स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह, ओके अंजली. थँक्स. Happy
रोजच्या वापराकरता हवा आहे, तुझ्याकडे किती कप चा आहे ? ब्राऊन राईस पण व्यवस्थित शिजतो का ? पाणी वगैरे बाहेर येत नाही ना ? रोज स्वच्छ करायला कसा आहे ?

मी स्टार सी जे वरून मास्टरशेफ डायमंड कोटेड पॅन आणि कढई मागवलं. दोन्ही भांडी अप्रतिम आहे.
मी अक्षरशः प्रयोग करून पाहिला. बेसनाचं थालिपीठ एक थेंब ही तेल न घालता अगदी नीट व्यवस्थित झालं. आय अ‍ॅम हायली इम्प्रेस्ड. Happy

मला परवा अपना बाजारात स्टीलची मस्त जाड कढई मिळाली आहे. किती महिने मी शोधत होते. आता सगळ्या अ‍ॅल्युमिनियमच्या कढयांना आणि नॉन स्टिकना टाटा बाय बाय.

नारळ खवण्या साठी कोणती खवणी बेस्ट आहे? माझ्याकडे चमच्यासारखी एक खवणी आहे पण जास्त प्रमाणावर नारळ खवायचे असल्यास त्रास होतो. मिक्सर मध्ये बारीक केलेले नारळ आवडत नाही.

मवा सॉरी फारच उशीरा उत्तर देतेय.
माझ्याकडे १२ कपचा आहे. ब्राऊन राईस पण होतो मस्त. पाणी वगैरे नाही बाहेर येत. ज्यात भात शिजतो ते भांडं बाहेर काढून घासता येतं.

मवा कॉस्ट्कोत २५-३० $ ला एक राईसकुकर मिळतो, त्यात स्लो कुकर चा पण ऑप्शन आहे आणी ब्राऊन राईस पण होतो.
मी ३ वर्ष वापरती आहे.

अंजली, अनुश्री, थँक्स. Happy
मी सध्या मेसीज च्या सेल मधून एक क्विझिनआर्ट चा छोटा ४ कप चा राईस कुकर घेतलाय, त्यात ब्राऊन राईस, किन्वा, स्टील कट ओटमील होतंय. त्यात वर स्टीमर पण आहे, भाज्या छान स्टीम होतायत,चिकन, मीट पण होतं असं लिहीलंय. हा सध्या ठीक वाटतोय.

मवा कॉस्टोचा मोठा आहे. बरच काय काय आहे त्याला, टायमर वैगरे पण आहे. (बाहेर जाताना लाऊन जाऊ शकतो)
पण तुला ४ कप चा हवा असेल तर तो मोठा होईल.

<<<डायमन्ड कोटेड पॅन आणि कढई >>>> वॉव.... मजा आहे बॉ....

मी सध्या सॅन्ड्विच बॉटम ची भान्डी वापरते... स्टील ची आहेत ...खाली अजिबात लागत नाहीत...खुप साईझ मधे आहेत...आणी नोन्स्टिक ची रिस्क पण नाही .....दर पण वाजवी आहेत....

हल्लीच मी भारतात मिळणार्‍या Softel Snack Makerचा विडियो पाहिला. ही लिन्कः http://www.youtube.com/watch?v=ASaxAqkxliM. मला हा घ्यायचा आहे माझ्यासाठी पण हेच मोडल मला USA मधे दिसले नाही. त्याच्या जवळपास जाणारे जे यंत्र मला दिसले ते म्हणजे hot air popcorn popper. कोणी हे वापरुन पाहिले आहे का? माहिती असल्यास मला हवी आहे.

अमी

असा एक स्नॅक मेकर आमच्या सासुबाईंनी घेतला आहे. पण तो भारतातच आहे. त्याचा काय वापर वगैरे ते मात्र मला नाही माहिती.

पेरु, मी दिलेल्या लिन्कवर विडियो पाहू शकाल. बर्‍यापैकी अंदाज येतो काय काय snack म्हणून करु शकतो ते. मला खूपच उपयोगी होईल म्हणून उसगावात काय त्याच्या ऐवजी वापरु शकते हे कोणाला माहित असेल तर मला मदत होईल. उत्तर दिल्याबद्दल धन्स!

अमी

Hi everyone,
We are moving back to india next year and going for a month visit at the end of the week. Could someone pls share what we can take from here like cooking set etc which brand, nonstick or steel? Is it ok to buy one in Costco Kirkland brand, pls reply. Also anything else, apart from cooking set if someone want to suggest would be a great help. We have two girls 8 and 5, so any kids related or kitchen home improvement stuff pls suggest.

Thanks much,
Surekha

सुरेखा भारतात सर्व प्रकारची उत्तम भांडी व अप्लायन्सेस मिळतात. खास मुलांच्या सवयीचे असे काही असेल तरच आणा नाहीतर सर्व भारतात नवीन घेता येइल. होम शॉपिन्ग नेटवर्क वर खरेदी केल्यास उत्तम डिस्काउंट पण मिळतील.

Thanks Prajakta ani Ama. Prajakta, tumhi dilelya link var around 60 pages ahet..I went through some info but couldn't find specific info I hv requested..so would be great if someone can reply..

सुरेखा,

तुम्ही तिथून खालिल वस्तू आणू शकता ज्या इथे वापरल्या जातील / उपयोगी पडू शकतात, Hope it helps.

1. Corelle or other your preferred brand dinnerware set. Now a days, you do get Corelle / Luminarc brand's dinnerware in India but they are very costly compared to USD cost but Corelle has introduced dinner-set as per Indian food assortment.

2. Glassware / Tumbler set

3. cutlery set

4. Kitchen knives set

5. bakeware : Again you do get Pyrex etc here but costlier and not much variety.

6. Kitchen storage boxes : Rubbermaid / Glad or any other your preferred brand

7. Pot and pon hanger / holder , Lid stacker or holder

8. Broom/ mop holder

9. You may bring non-stick or steel cookware set but non stick might not be as durable in India as we outsource utensil washing to the maid Happy

10. Various kinds of kitchen wipes and kitchen cloth

11. shower curtain with hooks, shower caddy

12. bathroom accessory sets

13. toy storage, if you have any.

I would suggest not to bring any electrical kitchen equipment. It's waste of money as conversion is big headache and most of the times it doesn't work as it should.

भांडी घासण्याचे काम बाईकडे असल्यामुळे आपल्या नाजूक, काचेच्या वस्तू कितपत टिकाव धरतील तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

Brooms/mop holders pan ameriketun aananaar? great. gammat waaTali.

http://www.walmart.com/ip/Ex-Cell-The-Clincher-White-Gloss-Mop-Broom-Hol...

http://www.walmart.com/ip/Universal-Magic-Wall-Holder-and-Hooks-Set-of-2...

अश्या प्रकारचे Innovative products इथे कोणत्या दुकानांत मिळतात ते सांगा... जे कळतं नाही, माहित नाही त्याबद्द्ल उगीच बोलू नाही Happy

Brooms/mop holders मी ही सिन्गापूर वरून आणले आहेत. ईव्हन कपडे वाळ्त घालायचा फोल्डेबल रॉड ही आणला आहे Happy

राजसी, ती वस्तूंची यादी देण्यापेक्षा अमेरिकेतला संसार तसाच्या तसा उचलून भारतात हव्या त्या ठिकाणी कुरीयर करण्यासाठी चांगलं डील कुठे मिळेल हे लिहिलंत तर sushinde ना जास्त उपयोगी होईल असं मला वाटतं.

अमेरिकेतून किंवा इतर कुठल्याही देशातून काहीही उपकरणे, सामान, खाद्यपदार्थ वगैरे नसताना पिढ्यानपिढ्या वाढल्यात ना प्रत्येक देशात. अजूनही कित्येक लोकांच्या घरी लोकल सामानच वापरले जाते.

तुमच्या तिथल्या लाइफ स्टाइलला ज्या गोष्टी आवश्यक त्या फक्त न्यायचे पहा .

कोरेल टाइप सर्व्हिण्ग भांडी, पोर्सलिन / बोनचायनाचे डिनरसेट हे सर्व मॅनेज करणे जमणार / आवडणार आहे का ? की त्या गोष्टी कपाटात पडून राहतील ? महागातले चाकू कात्र्या नेऊन ते जर कूक किंवा मेड कसेही वापरणार असेल तर चालेल का ? की तुम्हीच निगुतीने वापरणार ?

बेकिंग वगैरेसाठी इथल्यासारखे सगळे साहित्य स॑गळीकडे मिळेलच असे नाही. तसे असून सुद्धा तुमचा बेकिंगचा उत्साह टिकून राहणार आहे का ? उगाच वजन उचलून न्यायचे अन तिथे गेल्यावर साफ ठेवण्याची जबाबदारी फक्त ?

मुलं लहान असतील तर त्यांचे नेहमीचे सिपी कप्स, डबे , वॉटरबॉट्ल्स अशा त्यांच्या सवयीच्या गोष्टी नेता आल्या तर मुलांना अडजस्टमेंट सोपी जाईल.

Many thanks Rajasi for detailed reply!! Thanks everyone for the response!!

Ithli charcha vachun steel cha cookware set nyava Asa vatatay pan mostly nonstick vaparlele aslyane steel cooking baddal farshi mahiti nahi...mhanun tya baddal prashna vicharla...

sushinde! pls check the post on end of same pages of the link given by me...I think abhishruti has posted a detailed reply on how to take stuff from US to India.
Actually you can post your question there, cause you will get help from the experience people on this.

frankly speaking you get everything needful in India, and if there are things (in uses perspective) which you don't get India means you can live without it India.

on lighter note take as many pictures with your friend, go to some beautifull locations of USA In remaining time.this will be long lasting memories.

Happy journey!

Pages