'आम्हाला मातृभूमी नाही'

Submitted by आशयगुणे on 4 May, 2014 - 14:49

मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता. लेक्चरच्या वेळेस प्रोफेसरांनी 'आरक्षण हवे का नको' ह्या विषयावर चर्चा करायचे ठरविले. हा फार संवेदनशील विषय आहे हे मला माहिती होते परंतु वर्गातील सारी मुलं एवढ्या तावातावाने विरोधात बोलतील हे मला अनपेक्षित होतं. त्यातल्या एकाने आरक्षणासाठी थेट डॉ. आंबेडकरांना जबाबदार धरले आणि त्यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगितले. सारा वर्ग टाळ्या वाजवू लागला आणि एकदम एका मुलाने हात वर केला. त्याला बोलायची संधी दिली गेली आणि बाबासाहेबांबद्दल तो इतके सुंदर बोलला की बस्स - प्रोफेसर देखील त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. वर्गातील मुलांना देखील त्यापुढे काही बोलता आले नाही आणि बऱ्याच लोकांनी काहीतरी निरर्थक मुद्दे काढून उगीच विरोध करायचा प्रयत्न केला. परंतु ते फोल ठरले आणि चर्चा संपली! मी मुद्दाम वर्गाबाहेर जाउन त्याच्याशी बोलले. प्रसाद सारखा शांत मुलगा एवढे प्रभावी बोलू शकेल ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता!

पुढे आमची ओळख वाढली. गप्पा वाढल्या. बरेच विषय बोलले जायचे परंतु वैचारिक चर्चा जास्त होत असे. कधी कधी लायब्ररी मध्ये नोट्स काढणे म्हणून बसले जायचे परंतु अभ्यास सोडून सामाजिक विषय जास्त बोलले जायचे. त्याला त्यावर बोलणे फार आवडायचे आणि त्याचे मुद्दे देखील खूप प्रभावी असायचे. खूप वाचन होते. आणि शिवाय विचार अगदी सर्वसमावेशक होते. माझ्या घरी भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो होता परंतु माझ्याकडे त्या फोटोला नमस्कार करणे ह्यापलीकडे काहीच नव्हते. आणि त्याचे त्यांच्याबद्दल असलेले वाचन मला शरमेने मान खाली घालायला लावायचे. आमची मैत्री वाढत गेली तसा तो अधिक बोलका होऊ लागला. एकदा असाच एक विषय सुरु होता. प्रसाद भान सोडून बोलत होता. लायब्ररी मध्ये पुढे बसलेल्या लोकांनी एक-दोन वेळेस मागे वळून आमच्याकडे पाहिले देखील. "आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?" अंगावर शहारा आला होता आणि डोळे पाणावले होते त्याचे. तो लालबुंद चेहरा मला अजून लक्षात आहे.

एकमेकांचा नंबर तर होता आमच्याकडे! त्यामुळे मेसेज वगेरे सुरु झाले. तेव्हा व्हाटसअप वगेरे नव्हतं आणि फेसबुक पण नुकतंच सुरु झालेलं! त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करणं सुरु असायचं. आणि मी त्याच्या विचारांच्या आणि नंतर त्याच्या प्रेमात केव्हा पडले हे कळले देखील नाही. पण विचारायचे कसे? शिवाय विचारायच्या आधी आमची भिन्न पार्श्वभूमी लक्षात आली आणि क्षणभर बिचकले! परंतु मन सांगत होते विचारून मोकळी हो! आणि मी एकेदिवशी आम्ही घरी येताना त्याला सांगून टाकले. क्षणभर तो माझ्याकडे बघत राहिला! नंतर म्हणाला, " मला देखील तुला हेच विचारायचे होते!"
मी जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसेना! काही न बोलता आम्ही नुसतेच चालत राहिलो. आणि अचानक मनात आलेल्या विचाराने मी पुन्हा घाबरले. आणि धैर्य गोळा करून म्हणाले, " आमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो आहे तरी सुद्धा तुला चालेल?"
तो माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, " माझे विचार आणि माझी कृती ह्यात फरक नाही!"

आमच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपली मुलगी एका बामणाच्या घरी चालली आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! त्याच्या घरचे नातेवाइक तर अजिबात तयार होत नव्हते. परंतु प्रसाद माझ्याबरोबर उभा होता आणि मला ह्यात समाधान होते. दरम्यान मी त्याच्या घरी जाऊ लागले. त्याच्या घरच्यांशी ओळख होऊ लागली होती. त्याचा मोठा भाऊ प्रकाश हा रशियात
डॉक्टर होण्यासाठी गेला होता. आणि एके दिवशी घरी बातमी आली की प्रकाश दादाला रशियात एक रशियन मुलगी आवडली आहे आणि दोघे लग्न करणार आहेत! घरी अर्थात सगळे खुश झाले होते. तो घरी केव्हा येईल ह्याची वाट बघत होते. पोरांना ह्या गोऱ्या वाहिनीला बघण्याची ओढ लागली होती. 'स्काइप' वर आजीने होणाऱ्या सूनेला पाहिले होते आणि 'किती गोरी आहे माझी सून' असे आनंदाने म्हणून नात्याला पसंती दिली होती! प्रकाश दादाला देखील आपल्या होणाऱ्या बायकोची स्वीकृती झाल्यामुळे आनंद झाला होता. लग्नाचा दिवस उजाडला. मी देखील मदत म्हणून प्रसादच्या घरी असायचे. त्याचे इतर काही मित्र देखील होते. लग्न अगदी व्यवस्थित पार पडले आणि रशियन सूनेने अगदी उत्सुकतेने सारे विधी पार पाडले. तिला आपल्या 'कल्चर' बद्दल बरेच काही सांगितले गेले होते. ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश आजीने आणि त्यादिवशी घरी आलेल्या पुण्याच्या आजीने 'स्काइप' वर प्रकाश दादाला आधीच दिले होते. त्याचे पालन झाले होते बहुदा!

त्यादिवशी सारे नातेवाईक ह्या नव्या सूनेशी बोलायला उत्सुक होते. पुण्याच्या आजी तर प्रचंड! अगदी तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये सारे काही सांगितले जात होते. अर्थात मुलगी रशियन असल्यामुळे तितक्याच तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये उत्तरं मिळत होती आणि आजीची विशेष पंचाईत होत नव्हती! दोघे रशियाला परत जायचा दिवस उजाडला. सर्वजण अगदी भावूक झाले होते. मी देखील प्रसादच्या जवळ उभी होते. सारे काही समजू शकत होते.
"माझ्या सूनेची काळजी घे रे!" आजीने अगदी भावूक स्वरात सांगितले. आम्ही परत यायला निघालो. पुण्याच्या आजीने प्रसादकडे डोळे वटारून कोरड्या स्वरात सांगितले, " आता तुमचा नंबर असेल ना!" आम्ही परत घरी आलो.

प्रसादला आणि मला विधींचे विशेष आकर्षण नव्हते. शिवाय दोन वेगळ्या पार्श्वभूमी असल्यामुळे दोन्हीकडचे लोक आपापले विधी पुढे करतील ह्याची भीती होतीच. त्यामुळे आम्ही सर्वांचा रोष पत्करून कोर्टात लग्न करायचे ठरवले! हा आमचा निर्णय घरी तर अजिबात मान्य नव्हता पण त्या संदर्भात नाराजी ही नातेवाईक मंडळींमध्ये अगदी लगेच पसरली! प्रसाद खंबीर होता आणि सुदैवाने त्याचे वडील आमच्या बाजूने होते. सारे काही व्यवस्थित पार पडले असे जरी नसले तरी ऐन लग्नाच्या वेळेस मात्र कसलाही विघ्न आला नाही. लग्न करून आम्ही घरी आलो. सारे माझ्याकडे टक लावून पाहत होते. बोलत मात्र कुणीच नव्हतं. चिल्ली-पिल्ली मंडळी देखील आपल्या आईचा हात हातात धरून उभी होती. नाही, त्यांच्या आईंनीच त्यांचा हात हातात घेतला होता. मी वाकून सर्वांना नमस्कार करत होते. सारे ' हम्म' एवढे म्हणत होते.

मी आता घरची एक महत्वाची सदस्य झाले होते. आई-बाबा व्यवस्थित बोलायला लागले होते. मी देखील खुलले होते. गप्पांमध्ये सामील होत होते. आणि रविवारी पुण्याच्या त्या आजी आणि इतर एक दोन आजी येणार होत्या हे कळले. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करण्यात आईला मदत केली. बेत तयार झाला. दुपारी जेवण देखील छान गप्पांमध्ये पार पडले. किचन आमच्या बेडरूमच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथे बोलले जाणारे शब्द नीट ऐकू येतात. सगळं झाल्यावर मी झोपायचे म्हणून दिवाणावर पडले होते. प्रसाद बाहेर हॉल मध्ये फोनवर बोलत होता. आणि आत आजींचा संवाद सुरु झाला.
" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती. कोण कुठली बायको केली आहे ह्या प्रसादने! तरी वहिनी, मी तुम्हाला सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या माणसाशीच! जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! झोपा तुम्ही!"

मला कधी नव्हे ते हे सारे ऐकून धक्का बसला! आपल्या माणसाशी? रशियातून आलेली सून आपली होती? ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करणार होती काय? आणि मग त्या लग्नाला खूप अर्थ होता काय? तेव्हा कुठे गेले तुमचे पूर्वज? ह्याच त्या आजी सूनेची काळजी घे म्हणून त्या दिवशी सांगत होत्या! आणि मी ह्या देशातली सून असून माझी पर्वा नाही कुणाला! रशियातली 'गोरी' वहिनी बघायला मात्र सारी पोरं मोकळी पण मी घरात प्रवेश करताना त्या साऱ्यांचे हात त्यांच्या आईच्या हातात! अगदी घट्ट! माझा नमस्कार कुणीही स्वीकारायला तयार नाही आणि तिकडे? आपली महान संस्कृती समजाव म्हणून बजावले गेले होते! तिच्याशी इंग्लिश बोलायची हौस आणि माझ्याशी मातृभाषेत देखील कुणी बोलायला तयार नाही. पण तेवढ्यात प्रसाद खोलीत येताना दिसला! मला एकदम त्याचा कॉलेज मधला तो लालबुंद चेहरा आठवला! "…आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?"

- आशय गुणे Happy

माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/

माझे फेसबुक पान: https://www.facebook.com/pages/Aashay-Gunes-Blog/180236325384645?ref=hl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>' आम्हाला मातॄभूमी नाही' हे ही उगाच घुसडलेलं आहे. दुसरी सून जर नवबौद्ध नसली, अगदी जातीचीच जरी असली तरी कंपेरिझन झालीच असती . अन गोर्‍या सुनेला नक्कीच झुकतं माप मिळालं असतं.>>

मला नाही वाटत वाक्य उगाच घुसडले आहे. वेळे प्रसंगी गोरी रशियन सून सुद्धा स्विकारली गेली पण भारतीय सून नव बौद्ध आहे म्हणून तिचा स्विकार नाही. नव बौद्ध झाले तरी जातीचा शिक्का काही पुसला जात नाही दोनच पर्याय आहेत तर परकीय चालतील पण स्वकिय नवबौद्ध नको असे वर्तन घडते तेव्हा 'आम्हाला मातृभूमी नाही' याचा अर्थ नायिकेला उमगतो. एवढेच.

मला चर्चा झालेली आवडते. आपण कोणतेही विधान करतो त्याचे उगीच समर्थन किंवा त्याची उगीच निंदा झालेली मला कधीच आवडणार नाही. कारण तो अंधपणा झाला. इथे माझ्या ह्या छोट्या लेखामुळे काही आठवणी जाग्या झाल्या, हा लेख काही लोकांना रिलेट करता आला, काही लोकांना पटला आणि काहींना अजिबात पटला नाही! पण ह्या साऱ्या परिणामामुळे मला आनंद झाला! Happy

मला दिवसभर मायबोलीवर येता येत नाही. म्हणून रात्री चक्कर टाकतो! तरी एवढ्याssss प्रतिक्रिया अपेक्षित नव्हत्या! आता मला काय म्हणायचय लेखाबद्दल? हे स्वती ह्यांनी अचूक सांगून माझे काम कमी केले! धन्यवाद स्वाती! आणि इतर सर्वांना … लेख वाचल्याबद्दल! Happy

@आशयगुणे - कथा जरा मुद्दामहून रचल्यासारखी वाटते. पण अर्थात खूप कथा अशाच रचल्या जातात... पण अधिक चांगली रचना करता आली असती.

@अशोक - <<मुलाने प्रेमविवाह करून आणलेली मुलगी घरीच कामाला जुंपलेली असली तर तिचे कांडप ठरलेले आहेच. >> हे अगदीच सत्य आहे...
<<पण सासूबाईच्या मनी काहीतरी धगधगत आहे>> - माझ्या मित्रंच्या उदाहरणावरून मात्र मला असे वाटते जर "घरातील बाइमाणूस बाजूचे वा समजणारे असेल" तर खूप सुसह्य होते जगणे घरातिल सुनेचे.

मराठा मुलगी आणि तथाकथित "खालील" जातीमधील मुलगा याचे एक उदाहरण महीत आहे की ल्ग्नानंतर एक-दोन वर्षांनी मुलीच्या घरचे अगदी परत वळाणावर आले एतके की मुलगी आणि जावई खूप वेळा त्याण्च्याच घरी रहायचे...

कुठेतरी आंतरजातीय विवाह केलेल्या आईलाच मुलाने कसे त्या कारणानेच वाईट वागवले अशी उदाहरणे वाचली आणि मग मात्र मन सुन्न झाले होते ते आठवते. त्यातील काही वाचलेल्या सत्य-कथा अजूनही आठवतात.

पण बदल होत आहेत... खूप बदल होत आहेत.

एखादया काल्पनिक/खऱ्या कुटुंबात घडलेल्या काल्पनिक/खऱ्या कथेवरुन एखादया जातीबद्दल Generalizations करणं हे ridiculous आहे.

एखादया कुटुंबात झालं असेल असं- परजातीच्या सूनेपेक्षा परकीय सुनेला मिळालंही असेल झुकतं माप- पण तो त्या कुटुंबाचा-त्यातल्या काही व्यक्तींचा दृष्टीकोन झाला.
त्यावरुन कथा लिहून ’बघा ब्राम्हण कसे वाईट आहेत’, ’बघा त्यांना भारतीयांपेक्षा रशियन जवळचे वाटतात’, ’आरक्षणाला विरोध करणारे सगळे मूर्ख व चुकीचे- आरक्षणाचे काही दुष्परिणाम असूच शकत नाहीत’ अशी gross generalizations करणं योग्य नाही.

संधी मिळेल तेव्हा एखादया जातीला धरुन झोडपायचं, कथा-बिथा लिहून त्या विशिष्ट जातीबद्दल विष पसरवायचं आणि ’आम्ही नाही जात-पात मानत’ हे वर म्हणायचं!

एखादया काल्पनिक/खऱ्या कुटुंबात घडलेल्या काल्पनिक/खऱ्या कथेवरुन एखादया जातीबद्दल Generalizations करणं हे ridiculous आहे. >>> कोठे जनरलायझेशन केलेले आहे येथे कथेत? एक अनुभव आहे तो लिहीलेला आहे.

किंबहुना, प्रतिक्रिया अशाच आहेत की हे एखाद्या जातीमधेच फक्त होते, किंवा एखाद्या जातीविरूद्धच होते असे अजिबात नाही.

कोठे जनरलायझेशन केलेले आहे येथे कथेत? एक अनुभव आहे तो लिहीलेला आहे.

किंबहुना, प्रतिक्रिया अशाच आहेत की हे एखाद्या जातीमधेच फक्त होते, किंवा एखाद्या जातीविरूद्धच होते असे अजिबात नाही.

अहो तेच तर ना. प्रतिक्रियांमध्येही हेच म्हटलंय की जनरलायझेशन करु नका- जे लेखक करतोय.
’कोणत्याही मुलीला लग्नानंतर आलेला/येऊ शकेल असा एक अनुभव’ असं न मांडता लेखक ते नालायक ब्राम्हण समाज विरुध्द दलित समाज असं मांडतोय.

वेदिका२१ ,

कैच्याकै. तुम्हाला कुठे जनरलायझेशन दिसले? एक काल्पनिक कथा आहे. तुम्हाला वेगळ्या दृष्टीकोनातून मांडायची असेल तर तुम्ही पण कथा लिहा की.

>>
किंबहुना, प्रतिक्रिया अशाच आहेत की हे एखाद्या जातीमधेच फक्त होते, किंवा एखाद्या जातीविरूद्धच होते असे अजिबात नाही.
<< अगदी बरोबर. आणि या प्रतिक्रियांचे लेखकही चर्चा म्हणून समर्थनच करतोय. लेखकाला एक बाजू चूक दुसरी बरोबर असे हिरीरीने argument करायचे नाहीये असा माझा तरी समज झाला. एक फुकाचा सल्ला. उगाच सगळे बीबी एकाच तागडीत तोलू नका.

नवरा हा दोन्ही कुटुंबात एकोपा ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो तर अगदी याच्या उलट बायको मात्र माहेरचे तेवढे नातेवाईक जपायला आग्रही असते. बायकाना फार स्वातंत्र्य देऊ नये मी या मताचा आहे. कारण ते दिल्यास बायका सगळ्यात आधी सासरच्यांची सुट्टी करण्यासाठी दिलेले स्वातंत्र्य भरभरुन वापरतील. बायकांच्या या मनोवृत्तीमुळे पुरुषानी थोडे डॉमिनेटींग राहून दोन कुटूंबाना एकत्रीत ठेवणे कधिही बेहत्तर.

बायका खूप बिचा-या दिसतात पण आतून नसतात.
पुरुष हेकट दिसतात खरे, पण आतून बिचारे असतात.

म्हणून वरवर जरी बायकांचा छळ होतो असे दिसले तरी बरेच वेळा तो छळ नसून स्त्री हट्टाला घरच्यानी प्रतिसाद न दिल्यामुळे केलेले आकांडतांडव असते. याला काही अपवाद नक्कीच असतील पण स्त्री हट्ट व बायकांची संकुचीत वृत्ती याचा तो एकूण परिपाक असतो. या स्त्री हट्टाची सुरुवात कधी सून तर कधी सासू कडून होतो. यात होरपळला जातो तो प्रुरुष... कधी नवरा म्हणून तर कधी सासरा, दीर वगैरे रुपात.

थोडक्यात पेटतं बायकांचं, पण जळतो पुरुषच.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

खुपच खालच्या थरातील मनोवृत्ती...माफ करा मी फारच रुड बोलतेय पण तुमच्या मुलीला / बहिणीला सासरी जर अशा प्रकारे ट्रीट केलं गेलं तर???? .... तेव्हा ही तुम्ही असच म्हणाल की , " हीला फार स्वातंत्र्य देऊ नये, कारण ते दिल्यास ती आधी सासरच्यांची सुट्टी करण्यासाठी दिलेले स्वातंत्र्य भरभरुन वापरेल " .???

नवरा हा दोन्ही कुटुंबात एकोपा ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो ..... नवरा हा दोन्ही कुटुंबात एकोपा ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो >> हे एखाद दुसर्‍या घरात खरं असलं म्हणून सगळीकडे नसतं.

बायकाना फार स्वातंत्र्य देऊ नये मी या मताचा आहे.>> तुमचं मत काहीही असो हो पण एखाद्या बाईला - मग ती तुमची बहिण बायको किंवा मुलगी असो स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण? बहिण बायको किंवा मुलगी किंवा दुसरी कुठलीही स्त्री तुमच्या शरीराचा हिस्सा नाहीये की तुम्ही ठरवाल त्यांना स्वातंत्र्य द्यायचं का नाही. त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांना त्यांच स्वातंत्र्य आहेच. त्यांनी ते कसं वापरायचं हा त्यांचा प्रश्न आहे.

<<बायका खूप बिचा-या दिसतात पण आतून नसतात. पुरुष हेकट दिसतात खरे, पण आतून बिचारे असतात.>>

बायकोकडून भाजीत मीठ कमी पडलं किंवा बायकोने मला हवी ती भाजी बनवली नाही किंवा सून आठवड्यातून एकदा माहेरी जाते किंवा बायको माझ्या मनाविरुद्ध स्वतःचे शिक्षणाचे नोकरीचे निर्णय घेते म्हणून बायकोच्या अंगावर जेवणाचे भरलेले ताट भिरकावणारे नवरे, सूनेला माहेरीच राहा म्हणून सांगणारे सासरे आणी तुला माझ्या घरात माझ्या घरच्यांच्या पद्धतीनेच राहावे लागेल नाहीतर आपण घटस्फोट घेउ असे म्हणणारे नवरे किती बिचारे असतात?

स्वतः नोकरी धंदा करायचा नाही किंवा आलेल्या पैशाची दारू प्यायची, आणि मग बायको दारूला पैसे पुरवत नाही म्हणून तिला मारहाण करायची किती बिचारा असतो नाही का पुरुष?

गरोदर असलेल्या बायकोने सासरच्या मंडळींना वाकून नमस्कार केला नाही म्हणून तिला लाथाबुक्क्याने मारणारा नवरा किती बिचारा असतो ना पुरुष?

बायकोने माहेरून पैसे आणले नाहीत किंवा गाडी, स्कूटर आणली नाही म्हणून तिला जाळणारा नवरा - किती बिचारा असतो ना पुरुष?

ही जुनी पुराणी उदाहरणं नाहीयेत आजच्या काळातली उदाहरणं आहेत.

अनिष्का, वेल
हातोडा बितोडा असले आयडी घेऊन येणार्‍या फालतू ट्रोल्सना उत्तर द्यायलाही जाऊ नका. ते धागा पेटवून मजा बघत बसण्यासाठीच असले अवतार घेतात.

मला तरी प्रतिसादांमध्ये कोठेही एखाद्या विशिष्ट जातीला विरोध झालेला वगैरे दिसला नाही.

जे प्रॉब्लेम्स नाही आहेत ते आहेत असे भासवून का चर्चा करत आहेत काही जण? Happy

==============

ह्या संदर्भात मनात आलेला एक असा मुद्दा जो अनेकांनी ह्यापूर्वीही बोलून दाखवला असेल आणि तोच मुद्दा पुन्हापुन्हा मनात येत राहतोही:

आपल्याकडील शिक्षण हे माणसाला पदवीधारक बनवून विशिष्ट प्रकारचे उत्पन्नाचे साधन घेण्यास समर्थ बनवण्याचे उद्दिष्ट असलेले शिक्षण आहे. 'सुजाण व सुसंस्कृत नागरीक बनवणे' हा भाग आपल्याकडील शिक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये कितपत आहे, की नाहीच आहे हाच प्रश्न पडतो.

म्हणजे आम्ही तुमच्या पाल्याला शिकवू व पदवी देऊ, नोकरी त्याने त्याची मिळवावी आणि त्याने जगात कसे वागावे हे तुमचे तुम्ही त्याला शिकवा.

वेल, तुमचा प्रतिसाद उत्तम.. प्रत्येक मुद्दा सोदाहरण खोडुन काढलात...

नीधप म्हणतात त्याच्याशीही सहमत आहे. पण एकदा का होइना अश्या प्रतिसादांना योग्य प्रत्युत्तर मिळायला हव या मताची मी आहे. आता या पुढे मारा इग्नोरास्त्र यांच्या पोस्टींवर....

हर्पेनने दिलेल्या फेबु पानाला भेट द्या. आजच्या काळातही असं होतय आपल्या पासून हाकेच्या अंतरावर हे वाचून लाज वाटली, खंत वाटली.

नी, रिया - लक्षात ठेवेन.

पण एकदा का होइना अश्या प्रतिसादांना योग्य प्रत्युत्तर मिळायला हव या मताची मी आहे. आता या पुढे मारा इग्नोरास्त्र यांच्या पोस्टींवर....<<<

असहमत आहे. आपल्याला जे योग्य प्रत्युत्तर वाटत असते ते त्यांना त्यांनी टाकलेल्या काडीच्या किंवा ओतलेल्या तेलाच्या परिणामाचे चिन्ह वाटत असते व तोच त्यांचा आनंद असतो. Happy

तो त्यांचा प्रश्न झाला बेफी. म्हणुनच मी म्हणाले आहे की एकदा का होइना अस उत्तर दिल पाहीजे.. यापुढे त्यांना इग्नोर करुन पुढे जायच. एकदा भाव मिळेनासा झाला की परत टाकणार नाहीत अशा पोस्टी.. पब्लिक/ओपन फोरम आहे, लिहायला मिळतय म्हणुन कैच्याकै कमेंट्स करण योग्य नाही ना बेफी?

हात्तिच्या ! गोरी आणि काळी सून हा सर्वसमावेशक विषय आहे त्याचा रशियन गोरीशी आणि आंबेडकरी जनतेशी उगीचच बादरायण संबंध लावलाय.

" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती." >>>> हा डायलॉग पण प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने / बाईने आयुष्यांत कधी ना कधि नक्कीच ऐकला असणार. नेहमीच्या कौटुंबिक विषयाला आंतरजातीय विवाहाच कोंदण कशाला?

जर उद्धार, समाजसुधारणा असे उद्दात्त हेतू असतील तर सासू-सून ड्राम्यातून बाहेर पडा, ते लय बघतो आम्ही समस्त उपग्रहवाहिन्यांवर.

.... आणि बौद्धांना मातृभूमी नाही हे खोटं आहे सगळं 'फार इस्ट' होलसेलमध्ये ख्रिश्चन व्हायच्या आधि ते बौद्धच होते की ... बौद्धांना भारत मातृभूमी वाटत नसला तर......

लग्न आणि त्यानंतरचे आयुष्य हे एक अजब रसायन आहे. यात कोणत्याही प्रकारचं जनरलायझेन करणे कठीणच.

मात्र, जेव्हा 'आमचं' आणि 'तुमचं' बाजूला ठेऊन 'आपल्या सर्वांचं' अशी भुमिका नवरा, बायको आणि विशेषतः त्यांचे पालक घेतील तेव्हा बर्‍यापैकी प्रश्न सुटतील. पण जोवर आपली सो कॉल्ड 'संस्कॄती' टिकवण्याची धडपड माणुसकीनं वागण्यापेक्षा प्रबळ ठरते तोवर असले हिणकस संघर्ष होतच राहतील. आणि प्रत्येक साखळीतील सर्वांत कमकुवत दुवा पिचत राहिल.

mami, talya.gif

मामी - तुमच्या अपेक्षा भाबड्या आहेत. प्रत्यक्ष जीवनात असे होत नाही.

मुलींनी स्वताच्या पायावर उभे असणे सर्वात महत्वाचे आहे. तुम्ही financially dependent असलात तर काही करता येत नाही.
त्यामुळे मुलींनी स्वताच्या पायावर उभ्या नसतील तर लग्न च करु नये.

मुलींनी स्वताच्या पायावर उभे असणे सर्वात महत्वाचे आहे. <<< सहमत!

त्यामुळे मुलींनी स्वताच्या पायावर उभ्या नसतील तर लग्न च करु नये.<<< ह्याच्याशी सहमत होऊ शकत नाही कारण हीसुद्धा एक प्रकारे भाबडीच अपेक्षा वाटते मला तरी.

बायका खूप बिचा-या दिसतात पण आतून नसतात.
पुरुष हेकट दिसतात खरे, पण आतून बिचारे असतात.

अगदी सहमत.

Happy

Pages