स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या धाग्यावर मी वॉफल मेकर बद्दल विचारल होते. मला तो घाट्कोपरच्या आर सिटी मॉल मधे मिळाला.
नीधप Happy हे काळा वाटाणा प्रकरण अफाट छान लागतं असा सा बानी रिपोर्ट दिला होता. (स्वानुभव नाही). पण रोज तेच तेच खायला किती बोअर होत असेल ना!
मला प्लीज कोणी , अजिबात न गळणारी वॉटर बॅग कुठे मिळेल ते सांगाल काय! वर्षभर य बॉटल्स घेउन झाल्या. एक नशिबाने चांगली निघाली तर ती काल तुटली.

काळा वाटाणा प्रकरण अफ्फाट लागतं हे खरे आहे, पण रोज रोज तेच खाल्ले तर मग.. नी. ला माहित आहे.

शिवाय काळा वाटाण्यासारख्या प्रकरणांमुळॅ नाजुक पोटवाल्यांना पोटाचे त्रास होऊ शकतात. माझ्या एका वैनीला का.वा. उसळ अजिबात चालत नाही. आधी खायची आणि दुस-या दिवशी आडवी व्हायची. आता तिने बंद केले कावा खाणे.

मला का.वा. विथ खोबरे वाटण अफ्फाट आवडते. मी वर्षातुन एकदाच करते. Happy

ह्या धाग्यावर मी वॉफल मेकर बद्दल विचारल होते

कितीला मिळाला? माझ्याकडे मॉर्फी रिचर्ड्सचा सँडविच मेकर आहे त्यात एकदा वॉफल करायचे असा विचार मी कधीचा करतेय, अजुन मुहुर्त मिळाला नहईय.

टप्परवेयरच्या बाटल्या उत्तम आहेत. यावेळी मी चार बाटल्या आणल्या. तसेच एक वॉटर डीस्पेंसरही आणले आहे. पार्टी असल्यास गार पाणी/ ज्युस ठेवायला.

टपरवेअर खरेच मस्त आहे पण फार महाग आहे. फूड ग्रेड बाटल्या पण महागच आहेत.
वॉफल मेकर मध्ये ओले पीठ ओतावे लागते त्यामुळे कदाचित सँडविच मेकर खराब होईल का ग?

मी मोड आणायला कडधान्य भिजवताना, कडधान्याच्यावर एक पेरभर पाणी ठेवते. तुम्ही कमी कडधान्य घेत असाल तर अर्धा - पाऊण पेर पाणी जास्त ठेवा. भांड्यावर झाकण ठेवते. चार तासाने झाकण न काढता भांड्यातले कडधान्य आसडते जेणे करून कदधान्य वरचे खाली खालचे वर होतात. खूप लांब लांब मोड येत नाहीत पण २-३ मिमि येतात. उन्हाळ्यात संध्याकाळी भिजवलेल्या मूगांना सकळ पर्यंत २मिमि मोड येतात साधारणपणे.

स्प्राऊट मेकरनेही छान मोड येतात.

दोन्ही मध्ये कपड्यात बांधून ठेवायची गरज नाही.

टप्परवेअरच्या पाऊण आणि एक लिटर बाटल्यांना स्लिंग मिळते. आत्ता ह्या आठवड्यात एक लिटर बाटल्यांसोबत ते स्लिंग मिळते आहे - टप्परवेअरच्या सेल्स वोमन ला विचारा. ७५ का ९५ रु ला एक स्लिंग मिळते. पाऊण लिटरच्या बाटलीला फ्लिप ओपन सुद्धा आहे. मी मुलाला तीच देते शाळेत.

स्लो कुकर / राईस कुकर म्हणजे काय? तुम्ही इथे नक्की कोणत्या स्लो कुकर /राईस कुकर बद्दल बोलताय. मी खूप आळशी आहे त्यामुळे कुक येणार नसेल त्यादिवशी खूप काय काय साधने यंत्रे लागतात.

सगळ्यांना धन्यवाद ! टपरवेअरच्या बॉटल्सचा शोध घेते. त्याचे लंच बॉक्स, डीप फ्रीजमधे ठेवण्याचे डबे छान असतात.
वेल, स्लो कुकर वेगळा आणि राईस कुकर वेगळा. राइस कुकर मधे साधा भात आणि भाताचे ईतर प्रकार करता येतात. माझ्याकडच्या कुकर बरोबर स्टीमर आहे त्यात अळुवड्या, पालक/ कोबी ई वड्या, मुठीया असं वाफवते. स्लो कुकर मधे भाजी करता येते. माझ्या सा बा अप्रतिम चवीचा मुगडाळ शिराही त्यात करतात. का कोणजाणे हा कुकर घरात असुनही फारसा वापरात नाही.

स्लो कुकरच्या रेस्पीज मलाही हव्या आहेत. डिल मिळाली म्हणून घेतलाय, पण रेस्पीजच माहीत नाहीत. नेटवर फार काही मिळाले नाही. म्हणजे असेलही चांगले, पण ४-५ तास काहीतरी शिजवत ठेवायचे हे झेपत नाहीये अजुन..

खरेतर फूडप्रोसेसर , rice cooker चा वेगळा धागा काढायला पहिजे म्हणजे त्याबाबत माहिती लगेच मिळेल .
का आधीपासून असे वेगळे धागे आहेत?

लिंक अंजलीची खवणी तू दिलेल्या पहिल्या लिंकमधल्या सारखीच आहे. आणि दुसर्‍या लिंकमधली हातात प़अडून खवायची /खोवायची खवणी पण मिळते बाजारात.
मागे कधीतरी यावर चर्चा झाली होती बहूतेक.

धन्यवाद अल्पनाइथे दिसली चर्चा. पहिले होते माझ्याकडे २ वर्षे पडुन (त्या अर्धवर्तुळाकर टोकाने मला खुप कठीण वाटले खवणे).
दुसरे मात्र छान वाटतेय. .

ऑइल डिस्पेन्सर म्हणून सर्व प्रकार वापरुन झाल्यावर मला सर्वात उपयोगी वाटली ती ऑलिव्ह ऑइलची बाटली. अजिबात ओघळ नाही आणि साफ करणे सोपे. अगदी टपरवेअरपेक्षाही. फक्त इथे सध्यातरी माझी काचेचीच बाटली आहे. अमेरिकेत प्लास्टिकच्या मिळायच्या तश्या मिळाल्यातर अजून उत्तम.

ऑर्किड वॉफल त्यात बनवून पाहिलेस का?
आमच्याकडेही सर्वांना आवडतात. आणि इथे बहुतेक मार्केटसिटी मॉलमध्ये प्रचंड महाग असा वॉफलचा चतकर तुकडा घेतल्यावर परत घेणं झालंच नाही. घरी करता आले तर मस्तच.

Pages