स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑइल डिस्पेन्सर म्हणून सर्व प्रकार वापरुन झाल्यावर मला सर्वात उपयोगी वाटली ती ऑलिव्ह ऑइलची बाटली. <<< वर्षा +१.

ऑइल डिस्पेन्सर म्हणून सर्व प्रकार वापरुन झाल्यावर मला सर्वात उपयोगी वाटली ती ऑलिव्ह ऑइलची बाटली. +१. पण मला काचेची बाटली आवडते प्लास्टिकपेक्षा.

एका हातात ना.वाटी आणि दुसर्‍या हाताने हँडल गोल फिरवायचं तीच ना? ती चांगली असते का? म्हणजे वापरायला-धुवायला-ठेवायला सोपी आहे का? नारळाचा किस चांगला येतो का?>>>>>>>
मंजुडी, माझ्याकडे आहे अंजलीची खवणी. त्याची एक ट्रिक आहे. रबर बेस जो आहे तो अगदी पक्का बसण्यासाठी त्याला थोडस खालच्या साईडला पाण्यात बुडवायच आणि अगदी स्मुथ (काच,ग्रॅनाईट वगैरे) सरफेस वर चटकन बसवून हँडल फिरवून घ्यायच. अक्षरशः काहीही केल तरी ते हलत नाही मग. आणि नारळ मस्त खवला जातो. Happy मी गेली ६/७ वर्ष वापरत आहे.

वर्षा, दर रविवारी वॉफल करते. छान होतात. माबोवरचीच रेसिपी फॉलो करते.
ऑ ऑ ची बाटली कोणत्या ब्रँडची आहे? आम्ही सध्या टपरवेअरचा वापरत आहोत, पण् त्यातही तेलाचे ओघळ येउन वारंवार स्वच्छता करावी लागते.

वर्षा ,तुम्ही त्या बाटल्यांमध्ये तेल कसे भरता? हेच मी विचारणार होते . कारण मी ज्या बाटल्या बघितल्यात त्याची तोंड तर फारच बारीक असतात. & क्प्यासिती पण खूप कमी होती. पण दिसायला फार सुंदर !!

जुन्याकाळी एक प्लास्टीकचे नरसाळे मिळत असे घरात दोन असत एक रॉकेल साठी आणि एक बर्णी तून सुटे तेल आणत असू ते भांड्यात काढनया साठी. कोन विथ अट्यूब. ते वापरून बघा.
हरेक साइजचे मिळते मार्केट मध्ये. फूड ग्रेड असेलच असे नाही. सुर्‍या आरसे कंगवे फण्या विकणार्‍या बाईकडे मिळेल.

हो नरसाळ्याचा ऑप्शन आहे पण मला गरज नाही वाटली कधी.
माझ्या borges ऑ ऑच्या बाटलीच्या तोंडाच्या आतल्या बाजूने एक प्लास्टिकचे छोटे बूच आहे. ते काढून टाकलं की तोंड मोठं होतं बाटलीचं. (अर्थात नंतर परत लावायचं ते.) मग काळजीपूर्वक धार ओतली की भरता येते बाटली. थोडं स्किलफुली करावं लागतं पण अगदीच कठीण नाही. मी प्लास्टीकच्या पिशवीतले गिनी ऑइल आणते. (१ ली.) त्याची धार करणे कठीण नाही. पण तेलाचे मोठे कॅन्स वगैरे अस्तील तर हे भरणं कठीण आहे. मग नरसाळं वापरावं लागेल .
कपॅसिटी ग्रेट नाही पण माझा एकंदरीत तेलाचा वापर फार नसल्याने खूप वेळा रिफिल नाही करावं लागत मला.
ऑ ऑच्या खालोखाल मग टपरवेअरच बेस्ट आहे. त्यात मोठ्या आकाराचे डिस्पेन्सर मिळतात.

माझ्याकडे ५०० मिली वाल्या दोन काचेच्या बाटल्या आहेत. मी एक लीटर रिफाइंडची पिशवी आणते दर महिन्याला. पिशवीच्या कोपर्‍यात कापून दोन्ही बाटल्यांमध्ये भरुन ठेवते तेल.

याशिवाय तुपाची असते तशी एक छोटी तेलाची बुधली पण आहे. जर कधी पराठ्यांना तुपाच्या ऐवजी रिफाइंड लावायचं असेल तर वापरण्यासाठी. आणि एक एक्स्ट्रा व्ह्र्जिन ऑऑ स्प्रे आहे. (स्प्रे मधलं तेल संपत आलं आहे. पण तो स्प्रे उघडतो की नाही हे बघित्लं नाहीये आणि तो प्लास्टिकचा स्प्रे असल्याने त्यात परत तेल भरावं की नाही याबद्दल थोडी शंका आहे.)

दोन-चार महिन्यातून एकदा एक लीटरवाली सरसोच्या तेलाची बाटली पण आणते. पण ते तेल दुसर्‍या कशात न काढता डायरेक्ट त्या प्लास्टिक बॉटलमधूनच वापरते.

ओ के . मला वाटायचं की १ ली पण नाही बसणार. माझ्या कडे पण १ ली ची पिशवी असते म्हणून वाटायचं की एकदा पिशवी फोडली आणि नाही मावल त्या बाटलीत, तर काय करणार.

मी पाच लिटरच्या कॅनमधून एका लिटरच्या तेलाच्या किटलीत (स्टीलवाल्या) काढून घेते. त्यातून काचेच्या बाटलीमधे नसराळ्याने. स्टीलचं नरसाळं वापरते म्हणज स्वच्च्छ धुतलं की चिटकपणा जातो.

आमची आपली स्टील ची बुधली & त्यात छोटी पळी.
पिशिवी फोडायची & तेल त्यात ओतून ठेवायच . उरलेलं तेलासकट पिशवी तशीच स्टीलच्या डब्यात.
गरम पाण्यानि धुतले की मी भी खुश, बाई भी खुश & कुक भी खुश.

बजाजचं सँडविच मेकर विथ ग्रील प्लेट मिळालंय भेट म्हणून. सँडवीच मेकरमध्ये ग्रीलिंग करून बघितलंय का कुणी?>>> मी ग्रील सँडविच करते, तसेच एखादी बोरिंग भाजी आणि सकाळ्ची उरलेली पोळी संपवायची असेल तर पोळीत भाजी भरून, थोडे तूप् /बटर् /चीझ /तेल + ओली/ कोरडी चटणी असे ग्रील करते. मग त्याला फहिता नाहितर टॅको असे नांव देऊन सगळ्यांना खायला देते. सेकंड सर्व्हिंगची डिमांड येते :). टेलिशॉपिंगमधे पनीर, टिक्की वै. ग्रील करताना दाखवतात मी कधी करून पाहिले नाहिये.

प्राची, एक असे पण येते प्लास्टिकचे पंप असते व मोठी ट्यूब असते. एक साइड कॅन मध्ये ठेवून दुसरी बाटलीत ठेवून पंप केले की तेल नळीत चढते. मग कॅन वर ठेवला व बाटली खाली तर ग्राविटीने तेल खाली बाटलीत उतरते.

निवा +१. नुसती झाकणं पण मिळतिल. तुमच्याकडची मिक्सरची भांडी घेवून भांड्याच्या दुकानात जा.

Wet grinder फक्त इडली-डोश्याच्या पीठासाठीच वापरतात का त्याचा इतर काही उपयोग पण असतात? आजवर कधीच Wet grinder वापरलेला नाही, कोणाला वापरताना बघितलेले नाही, तर "Wet grinder for beginners / dummies" काय-काय टिप्स आहेत? मी विकत घ्यायचा विचार करत आहे, घ्यावा का? धन्यवाद

वेट ग्राईंडरमधे सर्व भिजवून ठेवलेल्या डाळी तांदूळ इत्यादि वाटले जातात. घरामधे इडली, डोसा, अडै, गुंडपंगला वगैरे खाण्याचे प्रमाण आठवड्यातून एक दोनदा वगैरे असलं तरी वेट ग्राईन्डर घेणे उत्तम. फक्त तो अति जड असल्याने त्याला एक ठराविक जागा कायम हवी.

यामधे पीठाचे कण दाबून दाबून बारीक होत असल्याने आणी वाटत असताना भर्पूर हवा मिक्स होत असल्याने इडली डोसा वगैरे हलके होतात.

इतर उपय्गामधे वाटपाचे मसाले वाटण्यासाठी वेट ग्राईन्डर वापरता येतो (तेवढा किलो अर्धाकिलोचे वाटण असेल तर)

फक्त तो अति जड असल्याने त्याला एक ठराविक जागा कायम हवी. + १

त्याचे भांडे धुतल्यावर फार वेळ उपडे ठेवू नये. थोडे पाणी निथळले की लगेच सरळ करुन पुसून कोरडा करावा.

Pages