निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे आता कडक उन्हाळा चालु झाला आहे. मि बाल्कनिमध्ये एक मनिप्लान्ट टांगला आहे. गेले दोन तिन दिवस पाणि घालताना चिमणि चिवचिवत बाहेर पडलि. बहुतेक तिने अंडि घातलि असावित. मला कळ्त नाहि, पाणि घालु कि नको. कडक उन्हाने प्लाण्ट सुकायला नको आणि अंड्यांचे नुकसानहि नको. काय करु? प्लिज सुचवा.

पर्यावरण दिनाचा शुभेच्छा
सगळ्यांचेच फोटो मस्त आहेत.
मानुषी ताई तुझ अभिनंदन Happy

मस्तच Happy

जिप्सी छान फोटो.

जागतिक पर्यावरणदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

TCS_4253.jpg

सुप्रभात... व्वा मोनालिप छान लिहीलयस... सगळ्यांचेच फोटोज छानच...
सरिवा, तन्मय आणि नितीन यांचे जास्त आवडलेत....
मनुषि ताई, खुप खुप अभिनंदन... लिंक मिळेल का?
राया, मला वाटतं पाणी कमी घाल/ एक दिवस आड घाल... तसे मनीप्लांट दणकट असते... बाकी जाणकार सांगतीलच....

मानुषी अभिनंदन. लायब्ररीतून आणून पाहते मासिक.

सायली ह्या मासिकांचे ई मासिक नाहीत त्यामुळे डायरेक्ट मासिकच घ्यावे लागेल.

ह्यातला नक्की टॅबेबुया कुठला? मला नेहमी गोंधळ उडतो. आणि मग दुसर्‍याचे नाव काय?

हे अजुन एक नाव माहीत नसलेले पिवळे फुल.

मानुषी, अभिनंदन! Happy

वर्षू, ते कोलाज कस करायचं? ते अजून नाही सापडलं मला. Uhoh
गुरुजी, बाई, कुठे आहेत सगळे. या मला शिकवायला. Happy

अय्या ते रिया नै कै राया आहे..हो ़ की नाही रियुटले Wink

ए आमच्या (मागच्या भागातल्या) वाटाण्याला फायनली (या भागात आल्यावर) कोवळ्या शेंगा येऊ लागल्यार. पोरांनी चव मह्णुन एक दोन पळवल्यापण Happy

सगळ्यांनाच पावसाची लागलेली ओढ प्रतिसादातून जाणवते आहे आणि धरणी इतकीच आपल्या सगळ्यांच्या तना मनाची तगमग होते आहे. म्हणुनच आकाशातुन येणार्‍या सरींच्याही आधी सगळ्याच्या मनात तो बरसायला सुरवात झाली आहे. Happy

तो टॅबुबिया वाटत नाही. पिवळ्या टॅबुबियाची पानं वेगळी असतात.
पहीला टेकोमा आहे, दुसरा अलमांडा. तिसरा माहीती नाही.

सर्व फोटो सह्हीए Happy

तो टॅबुबिया वाटत नाही. पिवळ्या टॅबुबियाची पानं वेगळी असतात.
पहीला टेकोमा आहे, दुसरा अलमांडा. तिसरा माहीती नाही>>>>अदिती +१ Happy

Jipsya , kolajatala pahila photo eeeeeeeeeeeeeeeeeeee>>>>>रिया, ती सापसुरळी आहे. मोठा फोटो टाकु का? Wink

रच्याकने, ठाणे, गावदेवी मैदान येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फोटो प्रदर्शन भरले आहे (५ ते ८ जून दरम्यान). यात मी काढलेले (वरील कोलाजमधील) २-३ फोटोज आहेत. कुठले ते पाहण्यासाठी ठाण्यातील प्रदर्शनाला भेट द्या. Proud

जिप्स्या, तुला गुरुजी म्हटलं तर लक्ष देत नाहीस का? >>>>शोभा, तुझ्याकडे पिकासा डाऊनलोड केलेले आहे का? (अंदाजे ८०-९०एम्बी साईज आहे). पिकासातुन कोलाज एकदम सहज होतं. Happy

अभिनंदन मानुषी.. काही महिन्यानंतरच ते प्रकाशक, तो लेख इतरत्र प्रकाशित करायला परवानगी देतील.
तोपर्यंत वाट बघू Happy

अभिनंदन जिप्स्याचेही !

जिप्स्या , शोभाला मी हेच्च सांगितलेलं पूर्वी.. .. शोभे आधी पिकासा डाऊन लोड कर.. पह्यली पायरी झाली कि मग दुसरी पायरी सांगते.. Happy

अर्रे मस्त .. अदिजो.. टबुबिया चा सुस्पष्ट फोटो आलाय.. ( होपफुली पुढच्या वेळी पासून ओळखता येईल आता मला)

टेकोमा आणी अलमांडा ... किती सारखे दिसत आहेत.. त्यांना वेगवेगळे ओळखणार्‍यांना ---/\---

शोभे आधी पिकासा डाऊन लोड कर.. पह्यली पायरी झाली कि मग दुसरी पायरी सांगते.. स्मित>>>>>>>>>>.ते केव्हाच डाऊनलोड केलेय. आता दुसरी पायरी सांग. Happy

वर्षू.. या दोन फुलांच्या बाबतीत डॉ डहाणूकरांचा उपमा बघ.
टिकोमा म्हणजे उंचावरचं दह्यादूधाचं मडके फोडण्यासाठी बाळ गोपाळांनी रचलेली उतरंड आणि अलमांडा म्हणजे
प्रसादासाठी हात पसरलेलं लहान मूल... अशी वर्णने.. फुले विसरताच येणार नाहीत.

ए आमच्या (मागच्या भागातल्या) वाटाण्याला फायनली (या भागात आल्यावर) कोवळ्या शेंगा येऊ लागल्यार. पोरांनी चव मह्णुन एक दोन पळवल्यापण >>>>>वेका, सह्हीए. Happy

दिनेशदा आता राहिल लक्शात.

जिप्स्या अभिनंदन.

उद्या ७ जून पावसाचा दिवस. उद्या निदान मुहुर्ताला तरी पाउस पडावा.

लोणावळा येथील राजमाची पॉइंट वरून दिसणारा हा धबधबा. एवढ्या उन्हाळ्यातही चालू आहे.

राजमाची पॉइंटचा नजारा.

ह्यांची तर जत्राच असते.

Pages