उन्हाळा आला कूsssल पेय 'पियुष'

Submitted by प्रमोद् ताम्बे on 16 April, 2014 - 00:27

पियूष
Piyush xxx.jpg

साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस ,दहा चमचे साखर ,छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.

कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.
लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्‍याच वेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाशचे (गिरगाव) पियुष म्हणजे लाजवाब.
एकापाठून एक पाककृती लिहित आहात.मानलं तुम्हाला!

पियुष हे पेय आहे आत्ताच माहीत झाले. इंडिअन रेस्टौरेंट मधील म्यांगो लस्सी सारखे असावे असे वाटते आहे. घरी बनविण्याचा प्रयोग करून पाहीन. मस्त रेसिपी आहे.

मला वाटायचे श्रीखंड पातळ केले की झाले पियुष...>>>... बरेचवेळा तसेच असते... मी तर एकदा (शिल्लक राहिलेल्या) बटाटेवडे आणि सामोश्या पासुन बनवलेली 'पाव-भाजी' खाल्लेली आहे... स्मित>>>>>>>>>>> अशक्य हसतेय मी Rofl

मी तर एकदा (शिल्लक राहिलेल्या) बटाटेवडे आणि सामोश्या पासुन बनवलेली 'पाव-भाजी' खाल्लेली आहे... स्मित>> सिरीयसली???

पियुष सारख्या पाकृ वर इतके प्रतिसाद बघून हौसेने आलो.....निराशा झाली नाही Lol

दक्षिणा << तांबे आका ?? >> भारी टायपो आहे Proud

तांबेजी तुमच्या की बोर्डला सलाम. तुमच्या वेगवेगळ्या तूफान मेल स्पीड येणार्‍या पोस्ट्सची एक हाय स्पीड फिल्म तयार झालीय डोक्यात आणि दृष्टिसातत्य का काय म्हणतात त्यामुळे 'हे सर्व कनेक्टेड आहे' (म्हणजे शिरा, पियुष, जैविक कचरा इ.) असे 'मॅट्रिक्स फीलींग' येत आहे.

मला तर पियुष म्हटलं की अख्ख दादरच आठवतं. Wink
रिया काय गं तू जरा मुंबईला येऊन जा की.

बाकी या धाग्यावरच्या टिपण्ण्या धम्माल आहेत...चालु देत Happy

पुण्यात पण जनसेवाचे पियुष प्रसिद्ध होते. आता जनसेवा इतिहासजमा झाले. लक्ष्मी रोड वरील इतर मराठी व्यावसायिकांच्या प्रमाणे. Sad

जनसेवाचा खरवस प्रसिद्ध होता.

त्याचप्रमाणे दहा रुपयांची बर्फी प्लेट, एक साबुदाणा खिचडी, मसाला दूध!

जनसेवामधे काउंटरवर मिळणारे सगळे पदार्थ लहान प्लेटमधे पण (दहा-वीस) रुपयांत मिळायचे. खरवस, दुधी हलवा, डिंक लाडू, पिवळा-आंबट गोड चवीचा, आज्जीच्या हातचा वाटावा असा सांजा, साबुदाणा खिचडी व खमंग काकडी, अळूची वडी वगैरे पदार्थ खासच होते. अनेक आज्जी आणि आजोबा दुकानात एकटे एकटे दुकानात बसून स्वत:च्या आवडीचे पदार्थ अगदी चवीने खाताना दिसायचे.

आँ? जनसेवा बंद झालं? कधी??? >> दीड- दोन वर्ष झाली असतील. माझं पण जबरदस्त फेवरेट. खूप मिस करणार. तसा मऊ सांजा, साबुदाणा वडा, पन्हं, खरवस मिळणे नाही.

जवळपास वर्षभरापूर्वी बंद झाले. पेपरमधे बातमी वाचली होती. जवळच्या दुकानदाराकडे चौकशी केली तर, हल्ली कामगार मिळत नाहीत, मालकाची मुले परदेशात आहेत त्यामुळे आता मालकांपैकी दुकान बघायला कोणी नाही म्हणून बंद केले असे समजले.

पियुष नामक प्रकार एकदा कोठेतरी प्यायला होता... तेच ते श्रीखंड केल्यानंतर विसळलेल्या भांड्यातील पाण्यासारखा जाम बाद प्रकार.... पणशीकराकडे गर्दी बघूनच जीव अर्धा होतो, त्यामुळे धाडस केलं नाही.
पण आत्ता मात्र जाम टेम्ट होतेय.
त्याआधी प्रमोद तुमच्या रेसीपीचा नक्की आस्वाद घेणार. नवरा बाद अर्थातच या प्रयोगातून. गिनीपिग बनणं बंद केलेय आता त्याने (मुरतोय हळूहळू पक्क्या नवर्‍यासारखा! ठाम मतं बितं सांगतो म्हणजे काय अमूक पदार्थ नाही खाणार/ पिणार Happy )
बेफिकीर ................ पुलंच्या नंतर तुमच्या कमेंटना ठसके बसतात वाचताना (ठहकना हणजे ठसकेच ना??? Uhoh Happy )

वा छान रेसिपी आहे.
जनसेवात खरच छान मिळायचं पियुष
डोंबिवलीत खूप वर्षांपुर्वी कुलकर्णी दुग्धालयात पण चांगलं मिळायचं पियुष

ज्यांना लिंबु पिळायची भिती वाटतिये त्यांनी, चक्का/श्रिखंड + दूध + केशर +वेलदोडा + जायफळ +साखर हे सर्व मिक्सरमधून फिरवा व गार गार करून प्या. लई भारी लागते.

>>डोंबिवलीत खूप वर्षांपुर्वी कुलकर्णी दुग्धालयात पण चांगलं मिळायचं पियुष
अजूनही मिळते आणि तेव्हढेच छान असते.

अरेरे! जनसेवा बंद पडलं ! लक्ष्मी रोडवर खरेदीला गेलं की खादडीसाठी "जनसेवा" हा एकमेव दिलासा होता.

लक्ष्मी रोडवर खरेदीला गेलं की खादडीसाठी "जनसेवा" हा एकमेव दिलासा होता.
<<
That, was the exact reason why that food joint lasted so long with its arrogant service, average tasting food, and had that over-hyped publicity Happy
दुसरा ऑप्शन जवळपास नव्हता हे एकमेव कारण.
तडेक्कनला नटराजच्या बाजूला एका बंगल्याच्या आवारात चालवलेल्या गाडीवजा उपहारगृहात, जनसेवापेक्षा जास्त स्वस्त, मस्त अन चविष्ट ऑथेंटिक मराठी पदार्थ मिळत असत,
हेमवैम.

दुसरा ऑप्शन जवळपास नव्हता >> हे खरे असले तरी जनसेवातल्या पदार्थांची क्वालिटी चांगली नसती तर पुणेकर कधीच तिथे गेले नसते आणि बंद पडल्यामुळे हळहळले नसते.

जे उत्तम क्वालिटी देतात तेच अ‍ॅरोगंट असूनही ( अर्थातच तुमच्या मते ) वर्षानुवर्षे उत्तम धंदा करतात/करु शकतात नाही, का?

रेस्टॉरंट्च्या बाबतीत म्हणाल तर ( किंवा एकंदरीतच) एकास चांगले म्हट्ले म्हणजे दुसरं वाईट ठरत नाही.

चितळे अ‍ॅरोगंट असले तरी चवीला उत्तम आहेत.
कदाचित मी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा फडफडीत साबुदाणा खिचडी व्यतिरिक्त काहीच 'शिल्लक' नव्हते.
अन हो,
डिफाईन "पुणेकर"

असो.

जनसेवा बंद झाले आहे. माझी माहीती गेल्या डिसेंबरची. Sad पण मी जनसेवाचे पियुष नाही प्यायले कधी. खरंतर मी पियुषच नाही प्यायले कधी. बाबा सांगायचे श्रीखंडाचे भांडं विसळून देतात ते, त्यामुळे कधीच इच्छा झाली नाही. तसेच पुण्यात रस्त्यावर छोट्या खोपट्यांतून इथे नीरा मिळेल अशासारख्या पियुषच्या पाट्या पाहील्यामुळे ते नकोच वाटलं..
छान वाटतंय. कधीतरी घरी करून पाहीन.

Pages