निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मानुषी अप्रतीम....
मानुषी अप्रतीम....
मानुषी, काय मस्त बहर आहे.
मानुषी, काय मस्त बहर आहे. जिथे थोडा काळच उन्हाळा असतो तिथे झाडांना असे भराभर फुलावेच लागते.
आधी फुले आणि मग पाने...>>>>>>>>>>
हे नव्हतं लक्षात आल! व्हेरी इंट्रेस्टिंग! आहे खरं तसंच सगळीकडे!
माझ्या आईकडे २०-२२
माझ्या आईकडे २०-२२ वर्षांपासून एक फणसाचे झाड आहे. त्याला फळे खूप लागतात.पण आतमधे एकही गरा नसायचा.सुट्टीतलं घर म्हणून झाडांची,खत वगैरे निगराणी नव्हती.फक्त पाण्याची सोय होती.बरेच फणस लागले.पण गरा नव्हता.भाजीचाच फणस म्हणून इतकी वर्षें चाललं .गेली ३-४ वर्षें आई तिथेच मुक्काम करून आहे.ह्यावेळी मात्र मोठ्या फणसात १ गरा मिळाला.अतिशय गोड होता असे म्हणे.काय कारण असेल गरा न लागण्याचे?कोणते खत घालावे लागेल? बाकी चहाचा पाला वगैरे चालू आहे.
मानुषी,, खरेच नशिबवान आहात
मानुषी,, खरेच नशिबवान आहात तुम्ही लोक्स ज्यांना हे प्रत्यक्ष पाहायला मिळतेय. चला, निदान तुमच्यामुळे फोटोत तरी पाहतोय.
वर्षू, मला हवा ऑथेंटीक शेज्वान सॉस
फणसात गरा नाही ? विलायती फणस
फणसात गरा नाही ? विलायती फणस आहे का तो ?
मानुषी... ध्रुवीय प्रदेशात वाढणारी काही छोटी रोपे तर सूर्यफूलासारखा दिवसभर सूर्याचा पाठलाग करतात.
एकंदर बीजप्रक्रियेसाठी त्यांना थोडीफार उष्णता हवी असते.
भारतातल्या बहुतेक भागातला उन्हाळा लांबणारा. म्हणून सुरवातीला भराभर बहर आणून फुले निर्माण करायची आणि मग निवांतपणे फळात साखर भरत रहायचे हाच अनेक झाडांचा उद्योग. ( आंबा, जांभूळ, खजूर )
तसा बडा खयाल थंड प्रदेशातील झाडांना परवडत नाही.
काल आमच्या सोसायटीत एक बाई
काल आमच्या सोसायटीत एक बाई आली. आणि सदाफुली, मोगरा, वगैरे फुलझाडांच्या वरच्या टुक्षाच तोडत होती.
वॉचमन तिला " नका तोडू " सांगत होता. तर ही लक्ष न देता खाली मान घालून तोडतच होती. मला कोकणातला अनेक वेळा पाहिलेला प्रसंग आठवला. "गुरे, आपण लावलेली किंवा उपयुक्त झाडे , किंवा वाळवण खात असतील आणि आपण त्यांना कितीही हाककलं तरी खाली मान घालून खातच रहातात. अगदी मार मिळाला तरी मान वर करून हलत नाहीत तिथून. तसचं ती बाई काल करत होती. शेवटी खिडकीतून आवाज दिल्यावर मी कुठे आता काढतेय असं म्हणून परत २-३ काढून मग गेली. नंतर कळलं ती दरोज येऊन हा उद्योग करते. 

आज सकाळी फुले काढताना, मुंडकी न्सलेली झाडे पाहून फार वाईट वाटलं. आणि येताना त्या वॉचमनला सांगून आले, की त्या बाईला आज इथे येऊन देऊ नका.
मानुषी, फोटो मस्तच.
मानुषी, फोटो मस्तच.
फणसात गरा नाही ? विलायती फणस
फणसात गरा नाही ? विलायती फणस आहे का तो ?>>>>> नाही.नीरफणस नाही.फणस कापला की आतमधे फक्त चारखंड असते .ह्यावेळी एक गरा मिळाला आहे.एकाने सांगितले की तो भाजीचा फणस आहे.पण त्याचा भाऊबंद समोरच्या घरात वाढला आहे (एक आठळी आईकडे आणि दुसरी आठळी समोरच्या घरी)
त्याला गरे असलेले फणस आले.मजा म्हणजे आईने गावच्या फणसाचे गरे समोरच्या घरात दिले होते.त्यातलीच आठळी दोघींनी लावली होती.पण त्यांचे कायम वास्तव्य तिकडेच आहे.
देवकी.. हे सत्यभामेच्या
देवकी.. हे सत्यभामेच्या प्राजक्ता सारखे झाले
मी आत्ताच सिंगापूरच्या ऑर्किडसचे फोटो टाकलेत. अवश्य बघा.
हे पहा.आणि विश्लेषण करा.
हे पहा.आणि विश्लेषण करा.

भुताटकी अमानवीय ???
भुताटकी
अमानवीय ???
दिनेशदा,
दिनेशदा,
देवकी मलापण फणसाचे वाचताना,
देवकी मलापण फणसाचे वाचताना, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या प्राजक्ताची गोष्ट आठवली.
'लावला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी', खूप सुंदर गाणं.
मनुषी, काय मस्त बहर.....आ हा
मनुषी, काय मस्त बहर.....आ हा हा!
"च" चिंचेचा आणि चेरीचा.
"च" चिंचेचा आणि चेरीचा.


सगळेच फोटो मस्त. बोले तो झक्कास!!!
'लावला पारिजात दारी, फुले का
'लावला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी', खूप सुंदर गाणं.>>>>>>>>>" पारिजात बहरला "(की 'बहरला पारिजात') हे नाटक लहानपणी आम्ही लांज्याला जाऊन पाहिलं होतं. त्याची आठवण झाली. त्यातला "नारायण" "नारायण" करणारा नारद अजुन आठवतोय. बहुतेक चंदू डेग्वेकर होते.
शोभा ताई, हा फोटो म्हणजे त्या
शोभा ताई, हा फोटो म्हणजे त्या बाईचे प्रताप आहेत का? :अओ::दिवा:
शोभा ताई, हा फोटो म्हणजे त्या
शोभा ताई, हा फोटो म्हणजे त्या बाईचे प्रताप आहेत का? :अओ:>>>>>>>नाही नाही.
आणि सदाफुली, मोगरा, वगैरे
आणि सदाफुली, मोगरा, वगैरे फुलझाडांच्या वरच्या टुक्षाच तोडत होती>>>>"टुक्षा" म्हणजे काय?
>"टुक्षा" म्हणजे
>"टुक्षा" म्हणजे काय?>>>>>>>>>>रोपांची मुंडकी.
पण असा असुरी प्रकार का करत
पण असा असुरी प्रकार का करत असावी ती?

कळ्या एकवेळ मी समजू शकते पण याने तिचा काय फायदा?
रोपांची
रोपांची मुंडकी>>>>ओक्के.
कळ्या एकवेळ मी समजू शकते पण याने तिचा काय फायदा?>>>>अगदी अगदी.
कळ्या एकवेळ मी समजू शकते पण
कळ्या एकवेळ मी समजू शकते पण याने तिचा काय फायदा? >>>>>>>>>.म्हणूनच मला राग आला. आणि दररोज येऊन हेच करतेय ती. आज ती रोपं मला फ़ारच अगतिक वाटली.
अगं म्हणजे केवळ ओरबडायची
अगं म्हणजे केवळ ओरबडायची वृत्ती म्हणून हे असं?

श्शीss!
sorry अवांतर लिहितेय पण
sorry अवांतर लिहितेय पण शोभाताई तुमची खूप आठवण येतेय सध्या. नवऱ्याला ठाण्याला एका ठिकाणी कोकणचे पदार्थ वगैरे मिळतात तिथे लाल तांदूळ मिळाले आणि त्याने आणले, मला लगेच आठवलं तुम्हाला आवडतात ते.
अन्जू, खूप खूप धन्यवाद! माझी
अन्जू, खूप खूप धन्यवाद! माझी आठवण काढलीस ना? आता खा निवांत.
(फ़क्त ते तुम्हाला मधलं "म्हा" काढून टाक.
)
देवकी.. हे सत्यभामेच्या
देवकी.. हे सत्यभामेच्या प्राजक्ता सारखे झाले......:D
शोभाने टाकलेल्या फोटोवरुन
शोभाने टाकलेल्या फोटोवरुन आठवले. सांगत्ये ऐका मधे एक लावणी आहे.
काल राती बाई मजसि, झोप नाही आली.. खिडकीवर कुणीतरी धडका देतय.. आणि घरात मी एकटीच, शिवाय पाच माळ्यावरती माझी कोपर्यात खोली..
इथे लावणीचा पहिला भाग संपतो. रसिक विचारू लागतात कि खिडकीवर धडका कोण देत होतं; त्यावर गायिका
म्हणते.. एक पाखरू धडका देत होतं.. शिवाय वर म्हणते, " कशी तुझी मैत्रिण बाई, पाखरांस भ्याली "
घरात दिवा असला तर बंद खिडकीच्या काचेवर धडका देणारी पाखरं आपण नेहमीच बघतो.. उजेडाकडे आकर्षित होणे हे त्यांचे नैसर्गिक वर्तन आहे. ही वृत्ती त्यांच्यात येण्यासाठी अनेक पिढ्या खर्च झाल्या असाव्यात.
पण काचेवर धडका देऊन फायदा नाही. मूळात काच म्हणजे काय याचा बोध त्यांना होऊन, त्यांच्या पुढच्या पिढ्यात ते ज्ञान जाण्यापर्यंत अजूनही अनेक पिढ्या खर्चाव्या लागतील. कारण त्यांच्या उत्क्रांतीसाठी जेवढा कालावधी लागला त्यातल्या फारच थोड्या कालावधीमधे "काच " आली. तशी निसर्गातही ज्वालामुखी मधे काच तयार होते पण मानवाने त्याचा वापर अगदीच अलिकडे सुरु केला.
आणि किटकांना का बोल लावा ? आपल्याला अभिमान वाटतोय त्या भल्या मोठ्या मेंदूत तरी हे भान अजून पुरते कुठे आलेय ? नव्या बांधकामात जिथे मोठ्या काचा लावलेल्या असतात तिथे आवर्जून लाल फुल्ल्या
मारलेल्या असतात.. नाहीतर त्या काचेतून आरपार जाऊ बघणार्या माणसांची काही कमी नसते.
आता कवि लोकांचे (खास करून
आता कवि लोकांचे (खास करून शायर लोकांचे ) आणखी एक आवडते रुपक.. शमा परवाना. गर्विष्ठ शमा आप्ल्याकडे परवान्याला आकर्षित करते आणि जाळून मारते.
या कल्पनेचीही अनेक रुपे दिसतात..
हम शम्मा का सीना रखते है, रहते है मगर परवानोंमे ( देख कबीरा रोया.. )
शमा कहे परवानेसे परे चला जा, मेरी तरह जल जायेगा, यहा नही आ ( कटी पतंग )
मराठीतही काही उल्लेख येतात.
जगी सांगतात कि प्रीत पतंगाची खरी, झेप घेऊन देतो प्राण ज्योतीवरी ( होनाजी बाळा )
हे तूला कसे कळेल, कोण एकटे जळेल ( मालवून टाक दीप )
याचाही संबंध उत्क्रांतीशीच आहे. शमा म्हणजे आपली प्रियतमा नव्हे. तिच्याजवळ गेल्यास आपला अंत होतो.
हे शहाणपण त्यांच्यात कधी येणार ? हा अनुभव किती वाईट होता हे परत येऊन सांगायला ते बिचारे जिवंत तर रहायला हवेत.
दिनेशदा मला हि गाणी आठवली १.
दिनेशदा मला हि गाणी आठवली
१. अंधारच मज हवा, उगा दावितो दिवा...काजवा, उगा दावितो दिवा
२. मी तर रमते हरीचरणासी होऊनी त्यांची दासी, का उगा पतंगा जळसी.
तटि: "काजवा" आणि "पतंग" हे निसर्गाचेच घटक असल्याने वरील पोस्ट विषयांतर नाही आहे.
Pages