उन्हाळा आला कूsssल पेय 'पियुष'

Submitted by प्रमोद् ताम्बे on 16 April, 2014 - 00:27

पियूष
Piyush xxx.jpg

साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस ,दहा चमचे साखर ,छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.

कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.
लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्‍याच वेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर कुणीच बनवून बघणार नसतील तर मी तरी येथे रेसिपी देण्याचा त्रास का घेतो ? तुम्हाला नसेल बनवायचे तर निदान मला आगाऊ कळवून प्यायला तरी यायला जमेल का ?
परवाच माझ्याकडे,माझे वेडे छंद बघायला व चहाला मायबोलीकर -मुंबईचे प्रमोद देव ,पुण्याचे विजयकुमार देशपांडे व कांदळकर येऊन गेले.

अरे वा, मं-सा. - थँक्स.

तांबेकाका, करुन पहाणार आहे, जायफळाची पुड (घरात आहे पण सापडत) नाहिये म्हणुन राहिलय.

काका तुमच्या रेसिपीने पियुष करुन पाहिला ..... अहा! खूपच मस्त चव Happy
धन्यवाद !
(दही थोड आंबट होतं म्हणून लिंबू पिळल नाही )

Pages