आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाय, पोलार्डकडून फलंदाजीत अपेक्षाभंगच अधिक होतोय, ही खरी काळजी करण्यासारखी बाब आहेच !मुंबईची फलंदाजी पूर्णपणे बहरात येणं, याला आतां तरी पर्याय नसावा.

तुमचा अभिषेक | 26 May, 2014 - 06:21

निलिमा,
अर्थातच मध्यंतरालाच पाऊस, सुरुवातीलाच पडला तर डकवर्थ लुईस येतच नाही.
तसेच तुम्ही जे आफ्रिकेचे उदाहरण दिले आहे ते डकवर्थ लुईस नुसार नव्हते.

>>>>

हे मी परत वाचले. तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे, माझ्या हे लक्षात आले नव्हते की त्यावेळी डकवर्थ लुइस नव्हती (माझी कॉलेजची परिक्षा मात्र चालु होती Happy )
-----------------------------------------------------------------------------------------

असो, माझा पॉईंट सांगतो
जर एखादा संघ २० ओवर मध्ये ८ च्या गतीने १६० मारतो, त्यानंतर पाऊस पडून ओवर कमी झाल्या तर समोरच्या संघाला १२ ओवरच उरल्या तर समजा त्यांना १० च्या गतीने १२० मारायला लावले. तर इथे हे समीकरण विजयासाठी बरोबर आहे कारण १० विकेट तुमच्या हातात असतात.
पण नंतर जेव्हा रनरेट काऊंट होतो तेव्हा फक्त रनरेटच बघितला जातो. म्हणजे तो संघ १२ ओवर मध्ये ११० मारून हरला तरी त्याचा रनरेट साधारण ९ असल्याने जास्त होतो. खरे तर इथे रनरेट डिफरन्स काढताना पहिल्या संघाची धावगती देखील १२ मध्ये १२० नुसार १० धरायला हवी पण ती २० मध्ये १६० नुसार ८ च धरली जाते. (हे मागे एका सामन्यात मी असे पाहिले होते)

>>> ह्या बाबतीत मात्र मी वर लिहिलेला मुद्दा योग्य आहे कारण सामन्यात जरी त्याचा रनरेट जास्त धरला तरी नेट रनरेट साठी खालिल रुल आहे.

http://www.iplt20.com/about/2014/match-playing-conditions/26/law-21-the-...

21.11.3 Only those matches where results are achieved will count for the purpose of net run rate calculations. Where a match is abandoned, but a result is achieved under Duckworth/Lewis, for net run rate purposes, team 1 will be accredited with team 2’s Par Score on abandonment off the same number of overs faced by team 2. Where a match is concluded but with Duckworth/Lewis having been applied at an earlier point in the match, team 1 will be accredited with 1 run less than the final Target Score for team 2 off the total number of overs allocated to team 2 to reach the target.

यानुसार जर डकवर्थ लुइस लावावा लागला असता तर तुम्ही उलटे समीकरण मांडले आहेत म्हणजे राजस्थान रॉयलचा स्कोर १० ओव्हर्स्मध्ये ११९ धरला गेला असता आण मुम्बैला साडेचार ओव्हर्स मध्ये १२० माराव्या लागल्या असत्या (खरेतर एकुण ओव्हर्स कमी झाल्याने कदाचित ४ ओव्हर्स मध्येच १२० माराव्या लागल्या अस्त्या)
म्हणजेच प्रत्येक चेंडुवर चौकार मारुनही मुम्बई प्लेऑफला पात्र झाली नसती.

म्हणजेच पाउस नाही आला हे बरेच झाले Happy

माझ्यामते प्रग्यन ओझा हा खरी वीक लीन्क आहे.
झहीरला घेताना टीमने हा विचार करायला हवा होता पण तो काहीसा भावनिक निर्णय असावा.

खरे तर इथे रनरेट डिफरन्स काढताना पहिल्या संघाची धावगती देखील १२ मध्ये १२० नुसार १० धरायला हवी पण ती २० मध्ये १६० नुसार ८ च धरली जाते. (हे मागे एका सामन्यात मी असे पाहिले होते)
>>>>>>>>
team 1 will be accredited with 1 run less than the final Target Score for team 2 off the total number of overs allocated to team 2 to reach the target.
>>>>>>>>>>>>

तुम्ही दिलेल्या पोस्टमधील हा रुल आणि मी जे वर खरे तर असे पाहिजे लिहिलेय ते एकच आहे बहुधा.
कारण मागे एका सामन्यात मी हे नेमके पाहिले नव्हते, म्हणजे चेसिंग टीम हरूनही वर मी नमूद केल्याप्रमाणे त्यांचा रनरेट जास्त पकडला गेला होता. आणि त्याला अनुसरूनच मी माझी पोस्ट टाकली होती.
आता हा रुल तेव्हा नव्हता की नंतर सुधारणा केली ते माहीत नाही पण हे आताचे लॉजिकलच आहे.
आणि येस्स, या केस मध्ये मात्र खरेच गोची झाली असती कारण मुंबईला मुळातच मोठा रनरेट हवा असल्याने एका लिमिटपुढे गेल्यास तुमच्या हातात दहा विकेट असो वा वीस विकेट कुछ फायदा नही. Happy

माझ्यामते प्रग्यन ओझा हा खरी वीक लीन्क आहे.
>>>>>
प्रग्यान ओझा सध्या चालत नाही पण वीक लिंक म्हणता आले नसते, कारण तो फेल गेल्यास त्याला रिप्लेस करायचा ऑप्शन होता, तो निव्वळ गोलंदाजच आहे, त्याला काढून दुसरा गोलंदाज घेतले की काम झाले. जसे मध्ये केलेलेही, प्रवीण कुमार आलेला, पण दुर्दैवाने त्याला दुखापत होऊन तो ही बाद झाला. झहीर अगोदरच बाद आहे.

अँडरसन, पोलार्ड, वा गेला बाजार रोहित शर्मा, सिमन्स पैकी कोणताच ऑलराऊंडर वा पार्टटाईमर काहीच कामाला येत नाहीयेत हि डोकेदुखी आहे, कारण त्यांना रिप्लेस नाही करू शकत, त्यांचे काम त्यांनाच बजावायचे आहे.

प्रग्यान ओझा सध्या चालत नाही पण वीक लिंक म्हणता आले नसते, कारण तो फेल गेल्यास त्याला रिप्लेस करायचा ऑप्शन होता, तो निव्वळ गोलंदाजच आहे, त्याला काढून दुसरा गोलंदाज घेतले की काम झाले

>> सध्या बेन्चवर ओझाला रिप्लेस करायला चांगला गोलंदाजच नाही आहे Happy
असो माझी पण इच्छा आहे की मुबै फायनलला पोचावी. फायनलला KKR / KXIP
कोणीही चालेल. KXIP आली तरी अंबानी आणि वाडिया (त्याचा अजुन काही हिस्सा आहे का माहित नाही) यांची fight पहायला मिळेल. KKR आली तरी मजा येइल.

अरे आता ते नेटरनरेट वरचे डिस्कशन पुरे..

आजच्या मॅच बद्दल बोला..
पंजाब की कोलकता..

कोलकत्याला परत एकदा होम ग्राउंड अ‍ॅडव्हांटेज आहे.. पण पंजाबची टीम जबरी फॉर्म मध्ये आहे.. कोणीतरी खेळून जातेच आहे..

करंट फॉर्म, बॅलंसड टीम, विनिंग मोमेंटम, होम पीच अ‍ॅण्ड होम क्राऊड.... अ‍ॅडवांटेज के के आर
त्याहून पंजाबचे गेल्या काही दोनेक सामन्यात मिलर मॅक्सवेलला विश्रांतीचे डावपेच मला तरी पटले नाहीत..
असो,
पंजाबी हिटर्स विरुद्ध नारायण आणि कंपनी सामना रंगतदार आहे आजचा खरा.
तरी आजच्या सामन्यात सेहवाग आणि वोहराची सलामी की फॅक्टर आहे...

बहुतेक फायनलमध्ये केकेआर फिक्स असावे त्यामुळेच मुंबई ऐवजी बंगळुरु मध्ये अंतिम सामना ठेवलाय... म्हणजे शारुकला मैदानात जाता येईल!!
Wink

सिमन्सला मात्र शतक करायला देण्यात आलं ! त्याच्या मतें हा सरळ सरळ वर्णभेद आहे !!!

ढोंगी अँडरसन! गोर्‍या लोकांनी काळ्या लोकांविरुद्ध वर्णभेद केला तर चालतो का? इंग्लंड, अमेरिका, द. अफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांनी केवळ वर्णभेदामुळे अनन्वित अत्याचार केले आहेत गेली तीनशे वर्षे.
नि वर्णद्वेष कशावरून? जशी परिस्थिती तसे खेळायचे. उगाच याला शतक करायला देण्यासाठी रन रेट चे नुकसान केले असते तर तिकडूनहि याच अँडरसनने बोंब मारली असती कॅप्टन बेकार म्हणून रन रेट कमी!
त्याला सांगा वर्णद्वेष म्हणजे काय हे गेल्या दहा पिढ्या आम्हाला माहित आहे!! तेंव्हा तू गप बस, सांगितले तसे खेळ. तुला निदान पैसे तरी देतो आहे. या लोकांनी पैसे न देता गुलामगिरी चालवली होती!!
च्यायला भाकरीच्या तुकड्यासाठी कुत्र्याने यावे नि देणार्‍यावरच भुंकावे!

अहो, झक्कीसाहेब, अँडरसनने तसं कांहींही म्हटलेलं नाहीं ! सिमन्सने त्या सामन्यात शतकाकडे लक्ष न देतां रन-रेट वाढवण्याचा प्रयत्न केला असता तर मुंबई 'क्वालिफायींग'साठी खूपच सुस्थितीत असती हें अधोरेखित करायला मीं तो फुसका विनोद केला होता ;
व तो विनोदच आहे हें स्पष्ट करायला तो कंसात टाकून स्माईलीही टाकली होती ! तरीही कुणाचा गैरसमज झाला असेल तर चूक माझी आहे. त्या बिचार्‍या अँडरसनला कुत्रा बनवण्याऐवजी मला गाढव म्हणा ! क्षमस्व.

आजचा सामना उद्यां ४ वाजतां ! मेजवानीच्या दोन दिवसांऐवजी एका दिवसात दोन मेजवान्या !! अरे इथं येवून रवंथ करायला तरी मधें वेळ नको आम्हाला !! Wink

भाऊ हलके घ्या, बहुधा झक्कींनाही ते समजले असावे की आपण मस्करीत म्हणालात आणि त्यांनी उलटी मस्करी कंटिन्यू केली असावी.

असो, उद्या दुपारचा सामना म्हणजे जराही बघायला मिळणार नाही Sad
तरीही आपला सपोर्ट कोरबो लोरबो जितबो रे .. Happy

<<... त्यांनी उलटी मस्करी कंटिन्यू केली असावी.>> जर माझ्याच मस्करीची री ओढून कुणी कुणाला अकारण कुत्रा ठरवत असेल, तर माझ्याकडे अधिकच दोष जातो ना !! Sad

आजच्या सामन्यांसाठीं चारही संघाना शुभेच्छा ! प्रेक्षकाना अटीतटीची झुंज बघायला मिळावी, अशी प्रार्थना !! माझ्यासारख्याना तज्ञाचा आव आणून इथं मिरवायला वाव मिळेल असं भरपूर कांहीं या सामन्यांत घडत राहो, हें तर आहेच !!! वरूणराजा, तुझ्या लहरीपणामुळे आमचं सोड, खेळाडूंचं सोड पण जाहिरातदारांचं किती नुकसान होतंय याचा तरी सहानुभूतिनं जरा विचार कर आणि आज जरा नीट वाग !!!

उथप्पाच्या ३०चेंडूत ४२ कौतुकास्पद पण १० षटकात ७३-३ स्कोअर निराशाजनकच [ गंभीर, उथप्पा व पांडे बाद झाल्याने ] !

११३-५ व पावसाची सर !
करनवीरने एका षटकात युसूफ व शकीबला बाद करून केकेआरला अडचणीत आणलंय. चेंडूला सुंदर 'फ्लाईट' देतो हा करनवीर !

यूसूफ पठाण भरवश्याचा खेळाडू नाही. एका इनिंगमुळे तो हिरो झाला असला तरी आज लवकर बाद झाला ह्यातून दैवाने केलेला न्यायच दिसत आहे.

क्षमस्व.
च्च, च्च! अहो भाऊ, तुम्ही कशाला क्षमस्व म्हणताहात?
तुमचा विनोद कळला. पण तरी गोर्‍या लोकांना जरा बसल्या शिव्या माझ्याकडून तर बिघडले कुठे?
ते नाही असला विचार करत! खुश्शाल शिव्या देतात, फारच अंगाशी आले तर विनोद केला, भावनेच्या भरात बोललो असे काहीतरी म्हणतात, क्षमस्व तरीहि म्हणत नाहीत.
उद्या कुणि गोर्‍या माणसाने हे पाहिले तर तो मला हिंदुत्ववादी, वगैरे म्हणेल, नि आपले मराठी भारतीय बंधूच अहमहिकेने त्याचे कसे बरोबर आहे हे ओरडून ओरडून सांगतील!!
असे खरे भारतीय.

आशा आहे की पुढल्या पिढ्या तुमच्या इतक्याच सुसंकृत पण थोड्या जास्त शहाण्या होतील, जग पाहून आलेल्या.
अधर्माचा नाश करायला भगवान श्रीकृष्णाने स्वतः कपट करून धर्माचा विजय करून दिला, ते त्यांना समजले असेल.

बाकी कालची सुपर मॅच पावसात वाहून गेली, नि आज मला बघता येणार नाही, ब्रिज खेळायला जाणार!!

झक्कीसाहेब , तुम्ही विनोद आहे हें कळून लिहीलं ,म्हणजे मीं निर्दोष सुटलों ! << ब्रिज खेळायला जाणार!! >> तरीच तुम्ही आलात कीं सगळ्याना 'व्हल्नरेबल' असल्यासारखं वाटतं ! Wink
' डकवर्थ्-लुईस' सामना 'वर्थलेस' करतात ! Sad

55 runs required from 18 balls

34 runs required from 12 balls

३० runs required from 6 balls, या एका ओव्हर ने मॅच फिरवली .......नरेन नी टाकलेली.. अवघे ४ रन्स देउन

हीच जर ओव्हर यादव ला दिली असती तर किमान १४ रन्स तरी निघाले असते...... म्हणजे शेवटच्या ओव्हर ला २० रन्स .... हे अचिवेबल टारगेट होते ..... परंतु गंभीर ने डोके लढवले नेहमी प्रमाणे नरेन ला शेवटची ओव्हर न देता सेकेंड लास्ट दिली ...... बचेंगे तो और भी लढेंगे या उक्ती प्रमाने कारण आधीच्या ओव्हर मधे शकिब ने तब्बल २१ रन्स दिलेले त्यामुळे बेली आणि जोन्सन समोर यादव ला देण्यापेक्षा आपला बेस्ट बॉलर ला उतरवले आणि त्याने जादु दाखवली नरेन ने त्याची जादु दाखवुन जिंकवुन दिले......... शेवटाच्या ओवर ला ३० रन्स म्हणजे फार फार होते Wink

सलग ८ मॅच जिंकले....................

कोरबो लोरबो जित बो रे ....
अबकी बार मुंबई केकेआर..
ड्रीम फायनलकडे पहिले पाऊल...
आता मुंबईने चेन्नईला आडे हात घ्यावे..
टॉस हरलो हे वाईट झाले, आज चेस हवे होते.. कितीही आणि का ही ही चेस केले असते..
आता पुन्हा सिमन्स आणि हसीच्या ओपनिंग पार्टनरशिपवर आहे.. मुंबईला चांगले दिवस या जोडीनेच दाखवायला सुरुवात केलीय..

<< या एका ओव्हर ने मॅच फिरवली .......नरेन नी टाकलेली.. अवघे ४ रन्स देउन >> म्हणूनच क्रिकेटचं रेकॉर्ड बुक बर्‍याच वेळां खरं चित्र दाखवतंच असं नाही; नरैनची आजची गोलंदाजी - ४-०-३०- ० पण मॅच फिरवणार्‍या त्या महत्वाच्या षटकाचा उल्लेखही नाही येणार स्कोअर बुकात !!
अभिनंदन, केकेआर व त्यांचे चाहते.

भाउ १९ वी ओव्हर जर यादव ने टाकली असती तर नक्कीच बेली आणि जोन्सन ने आड्वे तिडवे फटके मारुन किमान१०-१५ रन्स तरी काढायचा प्रयत्न केला असता आणि २० व्या ओव्हर ला टारगेट २०-२२ रन्स चे ठेवले असते..
पण तसे झाले नाही आणि शेवटच्या ओवर मधे ३० रन्स चे टारगेट मिळाले Happy

नरेनची ओव्हर चांगली होती ह्यात प्रश्नच नाही फक्त यादव आज चांगलाच र्‍हिदममधे वाटत होता त्यामूळे आडवे तिडवे मारूनही १५ निघालेच असते असे जरुरी नाही.

अपेक्षेप्रमाणे ओपनर्सनी चांगली सुरुवात करून दिली मुंबईला.. पण तरी १९०+ चे आरामात शक्य असणारी टोटल पुन्हा लाईनीत विकेट टाकल्याने १७३ ला थांबली.
शर्माने स्वताच्या जागी पोलार्ड वा रायडू वा गेला बाजार तारेलाच मारायचे लायसन देऊन पुढे पाठवायला हवे होते. त्यामुळे अँडरसनच्या विकेटनंतरही मोमेंटम तसेच राहीले असते. त्यातल्या त्यात हरभजनने शेवटचा षटकार मारून थोडीफार माहौलमध्ये जान आणली हे चांगले, जेणेकरून पॉजिटीव्ह बॉडी लँगवेजने उतरतील.
चेन्नई म्हणजे सुरुवातीच्या विकेट्स हव्यात, प्रवीणकुमारला स्विंग मिळाला पाहिजे, तो मग हे काम करू शकतो. मुंबई सहजी हरत नाही एवढे मात्र नक्की !!!!

Pages