उन्हाळा आला कूsssल पेय 'पियुष'

Submitted by प्रमोद् ताम्बे on 16 April, 2014 - 00:27

पियूष
Piyush xxx.jpg

साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस ,दहा चमचे साखर ,छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.

कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.
लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्‍याच वेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादरच्या पणशीकर पियुषची फॅन आहे. पियुष असे बनवतात हे माहित नव्हते. मला वाटायचे श्रीखंड पातळ केले की झाले पियुष. Happy

मला वाटायचे श्रीखंड पातळ केले की झाले पियुष...>>>... बरेचवेळा तसेच असते... मी तर एकदा (शिल्लक राहिलेल्या) बटाटेवडे आणि सामोश्या पासुन बनवलेली 'पाव-भाजी' खाल्लेली आहे... Happy

दही, लिंबू/ व्हिनेगर, दूध सगळं एकत्र घुसळल्यावर फुटत नाही का?

साधना, चक्का घुसळूनच पियुष करतात. दही घुसळलं की लस्सी, त्याला वेलचीचा स्वाद आणि चक्का+साखर घुसळलं की पियुष, त्याला जायफळ+केशराचा स्वाद अशीच खरी पाककृती आहे.

लिंबाच्या रसाने ,व्हीनेगरमुळे किंवा दहयामुळे दूध फुटत नाही. आम्ही कालच रात्रीच्या जेवनांनातर पाहुण्यांसाठी बनवलेहोते हे 'पियुष' आणि त्याचाच फोटो घेऊन सकाळी पोस्ट केला आहे.

दादरच्या पणशीकर पियुषची फॅन आहे. पियुष असे बनवतात हे माहित नव्हते. मला वाटायचे श्रीखंड पातळ केले की झाले पियुष. >>>>> + 1

पातळ श्रीखंडच लागतं की पियुष म्हणजे! मंजूडी इज म्हणिंग राईट.

जे काय असेल ते.. मला तर जाम आवडते. रानडे रोडवर दुपारच्या उन्हात शॉपिंगची रपेट केल्यानंतर पणशीकराकडे जाऊन, त्या इवल्याशा दुकानात उभे राहुन, थंडगार ग्लासातले थंडगार पियुष घोटाघोटाने गळ्याखाली उतरताना इतके थंडगार वाट्ते की बस्स.. मी कधिमधी चुकून दुसरा ग्लासही ऑर्डर केलेला आहे Happy

अ‍ॅक्चुअली घरी श्रीखंड केल्यानंतर ते भांडे विसळले की जे तयार होते, त्याला पारंपारिकरित्या (विशिष्ट प्रदेशात) पियुष असे नांव आहे. Wink

ही रेसिपी शिकून व नंतर प्रत्यक्ष करून अनुभव घेपर्यंत मीही असेच समजत होतो की श्रीखंड करून झाल्यावर त्याचे पातेले विसळून जे पाणी मिळते त्यालाच पियुष असे नांव दिलेले असावे.
आता मात्र खात्रीने व अनेक वेळा अनुभव घेऊन मगच मी ही रेसिपी लिहिली आहे.

हा पियुश प्रकार प्यायलेला नाहीये. त्यामुळे साध्या दह्यात थोडी मलई घालुन करुन पाहिले पाहीजे, नाहीतर चक्केवाला/ आईस्क्रीम पार्लर गाठावे लागेल.

काही वर्षापूर्वी मी पुण्याच्या 'कात्रज' डेअरीत इजिनियर म्हणून नोकरीस असताना तेथील एका पदवीधर डेअरी टेक्निशियनने मला ही रेसिपी शिकवली व तेंव्हपासून मी ही याच पद्धतीने करीत आलो आहे.त्यामुळे हीच मुळची किंवा जास्त योग्य आहे असे मी म्हणण्यापेक्षा हे आता वाचकांनीच अनुभव घेऊन ठरवलेले जास्त योग्य ठरेल असे मला वाटते.

माझ्या आठवणीप्रमाणे १९५७५ च्या सुमारास मला ऑफिसचे कामासाठी वरचेवर मुंबईस बॅलार्ड पियर भागातील वेक्फिल्डहाऊस मध्ये जावे लागत असे.तेथून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये मी हे 'पीयूष' पहिल्यांदा प्यायलो व एकदम त्याच्या प्रेमातच पडलो.

हायला, मग कात्रज डेअरीत मिळत असेल की हे. मध्यन्तरी तिथे हायवेवर ( मेन डेअरी) सुगन्धी दूध प्यायलो होतो. पण हे पियुश वगैरे बघायचे लक्षात नाही आले. आता चक्कर मारता येईल.

मला तर 'पियुष' असा काही प्रकार आहे हेच माहीत नव्हतं Uhoh
त्या आज कुछ तुफानी करते है लेखात उल्लेख वाचला तेंव्हा वाटलं लेखक चहाला पियुष म्हणत असावेत. तसही आजकाल लेखक मंडळींच भरोसा राहीला नाहीये.

हा प्रकारच माहीत नाही तेंव्हा तो खाल्ला/ प्यायला असल्याची शक्यताही नाही.
लस्सी आवडत नाही त्यामुळे हाही आवडेल का अशी शंका आहे

मुंबईत असताना दादर, गिरगाव भागात कायमच पियुष प्यायलं जायचं. हा प्रकार मुंबईच्या मराठी संस्कृतीचा एक भाग आहे. Happy
श्रीखंडाशिवायपण होतं हे माहीतच नव्हतं!

पियुषचा तो ग्लास बघुनच कस थंड थंड वाटते! पणशीकरांची मी पण फॅन आहे. भारतात आल्यावर एकदातरी पणशीकरांकडे जातेच जाते.

परवा पनवेलमधे एका हॉटेलात 'येथे पियुष मिळेल' अशी पाटी वाचुन प्रश्न पडला होता पियुष म्हणजे काय, आता उत्तर मिळाले :), रच्याकने, माझ्या फॅमेली फ्रेन्ड्स मधे एक पियुष नावाचा मुलगा आहे

रिया, तू एक हाताबाहेर गेलेली केस होणारेस! Light 1

सर,

तुम्ही इतकी चांगली पाककृती दिलीत आणि प्रतिसाद कोणाला तर पणशीकराला! भल्याचा जमाना नाही.

हे पियुष फार छान लागते. एकदम फ्रेश वाटते. मलाही श्रीखंडाबाबतच माहीत होते. आपल्या भाईंनी कोठेतरी तसा उल्लेखही केलेला आहे. (मी पुलंना भाई म्हणतो, त्याशिवाय आपण कोणी आहोत असे वाटतच नाही जगाला).

पण लिंबू पिळतात हे माहीत नव्हते. (अर्थात लिंबू आणि वाचक ह्यांचा दुसरा उपयोग काय म्हणा)

Light 1

माझ्या आठवणीप्रमाणे १९५७५ च्या सुमारास मला ऑफिसचे कामासाठी वरचेवर मुंबईस बॅलार्ड पियर भागातील वेक्फिल्डहाऊस मध्ये जावे लागत असे>>you really are The One.

तुम्ही इतकी चांगली पाककृती दिलीत आणि प्रतिसाद कोणाला तर पणशीकराला! भल्याचा जमाना नाही.....
तस नाही बेफिकीर पण आम्हां मुंबईकरांसाठी पियुष म्हणजेच पणशीकर हे एक समीकरण आहे. त्यामुळे पियुषची पाककॄती दिसल्यावर माझ्यासारख्या बर्‍याच जणांना पणशीकर आठवले.

Pages