गोळा पाणी (खट्टे गुलाब जामुन)

Submitted by सायु on 13 June, 2014 - 03:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हरबर्‍या च्या डाळीचे पीठ(बेसन) : २ वाटया
तेल : अर्धी वाटी
हळद : १/२ चमचा
तीखट : १ चमचा
गोडा मसाला : १ चमचा
हिंग , मीठ : अंदाजे
चिंचेच कोळ : अर्धी वाटी
गुळ : अंदाजे (एक छोटी वाटी)

क्रमवार पाककृती: 

प्रथम दोन वाटया बेसन पीठ एका पसरट भांडयात किंवा परातीत घ्यावे.
त्यात १/२ चमचा हळद, मीठ, हींग, तिखट आणि दोन/तीन चमचे कच्च तेल घालुन घट्ट भिजवुन
घ्यायचे.(पुरी सारख) आता या पिठाचे लिंबा पेक्षा थोडे छोटे गोळे करुन तळुन घ्यावे. साधारण १५-२० गोळे होतात.
आता कढई गरम करुन त्यात दोन चमचे तेल घालुन मोहरी घाला, १/२ चमचा तिखट, एक चमचा गोडा मसाला घातला की लगेचच चिंचेच कोळ घाला, पाणी अंदाजे (दिड फुलपात्र) घाला, गुळ आणि मीठ घालुन उकळे येउ द्या. मग त्यात तळलेले गोळे सोडा. आणि झाकण ठेवुन दहा मीनीट मंद आचेवर शीजु दया.

थंड झाल्यावर सर्व्ह करा. वन मील म्हणुन पण होऊ शकते.. किंवा भाता वर गोळा कुसकरुन त्यावर कच्च तेल
आणि चिंचेचा सार असा पण एक प्रकार होऊ शकतो.

रात्री पोळ्या नसतील, खिचडी खाउन कंटाळा आला असेल, तर हे ओप्शन चांगले आहे.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

चिंच गुळाचे प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी जास्त करता येते. फोडणी चे पाणी, केचप पेक्षा जरा पातळ हवे.

माहितीचा स्रोत: 
सासु बाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काल हा प्रकार पहिल्यांदाच करून पाहिला. तुम्ही तळून लिहिलं आहे पण मी उकळत्या पाण्यात शिजवून घेतले गोळे. आणि म. बाकी रेसिपीप्रमाणे मसाल्यात शिजवले. गरम भातावर चव आवडली. नेहमीच्या तूरडाळीच्या आमटीपेक्षा जरा वेगळी चव.
एकच प्रश्न- हे गोळे आतून शिजलेत हे कसं ओळखावं? म्हणजे तोडल्यावर ते आतून कच्चट वाटतात. (खाताना टाळूला चिकटत नव्हतप)

धन्यवाद सायो...एकच प्रश्न- हे गोळे आतून शिजलेत हे कसं ओळखावं?... १५/२० मीनीटात उकळत्या पाण्यात
शिजत असावा,एखादा गोळा काढुन चमचा किंवा सुरीनी कापुन बघता येईल आणि नंतर फोडणीच्या पाण्यात
१० मि.उकळता येईल... मी मंद आचेवर तळुन केले होते त्यामुळे कच्चे लागत नव्हते...

सायो, गोळे शिजले की उकळत्या पाण्यावर तरंगू लागतात आणि त्यांचा गुळगुळीतपणा जाऊन रंग फेड होतो आणि फुगलेले दिसतात.

Pages