निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
अरे माझं नाव पण आलं थँक्स
अरे माझं नाव पण आलं
)
थँक्स जागूतै
(कालचं भाषण लिहू का?
दिनेश, आज तुझा मूड काही औरच
दिनेश, आज तुझा मूड काही औरच दिसतोय..
निसर्गाचा संगीतावरचा प्रभाव खूप छान , गोड शब्दात जाणवून दिलास
वा दिनेशदा क्या बात है, मी
वा दिनेशदा क्या बात है, मी नि:शब्द. ह्या धाग्यावर येते त्याचं मनाला अतिशय समाधान मिळते. तुम्ही खूप छान संगीताचे पण जाणकार आहात, असंच कोल्हापूरच्या अशोकमामांना संगीताची जाण आहे त्याच्याकडूनपण खूप माहिती मिळते.
Thank u very much.
जागू,माझे नावही समाविष्ट
जागू,माझे नावही समाविष्ट झालेले बघून निश्चितच आनंद झाला:स्मित:आभार.
पण कृपया नावात 'सारिवा' असा बदल सरिवा ऐवजी करता येईल का?
गुलाबी पेरूचे रोप फुलासह.
गुलाबी पेरूचे रोप फुलासह. लहानपणी या पेरूचे खूप आकर्षण असे.

चवीच्या बाबतीत मात्र तो डावाच.
अगदी काही रांगाच्या वा
अगदी काही रांगाच्या वा धूनांच्या मागेही निसर्ग आहेच.
पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूर आणि काश्मिरमधील एखादी व्हॅली...,
उ. बिस्मिल्ला खान साहेबांची शहनाई आणि बनारसमधला गंगाघाट...,
पं. कुमारांचे निर्गुणी भजन आणि माळव्यातली एक धूसर पहाट....,
केसरीया बालमा अशी आर्त साद ... आणि राजस्थानमधल्या वाळवंंटात हरवलेला बालम......,
मेरे साजन है उस पार अशी नावाड्याची साद ....आणि बंगालमधली संथ वाहणारी रुंद नदी.....,
महाराष्ट्रातील अनवट गडकिल्ले आणि तशीच शाहीराही डफावरची थाप....,
गुजराथमधली सुगी आणि त्या आनंदात रंगलेला रासगरबा.....,
उंटाच्या पाठीवरची हलती बैठक आणि एखादा टप्पा.. या सर्व प्रतिमा किती जुळतात ना ! >>>>> दिनेशदा अगदी शायराना अंदाजमें ??? लगता है मुलूककी बहोत याद आ रही है .....
क्या बात है. ......क्या बात है .....
)
(मागील पानावरच्या दिनेशदांच्या सुरेल शब्दांची एवढी भूल पडली की तेच पुन्हा इथे जरा मोकळेपणाने मांडले आहेत झालं ... कानाच्या पाळ्या बोटात धरुन... - गुस्ताखी मुआफ हो ...
२-३ पानापूर्वी तो हिरव्या
२-३ पानापूर्वी तो हिरव्या जांबा चा फोटो होता ते Syzygium jambos :rose apple, malabar plum असु शकते. खाताना मंद गुलाबाचा वास येतो.
साधना, मला सुवर्ण्पत्राचे झाड मिळाले :-).
गुलाबी पेरूचे रोप फुलासह.
गुलाबी पेरूचे रोप फुलासह. लहानपणी या पेरूचे खूप आकर्षण असे.
चवीच्या बाबतीत मात्र तो डावाच.
माझ्या गावी गोल पेरु मिळतात. आतुन गुलाबी असतात. त्यांची चव मात्र अतिशय वेगळी आहे. इथले जे लांबट गुलाबी पेरु मिळतात तशी बेक्कार अजिबात नाही.
माज्या आजीच्या दारातही ह्या पेरुचे झाड आहे. ह्या वेळेला आम्ही काठीने झोडपुन पेरु पाडलेले, टेबल आणुन त्यावर चढुन पेरु काढले.
पेरु तर इतके लागलेले की खाली जमीन भरलेली पेरुंनी. पण मग अशी सुबत्ता असल्यावर खाली पडलेले पेरु कोण खाईल??
आता गेले की फोटो घेईन. आजीने एक रोप माझ्या घराच्या अंगणातही लावलेय.
सरिवा,खूप सुंदर रंग आहे ,
सरिवा,खूप सुंदर रंग आहे , फूलही किती नाजुक..
साधना आम्हाला ही लहानपणी बोरं, करवंदं,पेरू,डाळिंब्,चिंचा,आवळे कधी विकत घेऊन खाणे माहित नव्हते
घरी नाहीतर मित्रांच्या बागेवर डल्ला मारून , झाडावर चढून काटे टोचलेल्या हाताने फ्रॉक च्या घेर्यावर स्वच्छ पुसून घेतलेल्या पेरूंची , बोरांची चव .. आहाहा!!!
खर्रय.. मुंबई ला अगदी बेचव , पाणचट पेरू मिळतात.. कुठून असे चुनिंदा पेरू आणून विकतात म्हाईत नाही..
वॉव पेरू
वॉव पेरू

अरे वा, संगीतातल्या
अरे वा, संगीतातल्या जाणकारांकडून दाद.
यापैकी टप्पा जरा कमी ऐकण्यातला.. यू ट्यूबवर पं मालिनी राजूरकर, आरती नायक यांनी गायलेले टप्पे आहेत.
(बहुतेक सर्व पंजाबी भाषेतले आहेत. ) मराठीतला माझ्या ऐकण्यातला एकमेव टप्पा.. "परम सुवासिक पुष्पे" भार्गवराम आचरेकरांनी गायलेला. हे भार्गवराम माझा मावसआजीचे दीर.
===
अंबोलीच्या जंगलात पण पेरूची झाडे आहेत. ते पेरू आकाराने लिंबाएवढेच असतात. आतून लाल, जास्त गोड आणि
बिया जास्त असतात. कलम करण्यात आकार मोठा, बिया कमी झाल्या खर्या पण गोडवा आणि स्वाद हरवला.
दिनेशदा, तुम्हाला साष्टांग
दिनेशदा, तुम्हाला साष्टांग नमस्कार!
शोभा... नमस्कार त्या थोर
शोभा... नमस्कार त्या थोर कलाकारांना करायचा. अशा काही सुरावटी ते निर्माण करतात कि ते दृष्य डोळ्यासमोर उभे राहतेच.
कुठे मिळाला तर लताने गायलेला मांड जरूर ऐक..लेकिन चित्रपटात गायलाय त्यापेक्षा वेगळे शब्द आहेत.
केसरीया बालमा.. बावरी बोले लोग
ना मै जिवती, ना मरीयो मै
बिरहा म्हारो रोग..
अवश्य दिनेशदा. मला खरच खूप
अवश्य दिनेशदा.

मला खरच खूप आश्चर्य वाटतं तुमचं. सगळ्याच क्षेत्रात प्रविण कसे हो तुम्ही?
हातातून काही होऊ नाही शकले
हातातून काही होऊ नाही शकले या संगीत क्षेत्रात. घराण्यात गाणे होते आणि आईच्या रुपाने आहेही.. पण मी कोरडाच राहिलो ना. आता कधी एकदा साठी गाठतोय आणि निवृत्त होतोय असे झालेय.
माझ्या आजीकडचेही तस्सेच आहेत.
माझ्या आजीकडचेही तस्सेच आहेत. दिसायला अगदी पिवळी लिंबे. खरेतर अख्ख्या आंबोलीत असलेच पेरु आहेत. कोणीही न लावता सगळ्यांच्या अंगणात याची झाडे आहेत. या दिवसात झाडे वाकलेली असतात अक्षरक्षः. गेल्या वर्षी मी, ऐशू आणि माझा भाऊ तिघांनी पेरु लुटले अगदी.
आंबोलीला कढिपत्ता पण असाच न लावता आपोआप येतो.
जंगलात तर वृक्ष आहेत याचे. आणि शिकेकाईचे आणि तेजपत्त्याचे आणि रातांब्याचे.. आणि कसले कसले. इथे बसुन काय फायदा....

इथे बसुन काय
इथे बसुन काय फायदा....>>>>>>>>>....फ़क्त आठवण काढत बसायचं
ते पेरू आपल्यासाठी नाहीत. ते
ते पेरू आपल्यासाठी नाहीत. ते पोपटांसाठी असतात. ते फक्त बियाच खातात पण बाकीच्या बिया त्यांच्या चोचीला चिकटून रहाव्यात म्हणून थोडासा गर असतो त्यात. शिवाय आकारही त्यांना हाताळता ( पायाळता ) येईल एवढाच. रंग पण पिवळाधमक म्हणजे त्यांना शोधायला सोपा.. पेरूचा प्रसार त्यांनीच तर केला.
शिवाय आकारही त्यांना हाताळता
शिवाय आकारही त्यांना हाताळता ( पायाळता )
५००!
५००!
या दिवसात झाडे वाकलेली असतात
या दिवसात झाडे वाकलेली असतात अक्षरक्षः. गेल्या वर्षी मी, ऐशू आणि माझा भाऊ तिघांनी पेरु लुटले अगदी.>>>>>>चलो आंबोली.

लोकांना शनिवारच्या सुट्टीचा इतका आनंद झालाय कि मोबाईल घरी विसरून ऑफिसला येतात.

खास फुलांमधुन मध चोखुन
खास फुलांमधुन मध चोखुन घेण्यासाठी ही चोच तयार केलीय अशी. शिंप्याची चोच अशी नसते कारण त्याची ती गरज नाहीय....... अगदी बरोबर साधना...
व्वा! इकडे छान चालय.... दोन
व्वा! इकडे छान चालय....
दोन दिवसात इकडे ओझरतीच आले.. सावकाश वाचेन सगळ...
हाताळता ( पायाळता )
हाताळता ( पायाळता )
जिप्स्या, साधना बोलावून थकली
जिप्स्या, साधना बोलावून थकली तूला.. आता अजिबात फॉर्मल आमंत्रण मिळणार नाही.
जिप्स्या, साधना बोलावून थकली
जिप्स्या, साधना बोलावून थकली तूला.. आता अजिबात फॉर्मल आमंत्रण मिळणार नाही.>>>>>>>>>आम्हाला नाही बोलावलं.
जिप्स्या, साधना बोलावून थकली
जिप्स्या, साधना बोलावून थकली तूला.. >>>>>हा हे अगदी खरंय.
लाल पेरूचं फुल आणि शोभाताईनी
लाल पेरूचं फुल आणि शोभाताईनी टाकलेला फोटो मस्त.
दिनेशदानी कालच्या पोस्टवरून माहोल उभा केला. मला कॉन्क्रीटच्या जंगलात आजूबाजूला निसर्ग आणि संगीत जाणवायला लागलं.
हाताळता ( पायाळता )<<
हाताळता ( पायाळता )<<

दिनेशदा ग्रेट आहात! संगीताचा आणि निसर्गाचा संबंध किती सहजतेने उलगडुन सांगितलात!!
लोकांना शनिवारच्या सुट्टीचा
लोकांना शनिवारच्या सुट्टीचा इतका आनंद झालाय कि मोबाईल घरी विसरून ऑफिसला येतात
हो.. काही लोकांना फक्त ऐरोलीच्या ब्रिजवर आलेच कि फोन करायची आठवण येते. मग लगेच म्हणायचे आता माझा मोबाईल ऑफ होणार हा......
Pages