Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
अतीच अतार्किक आहे ही मालिका
अतीच अतार्किक आहे ही मालिका आता!!
असेल तिचे प्रेमप्रकरण साबा साबुनी नणदेने मधे मधे काय करायचे? खरे बोला राव पण मागचे उकरून राडे करू नका.
असे का नाही म्हणाले की तिला शांतपणे विचारूयात?
नि कधीपासून हे लोक देवाचे इतके मानायला लागले? मनाची नाती महत्वाची असा ढिंढोरा पिटत होते ना आधी?
हे सगळे पाणी घालणे आहे....
आता तरी मेदे-आदे वेगळे राहणार का?
आणत्तील आण्तील. काय भरोसा या
आणत्तील आण्तील. काय भरोसा या झी वाल्यान्चा? आता वेड लागल्यासारखे प्रत्येक पिक्चर्चे प्रमोशन करत सुटलेत. मागे लय भारी, आता पोष्टर बॉईजचे. वैताग आला राव. चान्गले फुबैफु चाल्ले होते तर मध्येच यान्च्या मुलाखती.
देवा वाचव रे आता.
>>>>>>आणत्तील आण्तील. काय
>>>>>>आणत्तील आण्तील. काय भरोसा या झी वाल्यान्चा? आता वेड लागल्यासारखे प्रत्येक पिक्चर्चे प्रमोशन करत सुटलेत. मागे लय भारी, आता पोष्टर बॉईजचे. वैताग आला राव. चान्गले फुबैफु चाल्ले होते तर मध्येच यान्च्या मुलाखती.
देवा वाचव रे आता.
.............................
आपका भविष्य आपके हाथ मे है …. रिमोट
काल सुमो ला एकच डायलॉग
काल सुमो ला एकच डायलॉग होता......फसवलं ....फसवलं या दोघांनी....२-३ वेळ तरी बोल्ली ती....
सुमो उर्फ माई फार्र म्हणजे
सुमो उर्फ माई फार्र म्हणजे फार्रच हेकेखोर आहे.
हो खायचे वेगळे दाखवायचे
हो खायचे वेगळे दाखवायचे वेगळे!! लग्नाआधी अफेअर असलेली सावर्डेची बायको चांगली पण सून मात्र नाही.
>>>>>>>काल सुमो ला एकच डायलॉग
>>>>>>>काल सुमो ला एकच डायलॉग होता......फसवलं ....फसवलं या दोघांनी....२-३ वेळ तरी बोल्ली ती....
.....................
म्हणजे एकूणच सुमो सध्या "जाड्या ढोल्या रड्या ढोल्या" च्या भूमिकेत घुसालेय तर
मला एक कळत नाही.. आधी सुमो
मला एक कळत नाही.. आधी सुमो आणि गिओ इतके फंडे मारत असतात की त्यांच्यात जो काही प्रॉब्लेम आहे तो त्यांचा त्यांनीच सोडवायला हवा वगैरे.. आणि मग आता आदेवर का इतकी चिडचिड करतात की तू तरी आम्हाला सांगायला हवं होतस म्हणून !
बाकी ह्या सगळ्या प्रकारात काम सगळे कलाकार चांगलं करत आहेत मात्र..
ती अर्चू तर अशी रडत होती जसं
ती अर्चू तर अशी रडत होती जसं काही कोणी गचकलचं आहे
आनची एंट्री मस्ट आहे आता / मेदे प्रेग्नंट, मग संशय वगैरे वगैरे.......
या सगळ्या साखरेत घोळलेल्या
या सगळ्या साखरेत घोळलेल्या गप्पा मारणार्यां पात्रांनी आपण जेलस माणसं आहोत हे दाखवून दिले आहे. बहुतेकांचा इगो हर्ट झालेला दिसतो आहे. आदे आणि मेद यांचा प्रॉब्लेम, त्यानी दोघानी सोडवला. त्यात इतरानी कशाला पडायला पाहिजे? आपल्या घरात प्रत्येकाला त्याची स्पेस दिली जाते वगैरे आधी मोठमोठ्याने बोलत होते ते कशाला? आता खरे तर काही प्रॉब्लेम नाहीच, तर उद्या ही मेदे आदेला सोडून गेली तर वगैरे बोलणी ऐकून आणि रडारड बघून डॉक्याला शॉट लागला आहे. आता टिपिकल सासू-सून संघर्ष सुरू होणार वाट्टे. आणि सतत डोकावणारे बाबाजी आता कुठे हरवले?
ती अर्चू तर अशी रडत होती जसं
ती अर्चू तर अशी रडत होती जसं काही कोणी गचकलचं आहे <<<
हेच लिहायचे होते मलाही!
बाकी जेवणावर का राग काढत आहेत सगळे? कोणीच जेवणार नसेल तर स्वयंपाक करू नका म्हणाव!
उगाच वाया जाते अन्न! हल्ली भाज्या काय महागल्यायत!
बेफि, इथे लिहिण्यापेक्षा
बेफि, इथे लिहिण्यापेक्षा अन्या तरी पुर्ण करा
बाकी ह्या सगळ्या प्रकारात काम
बाकी ह्या सगळ्या प्रकारात काम सगळे कलाकार चांगलं करत आहेत मात्र..>>
हो, आदित्य आणि अमीत मधला प्रमोशन बद्दल सांगतो आणि गिफ्ट देतो तो सीन छान झाला. आदित्य काम छान करतो
खर तर हा आदे आणि मेदे चा
खर तर हा आदे आणि मेदे चा प्रोब्लेम आहे आणि त्यात आदे जर स्वताच्या बायकोला इतक सांभाळून घेतो आहे तर इतरांनी बोलण्याचा आणि रडण्याचा संबंध येतोच कुठे ? बर आत्ता त्या दोघांच सुद्धा जुळलेल आहे .मग प्रोब्लेम काय आहे ?
<<बाकी जेवणावर का राग काढत आहेत सगळे? कोणीच जेवणार नसेल तर स्वयंपाक करू नका म्हणाव!
उगाच वाया जाते अन्न! हल्ली भाज्या काय महागल्यायत! >> करेक्ट
बाकी जेवणावर का राग काढत आहेत
बाकी जेवणावर का राग काढत आहेत सगळे? कोणीच जेवणार नसेल तर स्वयंपाक करू नका म्हणाव!
उगाच वाया जाते अन्न! हल्ली भाज्या काय महागल्यायत!>>>>>>>>>>>>> हे बाकी खरंय.
ती अर्चू तर अशी रडत होती जसं
ती अर्चू तर अशी रडत होती जसं काही कोणी गचकलचं आहे>>> + १००००००००००००००००००० .
मला तर वाटलं गेला बाजार कोणीतरी ( सुमो) हास्पिटलात आहे की काय ?
अमित जेन्युईन वाटला आवडला , " चुका तुम्ही करायच्या आणि वर उपोश्ण करून आम्हाला त्रास द्यायचा की तुम्हाला जेवायच निमन्त्रण पाहीजे "
मेघना हे पात्र गंडलं आहे.
मेघना हे पात्र गंडलं आहे.
अख्खी शिरेलच गंड्ली आहे..
अख्खी शिरेलच गंड्ली आहे..
मेघना हे पात्र गंडलं आहे. >>
मेघना हे पात्र गंडलं आहे. >> बेफी लवकर कयलं.
(सुमो टोने मध्ये कळलं आहे ते बरं का )
दक्स दांभिकपणा आहे सगळा ...
दक्स
दांभिकपणा आहे सगळा ... नानांचं न्यानामृत कुठे गेलं आता? वा!!!!!!
आता झलक दाखवली. आदित्य
आता झलक दाखवली. आदित्य अर्चुला विचारतो की ती पेटी शोधुन माईला दाखवण्याचा भोचकपणा केलास कशाला. तर मेघना आदेला म्हणते की तिच्यावर का ओरडतोयस. लग्गेच् माईमधली सोकोल्ड ( येस्स, नॉट सोकॉल्ड) आई जागृत होऊन ती आधीच गट्टाणे असलेले डोळे मोठे करुन म्हणते माझ्यासमोर माझ्या मुलावर आवाज चढवायचा नाही ह!
हायला, इतकी मायाळू, प्रेमाळु कशी झाली ही लग्गेच? आणी आदे आता नुसता तिचा मुग्गा नाहीय्ये काई, तो मेदेचा पण नवरा आहे म्हणल! चावट्ट कुठली.:फिदी:
मुग्गा
मुग्गा
आता मेघनाने आपला रडूबाईपणा
आता मेघनाने आपला रडूबाईपणा एकदा तरी सोडून देऊन सर्वांसमोर ठामपणे सांगावे की हो, होतं माझं लग्नाआधी प्रेम. गुन्हा आहे काय? नवर्याला माहीत आहे, त्याने मला अॅड्जस्ट होण्यासाठी टाइम आणि स्पेस दिलीय, तुम्हांला काय प्रॉब्लेम आहे? आणि इतक्या नाजुक आणि खाजगी गोष्टी चारचौघांत ढोल वाजवून सांगायच्या की काय? काहीतरी खाजगीपणा नको का? आणि तिने ते सारखं सारखं सॉरी म्हणणं सोडावं बुवा आता. आणि त्या अर्चू नामक ढालगज भवानीला लेखकमहोदयांनी थोडी समज द्यावी. अगदीच लाडोबा दाखवलाय. उगीच इथे तिथे भोचकपणा करीत हिंडतेय. जा म्हणावं आता स्वतःच्या घरी आणि सांभाळ स्वतःचा संसार. किती दिवस त्या नवर्याला 'जणू काही' घरजावई करून ठेवलंय. पूर्वीच्या नणंदा कुटिल कारस्थानाने भाऊभावजयीमध्ये बखेडा निर्माण करीत, आताच्या या नणंदा अतिलाडाने तेच करताहेत. आणि आदित्यनेही एकदा खंबीरपणे सांगावं की नव्हतं सांगायचं आम्हांला हे. पुढे कधी वाटलं तर सांगितलंही असतं, पण माझ्यालेखी ते अगदीच बिनमहत्त्वाचं आहे.
.
सुकन्याबाईचं पात्र इतकं सुधारक दाखवलंय तर आता का फुसक्या मुद्द्यावरून अकांडतांडव चालवलंय?
अगदीच कृत्रिम आणि पहिल्यापासून गाठी उसवलेली विशविशीत मालिका.
हिरा एकदम राईट. सानी.
हिरा एकदम राईट.:स्मित:
सानी.:फिदी:
आताच्या या नणंदा अतिलाडाने
आताच्या या नणंदा अतिलाडाने तेच करताहेत.>>>+++++++ ११११११११ काय सही लिहिलंय .
रश्मी हीरा पोस्ट अगदीच पटली
रश्मी
हीरा पोस्ट अगदीच पटली पण तिला असे ठामपणे बोलण्यासारखे बरेच प्रसंग येऊन गेलेत आधीही... तेव्हा गोलगप्पे गिळून बसलेली... अचानकच तिला साक्षात्कार झालेला की पेंडोरा बॉक्सचं विसर्जन वगैरे करूयात!! म्हणजे मग ही करून सवरून नामानिराळी!! आता म्हणते आपली चूक होती... वागं वा!! बरीच आहे.
मला सुमो चे बरेचसे मुद्दे पटलेले. मैत्रीण काय? हाताला हात लावून मम म्हणताना... म्हणे निर्णय घ्यायचा होता!!! अर्थसंकल्पाचा निर्णय ही इतका वेळ खात नसेल. पण जाऊद्या ना आता त्यांचं त्यांनी सोडवलंय तर तुम्ही कशाला गुंता कर्ताय त्या रेशीमगाठींचा??
अर्चू मात्र उगाच गळे काढत होती... अजून तो आन परतायचाय!!! मग ही मेघी त्याला आवाज देइल ए व्हिलन...
सुमोचे मुद्दे मला पण पटले
सुमोचे मुद्दे मला पण पटले होते. पण आता मात्र घरच्यानी आदे व मेदे दोघानचीही बाजू एकदा नीट ऐकुन मग त्याना शान्तपणाने सन्सार करु द्यावा. पण असे करतील तर ती माई आणी अर्चु कसली. विजया पण कायम कुम्पणावरच बसलेली असते. काकान्सारखी. आता काका कोण ते विचारु नका. ते जगजाहीर आहेत पक्ष बदलाकरता.:खोखो:
ए व्हिलन... >>
ए व्हिलन...

>>
सुमो मला अजिबात नाही पटली.
सुमो मला अजिबात नाही पटली. देवाब्राह्मणासमोर लग्न लागलं ना, रजिस्टर झालं ना? मग आ आणि मे पतिपत्नीच आहेत. मम म्हणताना, पूजा करताना त्यांनी कोणाचीच फसवणूक केलेली नाहीय. संबंध झाले तरच तुम्ही पतिपत्नी होता असं काही नाहीय. (थोडं सीरियस्ली :कॉन्जुगल राइट्ससाठी दाद मागता येते आणि विवाहविच्छेद होऊ शकतो. पण तोपर्यंत पतिपत्नीच. लग्नाच्या पहिल्या दिवशीच टाकलेल्या बायका सुद्धा भोळ्या भावाने आणि नवरा नांदवेल या आशेने वटसावित्री करतात. व्रतं वैकल्यं करतात.)
शिवाय आता मे मनोमन आणि तनोतन सुद्धा आ ची झालीय तर त्यात आता अनैतिक असंसुद्धा काही नाही. मनाने वरणे हा प्रकार पूर्वापार आहेच. त्यामुळे थोडं आधीही ते अनैतिक अथवा अनुचित नव्हतं.आताचे रुसवे फुगवे जराही पटत नाहीत.
मे चं कॅरॅक्टर आतापर्यंत थोडसं संभ्रमित, डळमळीत दाखवलंय. पण आता ती सावरलीय तर निकराच्या क्षणी तिने आपली बाजू मांडायला हवी. तर या सीरियलला सध्याच्या काळात काही मीनिंग येईल.
ही मालिका आता प्रौढांनी
ही मालिका आता प्रौढांनी पाहण्यासारखी राहिलेली नाही. तिला 'फॉकिओ' सर्टिफिकेट द्या सेन्सॉरकडून! फॉर किड्स ओन्ली!
Pages