गोळा पाणी (खट्टे गुलाब जामुन)

Submitted by सायु on 13 June, 2014 - 03:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हरबर्‍या च्या डाळीचे पीठ(बेसन) : २ वाटया
तेल : अर्धी वाटी
हळद : १/२ चमचा
तीखट : १ चमचा
गोडा मसाला : १ चमचा
हिंग , मीठ : अंदाजे
चिंचेच कोळ : अर्धी वाटी
गुळ : अंदाजे (एक छोटी वाटी)

क्रमवार पाककृती: 

प्रथम दोन वाटया बेसन पीठ एका पसरट भांडयात किंवा परातीत घ्यावे.
त्यात १/२ चमचा हळद, मीठ, हींग, तिखट आणि दोन/तीन चमचे कच्च तेल घालुन घट्ट भिजवुन
घ्यायचे.(पुरी सारख) आता या पिठाचे लिंबा पेक्षा थोडे छोटे गोळे करुन तळुन घ्यावे. साधारण १५-२० गोळे होतात.
आता कढई गरम करुन त्यात दोन चमचे तेल घालुन मोहरी घाला, १/२ चमचा तिखट, एक चमचा गोडा मसाला घातला की लगेचच चिंचेच कोळ घाला, पाणी अंदाजे (दिड फुलपात्र) घाला, गुळ आणि मीठ घालुन उकळे येउ द्या. मग त्यात तळलेले गोळे सोडा. आणि झाकण ठेवुन दहा मीनीट मंद आचेवर शीजु दया.

थंड झाल्यावर सर्व्ह करा. वन मील म्हणुन पण होऊ शकते.. किंवा भाता वर गोळा कुसकरुन त्यावर कच्च तेल
आणि चिंचेचा सार असा पण एक प्रकार होऊ शकतो.

रात्री पोळ्या नसतील, खिचडी खाउन कंटाळा आला असेल, तर हे ओप्शन चांगले आहे.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

चिंच गुळाचे प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी जास्त करता येते. फोडणी चे पाणी, केचप पेक्षा जरा पातळ हवे.

माहितीचा स्रोत: 
सासु बाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, किती मस्त फसवे गुलाबजाम दिसत आहेत. एकदम गोड गुलाबजाम सारखे. मस्त पा.कृ. आहे.

धन्यवाद दिनेश दा,सृष्टी, आरती, नंदनी,साती,लक्ष्मी, हर्ष्,द़क्षीणा......

दिनेश दा... तळायचे नसतील तर मला अस वाटत की उकळत्या पाण्यात १० मी.सोडुन मंद आचेवर
ठेवावे.. कधी प्रयोग केला नाही पण कल्पना चांगली आहे...

अच्छा. मला वाटतय मसाल्याच्या पाण्याची कन्सीस्टनसी कमी जास्त होईल का? म्हणुन म्हटल साध्या पाण्यात उकळायचे काय?

मी बेसन पिठात जिरंही खरडून घालते. गोळ्यांसाठी ते भिजवायच्या आधी अर्धी वाटी सुकंच बाजूला काढून ठेवते. फोडणीवर नुसतं पाणी घालून त्यात न तळलेले गोळे सोडून, ते शिजून तरंगायला लागले की त्यात हे सुकं पिठ थोड्या पाण्यात कालवून त्या उकळत्या पाण्यात मिसळते. नंतर मीठ आणि गूळ घालून एक उकळी आणून गॅस बंद. पोळी, भाताबरोबर तसंच नुसतंही वाटीत घेऊन खायला मस्त लागतं. माझी आई ह्या पद्धतीने करायची. साबांना हा प्रकार माहित नव्हता. एक काकू हे गोळे तळून फोडणीतल्या उकळत्या पाण्यात घालायची.

धन्यवाद डीवीनीता,कविता,मंजु...
अश्विनी, तुम्ही सांगताय ती पद्धत पण छानच....
लक्ष्मी, तळायला फार तेल नाही लागत....

आज बनवले हे गुलाब जामुन. फार मस्त लागले. मी केश्विनीसारखे आधी उकळून घेतले, आणी मग मसाल्याच्या पाण्यात शिजवले. सोबत साधा भात, पापड आणि कोल्हापुरी ठेचा.

मस्त मेनू झाला.

मीपण गोळ्याचे सांबार खाल्ले आहे, शेजारी मालवणच्या काकू राहायच्या त्यांच्याकडे.

आता ह्या पद्धतीने करून बघेन.

Pages