'आम्हाला मातृभूमी नाही'

Submitted by आशयगुणे on 4 May, 2014 - 14:49

मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता. लेक्चरच्या वेळेस प्रोफेसरांनी 'आरक्षण हवे का नको' ह्या विषयावर चर्चा करायचे ठरविले. हा फार संवेदनशील विषय आहे हे मला माहिती होते परंतु वर्गातील सारी मुलं एवढ्या तावातावाने विरोधात बोलतील हे मला अनपेक्षित होतं. त्यातल्या एकाने आरक्षणासाठी थेट डॉ. आंबेडकरांना जबाबदार धरले आणि त्यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगितले. सारा वर्ग टाळ्या वाजवू लागला आणि एकदम एका मुलाने हात वर केला. त्याला बोलायची संधी दिली गेली आणि बाबासाहेबांबद्दल तो इतके सुंदर बोलला की बस्स - प्रोफेसर देखील त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. वर्गातील मुलांना देखील त्यापुढे काही बोलता आले नाही आणि बऱ्याच लोकांनी काहीतरी निरर्थक मुद्दे काढून उगीच विरोध करायचा प्रयत्न केला. परंतु ते फोल ठरले आणि चर्चा संपली! मी मुद्दाम वर्गाबाहेर जाउन त्याच्याशी बोलले. प्रसाद सारखा शांत मुलगा एवढे प्रभावी बोलू शकेल ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता!

पुढे आमची ओळख वाढली. गप्पा वाढल्या. बरेच विषय बोलले जायचे परंतु वैचारिक चर्चा जास्त होत असे. कधी कधी लायब्ररी मध्ये नोट्स काढणे म्हणून बसले जायचे परंतु अभ्यास सोडून सामाजिक विषय जास्त बोलले जायचे. त्याला त्यावर बोलणे फार आवडायचे आणि त्याचे मुद्दे देखील खूप प्रभावी असायचे. खूप वाचन होते. आणि शिवाय विचार अगदी सर्वसमावेशक होते. माझ्या घरी भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो होता परंतु माझ्याकडे त्या फोटोला नमस्कार करणे ह्यापलीकडे काहीच नव्हते. आणि त्याचे त्यांच्याबद्दल असलेले वाचन मला शरमेने मान खाली घालायला लावायचे. आमची मैत्री वाढत गेली तसा तो अधिक बोलका होऊ लागला. एकदा असाच एक विषय सुरु होता. प्रसाद भान सोडून बोलत होता. लायब्ररी मध्ये पुढे बसलेल्या लोकांनी एक-दोन वेळेस मागे वळून आमच्याकडे पाहिले देखील. "आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?" अंगावर शहारा आला होता आणि डोळे पाणावले होते त्याचे. तो लालबुंद चेहरा मला अजून लक्षात आहे.

एकमेकांचा नंबर तर होता आमच्याकडे! त्यामुळे मेसेज वगेरे सुरु झाले. तेव्हा व्हाटसअप वगेरे नव्हतं आणि फेसबुक पण नुकतंच सुरु झालेलं! त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करणं सुरु असायचं. आणि मी त्याच्या विचारांच्या आणि नंतर त्याच्या प्रेमात केव्हा पडले हे कळले देखील नाही. पण विचारायचे कसे? शिवाय विचारायच्या आधी आमची भिन्न पार्श्वभूमी लक्षात आली आणि क्षणभर बिचकले! परंतु मन सांगत होते विचारून मोकळी हो! आणि मी एकेदिवशी आम्ही घरी येताना त्याला सांगून टाकले. क्षणभर तो माझ्याकडे बघत राहिला! नंतर म्हणाला, " मला देखील तुला हेच विचारायचे होते!"
मी जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसेना! काही न बोलता आम्ही नुसतेच चालत राहिलो. आणि अचानक मनात आलेल्या विचाराने मी पुन्हा घाबरले. आणि धैर्य गोळा करून म्हणाले, " आमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो आहे तरी सुद्धा तुला चालेल?"
तो माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, " माझे विचार आणि माझी कृती ह्यात फरक नाही!"

आमच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपली मुलगी एका बामणाच्या घरी चालली आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! त्याच्या घरचे नातेवाइक तर अजिबात तयार होत नव्हते. परंतु प्रसाद माझ्याबरोबर उभा होता आणि मला ह्यात समाधान होते. दरम्यान मी त्याच्या घरी जाऊ लागले. त्याच्या घरच्यांशी ओळख होऊ लागली होती. त्याचा मोठा भाऊ प्रकाश हा रशियात
डॉक्टर होण्यासाठी गेला होता. आणि एके दिवशी घरी बातमी आली की प्रकाश दादाला रशियात एक रशियन मुलगी आवडली आहे आणि दोघे लग्न करणार आहेत! घरी अर्थात सगळे खुश झाले होते. तो घरी केव्हा येईल ह्याची वाट बघत होते. पोरांना ह्या गोऱ्या वाहिनीला बघण्याची ओढ लागली होती. 'स्काइप' वर आजीने होणाऱ्या सूनेला पाहिले होते आणि 'किती गोरी आहे माझी सून' असे आनंदाने म्हणून नात्याला पसंती दिली होती! प्रकाश दादाला देखील आपल्या होणाऱ्या बायकोची स्वीकृती झाल्यामुळे आनंद झाला होता. लग्नाचा दिवस उजाडला. मी देखील मदत म्हणून प्रसादच्या घरी असायचे. त्याचे इतर काही मित्र देखील होते. लग्न अगदी व्यवस्थित पार पडले आणि रशियन सूनेने अगदी उत्सुकतेने सारे विधी पार पाडले. तिला आपल्या 'कल्चर' बद्दल बरेच काही सांगितले गेले होते. ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश आजीने आणि त्यादिवशी घरी आलेल्या पुण्याच्या आजीने 'स्काइप' वर प्रकाश दादाला आधीच दिले होते. त्याचे पालन झाले होते बहुदा!

त्यादिवशी सारे नातेवाईक ह्या नव्या सूनेशी बोलायला उत्सुक होते. पुण्याच्या आजी तर प्रचंड! अगदी तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये सारे काही सांगितले जात होते. अर्थात मुलगी रशियन असल्यामुळे तितक्याच तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये उत्तरं मिळत होती आणि आजीची विशेष पंचाईत होत नव्हती! दोघे रशियाला परत जायचा दिवस उजाडला. सर्वजण अगदी भावूक झाले होते. मी देखील प्रसादच्या जवळ उभी होते. सारे काही समजू शकत होते.
"माझ्या सूनेची काळजी घे रे!" आजीने अगदी भावूक स्वरात सांगितले. आम्ही परत यायला निघालो. पुण्याच्या आजीने प्रसादकडे डोळे वटारून कोरड्या स्वरात सांगितले, " आता तुमचा नंबर असेल ना!" आम्ही परत घरी आलो.

प्रसादला आणि मला विधींचे विशेष आकर्षण नव्हते. शिवाय दोन वेगळ्या पार्श्वभूमी असल्यामुळे दोन्हीकडचे लोक आपापले विधी पुढे करतील ह्याची भीती होतीच. त्यामुळे आम्ही सर्वांचा रोष पत्करून कोर्टात लग्न करायचे ठरवले! हा आमचा निर्णय घरी तर अजिबात मान्य नव्हता पण त्या संदर्भात नाराजी ही नातेवाईक मंडळींमध्ये अगदी लगेच पसरली! प्रसाद खंबीर होता आणि सुदैवाने त्याचे वडील आमच्या बाजूने होते. सारे काही व्यवस्थित पार पडले असे जरी नसले तरी ऐन लग्नाच्या वेळेस मात्र कसलाही विघ्न आला नाही. लग्न करून आम्ही घरी आलो. सारे माझ्याकडे टक लावून पाहत होते. बोलत मात्र कुणीच नव्हतं. चिल्ली-पिल्ली मंडळी देखील आपल्या आईचा हात हातात धरून उभी होती. नाही, त्यांच्या आईंनीच त्यांचा हात हातात घेतला होता. मी वाकून सर्वांना नमस्कार करत होते. सारे ' हम्म' एवढे म्हणत होते.

मी आता घरची एक महत्वाची सदस्य झाले होते. आई-बाबा व्यवस्थित बोलायला लागले होते. मी देखील खुलले होते. गप्पांमध्ये सामील होत होते. आणि रविवारी पुण्याच्या त्या आजी आणि इतर एक दोन आजी येणार होत्या हे कळले. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करण्यात आईला मदत केली. बेत तयार झाला. दुपारी जेवण देखील छान गप्पांमध्ये पार पडले. किचन आमच्या बेडरूमच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथे बोलले जाणारे शब्द नीट ऐकू येतात. सगळं झाल्यावर मी झोपायचे म्हणून दिवाणावर पडले होते. प्रसाद बाहेर हॉल मध्ये फोनवर बोलत होता. आणि आत आजींचा संवाद सुरु झाला.
" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती. कोण कुठली बायको केली आहे ह्या प्रसादने! तरी वहिनी, मी तुम्हाला सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या माणसाशीच! जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! झोपा तुम्ही!"

मला कधी नव्हे ते हे सारे ऐकून धक्का बसला! आपल्या माणसाशी? रशियातून आलेली सून आपली होती? ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करणार होती काय? आणि मग त्या लग्नाला खूप अर्थ होता काय? तेव्हा कुठे गेले तुमचे पूर्वज? ह्याच त्या आजी सूनेची काळजी घे म्हणून त्या दिवशी सांगत होत्या! आणि मी ह्या देशातली सून असून माझी पर्वा नाही कुणाला! रशियातली 'गोरी' वहिनी बघायला मात्र सारी पोरं मोकळी पण मी घरात प्रवेश करताना त्या साऱ्यांचे हात त्यांच्या आईच्या हातात! अगदी घट्ट! माझा नमस्कार कुणीही स्वीकारायला तयार नाही आणि तिकडे? आपली महान संस्कृती समजाव म्हणून बजावले गेले होते! तिच्याशी इंग्लिश बोलायची हौस आणि माझ्याशी मातृभाषेत देखील कुणी बोलायला तयार नाही. पण तेवढ्यात प्रसाद खोलीत येताना दिसला! मला एकदम त्याचा कॉलेज मधला तो लालबुंद चेहरा आठवला! "…आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?"

- आशय गुणे Happy

माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/

माझे फेसबुक पान: https://www.facebook.com/pages/Aashay-Gunes-Blog/180236325384645?ref=hl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझेही लग्न असेच. सुदैवाने वाईटच्या मानाने बरे अनुभव जास्त आले. दोन्ही कडूनच. आणि अश्या वेळी चांगल्या अनुभवांचे वेटेज नेहमी जास्त पकडण्याची सकारात्मकता दाखवावी. कदाचित मी एकुलता एक असल्याने तुलना करायला कोणी रशियन सून नव्हती त्यामुळे असावे. पण चांगले घडलेय तर का खोलात शिरावे. असो, खूपच रिलेट होणारा विषय आहे, म्हणून लेखाबद्दल तटस्थपणे रिप्लाय सध्या सुचत नाहीये.

माझा एक चुलत जावई बौद्ध आहे. नवदांपत्य जर्मनीस स्थाइक होणार आहे. त्यांनी अगदी जवळच्या नातेवाइकांना एका कोकणातील रिझॉर्ट वर नेउन तिथे लग्न लावले. ह्या मुलीच्या आजींनी मी दत्तक असून मला कधीच स्वीकारले नाही. आता असत्या तर जावया बद्दल काय त्यांची मते असती असे वाटले. तथापि का ळाच्या रेट्यात सर्व मागे गेले. आता फक्त नवीन जोडप्यास शुभेच्छा दिल्या .

आवडला लेख.

लेख छान आहे. माझ्या माहितीत २ उदा. आहेत . एक मराठा मुलगी धनगर घरात लग्न करून गेलेली. तिच्या माहेरच्यांनी तिच्याबरोबरचे पुर्ण संबंध तोडले आहेत. दुसरी एक ब्राह्मण मुलगी नवबौद्ध घरात. पण तिलाही भरपूर त्रास झाला होता. तिच्या आई वडीलांनी तर सम्बंध तोडलेलेच. पण सासरची माणसे देखिल जातीपासून इतर प्रत्येक गोष्टीतच टोचून बोलायची. जातीबाहेरच्या लग्नात बायाकांनाच जास्त त्रास सोसावा लागतो , मग ती बाई कोणत्याही जातीची का असेना Sad

अता लोक म्हणतील , की धागा कोणताही असो या बाई स्त्रीवाद घेऊन येतातच Sad

श्री.गुणे यांचा लेख समाजमनाचे, स्थितीचे अगदी हुबेहूब चित्रण करीत आहे. एकीकडे आंतरजातीय विवाह करण्या-यांची संख्या लक्षणीय आहे असे दिसत आहे (पुण्यामुंबईतच नव्हे तर कोल्हापूर बेळगाव अशा ठिकाणीसुद्धा) त्याचे स्वागत निदान काही प्रमाणावर होत असले तरी कौटुंबिक पातळीवर "हे तुमचे असे कसे ? हे आमचे तू स्वीकारले पाहिजेस " अशा स्वरूपाच्या मागण्या ज्येष्ठांकडून (सुशिक्षित अशिक्षित फरक नाही...केवळ ज्येष्ठ या पदवीला पात्र आहेत म्हणून) आग्रहाने आणि सातत्याने होत असल्याचे मी माझ्या समाज निरिक्षणात अनुभवले आहे. त्यात जर सून नोकरी करणार असेल तर हा जाच काहीसा पातळ स्वरूपाचा असतो पण मुलाने प्रेमविवाह करून आणलेली मुलगी घरीच कामाला जुंपलेली असली तर तिचे कांडप ठरलेले आहेच.

आंतरजातीय विवाहाची नवलाई फार लवकर सुकते, आशय. मी वयाने तुमच्यापेक्षा सीनिअर आहे त्याच्या आधारे प्रत्यक्ष पाहिलेल्या उदाहरणावरून हक्काने सांगू शकतो की काही महिन्यांनी या मजनूचा इश्की ज्वर उतरला की तोही मग लैलाला लैला न समजता कुटुंबियांच्या कलाने तिने कसे घेतले पाहिजे हे हक्काने सांगायला लागतो. अशावेळी त्या मुलीची जी घुसमट व्हायला सुरू होते त्याचे परिणाम मग सुरुवातीला तिच्या वर्तणूकीवर व नंतर प्रकृतीवर दिसायला सुरुवात होते. हे व्यावहारिक जग आहे आणि ह्या पटरीवरील गाडी नित्यनेमाने खडखडत चालत राहते. यशस्वी उदाहरणेही पाहिली आहेत (अगदी एक हिंदू मुलगा व मुस्लिम मुलगीचेदेखील) पण ह्या जोड्या स्वतंत्र राहत असल्यानेच....अर्थात याना झालेल्या अपत्यांच्या वाढीचाही डोकेदुखी व्हावी असा वाद आहे, पण ह्या धाग्यात ते अवांतर होईल.

डेलिया म्हणतात... "...जातीबाहेरच्या लग्नात बायाकांनाच जास्त त्रास सोसावा लागतो , मग ती बाई कोणत्याही जातीची का असेना...." ~ हे तर अगदी ठरलेले आहे. अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. होल्डर असलेल्या माझ्या ओळखीच्या एका मुलीने (देब्रा) माझ्याच मित्राच्या मुलाबरोबर (मराठा) प्रेमविवाह केला....हा बॅन्केत, तर ती लेक्चरर....दोघांच्या वेतनावर तब्बल सहा लोकांचे घर आरामात चालते अशी परिस्थिती....तरीही माझ्याशी बोलताना सासूबाई "अहो पाटीलभावोजी, बाकी सगळे ठीक आहे हो, पण अजूनी हिला आपल्यासारख्या भाकर्‍या करता येत नाहीत. चपात्याच करते..." ~ काय बोलायचे या बाईच्या मनोवृत्तीवर ? एकीकडे नवर्‍यापेक्षाही ही लेक्चरर मुलगी जास्त पगार मिळविते, घरही प्रेमाने चालवित आहे....पण सासूबाईच्या मनी काहीतरी धगधगत आहे, ते अशा फुटकळ कारणाने समोर येत राहते. सहन करते ती मुलगी.

आशय....तुमच्या लेखातील मुलगी समाज उतरंडीवरील व्याखेप्रमाणे दलित आहे तर मुलगा उच्चवर्णीय. कदाचित त्यामुळे सासरच्या लोकांचा तिच्याकडे पाहाण्यच्या दृष्टिकोण काहीसा कुत्सित असू शकेल, पण बिलिव्ह मी....उच्चवर्णियाची मुलगी निम्नवर्णियाच्या घरी नांदताना तिलाही प्रसंगी हेटाळणी सहन करावी लागतेच असे चित्र दिसते. सामाजिक मनोवृत्तीचा तो एक अटळ असा भाग आहे.

दुटप्पीपणा हा आपल्या महान संस्कृतीचा स्थायिभावच आहे.

< जातीबाहेरच्या लग्नात बायाकांनाच जास्त त्रास सोसावा लागतो , मग ती बाई कोणत्याही जातीची का असेना> जातीबाहेरच्याच का, जातीतल्या लग्नातही बायकांनाच त्रास सोसावा लागतो. "आमच्याकडे हे अस्लं चालत नाही; हीच रीत आहे का तुमच्या घरची?" हे उद्गार जातीतल्या लग्नात येतातच ना.
तुमचा प्रतिसाद वाचून इंदिरा संत यांच्या 'मृद्गंध' मधील 'बरा संसार संसार' हा ललितलेख आठवला.

भरत....

"....जातीतल्या लग्नातही बायकांनाच त्रास सोसावा लागतो..." ~ असेही उदाहरण मी पाहिलेले आहे. फरक इतकाच की अशाप्रसंगी जातीतीलच ती सून कणखरपणे सासूला उलटून त्वेषाने बोलताना दिसली आहे. एका सूनेने तर अशा वादात "तुमच्या घराचे सांगू नका मला...माझ्या लग्नाअगोदर बॅन्केची नोटीस आली होती तुम्हाला, हे माहीत होते आमच्या घरी, तरीही माझे इथे लग्न लावून दिले, मुलाकडे पाहून..." हा वार जबराच होता.

असा विवाह... मग तो विवाह पारंपारिक असो वा प्रेम. सून त्याचे शाखेची असल्याचा तो एक फायदा मिळतोच तिला.

पण बिलिव्ह मी....उच्चवर्णियाची मुलगी निम्नवर्णियाच्या घरी नांदताना तिलाही प्रसंगी हेटाळणी सहन करावी लागतेच असे चित्र दिसते. सामाजिक मनोवृत्तीचा तो एक अटळ असा भाग आहे. >>>>> साधारण ३० वर्षांपुर्वीची गोष्ट. आमच्या शेजारची एक ताई (शेजारच्यांची पुतणी, जी बरेच वेळा आमच्या शेजारी येत असे) कुर्ला (पश्चिम) येथे रहाणार्‍या एका अत्यंत सज्जन नवबौद्ध मुलाच्या प्रेमात पडली. सुरुवातीला दोन्हीकडून विरोध होता. पलिकडून तर अगदीच कडवा विरोध. आमचे शेजारी आणि त्यांचे धोतर/नऊवारी नेसणारे म्हातारे आईवडिल सोवळे ओवळे पाळणारे होते तरी त्या रजिस्टर लग्नाला सह्या करायला हजर होते. मुलाकडील घरचे कुणीच आले नाही. मित्रांनी सह्या केल्या. नंतर ताई तिची छोटीशी बॅग घेऊन कुर्ल्याला सासरी गेली. स्वागत तिरस्काराने झालं. दुसर्‍या दिवशी नवपरिणित जोडप्याचे सामान भर गर्दीसमोर तमाशा करुन बाहेर फेकलं गेलं. ताईला नोकरी नव्हती. तिच्या यजमानांना छोटीशी नोकरी होती. मग आमच्या शेजारच्या काकांनी त्या दोघांना आपल्या घरी आणलं. सगळ्यांनी (अगदी शेजार्‍यापाजार्‍यांनीही) सामावून घेतलं, फक्त त्यांना एकच अट होती की त्या घरात मांस शिजवायचं नाही आणि आणायचंही नाही. तिथेच तिचं पहिलं बाळंतपण झालं. नंतर तिच्या यजमानांना एअर इंडियात नोकरी लागली आणि त्यांनी स्वतःची जागा घेतली. आता त्यांची दोन्ही मुलं मोठी झाली. मोठ्याचं लग्नही झालं. मोठा इंजिनियर होऊन यू.एस. ला आहे. धाकटा सर्जन आहे. ताईने सासरच्यांबद्दल मनात राग ठेवला नाही. तिची धाकटी जाऊ जातीतील असल्यामुळे सासरी नांदवली गेली. तिच्याशीही ताईचे चांगले संबंध होते.

जातीबाहेरच्या लग्नात बायाकांनाच जास्त त्रास सोसावा लागतो , मग ती बाई कोणत्याही जातीची का असेना <<<
हे अनेक ठिकाणी होताना ऐकलंय. बघितलंय सुद्धा.
माझ्या लग्नाच्या वेळी कुठेतरी आतमधे मी मनाची तयारी केली होती असे काही झेलावे लागेल याची. पण सुदैवाने जात ह्या विषयावरून कधीही काहीही सोसाबिसावे लागले नाही.

नीधप....

"...पण सुदैवाने जात ह्या विषयावरून कधीही काहीही सोसाबिसावे लागले नाही....." ~ खूप नशीबवान आहात तुम्ही, नीधप. याला दोन कारणे संभावतात (माझ्या अभ्यासावरून लिहितोय मी....) १. तुमच्याकडे असलेला तुमचा स्वतंत्र बाणा....मग तो वैचारिक असो वा व्यावहारिक....यामुळेही तुमच्या शब्दाला आपोआपच एक वजन प्राप्त होते. व २. तुमचे पान मी पाहिले....तिथे वास्तव्याचे ठिकाण पुणे आणि मुंबई अशी दोन शहरे आहेत. ही दोन्ही ठिकाणे आधुनिक विचाराच्या धारेने भारलेली असल्याने तसेच जीवनाचाही वेग पकडलेली असल्याने आंतरजातीय विवाहाला असलेली धार बोथट होते (होत असावी).

अन्य शहरात अशी परिस्थिती नसते....बर्‍याच उदाहरणाच्या आधारे मी म्हणत आहे.

वास्तव्याचे ठिकाण पुणे आणि मुंबई अशी दोन शहरे आहेत. ही दोन्ही ठिकाणे आधुनिक विचाराच्या धारेने भारलेली असल्याने तसेच जीवनाचाही वेग पकडलेली असल्याने आंतरजातीय विवाहाला असलेली धार बोथट होते (होत असावी).
>>>
as mulich nahiye mama Happy

Third class samaj sagalikade asato.

so called uchabhru lok khujbuj karatat ani so called adani lok tondawar bolatat.
pan bolatatach

pan bolatatach <<
लोक कुठेही बोलतात हे खरे पण मला लोकांची बाष्कळ बडबड ऐकू येत नाही त्यामुळे मी सुखी आहे.
घरातले लोक महत्वाचे आणि ते त्रास करत नाहीत हे सुदैव.

तुमचे पान मी पाहिले....तिथे वास्तव्याचे ठिकाण पुणे आणि मुंबई अशी दोन शहरे आहेत. ही दोन्ही ठिकाणे आधुनिक विचाराच्या धारेने भारलेली असल्याने तसेच जीवनाचाही वेग पकडलेली असल्याने आंतरजातीय विवाहाला असलेली धार बोथट होते (होत असावी).>>>>> यातल होत असावी हे जास्त आहे. स्थळ कुठलही असो, मुंबई-पुणे किंवा आणखी काही जिथे माणसाचे मुळ विचार भेदभावाचे आहेत तिथे स्थळ, काळ दोन्ही गोष्टी गौण ठरतात. ज्या शहरांमधुन अजुन देब्रा-कोब्रा भेद नाहीसा झाला नाहिये तिथे इतर गोष्टींची अवस्था काय वर्णावी? बाकी अनुभवाच्या बाबतीत मी इथे मत प्रदर्शित केलेल्या सदस्यांपेक्षा कमीच आहे. तरी जे मनात आल ते बोलल्यावाचुन रहावल नाही. चु.भु.द्या.घ्या.

आशयभेद तुमचा लेख आवडला, मनापासुन आवडला.

रिया....

मान्य. तसे मी देखील काहीशा सावधगिरीनेच तसे लिहिले होते....आशादायक चित्र निर्माण होईल असे वाटले. बाकी समाजातील आंतरजातीय विवाहामागील विरोध विचारधारा कायमची पुसून जाईल अशा भ्रमात मी देखील नाही. शहरात सुसह्य परिस्थिती आहे पण तालुका आणि ग्रामीण भागात तर अंगावर शहारे येईल असा त्रास (जाच म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल) होत असतो मुलींना. वादप्रसंगी माझ्यासारखा त्रयस्थ केवळ समजुतीच्या दोन गोष्टी सांगण्यापुरताच तिथे जातो. कदाचित तो एखाददुसरा दिवस ठीक जात असेल त्या मुलीचा....पण तिसर्‍या दिवसापासून सासूबाईंच्या अंगात यल्लमा संचारतेच.

देब्रा मुलगी सून म्हणून घरी आणली हे सुरुवातीला स्वागतार्ह ठरले; पण पुढे जातीचा फणा उग्रावला व एके दिवशी सासूने या ब्राह्मण मुलीला मटण करायला शिकले पाहिजे असे फर्मान सोडले....काय वाटले असेल त्या २१ वर्षाच्या मुलीला ? जिला अजूनी मटण्याच्या स्पेलिंगमध्ये नेमके कोणती लेटर्स येतात हेही माहीत नव्हते. ज्या हीरोसमवेत लग्न केले तो तरी आईला याबाबतीत विरोध करेल असे हिला वाटले, तर तो वाघ्याही पेंढा भरलेला निघाला. तो म्हणू लागला..."आईचे ऐकले पाहिजे....!"

असे हे प्रेमविवाह.

mama, mazya olakhichya eka maitrinila tar tichya sasune mutton nusate karayala nahi tar khayalahi lavale hote Sad
kasale bekkar lok asatat Sad

mala koni authority dili na tar mi saral ek kayada kadhen, jat pat mananarya pratyek vyaktila fashichi shiksha bhogavi lagel asa :raag:

devane fakt manus banavala ani manasane jat.... ata devachya nirmiti chya dokyawar manasanchi nirmiti mire vatu lagaliye.

asalya samajawar mi thunkanar pan nahi. tyanchya wicharapesha mazi thunk bari.

अशावेळेला मुलीने ठामपणे (आणि आकांडतांडव न करता) नकारच द्यायचा. एकदा वाकलात की मग सवय लागते समोरच्याला. ती कमावती आहे ना? आणि हे असे संभाव्य संघर्षाचे मुद्दे आधीच मोकळेपणाने सगळ्यांशी चर्चा केलेले असले तर संघर्षाची धार कमी व्हायला मदत होते. लग्नाआधीच स्पष्ट सांगायला हवं की मी मांसाहारी स्वैपाक करेन्/करणार नाही किंवा इतर रहाणीमानाचे, वेशभूषेचे मुद्दे. हे सगळे मुद्दे लग्नाआधी दोन्ही घरातल्या सगळ्या लोकांसमोर दोघा नवराबायकोंनी स्पष्ट केले तर जास्त सोपं जातं. मला माहित आहे सांगण्यापेक्षा करणं अवघड, पण निदान सुशिक्षित कमावत्या मुलींनी तरी हे असं करायला पुढाकार घेतलाच पाहिजे. पेंढा भरलेले वाघ कुठले आणि खरे कुठले हे बरंचसं तेव्हाच कळून जाईल.
पण काय आहे ना, मुळात आपल्याकडे मुलींनी पुढाकार घेऊन स्वतंत्र मतं मांडलेली बहुतेकवेळा त्यांच्याच आईवडिलांना पचत्/रुचत नाहीत. तेव्हा अशा 'भावनिक दबावांना' बळी पडायचं की नाही हे मुलींनी स्वतःच ठरवायचं. मुलांना फारसा फरक पडत नाही कारण त्यांच्या जीवनशैलीत फारसा फरक पडणार नसतो किंवा बरेच वेळा घरही बदलणार नसतं.

जुन्या लोकांची मानसिकता बदलणं कठीण असतं हे कितीही खरं असलं तरी आपण हळूहळू बदलायचे प्रयत्न केलेच पाहिजेत.

पण तिसर्‍या दिवसापासून सासूबाईंच्या अंगात यल्लमा संचारतेच.>>>> देवा!! मामा माझ्या डोळ्यासमोर लल्लाटी भंडार गाण्यावर नाचणारी एक भयानक बाई आली...

asalya samajawar mi thunkanar pan nahi. tyanchya wicharapesha mazi thunk bari.>>> रिया सॉरी टु से.. पण जरा सांभाळुन

मुळात आपल्याकडे मुलींनी पुढाकार घेऊन स्वतंत्र मतं मांडलेली बहुतेकवेळा त्यांच्याच आईवडिलांना पचत्/रुचत नाहीत. तेव्हा अशा 'भावनिक दबावांना' बळी पडायचं की नाही हे मुलींनी स्वतःच ठरवायचं.

>>>>>
ye pate ki bat hai Happy

pan sagalyach mulina aai vadilana dukhavan (apali mat Mandan pan dukhavan vatayala lagalay lokaa aajkal/..... ani tyat natewaeek asatatch agit tel otayala) jamat nahi Sad

ashanch sandwich hot agadi

Mugdhe, mala bhayankar santap alay g.
jyala je watayach te vatu det. I care damn!

pan tech maz mat ahe ani tech khar ahe!

agadi kalachach udaharan,
mazya olakhitali ek mulagi mulaga pahayala geli hoti.

mulane vicharal tu office la kasha jates tyawar tine uttar dil mazya mitrasobat ani tichya ghari jo akantandav...... sangayach hotas mhane busne jate.... mala asa santap alela na tichya aaicha.... mi mhanal kaku ashi khotepanawar nati julavat rahilat tarmodayala wel laganarnahi. tar tyani mala gharabaherach hakalun dil :ao:

लग्नाआधीच स्पष्ट सांगायला हवं की मी मांसाहारी स्वैपाक करेन्/करणार नाही किंवा इतर रहाणीमानाचे, वेशभूषेचे मुद्दे. हे सगळे मुद्दे लग्नाआधी दोन्ही घरातल्या सगळ्या लोकांसमोर दोघा नवराबायकोंनी स्पष्ट केले तर जास्त सोपं जातं. मला माहित आहे सांगण्यापेक्षा करणं अवघड, पण निदान सुशिक्षित कमावत्या मुलींनी तरी हे असं करायला पुढाकार घेतलाच पाहिजे. पेंढा भरलेले वाघ कुठले आणि खरे कुठले हे बरंचसं तेव्हाच कळून जाईल. >>>> करेक्ट. काही वर्षांपुर्वी ऑफिसमधल्या एकीने स्वतःला संपवलं होतं. फिजिक्समध्ये मास्टर्स केलेल्या त्या मुलीने सासरच्या जातीप्रमाणे माश्यांची टोपली घेऊन विकायला बसायला नकार दिल्यावर सासरच्यांनी "आमच्या जातीप्रमाणे तुला वागावंच लागेल" असं म्हणत अनन्वित छळ सुरु केला होता. नवर्‍याचं काय म्हणणं होतं ते कळलं नाही. मरता मरता तोंडातून वाचवण्यासाठी आरडा ओरडा केला जाऊ नये म्हणून बिचारीने तोंडात भरपूर तंबाखू कोंबून घेतला होता.

inshort kai tar jatiyvadach nasht hoela hava Sad

je imposible ahe.

ase varache lekh vachun swatala jara bar vatun ghyav! zaal!

Pages