मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

Submitted by उडन खटोला on 25 May, 2014 - 01:41

मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??

..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी

आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत

आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??

(इतरत्र पूर्वप्रकाशित )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म. वरच्य लेखातील काहि वाक्यांचा सबंध कळलाच नाही, म्हणून तुम्हालाच विचारते. हे 'प्रश्ण' विचारलेले आहेत , कुठलेच अंदाज बांधलेले नाहीत हे लक्षात घ्या. त्यामुळे उगाच टिका नाहीये हे लक्षात येइलच. Happy

१) >>मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर<<
धार्मिक विधीचे आंमत्रण देताना, लोकांनी कसे व कोणते कपडे घातले ह्याचा काय सबंध? म्हणजे त्याचा आमंत्रण देण्यावर काय परीणाम झाला?
(नाहितरी उकडतय भारी पुण्यात(पुण्यात असाल हा मात्र अंदाज) तेव्हा सुटसुटीत कपडे घातले असतील हो.(हि मात्र सहज गंमत)...;)

२)>>>.परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता <<
हे पण नाही कळले की, NRI वगैरेचा उल्लेख सहज आहे का? की काहि दर्शवायला?

३)>>मराठी ब्राह्मण घरातील आहेत<<<
३अ)जातीचा का खास उल्लेख सांगितलाय इथे? (मुंज हि फक्त ब्राम्हणच करत नाही. सीकेपी, पाचकळशी, सोनार वगैरे सुद्धा करतात, आणखी कोणी करत असतीलही. मला माहिती नाही).
३ब)मराठी लोकांनी असे (वरती उल्लेख केलेय तसे) प्रकार करु नये/करावे असे काही अपेक्षित आहे/होते का?
की
३क)ब्राम्हण असूनसुद्धा असे प्रकार(जे काही तुमच्या मते चांगले/वाईट प्रकार) केले म्हणून? की

३प्)फक्त ब्राम्हणांनाच संस्कार असतात व वैचारीक पात्रता असते असा काहीसा समज होता की काय? ह्या समजानुसार काही अपेक्षित होते/आहे व तिला धक्का बसला म्हणून तुम्ही तसे लिहिलेय का?

बाकी, एकंदरीत लोकं काय पैसा असो वा नसो; आम्ही नंगा नाच करु नाहितर काही करु असे जरी असले तरी त्यावरून ठोस असे कोणतेही अनुमान काढणे कठिण आहे. बरोबर/चूक कोण ठरवणार?
खूप फ्लेक्सिबल लोकं झालीत. Proud

http://www.maayboli.com/node/49104

यात पन मुन्जीचे आमन्त्रण आहे. पन हे लिखाअ आधी आल आहे. हे नन्तर. एकाच विशयावर हा योगायोग आहे ना ?

Happy

मुन्जीच्या नावाखाली "स्वतःच्या भलभलत्या" हौसा साजर्‍या करणे टाळलेच पाहिजे.
अर्थात वरील लेखात वर्णन करताना भासतय तसे ते "सार्वत्रिक" नाही, ते ब्राह्मण समाजात सार्वत्रिक आहे असा गैरसमज होऊ नये.
मात्र, इथे येऊन असा लेख लिहीलात ते चान्गले केलेत, पण हाच मजकुर त्या यजमान जोडप्याला जागच्याजागी ऐकवला असतात तर तुमच्या इथल्या शब्दान्ना काही वजन/धार प्राप्त झाली असती. तुम्ही केवळ वर्णन दिलय काय होतय त्याचे, तुम्ही त्याबद्दल तिथल्या तिथे काय केलय हे दिले नाहीयेत. तेव्हा वरील वर्णन इथे जाहीर करण्याबाबतच्या तुमच्याच हेतूबद्दल शन्का उपस्थित होते.
कारण,जिथेवर ब्राह्मण समाजाचा व त्यातुनही तुम्ही उल्लेख न केलेल्या पोटजातीचा अर्थात पेठी कोब्रान्चा सम्बंध येतो, तिथे त्यान्चेत उपस्थित कुणी शहाणा असेल, तर तो जागचे जागी चार गोष्टी सुनावण्याची धमक राखुन असतो, व अशी धमक केवळ याच समाजात आजही अस्तित्वात आहे. तुम्हाला कुणी चूकार पाश्च्यातळलेले दिसलेच असतील तर त्याला इलाज नाही. थोडा वेळ काढा, अन पुण्यातिल अनेक मन्दिरे/धर्मशाळा इत्यादी ठिकाणी होणारे मुन्जविधी स्वतःहून बघायला गेलात तर इथे असा लेख लिहीण्याइतके "निराश व्हायची" Proud पाळी तुमच्यावर येणार नाही.
असो. लेख चान्गला आहे.

मुंज खरंच संस्कार म्हणूनच करायची असेल तर ठीक आहे पण औपचारिकता व सोहळा म्हणून करायची असेल तर त्यांत कांही अर्थ नाही, हें माझं वैयक्तीक मत. संस्कार म्हणून केली तर मुंज साधेपणाने करणंच औचित्यपूर्ण, हें आलंच. पण कोणी , कशासाठी, कशी मुंज करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न; त्याचा हेतू सफल होणं त्याच्यासाठीं महत्वाचं, मुंजीचा खरा हेतू सफल झाला का हें दुय्यम. एकच उदाहरण देतो-
माझ्या खास परिचयाच्या कुटूंबातील एक मुलगा गेली १०-१५ वर्षं अमेरिकेत आहे व परत भारतात येण्याची शक्यताही नाही. त्याने आपल्या मुलाची मुंज मात्र इथं येवून विधीपूर्वक, नातेवाईकाना निमंत्रित करून पण विशेष भपका न करतां केली. त्याच्याशीं बोलताना लक्षांत आलं कीं त्याचा मुलगा अमेरिकन वातावरणातच वाढणार व जगणार असला तरीही ' आय बिलॉन्ग समव्हेअर एल्स ' ही जाणीव निदान आणखी एक पिढी तरी त्याचा सतत पाठपुरावा करणारच. म्हणून, त्याला त्या पूर्वसंस्कारांची, रुढींची किमान ओळख असणं खूप गरजेचं आहे म्हणून हा मुंजीचा खटाटोप. हेतू मुख्यतः संस्कार करण्याचा नसून संस्काराची ओळख करून देणं हा होता, तो व्यवहार्य होता व तो सफलही झाला.

मराठी ब्राह्मण घरातील आहेत
अर्थातच! अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे असली सुधारकी वागणूक त्यांनाच जमणार. जसे त्यांना गोमूत्र पिणे, गायत्री म्हणणे येते तसेच हेहि येते. खरे तर सगळे बरे वाईट बदल ब्राह्मण वर्गाने अंगिकारले तरच होतात.

इतर जातीतले लोक मेंढरांसारखे ब्राह्मण लोकांचे अत्याचर सहन करत बसले होते, हजारो वर्षे! कुणात ना बुद्धि ना इच्छा. आतासुद्धा नुसत्या ब्राह्मणांना शिव्या देण्यापलीकडे नि भांडारकर इन्स्टिट्यूट वर हल्ला करण्यापेक्षा काही विधायक केले आहे का? शक्यच नाही ना!! उगाच दहा कोटीमधे चार पाच जण शहाणे आहेत त्यांचे उदाहरण द्यायचे - बाकीचा समाज?!

जातीचा का खास उल्लेख सांगितलाय इथे?
काही वाईट गोष्ट ब्राह्मणांनी केली की ब्राह्मण जातीचा उल्लेख होतो. इतर जातीतल्या लोकांचे धंदे सांगताना मात्र जात सांगायची नाही - सरकारात घोटाळे, अफरातफर! कुणि केले हो? सांगता का जात? त्या अफरातफरीविरुद्ध आवाज कुणि उठवला? त्यांची जात काय हे नाही लिहीत?

बाकी लेख चांगला लिहीला आहे. पोषाखाचे वर्णन वाचून चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. अमुक रंगाचे कपडे घालून या याबद्दल लिहील्याने क्षुल्लक गोष्टीत जास्त लक्ष नि महत्वाची मुंज त्याकडे दुर्लक्ष हा विरोधाभास एकदम मनाला जाणवतो.
शिवाय महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली अशी वर्णने वाचून गंभीर विषय वाचताना सुद्धा चेहेर्‍यावर स्मित उमटल्याशिवाय रहात नाही.

बाकी गोष्टींचा जास्त विचार करू नका हो - काही वाटले तर तसे तिथल्या तिथे आपल्या यजमानांना सांगावे. पुनः या घरी धार्मिक कार्यासाठी न जाता सांगितल्याप्रमाणे विशिष्ठ रंगाचे कपडे घालून कॉकटेल पार्टीला जावे गाणी ऐकावीत, 'डाँस' करावा. धार्मिक कार्यांसाठी इतर अनेक ठिकाणे आहेत.

मुंज ह्या विधीमुळे खरच काय साध्य होतं? मुंज झालेला मुलगा असा काय वेगळा होतो? रोज संध्याकाळी स्नान संध्या तर कोणीच करत नाही आणि गुरु गृही शिकायलाही कोणी जात नाही. मग तो विधी करून कार्यालय आणि जेवणावळ्यांवर पैसे घालवण्यापेक्षा त्याच पैशातून मुलाच्या पुढच्या शिक्षणाची तजवीज करावी किंवा त्याला एखादी कला / खेळ शिकण्यासाठी क्लास लावून द्यावा म्हणतो मी.

बाकी राहिलं लोकांच्या एन्जॉयमेंटच्या कल्पनांबद्दल, त्याला काय व्यक्ती तितक्या प्रव्रुत्ती ह्या न्यायाने धुमारे फुटतात. इथे उत्तम नाट्यसंगीत (नरवर कृष्णा समान) ऐकल्यावर लोक जोर जोरात शिट्ट्या मारतात, मंडळात आपल्याच मैत्रीणी; बहिणी ;मावश्यांनी लावणीवर छान नृत्य सादर केलं तर एका मुलीला त्यांच्यावर पैसे उधळायचे होते! म्हणाली खोटेसुद्धा चालतील पण पैसे उधळू. मी विचारलं कि तुझ्या ३ वर्षाच्या मुलाला तू त्याचा अर्थ कसा समजावणार? तर म्हणाली "दॅट एज रिअ‍ॅलिटी, कळेलच त्याला".

वर कोणीतरी म्हणाल्याप्रमाणे प्रसंगानुरुप कसे वागवे हे शिकवणारे मोठेच आजुबाजुला लागतात पण हल्ली त्या मोठ्यांना कोण शिकवणार हा प्रश्न आहे.

>>मुंज ह्या विधीमुळे खरच काय साध्य होतं? मुंज झालेला मुलगा असा काय वेगळा होतो? रोज संध्याकाळी स्नान संध्या तर कोणीच करत नाही आणि गुरु गृही शिकायलाही कोणी जात नाही.

नसेल असे काही होत म्हणुन करूच नये असे नाही. ज्यांना हा एक संस्कार आहे आणि तो केला जावा असे वाटते त्यांनी करावा.

उद्या म्हणाल कित्त्येक लग्ने फेल होतात, लग्नात दिल्या घेतल्या जाणार्‍या वचनांप्रमाणे लोक वागत नाहीत म्हणुन लग्न देखील करू नका. रहा तसेच. अर्थात तसली फॅडे आधीच चालू झालेली आहेतच.

असे म्हणत नाही की पुर्वीपासुन चालत आलेल्या सर्वच गोष्टी जशाच्या तशा चालू ठेवाव्यात,
पण म्हणुन लगेच सगळेच सोडून द्यावे असेही नाही.

तसेही अनेक लोक टपलेलेच आहेत हिंदू धर्म आणि त्यातल्या अनेक गोष्टी नष्ट करायला त्याला हातभार.
वर जे प्रसंग दिले आहेत त्याला समर्थन तर नाहीच नाही पण असे जर खरेच झाले असेल होत असेल तर ते दुर्दैवीच आहे. मुळात वैयक्तिकरित्या मला ते लग्नात नाचणे वगैरे पटत नाही. पण हिंदी सिनेमे, मालिका, इ. मधुन उत्तरेकडचा प्रभाव वाढलेला आहे त्याचा हा परिणाम.

आहे ते बंद करण्यापेक्षा मुंजीनंतर अगदी गुरूगृही नाही तरी किमान आवश्यक धार्मिक शिक्षण कसे देता घेता येईल त्याचा विचार केला जावा.

लहान मुलाच्या हातात एखादी वस्तु असेल आणि ती जर खसकन काढून घेतली तर ते जोरजोरात रडायला लागते.
पण हेच जर दुसरी वस्तु घेऊन आधीच्या वस्तुपेक्षा ती कशी छान आहे हे सांगून आधीची वस्तु काढून घेतली तर ते मूल फार त्रास करून घेत नाही आणि त्रास देत नाही.
येथे तर समाजाच्या हातून एखादी परंपरा काढून घेऊन ती बंद करण्याची चर्चा आहे. Happy

अरेरे मला पूर्वी २-३ मुन्जींची आमंत्रणे होती - गेलो नाही !
आता मुंन्जीत दारूकाम सर्वमान्य झालेय काय ?
मला कोणी अशा मुंन्जीत बोलवेल काय ?

मुंज ह्या प्रकाराबाबत काही ज्ञान नाही.आधि वाटायचे फक्त ब्राम्हण जातित होते कि काय परंतु वरील एका प्रतिक्रियेत इतर जातितही मुंज करतात हे कळाले.मुंज हि फक्त मुलांचिच होते की मुलिंचीही करतात?

अहो, वैचारिक दिवाळखोरी काय? वैचारिक क्रांति म्हणा. वैचारिक प्रगति म्हणा.

आजकाल फ्यूजन ची फॅशन आहे. इंडियन चायनीज जेवण, भारतीय-पाश्चिमात्य संगीताचे फ्यूजन, हिंदी गाण्यात सर्रास गायत्री मंत्र, इतर संस्कृत मंत्र, श्लोक यांचे फ्यूजन, मराठी भाषेत इंग्रजीचे फ्यूजन इ. प्रकार आहेतच.

तसेच भारतीय पद्धतीच्या संस्कार कार्यक्रमात आधुनिक संस्कृतीचे फ्यूजन.

फ्यूजन लिव्ह्ज!!

मुंज फक्त मुलांचि करतात मुलिंची नाहि.ह्या मागे काहि धार्मिक कारण आहे का?की नेहमिचेच स्त्रि पुरूष असमानता..

सचिन पगारे,

>> मुंज फक्त मुलांचि करतात मुलिंची नाहि.ह्या मागे काहि धार्मिक कारण आहे का?की नेहमिचेच स्त्रि
>> पुरूष असमानता..

स्त्री आणि पुरूष असमान आहेत म्हणूनच एकाची करतात आणि दुसऱ्याची नाही. असा बावळट प्रश्न विचारू नका परत कधी.

आ.न.,
-गा.पै.

टीप : प्रश्न बावळट आहे. तुम्ही नाही.

स्त्री आणि पुरूष असमान आहेत म्हणूनच एकाची करतात आणि दुसऱ्याची नाही. असा बावळट प्रश्न विचारू नका परत कधी.

आ.न.,
-गा.पै.

<<

अहो,
सुन्ता सुद्धा मुलगे व मुली, दोघांची करतात. धर्मासमोर सगळे समान असतात हे ठाऊकेय का तुम्हाला गापै?
सनातन प्रभातवाले "डॉक्टर" हिंदू धर्माचे खरे प्रवक्ते नव्हेत Wink

.

स्वत:ला जे योग्य वाटते ते करावे
समाज गेला उडत
आणि धर्माचा ठेका घेतलेल्यांना गाडून टाका

गामा मला मुंजिबाबत खरच माहिती नाहि.जाणुन घ्यायची इच्छा आहे.जर मुंजि मध्ये वपन करत असतिल तर ति मुलांसाठीच योग्य आहे अन्यथा मुलिंची मुंज का करत नसावेत हा एक प्रश्नच आहे.

मुंजी मध्ये मुलांच्या गळ्यात जानवे घातले जाते त्या वरुन कळते की तो ब्राम्हण आहे.अगदी वॄध अवस्थे पर्यन्त पुजा

पाठ करताना त्यांना वस्त्र उतरुन पुजेला बसावे लागते गळ्यात जानवे असते व खाली पंचा गुंडाळलेला असतो

अश्या अवस्थेत मुलिंची कल्पना करा कसे वाटेल...

म्हणुन मुलिची मुंज करत नाहित.

Pages