जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@बन्या
घोर तपस्येनंतर आदित्यला बायको पावलीय
त्यामुळे तो सध्या चेकाळलेला असणारच

आयुर्वेद | महाराष्ट्र मंडळ | कूटप्रश्न | टेनिस | धार्मिक-साहित्य | नातीगोती | नृत्य | हितगुज ग्रूप | होमिओपथी | बागकाम | | आरोग्य | वधु वर सूचक मंडळ | हस्तकला | इतिहास | धर्म >>>

:हाहा:, Lol

=))

चेकाळलेला आदे विचित्र दिसला....गंभीरच बरा दिसायचा....असो.
आहारशास्त्र आणि पाककृतीवरून आठवलं....देसायांच्या घरात कुठल्याही पाककृतीची क्वांटिटी पाहून गंमत वाटते नेहेमी....खाणारी तोंडं किती आणि लहानशा कढईत थोडंसं काहीतरी शिजवत असतात..एकादशीला ती थोरली जाऊ इवलुशी बटाट्याची भाजी करत होती....एकट्या सुमोलाही पुरली नसती ती....

आजच्या भागात … गोगलगाय व त्याच्या २५००० प्रजाती यावर मुरंब्याच्या बरणीचे चुन्याच्या डबीला मार्गदर्शन
उद्याच्या भागात …. पाककला सेक्शन मध्ये भगिनींसाठी बेडकाची चटणी कशी करावी याची रेसिपी
त्यानंतर गांडूळ शेतकऱ्याचा मित्र , त्याचे संवर्धन व निगा यावर नानांचे भाषण , मातीचा पोत कसा ओळखावा याचे प्रात्यक्षिक

ए मला सांगा ना कोणत्या भागात दाखवलेय(कोणत्या तारखेचा) आदेचा उपवास सुटला?(भारीच बाई, मला मानेवरचा कीस पहायची उत्सुकता आणि देश पुढे गेलेला पहायची घाई). Proud

त्या रितेश देशमुखने तर वात आणलाय.... प्रत्येक झीच्या सिरियलीत येतोय..(ट्रेलर पाहिला). जुयेरेगा किती तो नाटकी भाग होता... त्या थोराड अर्चुचे किंचाळणे... बंद केला टीवी.

अशुद्ध मराठी तर तो बोलतोच... आधीहि एका मुलाखतीत एकलेले. पण बहुधा तशीच त्यांच्या घरातली बोली भाषा असावी. एका दुर्मिळ मुलाखतीत, त्याचे बाबा व आई बोलत होते(कुठला तरी बातम्यांचा चॅनल होता काही वर्षापुर्वी) तर तेहि असेच अशुद्ध बोलत होते.

आनि, पन, त्यचे, जाला(झालं एवजी)... एकायला खूप विचित्र वाटत होते.

बाकी, लातुरला अशी भाषा बोलतात काय?(विचारात पडलेला... ).. तो लहानपणी लातुरला वाढलाय...

रितेश लहानपणी लातूर मध्ये नाही वाढला. तो मुंबईतलाच .
त्याचे बाबा " विलासराव देशमुख " लातूर मध्ये वाढलेले आहेत.

सध्या चाललेली किसिंग सीन ची चर्चा लक्षात घेता, झी मराठीने प्रत्येक सिरियल मध्ये हा आगळावेगळा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्यातरी प्रायोगिक तत्वावर होसुमियाघ मध्ये जानवी तिचा भावी नवरा आपटे यास एक उडते चुंबन देणार आहे, परंतु श्रीरंग गोखले त्यांच्या मध्ये आल्याने ते त्याच्यावर आपटणार आहे.

@ घना
ते पण दाखवतील परंतु त्याआधी, आमच्या वेळी गुलाबाची फुले किती दुर्मिळ होती हा मुराम्ब्याची बरणी व गिओ यांच्यातील परिसंवाद दाखवतील .
त्यानंतर "मी गुलाबाचे फुल झाले तर" हा अर्चुचा नकलांचा कार्यक्रम बघायला लागेल

पुढील कार्यक्रम
अर्चू व तिच्या नवर्याचे "डेंटल ब्रेसेस लावून कीस केल्यावर काय होते " यावर प्रात्यक्षिक
विशेष उपस्थिती डॉक्टर झोलाछाप हातोडीवाला (होसुमियाघ फेम, सध्या अमेरिकेत )

आज देसायांच्या डायनिंग टेबलवरील चघळायचा विषय, "अर्चुचे पात्र, कथेची गरज कि निव्वळ चोंबडेपणा "

आजच बघितलेल्या ट्रेलरमध्ये मुरंब्याची बरणी साडीऐवजी चक्क ड्रेसमध्ये दिसली. अर्चु मेदेची स्तुती करताना दाखवली.
म्हणजे आता इथेसुध्दा (तिकडे जानूने गोखले कुटुंबियांना सुधरवले तसे) मेदे समस्त देसाई कुटुंबियांना सुधरवणार तर! यात किमान दोन आठवडे तरी नक्कीच जातील. जर मेदेला संपुर्ण देसाईवाडी सुधरवयाची असेल तर आणखी दोन आठवडे!
चालु राहु द्या पाणी घालणे; फक्त अजुन पाऊस कमी पडतो आहे याची काळजी घ्या. Happy

आता हा आदे गायब झालाय आर्चीच्या सुचविलेल्या आयडियामुळे......तसाच कुठे जाऊन मेला तर मी ही मालिका बघायचे सोडून देणार

काहीही खास घडत नाहीये....आता बहुदा आदिच्या विरोधाला न जुमानता मेदे खर सांगून टाकेल आणि मग जरा गदारोळ उडेल....आणि थोडंस तरी काहितरी घडेल...उगाच टीपी करत बसले आहेत...त्या सुमोचा पंजाबी ड्रेस आणि नानांचा बर्मुडा.... Sad

त्या भोचक अर्चुने नाहीतर स्वतः आदेनेच पळवली/ लपवली/ गायब केली असेल गायब आया सारखी.:फिदी:

आदे जाम कन्टाळला असेल मेदेच्या "सत्य वदे वचनाला नाथा".:फिदी:

Pages