Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिर्ची, कृपया दुसर्या
मिर्ची,
कृपया दुसर्या संकेतस्थळांचे स्क्रीनशॉट, प्रताधिकार असलेले फोटो इथे देऊ नका.
मिर्ची तो विनोदी लेख नाही
मिर्ची तो विनोदी लेख नाही
जाई, मला तो विनोदीच वाटला.
जाई, मला तो विनोदीच वाटला. दुमत असू शकतं.
ओके चिनूक्स. एक चित्र शंभर शब्द टंकायचं वाचवतं. पण ठीक आहे.
आब्र +१
उदय,
मिडिया....आत्तापर्यंतच्या पानांवर मिडियाच्या विश्वासार्हतेचे अनेक दाखले दिले आहेत. रहिवासी का भारतींच्या मागे उभे आहेत?
कायदेमंत्र्याने जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाहीत म्हणून पोलिसांवर ओरडणं तुम्हाला योग्य नाही वाटत? मग आपलं दुमत आहे. दिल्लीकर पोलिसांच्या अरेरावीला कंटाळले आहेत. पोलिस स्वतः वाईट नसतील, पण नेत्यांपुढे त्यांना झुकायला लागतंय असं दिसतं.
दारू-माफियाशी लढताना मारल्या गेलेल्या पोलिस कर्मचार्याच्या कुटुंबियांना १ कोटी रूपये मदत देणारे सुद्धा हेच आप वाले होते.
मिर्ची यांचा चित्र देण्याचा
मिर्ची यांचा चित्र देण्याचा उद्देश वाईट नाही. ही चित्र इथून हटवून काय होईल ?>>>>>>> सहमत हि देशाची सध्याची वस्तुस्तिथी आहे. एकीकडे ज्या मुली फासावर लटकलेल्या आहेत त्यांच्यासाठी दिल्ली सारखे आंदोलन झाले नाही कारण त्या ग्रामीण भागातील आहेत, शहरात अशी एखादी घटना घडली असती तर देश पेटून उठला असता . शिवाय त्या मुली दलित आहेत हाही एक फ्याक्टर असावा. कुठल्याही राजकीय पक्षानेही हे प्रकरण लावून धरले नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे कदाचित ह्या दलित मुली आहेत न मग ते आठवले, मायावती काय ते बघून घेतील आपण का लक्ष घालावे असा हेतू असावा. तर दुसरीकडे विकास राज्य गुजरात मध्ये स्त्रियांना हंडाभर पाण्यासाठी कशी वणवण करावी लागते ह्याचे विदारक दृश्य दिसते.
एकीकडे ज्या मुली फासावर
एकीकडे ज्या मुली फासावर लटकलेल्या आहेत त्यांच्यासाठी दिल्ली सारखे आंदोलन झाले नाही कारण त्या ग्रामीण भागातील आहेत, शहरात अशी एखादी घटना घडली असती तर देश पेटून उठला असता .
. राजकारण्यान्ची (राज्याचे मुख्यमन्त्री अखिलेश यादव आणि पक्ष नेते मुलायम यादव) मिडिआ समोरची स्टेटमेन्टस ताज्या जखमेवर मिठ आहे.
------ सचिन ते चित्रे बघुन आपलीच आपल्याला लाज वाटावी अशी घटना आहे. भावना व्यक्त करायला शब्द नाही आहेत
अपराध्याना कितीही कठोर शिक्षा झाली तरी त्या दोन निष्पाप जिवान्ना जबर किम्मत चुकवावी लागली ना...
या प्रकरणात दिल्ली सारखे मोठे आन्दोलन झाले नाही या तुमच्या निरीक्षणाशी मी सहमत. प्रश्न केवळ दिल्ली आणि ग्रामीण भाग हा नाही आहे... कुठेही महिला सुरक्षीत नाही आहे हे कडवट सत्य आहे.
पगारे +१ उदय +१ प्रचि खरंच
पगारे +१
उदय +१
प्रचि खरंच फार अस्वस्थ करणारं आहे. काढून टाकलंय.
आणि सगळ्यांत भयानक गोष्ट म्हणजे ह्या मुलींवर बलात्कार कधी झाला माहीत आहे? जेव्हा त्या शौचासाठी जागा शोधायला बाहेर गेल्या होत्या.
नंदिनी,
शौचालये बांधणं हे कोणाच्या अखत्यारीत येतं हे सांगू शकाल का? नागरिकशास्त्राच्या पुस्तकात लिहिलं असेलच ना.
ग्रामीण भागात राहणार्या ६५% भारतीयांना शौचालयासारखी मुलभूत सुविधा अजून आपली व्यवस्था देऊ शकलेली नाही. पैशाची कमतरता? मग स्विस बॅंकेत एका वर्षात ४०% धन कसं वाढलं असेल बरं?
प्रश्न केवळ दिल्ली आणि
प्रश्न केवळ दिल्ली आणि ग्रामीण भाग हा नाही आहे... कुठेही महिला सुरक्षीत नाही आहे हे कडवट सत्य आहे.>>> +१ महिलांना एक दुबळा घटक म्हणून जोपर्यंत समजले जाते आणि त्यांना आपण कसेही वापरु शकतो असे समजले जाते तो पर्यंत हेच होणार. कितीही शिकले सवरले तरी समाजातली ही वृत्ती जात नाही. महिलांवरच्या अत्याचाराविरोधात लढायची गरज पडणार नाही तो सुदिन. इथे राजकियपेक्षाही समाजप्रबोधनाची गरज आहे. असले घाणेरडे लोक्स कुठल्याही पक्षात असू शकतात. इथे पक्षभेद, जातीभेदापेक्षा लिंगभेद अपराध करतोय.
मी जरी कॉंग्रेस चा समर्थक
मी जरी कॉंग्रेस चा समर्थक असलो तरी आप ज्या प्रकारे राजकारण करते ते मला आवडले. आप हि समाजाची गरज आहे आप नसले तर नुकसान जनतेचेच होणार हे स्पष्ट आहे.सत्ताधारी हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपरूपी अंकुश हवाच.
<< कितीही शिकले सवरले तरी
<< कितीही शिकले सवरले तरी समाजातली ही वृत्ती जात नाही.>>
आधी मीही असलीच वाक्ये बोलून स्वतःचीच समजूत घालून घेत होते. पण आता वाटतं, नाही...समाजाची वृत्ती घालवण्यासाठी कठोर कायदे हवेत.नेत्यांची इच्छाशक्ती हवी. आणि आपलं सहकार्य हवं.
केजरीवालांनी रस्त्यावर झोपण्याचा जो काही समारंभ केला होता तो कितीही विनोदी असला तरी मला ह्यामुळेच योग्य वाटतो. "जिथे बलात्कार झालाय तिथल्या कुणा तरी अधिकार्याला ह्यासाठी जबाबदार ठरवा, एका पोलिस अधिकार्याला बडतर्फ करा. आपोआप गुन्हे आटोक्यात येतील." ही मागणी मला रास्त वाटते.
दिल्लीत झालेल्या बलात्काराची नोंदसुद्धा करून घ्यायला पोलिस तयार नसतात. का?
इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये दिल्लीचे पोलिस कमिशनर नीरजकुमार ह्यांनी जी काही वक्तव्यं केली होती, ती पाहिल्यावर तर 'हा पोलिस कमिशनर??' ह्या विचाराने लाज वाटली होती.
सत्यपाल सिंगांनी काय केलं माहीतच आहे.
१. "बलात्कार कभी कभी सही होते है, कभी कभी गलत" - बाबुलाल गौर (भाजपा)
२. "कोई जानबूझ के बलात्कार थोडे ही करता है, वो तो हो जाता है" -रामसेवक पैक्रा (भाजपा)
३. "लडके तो लडके होते है, उनसे गलतियां हो जाती है" - मुलायमसिंग यादव (सपा)
४. "आप तो ठीक हो ना, तो क्यों चिंता करते हो?" - अखिलेश यादव (सपा)-बदायुं रेपनंतर एका पत्रकाराला उद्देशून
५. "जिन औरतोंपे बलात्कार हुआ है, उन को भी सजा मिलने चाहिये, जो संमती से संभोग करती है उन औरतों को फांसी पे लटकाना चाहिये" - अबु आझमी (सपा)
६. "मैं क्यों इस्तिफा दूं? मुझे लोगों ने ही चुना है" - निहालचंद (भाजपा)
हे असे लोक संसदेमध्ये बसून कायदे बनवत असतील तर महिला सुरक्षित कशा असतील?
नाउ आय कॉल धिस अॅज नाइव्ह !
पंतप्रधान मोदींनी बदायुं रेपनंतर कित्येक दिवस अवाक्षर काढलं नव्हतं. आंतरराष्ट्रीय मिडियाने सुद्धा ह्या प्रसंगाची दखल घेतली असताना. निहालचंदांची हकालपट्टी अजून झालेली नाही.
कसली शिस्त लागणार आहे समाजाला?
स्वतः मोदी ह्यांचं व्यक्तिगत आयुष्य स्त्रियांबाबत फारसं आश्वासक नाही. पण ते असो.
<<मी जरी कॉंग्रेस चा समर्थक
<<मी जरी कॉंग्रेस चा समर्थक असलो तरी आप ज्या प्रकारे राजकारण करते ते मला आवडले. आप हि समाजाची गरज आहे आप नसले तर नुकसान जनतेचेच होणार हे स्पष्ट आहे.सत्ताधारी हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपरूपी अंकुश हवाच.>> +१००
ती चित्रे काढून टाका >>> +1
ती चित्रे काढून टाका >>> +1
बदायुं हत्याकांडातल्या मुली
बदायुं हत्याकांडातल्या मुली दलित नाहीत. तो मोठा इश्यु नसावा. दलित नसल्या तरी गरीब आहेत. मौर्य समाजाच्या आहेत. या समाजाचे गुजरातेतले एक नेते राजेशकुमार मौर्य माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी विशद केलेली गुजरातेतली परिस्थिती वेगळी आहे. वर दिलेलं टँकरचं चित्र त्यांनीच प्रथमतः दिलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका इथे आदिवासींना बाजूला सारून बाहेरून आलेल्यांनी स्वतःचा विकास करून घेतला. अमेरीकेत तर रेड इंडीयन्सच्या कत्तली झाल्या. भारतातल्या जातीय दंगलींचा अभ्यास केला तर कुठल्या समाजाचं नुकसान होतं आणि कुठल्या नाही हे गुपीत राहीलेलं नाही. भारतातल्या विकासाची भाषा ही सर्वसमावेशक कधीच नव्हती आणि नाही. समाजाच्या या सेक्शन मधून नेतृत्व उभं राहू दिलं जात नाही. राहीलंच तर ते भांडवलदारी पक्षाच्या वळचणीने उभं राहीलं पाहीजे. त्याला मोठी प्रसिद्धी देण्यात येते. एक व्यक्ती एक मत असल्याने मांडलिकांची आवश्यकता असते. मांडलिकांच्या जोरावर साम्राज्य उभारता येतं.
पण जर मांडलिक म्हणून समजल्या गेलेल्यांमधून नेतृत्व उभं राहीलं तर त्यांची मोठी बदनामी केली जाते. निंदानालस्ती केली जाते. त्यासाठी मीडीया आपली भूमिका चोख बजावतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नेतृत्व महाराष्ट्रात उभं राहू नये म्हणून काँग्रेसने अगदी याच पद्धतीने यशवंतराव चव्हाणांना मोठं केलं. लालूप्रसाद यादवांचं राज्य उलथवण्यासाठी जॉर्ज फर्नांडीस आणि नीतीशकुमार यांचा वापर झाला. मायावतींनी स्वतःहून स्वतःचा वापर करू दिला. त्याची शिक्षा त्यांना मिळाली.
आत्ता देखील स्विस बँकेत ज्यांची खाती आहेत ते मोकाट आहेत. जयललिता भाजपकडे आल्या कि त्या कशा पवित्र झाल्या हे लिहीलंच आहे. टू जी आणि थ्री जी मधे काँग्रेससहीत भाजपाचे सगळेच नेते अडकलेले आहेत. रिलायन्स मोबाईल सेवेचे उद्घाटन महाजन - अडवाणींनी केलं. त्याच दिवशी बीएसएनएल च्या लँडलाईन सेवेत प्रचंड भाववाढ झाली. बी जी कोळसेपाटील यांनी सप्टें २०११ मधे फेसबुक वर आठवण लिहीली होती कि ते त्या वेळी समता पक्षात होते. जॉर्ज हे सर्वाधिक स्वच्छ समजलं जाणारं नेतृत्व होतं. या भाडेवाढीविरुद्ध कुणीच काही बोलत नसल्याने कार्यकर्त्यांनी संतप्त प्रश्न विचारले तेव्हां जॉर्ज यांनी वाजपेयींकडे विचारणा केली. वाजपेयी म्हणत मी सरकारच्या सल्लागाराला विचारून सांगतो. हा सल्लागार अंबानींनीच दिलेला असल्याने पुढे प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. पण जॉर्ज सरकारमधून बाहेर पडले नाहीत. या भ्रष्टाचारापेक्षा त्यांना चारा घोटाळा महान वाटत होता.
भाजप, काँग्रेस वगळता इतर कुणीही काहीही केलेलं नाही हा मीडीयाचा प्रचार आहे. पण त्यांनी आपसात लाथाळ्या करून देशापुढे दोनच पर्याय ठेवलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्याला जबाबदार तेच. त्यातल्या त्यात डावे प्रामाणिक आहेत. पण देशभरात त्यांचं जाळं नाही. निवडणूक आली की अचानक ते तिसरी आघाडी म्हणून जागे होतात. ती आघाडी करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. वेळेवर हे लोक का कामाला लागत नाहीत कळत नाही. मी डाव्यांचा समर्थक नाही, आपसमर्थक नाही, काँग्रेस समर्थक नाही, भाजप तर नाहीच नाही. इथल्या कुठल्याही पक्षाचा राजकीय अजेण्डा मी बाळगत नाही. तर देशातल्या बहुसंख्य समाजाला प्रतिनिधित्व कोण देऊ शकेल या विचाराने गोंधळलेल्या करोडो लोकांपैकी एक आहे. त्यातल्या त्यात सत्तेच्या जवळ जाऊ शकणा-या आणि आपल्याला परवडू शकणा-या पक्षाला मत देणारा एक सामान्य मतदार आहे.
गुडनाईट !
मिर्ची, >> जिथे बलात्कार
मिर्ची,
>> जिथे बलात्कार झालाय तिथल्या कुणा तरी अधिकार्याला ह्यासाठी जबाबदार ठरवा, एका पोलिस अधिकार्याला
>> बडतर्फ करा. आपोआप गुन्हे आटोक्यात येतील.
तुम्हाला आआपची ही मागणी रास्त वाटते. मात्र यातून बळीचा बकरा बनण्याची धास्ती वाढेल. पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होणार नाहीका? त्यापेक्षा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी याचा आग्रह धरणे सयुक्तिक ठरेल. त्याचप्रमाणे तपासात हयगय केली तरच पोलीसांस बडतर्फ करावे, अन्यथा नको. असं माझं मत पडतंय.
आ.न.,
-गा.पै.
कालचे फोटो मीही पाहीले.वास्तव
कालचे फोटो मीही पाहीले.वास्तव माहीत असते पण त्याला बघताना सर्र्कन काटा येतो.ते फोटो इथून काढले तरी त्याची दाहकता एका घटनेपुरती मर्यादित नक्कीच नाही.त्यामुळे ते प्रचि असेही ठेवले असते तरी चालले असते.
नागरीकशास्त्र- इतिहास आणि भूगोलाला पुरवणी असल्यासारखा विषय.इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकांना पुरवणी जोडावी तसं पुस्तक,बोर्डात यायचं म्हणून आपण घोकलेला पहिला आणि शेवटचा विषय. आणि तो विषय शिकवणारे इतिहासाचेच रटाळ मास्तर.आपलं सगळ्यांचंच नागरीक शास्त्र शेवटी कच्चच राहीलं.
ना.शा.च्या पुस्तकात भारतीय घटनासंदर्भ बरीच माहीती आहे.पण ना.शा.चं पुस्तक खालील गोष्टी शिकवत नाही
१-डोमेसाईल्/नॅशनॅलिटी काढताना पाचशे-हजारची खिरापत देणे कसे टाळावे?
२-तलाठ्याने २५०००-३०००० हजार मागितले असता आपल्याला,मनस्ताप न होता ते काम कसे करावे?
३-आमच्या भांडीवाल्या मावशींना ५००० रुपये फक्त मध्ये आपले मत विकले.सहा महीन्यांनी त्यांना विचारले असता ते पैसे केव्हाच संपले असे मावशींचे उत्तर.. या प्रसंगात प्रबोधन कसे करावे?
४-अमूक-तमूक उमेदवार्/नोकर्/खासदार्/आमदार या संख्या विविध घटनात्मक कार्यालयांच्या(संसद्,विधानसभा, वपंचायत समिती) -- ही प्रत्यक्षात मॅनेज कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक वा डेमो?
५-सरकारी कार्यालयात गेल्यानंतर कमीतकमी वा जास्तीतजास्त किती खेट्यामध्ये काम केले जाईल याची मूळ संख्या?
६-कायदेसंमत ज्या संस्था आहेत ज्या कायदेशीर कामे करतात त्यांच्या प्रलंबित खटल्यांची संख्या आणि त्याची कमीतकमी मर्यादा किती आहेत?
७-नगरसेवकाने/आमदाराने त्याची हांजीहांजी न करता करावयाची कामे याची यादी?
८-
९-
..
.
असे बरेच आहेत.आणि शाळेत शिकवलेलं कुणी विसरत नसतं.तिथंच तर सगळं शिकलेलो आहोत आपण हो.
नंदिनी,ना.शा. शिकायला मात्र मला तुमच्याकडेच यावं लागणार.तेव्हा ती शिकवणी चालू कराच.आणि गेल्या ६५ भारतात काय प्रगती झाली हा धागा लवकर काढा.मग मी बोलेनच.. कालपासून काहीच प्रतिसाद नाहिये तुमचा यावर खेळाडू वृत्तीने चर्चा होईल ही खात्री देतो.
ते फोटो टाकल्यानंतर काही प्रतिसाद फारच सकारात्मक आलेत.आपल्या देशात प्रत्येक गोष्टीचा आधी डेमो द्यावा लागतो.मग डोळे जरा कुठे किलकिले होतात.
आभार!
ब्र आ - प्रतिसाद आवडला,
ब्र आ - प्रतिसाद आवडला, विशेषत: शेवटचा परिच्छेद.
त्यातल्या त्यात डावे प्रामाणिक आहेत
----- डावे प्रामाणिक आहेत तर प. बन्गाल मधे अनेक वर्षे त्यान्चेच (बसू नन्तर भट्टाचार्य) एकछत्री सरकार होते, मग इतर प्रान्तान्च्या तुलनेने प्रगती का नाही साधली ?
ते फोटो टाकल्यानंतर काही
ते फोटो टाकल्यानंतर काही प्रतिसाद फारच सकारात्मक आलेत.आपल्या देशात प्रत्येक गोष्टीचा आधी डेमो द्यावा लागतो.मग डोळे जरा कुठे किलकिले होतात.>>>> डेमो कसला डोंबलाचा? म्हणजे त्या आधी लोकं झोपली होती असं म्हणायचंय का की मिर्चींनी खूपच काहीतरी वेगळं सांगितलं आणि लगेच इथल्या लोकांचं उद्बोधन झालं? तोपर्यंत लोक बिन्डोक होते? जेव्हा जेव्हा अश्या घटना घडतात तेव्हा संवेदनशील लोक अश्याच प्रतिक्रिया देतात. त्यासाठी कुणी चित्र टाकायचीच आवश्यकता आहे असं नाही. वर्षानुवर्षं बायकांवर अत्याचार होतच आहेत आणि त्यातले काही उघडकीला येतात तर काही नाही. त्या सगळ्याप्रकारच्या अत्याचारांचा लोक निषेध करतच आले आहेत. ही चित्रं एन्कॅश करण्यासाठी टाकलेली आहेत आपच्या निगेटिव्ह प्रचाराचा एक भाग म्हणून.
म्हणजे त्या आधी लोकं झोपली
म्हणजे त्या आधी लोकं झोपली होती असं म्हणायचंय का की मिर्चींनी खूपच काहीतरी वेगळं सांगितलं आणि लगेच इथल्या लोकांचं उद्बोधन झालं?<<< दोन्हीचं उत्तर ठार नाही,असच आहे. याचं स्पष्टीकरण देत नाही.
जेव्हा जेव्हा अश्या घटना घडतात तेव्हा संवेदनशील लोक अश्याच प्रतिक्रिया देतात. त्यासाठी कुणी चित्र टाकायचीच आवश्यकता आहे असं नाही. वर्षानुवर्षं बायकांवर अत्याचार होतच आहेत आणि त्यातले काही उघडकीला येतात तर काही नाही. त्या सगळ्याप्रकारच्या अत्याचारांचा लोक निषेध करतच आले आहेत.<<< फक्त निषेधच..??? हे वर्षानुवर्ष चालूच आहे आणि ६५ वर्षाचा विकास यातलं सूत्र ??? जरा विकास झाला-झाला असं म्हणणार्यांनी त्याचा लेखा-जोखा मांडावा की... एखाद्या पक्षाचा विरोध करताना वा त्याची बाजू घेताना काहीतरी कॉमनसेन्स धरुनच आपण बोलतो ना?? केजरीवाल चुकले असतील पण त्यांनी उभी केलेली चळवळ अशीच संपू द्यायची..??
ही चित्रं एन्कॅश करण्यासाठी टाकलेली आहेत आपच्या निगेटिव्ह प्रचाराचा एक भाग म्हणून.<< जरी असेल तरी सगळे सुज्ञ आहेत इथे काय घ्यायचं आणि काय टाकायचं एवढं कळतं आपल्याला.चला जाऊ दे आआपचं नाव बाजूला काढा या फोटोंमधून.... द्या मला उत्तर की हे चित्र प्रतिनिधीक आहे की एकमेव? आणि का? देता येईल... अश्विनीके मॅडम...??
फोटोचं काय घेऊन बसलात.झोपडपट्टीत पैसे देऊन आमचा नगरसेवक निवडणूक जिंकला.गेले १५+वर्षे इथल्या आमच्या सोसायट्या मागे लागल्या होत्या.रस्ते करा रस्ते करा...आवेदनं निवेदनं झाली...अगदी आमदार-खासदारापर्यंत तेव्हा जाऊन कुठे दोन एकूण ३.५ किमी रस्ते झाले पक्के.अजून बरेच बाकी आहेत तरी?? बोला?? तुम्ही म्हणता निवेदनं द्यायला हवीत..
<<ही चित्रं एन्कॅश करण्यासाठी
<<ही चित्रं एन्कॅश करण्यासाठी टाकलेली आहेत आपच्या निगेटिव्ह प्रचाराचा एक भाग म्हणून.>>
गेट वेल सून.
विज्ञानदास,
रेल्वेखाली चिरडून मेलेल्या मुलाचं पोस्ट्मॉर्टेम झाल्याचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सुद्धा ५०००रू ची दक्षिणा देणार्या आईला प्रत्यक्ष बघितलं आहे. तुमच्या यादीत भर.
हे चित्र प्रतिनिधीक आहे की
हे चित्र प्रतिनिधीक आहे की एकमेव? आणि का? >>> अहो काय तेच तेच? मी म्हटलंय ना की वर्षानुवर्षं हा बायकांवरच्या अत्याचाराचा प्रॉब्लेम अगदी जागतिक पातळीवर आहे. आणि सामान्य माणूस निषेध करु शकतो आणि समोर कुणी असं वागताना दिसलं तर स्वतःच्या अंगात बळ व मानसिक तयारी असेल तर जिवानिशी प्रतिकार करु शकतो आणि तशी प्रतिकार केल्याची उदाहरणं घडतातच. इथे फक्त ते एन्कॅशच करायला वापरलं आहे हे सगळ्यांना कळतंय. तरीदेखिल त्याकडे दुर्लक्ष करुन स्त्रियांच्या जेन्युईन प्रॉब्लेमसाठी हळहळ व्यक्त केली गेली, तर तुम्ही म्हणता मिर्चीताईंनी डेमो दिला म्हणून लोकं जागे झाले
अजून किती असं एन्कॅश करणार आहात? द्वेषाने आंधळं होऊन पेट्रोल प्राईसच्यावर मोदींच्या अॅडचा खर्च चिकटवून पोस्टर बनवणे वगैरे म्हणजे.... स्वतः पुन्हाच्या निवडणूका घ्यायचा आग्रह करुन जनतेला खेळासाठी खर्चात ढकलायला बघताय....कसं सिरियसली घ्यायचं तुम्हाला? जेव्हा हे द्वेषाने आंधळं आणि वेडंपिसं होऊन लिहिणं बंद करुन आप चा पॉझिटिव्ह प्रचार कराल तेव्हा बघू.
गेट वेल सून.>>> सेम टू यू
अश्विनी के यांच्या
अश्विनी के यांच्या प्रतिसादाला मान देवुन संपादित.
मग आमच्या देवाला का नावं ठिवु र्हायले लोकं !
देवा = नमो, रागां, अके पैकी कोनीही असु शकल बरं हॅ हॅ हॅ. (हे मक्या स्टाईलमधे वाचावे)
जेम्स बाँड, उगाचच काय त्यांचं
जेम्स बाँड, उगाचच काय त्यांचं नाव घेऊन लिहिताय? आयडीची खिल्ली कश्याला? नामसाधर्म्य झालं म्हणून काय झालं?
असो, अश्याप्रकारच्या धाग्यांमधून नविन काही निघणार नाही हे परत एकदा उमगलंय. राम राम.
द्वेषाने आंधळं होऊन पेट्रोल
द्वेषाने आंधळं होऊन पेट्रोल प्राईसच्यावर मोदींच्या अॅडचा खर्च चिकटवून पोस्टर बनवणे वगैरे म्हणजे.... <<< ठिक आहे पण त्यामागचं गणित,प्रति बॅरेल किंमती आणि सर्वच ठिकाणी एकंदर पक्षांनी केलेल्या अॅडव्हर्टाईजमेंट याचा ताळा बघा की.मोदींचं चित्र तिथून काढून पहा. पलीकडल्या धाग्यावर वित्तीय तुटीचं राजकारण कुछ हजम नही हो रहा... बरेच लोक चित्रविचित्र युक्तीवाद करतात त्याचंच हसू येतं.
द्वेषाने आंधळा वगैरे,,मी तरी निदान त्यातला नाही.निदान माबोवर तरी.कारण जे काय चांगलं करायचंय ते करा,पण करा.मोदी,गांधी किंवा कोणीही... आआपने मुद्दे उभे केले त्याची पाठराखण करतोय..त्यात द्वेष नाही कुणाबद्दल.मिर्चताई,आणखी कुणी,अगदी म्हणणं द्वेषात्मक 'वाटत असेल' फक्त,ते तसं आहेच असे कसे म्हणता?
जेव्हा हे द्वेषाने आंधळं आणि वेडंपिसं होऊन लिहिणं बंद करुन आप चा पॉझिटिव्ह प्रचार कराल तेव्हा बघू.<<< पटले व मान्य... तरी तोपर्यंत काय,?
अहो काय तेच तेच? <<< ठिक आहे ते तुमच्यासाठी नाही इतर लोकांसाठी सांगितलं आहे असं धरा. असं फार विरळा होतं की लोकांनी प्रत्यक्षात विरोध केलाय.. दुसर्याच्या भांडणात न पडण्याचे किंवा 'इग्नोर' करण्याचे संस्कार आपल्या सर्वांना दिले जातात.त्यात चूक काहीच नसेल्,पण काहीवेळा टोचतच. हे आपणही मान्य कराल.
बाकीचा प्रतिसाद पटला आणि नेहमीच तुमचे प्रतिसाद व्यावहार्य असतात. ते आवडतातच.(पलीकडच्या धाग्यावर रेल्वे भाववाढीविषयी लिहीलेले आवडले +१ इथेच घ्या)
मी वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मिळणार का मला?? की ६५ वर्ष विकास हा एकतर्फीच झाला या विधानावर शिक्कामोर्तब करुयात!?
भरत मयेकर यांनी प्रश्न
भरत मयेकर यांनी प्रश्न विचारला आहे की हे सर्व लक्षात घेतलं तर चित्र काय उभं राहतं ? हे प्रश्न शक्यतो अनुत्तरीत राहतात. आत्ता देखील आआप ला शिव्याशाप देणा-यांनी कधीकाळी भरत मयेकर यांनी मांडलेली भूमिका घेणा-यांना शिव्याशाप दिलेच होते. अगदी पेड आर्मी स्टाईल. त्या वेळी म्हणे त्यांची मनं दुखावली होती. म्हणे एका महात्म्यावर चिखलफेक करू नका. आता त्यांनी ते केलं तर ..
असो. त्या त्या काळचे हे लेख. थोडंफार असंच मत अनेकांचं त्या वेळी होतं. पण मीडीयाने दुसरी बातमी न देण्याचा चंगच बांधला होता. त्यांच्यासाठी ती २०१४ ची रंगीत तालीम होती.
मोदी का विस्तार हैं केजरीवाल
जिस मीडीया ने बनाया उसी को कोस रहे है केजरीवाल
जंतर मंतर तहरीक चौक न बन पाया
चित्र काय उभं राहतं ?
Vidnyan daas sorry unable to
Vidnyan daas sorry unable to write in Marathi. if the Fiscal Deficit logic is not digestible then please counter it. just don't say you could not digest it. if you are saying there is no fiscal deficit you are discrediting institutes like Reserve Bank of India which prepares related numbers too. I really cannot help it if you cannot understand it but please don't make statements if you cannot justify it.
@युरो पलीकडल्या धाग्यावर
@युरो
पलीकडल्या धाग्यावर वित्तीय तुटीचं राजकारण कुछ हजम नही हो रहा... बरेच लोक चित्रविचित्र युक्तीवाद करतात त्याचंच हसू येतं.<<< तुमचा मुद्दा पटला आहे हो.पण इतर लोकं तो सोडून भाजपाच्या भाववाढीच्या निर्णयावर अडून बसलेत.ही वेळ येणारच होती.काँग्रेसने भाववाढ केलीच असती.जरा कमी असती कदाचीत.तेही असो.
पण हा महत्वाचा मुद्दा सोडून बरेच आयडी हे चिखल फेकीच्या मागे लागलेले आहेत.म्हणून म्हटलं की हे इकॉनॉमीचं राजकारण पचेना का या लोकांना नेमकं काय?
तुमच्या सर्व पोस्टबाबत दुजोराच आहे.
आब्र,
आता केजरीवालांना दुसरं घर मिळालं आहे.आता आपण नव्याने सुरूवात करुयात.
तेव्हा जुन्या बातम्या बास की हो आता.
आब्र, आता केजरीवालांना दुसरं
आब्र,
आता केजरीवालांना दुसरं घर मिळालं आहे.आता आपण नव्याने सुरूवात करुयात.
तेव्हा जुन्या बातम्या बास की हो आता. >>> नमोभक्तांपेक्षाही वाईट प्रतिसाद आहे हा तर. उदो उदो करणा-या जुन्या बातम्या चालतील ना ? नाही म्हणजे, जागता पहारावर जुनं पुराणं सगळंच बाहेर काढलंय आता..
आता ज्या लिंक्स दिलेल्या आहेत
आता ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या सुरुवातीला सापडल्या असत्या तर एकच पोस्ट पुरेशी होती माझ्यासाठी. मी काही केजरिंचा शत्रू नाही. पण इथं फेक आयडी कुणाचा आहे याची लोकांना चर्चा कराविशी वाटते, इथे एक माणूस देश चालवीन म्हणतो, त्याची पार्श्वभूमी माहीत नको का ? कुठल्याशा एखाद्या संघटनेचे संस्कार लपवण्यापेक्षा जाहीर केलेले केव्हांही चांगले. हे संशयाचं धुकं जोवर हटत नाही, तोवर अशा माणसाचा स्विकार करणे अवघडच वाटते.
https://groups.yahoo.com/neo/groups/PWAP/conversations/topics/29433
ही एक चर्चा आहे. संदर्भ तपासलेले नाहीत. पण मुद्दे चिंताजनक आहेत..
<<द्वेषाने आंधळं होऊन पेट्रोल
<<द्वेषाने आंधळं होऊन पेट्रोल प्राईसच्यावर मोदींच्या अॅडचा खर्च चिकटवून पोस्टर बनवणे वगैरे म्हणजे.... स्वतः पुन्हाच्या निवडणूका घ्यायचा आग्रह करुन जनतेला खेळासाठी खर्चात ढकलायला बघताय....कसं सिरियसली घ्यायचं तुम्हाला? >>
तिकडे उत्तर दिलंय ह्याला.
माझे ३-४ अगदी बेसिक प्रश्न आहेत -
१. जी भाडेवाढ आत्ता करण्यात आली आहे त्यासाठीच सत्तेत येईपर्यंत भाजपाने (मोदींनी पत्र सुद्धा लिहिले होते) आकांततांडव का केला होता?
२. वित्तीय तूट आहे तर स्विस बँकेतला पैसा इतका एक्स्पोनेन्शिअली का वाढतोय?
३. रिलायन्स जो गॅस २$ प्रति युनिटला बांग्लादेशला विकतंय, तोच गॅस आपलं सरकार रिलायन्सकडून ८$ प्रति युनिटला का विकत घेत असावं?
४. प्रचारादरम्यान कोट्यावधी रूपयांचा झालेला खर्च कोण आणि का करत असावं?
उत्तरें माहीत असतील तर कृपया द्यावीत.
<<ठिक आहे पण त्यामागचं गणित,प्रति बॅरेल किंमती आणि सर्वच ठिकाणी एकंदर पक्षांनी केलेल्या अॅडव्हर्टाईजमेंट याचा ताळा बघा की.मोदींचं चित्र तिथून काढून पहा. पलीकडल्या धाग्यावर वित्तीय तुटीचं राजकारण कुछ हजम नही हो रहा... बरेच लोक चित्रविचित्र युक्तीवाद करतात त्याचंच हसू येतं.>> +१
बरं. २-३ दिवसांचा राजकारण
बरं. २-३ दिवसांचा राजकारण संन्यास घेतेय
पुन्हा भेटूच.
तोवर नवीन अफवा पसरलेल्या असतीलच.
वरच्या चित्रात निगेटीव्ह
वरच्या चित्रात निगेटीव्ह स्टोरी ऑन च्या नंतर कुणाचंही नाव चालू शकेल... त्या त्या कल्टला ते खुप आवडेल.
Pages