जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बाय द वे, सलमानला आधी आदेच्या रोलबद्दल विचारणा झाली होती, पण इतका वारंवार अभिनय करणे, तेही पूर्ण शर्ट घालून, शक्य नसल्याने त्याने विनम्र नकार दिल्याचे समजते.

केवढी मोठी संधी घालवली>>> Happy

त्या अर्चु म्हणजे शर्मिष्ठा राउत च्या नवर्याने किंवा शिरेल वाल्या नवर्याने...लग्नात हा उखाणा नक्कीच घेतला असेल बायको साठी...

गुलाबाच्या झाडाला मोगर्याच्या कळ्या
गुलाबाच्या झाडाला मोगर्याच्या कळ्या
माझ्या अर्चुचे ( शर्मिष्ठेचे ) दात म्हणजे दुकानाच्या फळ्या

कालच्या फु बाई फु महा अंतिम सोहळ्यामध्ये मेदे ने मंगळागौरीची हौस भागवून घेतली. आदे नव्हता पण, भाऊ कदम होता बरोबर.
मेदे फारच बुटकी आहे, नाचताना अगदी जोशात नाचत होती.

अनिष्कापुतणे,

अर्चूमावशीबद्दल अद्वातद्वा बोलू नकोस.

तिला स्क्रीनवर पाहिले की मला हे गाणे आठवते:

देखनेवालोंने क्या क्या नही देखा होगा
मेरा दावा है के तुझसा नही देखा होगा
जिस तरहा मैने तेरी राह तकी है बरसो
यूं किसीने तेरा रस्ता नही देखा होगा

देसायांच्या घरीपण आहे ना मंगळागौर? काल अ‍ॅड बघितली..<<<

मंगळागौरच तर चाललीय की दोन वर्षे! आधी आदे आणि मेदे चा झिम्मा झाला, मग जेजुरीला फुगडी झाली, वडाखाली पिंगा घातला, आता भोवळ येणे उरलेले आहे.

बेफी :हाहा:.. मी नाही बघत पुर्ण सिरीअल .. एलतिगोच्या आधी ५ मिनिट येतं कधीतरी ऑनलाईन बघताना .. नाहीतर इथले अपडेट्स..

देसायांच्या घरातल्या पुरुष मंडळी कसली गोड आहेत .
मंगळागौरीच्या सकाळी सकाळी स्वताच्या अर्धान्गीनिंसाठी साठी सकाळचा नाष्टा तय्यार Happy

>>>संपेल का आता मालिका?<<<<<

छे छे. किमान एक वर्ष चालेल हे सुमोच्च्या एका वाक्यात दडलेले गुपित आहे.

"तु माझ्या मुलासाठी ज्या क्ष्णी असे काही करशील कि त्याने माझी खात्री होइल की तु त्याला मनोमन स्विकरले आहे असे समजेन."

आता लावा अर्थ ह्याचा,

१) आदे मरणार
२) आदे आजारी, मेदे रक्त देणार
३) मेदे मरणार कशाने तरी आदेच्या चुकीने

२) आदे आजारी, मेदे रक्त देणार
>>>
मग ते रक्ताचे भाऊ बहीण होतील की Uhoh Proud

आदे मरणार , मेदे ला सगळे टोचणार की तू माझ्या मुलाला सुख दिलं नाहीस , मेदे तरीही त्याच्या फॅमेलीला सांभाळणार. माई/ नानांचं आजारपण काढणार.

काही वर्षांनी मेदे पुन्हा कुटुंबाची लाडकी होणार. मग घरचे मेदे च लग्न लावूयात म्हणणार. मेदे नाही म्हणणार... तोपर्यंत मयु, साक्षी लग्नाच्या वयाच्या होतील. मग त्यांच्या लग्नात मेदेची भेट कोणाशी तरी होणार. मेदेच्या तो प्रेमात पडणार. कुटुंब म्हणणार याच्याशी लग्न कर. मेदे नकार देणार.... तो कोणीतरी अ‍ॅक्च्युअली खुप वाईट असणार. मग त्याचा मेदे पर्दाफाश करणार. आणि अचानक तिला कळणार की आदे जिवंत आहे.
ती त्याच्याकडे धाव घेणारच इतक्यात तिला कळणार की तो तिला विसरलाय.....

अ‍ॅण्ड सो ऑन!!!!!!!!!!!!!!!!!!

पेटी दुस-या किना-यावर उभ्या असलेल्या आन ला मिळेल का?

चांगली पेटी होती हो, उगाच वाया घालवली, आतले काढून वापरायची ना, काही नाही तर मसाले तरी ठेवले असते..शिवाय विसर्जन करून ती विरघळणार आहे का?

न विरघळणारे पदार्थ नदीत फेकायचे आणि मग नद्या साफ करायच्या घोषणा करून निवडून यायचे.

भाजपवाले असलेच!

त्या चारपाचजणांना सांगा हे, त्यांचा एक दिवस जाईल त्रागा त्रागा खेळण्यात!

"तु माझ्या मुलासाठी ज्या क्ष्णी असे काही करशील कि त्याने माझी खात्री होइल की तु त्याला मनोमन स्विकरले आहे असे समजेन." >>> प्रेग्नंट रहा म्हणाव मेदेला.. लग्गेच खात्री पटेल साबांची..

प्रेग्नंट रहा म्हणाव मेदेला.. लग्गेच खात्री पटेल साबांची..<<<

हा फार पारंपारीक विचार झाला. काही आधुनिक उपाय नाही का?

खात्रीलायक उपाय आहे हा बेफी.. आणि मेदेच्या साबा पारंपारिक विचारांच्याच आहेत हे सध्या त्या सिद्ध करत आहेत नै का?

काल अनेक परिपक्व विचारांच्या महिलांनी बालिशपणाचा कहर चालवलेला होता.

हातात सूप घेऊन लहान बाळाकडे लाडाने बघतात तसे त्या सुपाकडे बघत मेदे 'कशी मी नाचू' म्हणत ठुमकत होती. सांगतंय कोण नाचायला? दहापाच वैश्विक आकाराच्या बायका तोंडाला येईल ते स्तोत्र उच्चारत होत्या आणि काही जणी जमीनीवर लोळून निषेध व्यक्त करत होत्या. मध्येच सगळ्यांनी एकमेकींना आनंदाने टाळ्या द्यायला सुरुवात केली. नवरात्रातल्या अष्टमीला अंगात आलेल्या बायकाही ह्यापेक्षा सुसंबद्ध वागताना दिसतात.

येऊन जाऊन ती अर्चूच काय ती खत्तरनाक दिसत होती.

सुमोबाई गौरी बसवल्यासारख्या एका खुर्चीवर बसून होत्या.

Pages