आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोहलीकडे तर निव्वळ एटीट्यूड आहे, आणि त्याची देहबोली पाहता वाटते की त्याचा असा गैरसमज असावा की हा कप्तानाला शोभणारा अ‍ॅटीट्यूड आहे.
फलंदाजीत चेस करताना त्याचा हा अ‍ॅटीट्यूड कामी येतो पण कप्तानीला नाही शोभत हे त्याला कोणीतरी समजावणे गरजेचे. आशा करतो त्याला धोनीनंतर भारतीय संघाची कप्तानी देण्यात येऊ नये.

धोनी फार कमी गरम होतो म्हणुन इतरांनी त्याचा आदर्श ठेवावा परंतु असतो एकेकाचा स्वभाव .. ऐन मौक्याला जसे धोनी बदल करुन बनत असलेली भागीदारी फोडतो तसे सध्या तरी फक्त गंभीरच करत आहे. त्याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे बँगलोर बरोबरची मॅच कोहली आणि टाकावले यांची भागीदारी ऐनरंगात आल्यावर नरेन ला आणुन फोडली तसेच शेवटी डिव्हिलिअर्स आणि युवराज ची भागीदारी नरेन ची ओव्हर संपायला आली असुन देखील ती रिक्स घेउन नरेन ला शेवटची ओव्हर १६वी दिली.. त्यात दोन्ही फलंदाज आउट झाले आणि मॅच फिरली.

केकेआर ची आता पर्यंतच्या आयपीएल मधली ७ सलग सामन्यांची विनिंग स्ट्रीक आहे

गॅरी कर्स्टन आणि डुमनी चे काही वाजले आहे का ???????? आजच्या मॅच मधे देखील डुमिनिला लवकर उतरवला नाही Angry
ज्याने सर्वात जास्त रन्स काढले आहे ज्याचा फार्म चालु आहे त्याला तुम्ही शेवटचे ३-४ ओवर्स देत आहेत खेळायला त्यात काय तो संघासाठी करु शकणार आहे ????????????????

अपयश लपवत आहेत.
आता सारे काही संपल्यावर ड्युमिनीला वर पाठवून तो खेळला तर हे आधीच का नाही सुचले ही नाहक टिका.
असतं एकेकाचे.
मात्र पीटरसन आणि ड्युमिनी ही जोडी एकत्र येईल असे बघितले असते (अनुक्रमे ३-४ क्रमांकावर पाठवून) तर दिल्लीचे निकाल वेगळेच असते.

मुंबईला साधारण
४२ - ४३ धावांनी जिंकायची गरज
किंवा
१४.२ - १४.३ ओवरमध्ये चेस करायचे आहे.
टारगेटनुसार किंचितसा फरक आहे.
गो मुंबई गो .

मुंबईला १८९चं लक्ष्य १४.३ षटकांत ओलांडायचं आहे. आत्तां त्यांचा स्कोअर आहे ७.४ षटकांत ६०-३ ! शक्य ? अशक्य ? अँडरसन व रोहित या जोडीवर सगळं अवलंबून आहे !

पोलार्ड आज खेळायला हवा होता .. काहीतरी.. हा असला स्कोअर सिक्स हिटरच मारू शकतात. फोर कितीही मारले तरी कमी पडतात. अ‍ॅंडरसन मात्र आपली पुढच्या आयपीएलमधील संघातली जागा बूक करायच्या हिशोबात खेळतोय आज. मात्र त्याने पठाण सारखे जिंकावून दिले तर त्यासाठी मोजलेले पैसे वसूल.

काल पठाण आज अँडरसन
जबरदस्त खेळ
राजस्थान चोकर्स झाले
कानामागून केकेआर आले आणि 2र्या नंबर वर पोहचले आणि राजस्थान ला ४ था नंबर राखता आला नाही

जागेवर बसत नाहीत तो पर्यंत जागा पक्की आहे या भ्रमात राहू नये हा संदेश जयपुर ला मिळाला
द्रविड़ला पहील्यांदाच त्रागा करताना पाहीला

राजस्थाननी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला... त्यांना आधीच क्वालिफाय करणे सहज शक्य होते.. मधल्या दोन मॅचेस अगदीच वेडेपणा करुन घालवल्या..

Hats off to Rahane >> ?

अँडरसन बरोबर रायुडूची छोटी inning विसरू नका रे.

थक्क थक्क थक्क...
थक्क करणारा सामना..
शेवटी मुंबई बाद झाली असती तर खरेच खूप वाईट वाटले असते..
साला मी तर गेले आठवडाभर जिथे तिथे याच पोस्ट टाकत होतो की सध्या मुंबई जो खेळ करतेय ते पाहता ती बाहेर जाणे डिजर्व्ह करत नाही..
अँडरसनने खरेच एका इनिंगमध्ये पैसा वसूल केला..
रायडू तर काय क्लास खेळत होता..
तारे ने सुद्धा पहिलाच चेंडू असून आपले टेंपरामेंट दाखवले, अन्यथा अनपेक्षित फुलटॉसला देखील बाऊंडरीबाहेर मारणे नेहमीच शक्य नाही होत..
क्लास सामना, बघणार्‍याचाही पैसा वसूल..
आता जिंकण्यासाठी आधी चेन्नई आणि मग कलकत्ता व पंजाबला धरदबोचावे लागणार..
त्याचे काय पण होवो, मुंबईने इज्जत राखली... जिओ.. Happy

<< Hats off to Rahane >> ? >> क्षमस्व. मींच एवढा एक्साईट झालो होतों, रायूडू ऐव़जी रहाणे टंकलं. सॉरी !
[ उत्तेजित झाल्याने रन-रेटच्या गणितात मुंबई व राजस्थान संघांत गोंधळ होऊं शकतो, तर म्यां पामराचं काय ! Wink ]

भाऊ १ नं. व्यंचि Happy

काल मॅच संपल्या वर मिथुनचा कोणाता तरी जुना सिनेमा आठवला.. त्यात गोळी लागलेला मिथुन परत उठुन व्हिलनला धुतो आणि मॅच जिंकतो.

कमी म्हणून युसुफ पठाण नावाचे ओझे जे ते बाळगत होते तो सुद्धा गेले काही सामने पाहता अचानक खेळून जाईल असे वाटतेय>?>>

अभिषेकच भाकीत तुफानी यशस्वी झालं की.

बा द वे, कालची मॅच अफलातुन झाली.
अ‍ॅन्डरसन जबराट खेळला.
त्याला सर्वाचीच मस्त साथ मिळाली.

काल सचिन खेळाडूंबरोबर न बसता वेगळ्याच ठीकाणीं बसला होता वे तें खटकत होतं.मग शास्त्रीने खुलासा केला कीं, " मुंबईचा स्कोअर होतोय हें पाहिल्यावर सचिन आतां सामना संपेपर्यंत त्या जागेवरून हलणार नाही; "सुपरस्टीशन, यू नो ! ".
खरंच, 'मॅन ऑफ द मॅच' कुणीही होवो, पण त्या यशाला कुणाकुणाचे, कसले कसले हातभार लागत असतात सांगणं कठीण !!

काल गोलंदाजीसाठी पोलार्डला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवणं इथं कुणाला खटकलं नाही ?

कालच्या सामन्यात रन-रेटच्याबाबतीतला नियम इतका आत्यंतिक महत्वाचा असूनही दोन्ही संघांचं त्याचं ज्ञान इतकं तोकडं असावं याचंही आश्चर्य वाटलं !

भाऊ.. रनरेट बद्दल त्यांना नक्कीच माहिती होती.. पण असा टाय झाला तर काय होऊ शकेल ह्याचा विचार ना संघांनी केला होता ना आयपीएल संघटकांनी.. म्हणूनच कल गोंधळ उडाला..

Pages