सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29

येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे! Happy

आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!

तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.

सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केल + रोस्टेड पेप्पर + पातीचा कांदा + अ‍ॅव्होकाडो- हे सगळं चिरून आणि त्यात स्पायसी ऑऑ + लिंबाचा रस + सॉल्टपेप्पर असं सॅलड केलं होतं. भारी लागलं. वरून क्रुटॉन्स घातले.

थंडीच्या सीझनमध्ये सुक्या मेव्याचे राजेशाही सलादही बनवून खाता येते. अर्थात त्याला सलाद म्हणावे अथवा नाही हा एक प्रश्नच आहे! Wink

काळ्या मनुका, जर्दाळू, बेदाणे, सुकी अंजीरे इत्यादी उपलब्ध असलेला सुकामेवा थोड्या पाण्यात रात्रभर भिजवायचा. हवं तर खजूर (शक्यतो बिनबियांचा), बदामही घालू शकता. सकाळी हा सुकामेवा पाणी पिऊन चांगला टम्म फुगलेला दिसतो. थोड्या पाण्यासकट हा मेवा पॅनमध्ये गॅसवर गरम करायला ठेवून त्यातले पाणी आटवता येते, किंवा गारच खायचा असेल तर पाणी पिऊन टाका आणि टम्म फुगलेला मेवा नुसता हादडू शकता. त्यात आवडीप्रमाणे भाजलेले तीळ, सूर्यफुलाच्या बिया, भाजलेले व भरड केलेले शेंगदाणे असा क्रंची मालही घालता येतो.
मेवा जर गरम करणार असाल तर स्वादासाठी आवडीप्रमाणे किंचितशी दालचिनीपूड, वेलचीपूड, भरडलेल्या लवंगा वगैरे घालू शकता. लाड कराल तेवढे थोडे! Proud ह्यात खायच्या वेळेस वरून मधही घालू शकता.

सिंडरेला, मस्त वाटतय. रोस्टेड पेप्पर म्हणजे गॅअसवर भाजुन काळी साल काढुन टाकली व गर बारीक करुन वापरला की अजुन आही वेगळी पद्धत? स्पायसी ऑऑ मिळते का विकत?

सुनिधी, फॉइलमध्ये गुंडाळून गॅसवर भाजल्या मिरचीच्या फोडी. नंतर सालं न काढताच फोडी केल्या. स्पायसी ऑऑ मिळते लोकल ग्रोसरीत.

माधुरी, वॉलनट्स पण चालतील किंवा ब्लॅक बीन्स आणि कॉर्न चिप्स.

सिमला मिरची रायत्यात भाजून वापरली तर रायत्याला एक वेगळा स्वाद येतो त्यामुळे. Happy
आणखी एक पद्धत म्हणजे फोडणीत कांदा व सिमला मिरची परतायची, एकीकडे रायत्यासाठी दही तयार करायचे. (दही फेटून त्यात साखर, मीठ, तिखट इ. आवडीप्रमाणे घालायचे.) परतलेली सिमला मिरची + कांदा मिश्रण जरा गार झाले की ह्या दह्यात अलगद मिसळायचे. काहीजण ह्यात ओले खोबरेही घालतात. वरून कोथिंबीर इ.
फ्रीजमध्ये गार करायचे आणि खायचे.

तसेच काहीजण सिमला मिरची रायत्यासाठी सायीचे दही वापरतात. त्याची एक वेगळीच चव येते.

ऑऑ + लिंबाचा रस + मीठ + मिरेपूड + ठेचलेला लसूण असे ड्रेसिंग बनवायचे. भाजलेल्या सिमला मिरचीच्या फोडी, काकडी व टोमॅटो बारीक चिरून, हवी असल्यास पुदिन्याची ताजी पाने किंचित चुरडून त्यात हे ड्रेसिंग मिसळायचे.
माझी एक मैत्रिण ह्यात लेमन झेस्ट (लिंबूसाल) देखील वापरते. परंतु त्याची किंचित कडसर चव मला आवडत नाही. मिक्स हर्ब्ज पण छान लागतात ह्या सॅलडमध्ये. समर स्पेशल म्हणून पांढरा कांदा चिरून, संत्र्याच्या फोडी, काळी द्राक्षे, डाळिंबाचे दाणेही घालता येतील.

~ हटके सॅलड ड्रेसिंग म्हणून एखादे वेळी चवीत बदल म्हणून कांदा, काकडी, टोमॅटो इत्यादी बारीक चिरून त्यात कैरीच्या लोणच्याचा खार मिसळून देखील यम्मी लागतो. वेगळे मीठ, तिखट घालायची गरज नाही.

~ कोथिंबीर + पुदिन्याची चटणी सॅलड ड्रेसिंग म्हणून वापरता येते.

~ ऑऑ मध्ये ताजी पुदिन्याची पाने चुरडून आणि चवीपुरते मीठ.

~ ऑऑ + लिंबाचा रस + सैंधव / मीठ + साखर + मिरपूड + आल्याचा रस किंवा किसलेले आले + भरडलेली बडीशेप. (चव गोडसर - तिखट लागते ह्या ड्रेसिंगची.)

~ शिजवलेली चवळी + उकडलेले बटाटे + बारीक चिरलेले टोमॅटो / चेरी टोमॅटो + बारीक चिरलेला कांदा + आवडत असल्यास बारीक चिरलेली सिमला मिरची + कोथिंबीर हे सॅलड + वरून मीठ - लिंबाचा रस - साखर - मिरपूड असे ड्रेसिंग. (किंवा ऑऑ मध्ये मिक्स करून ते ड्रेसिंग)

पडवळाची कोशिम्बीर मस्त लागते. पडवळ विशेष कोणाला आवडत नाही. पण कोशिम्बीर कळत ही नाही पडवळाची आहे म्हणून. कोवळ पडवळ काकडी सारख कोचवायच आणि नंतर त्यात मीठ, साखर, हिरवी मिर्चि, दाण्याचं कूट आणि दही घालुनं सारखं करायचं. कोशिम्बीर तयार !! माझा एवढा मोठा मुलगा फसतो तिथे लहानांच काय !! आणि खरच टेस्ट बेस्ट !! कोणि आधी लिहिलेली दिसली नाही म्हणून शेअर करत आहे.

कोशिंबीरी / सलाड्स म्हणजे साइड डिश नसून मेन डिशच असते आमच्याकडे.
हा धागा मस्त आहे save करुन ठेवण्यासारखां!!

पडवळ, दोडकी, दुधी इ. पाणचट पोटभरू बेचव भाज्या खाल्ल्याच पाहिजेत असले कोणते ओमेगा३फॅटीअ‍ॅसिड्स् / टोकोट्राएनॉल्स / मल्टिव्हिटॅमिन्स / मिनरल्स त्यांत असतात याबद्दल कुणी माझं प्रबोधन करील काय? Wink

बाकी सॅलड्स प्रचण्ड आवडतात.

वॉल्डॉर्फ सॅलड फेवरिट्सपैकी आहे.

गुगल वर भरपूर माहिती आहे पडवळाच्या पोषण मूल्यांबद्दल !! मला असं वाटतं की आहारात विविध प्रकारच्या भाज्या आणि फळं यांचा समावेश असावा . चवीतही विविधता मिळ्ते. रुचिपालट हवाच असतो ना आपल्याला?
पडवळ कोणालाच विशेष आवडत नाही पण हि कोशिम्बीर खरच खूप छान लागते म्हणून शेअर केली.
अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी हे ही तितकेच खरे!!

मला पडवळ, दुधी ह्या सगळ्या भाज्या आवडतात. एकूणच मोस्टली सगळ्या भाज्या, उसळी आवडतात आणि क्वांटिटी मध्ये केल्या/ खाल्ल्या जातात. अमेरिकेत मिळणार्‍या अख्ख्या कोबीच्या गड्ड्याची भाजी आमच्याकडे केली जाते आणि पाऊण भाजी एका वेळेत संपतेही.

मस्त रेसीपी हेमा...माझ्या माहेरी पडवळाची नारळ घालुन कोशिंबीर करतात. मला भाजीपेक्शा कोशिंबीरच आवडते.

हेमा वेलणकर,
पडवळ कच्चाच ठेवायचा का?
पडवळाचा हा प्रकार करून पहायला हवा. पण कच्चा पडवळाने पोटदुखी किंवा गॅस नाही होणार ना हि चिंता आहे.

होय पडवळ कच्चचं ठेवायच. पडवळ कोवळं बघुन घ्यायचं. जरा ही उग्र वास येत नाही. कोकणात पावसाळ्यात खूप पडवळं होतात, प्रत्येकाच्या घरी म्हणून discover झाली असेल कदाचित ही रेसिपी. केशर, खरं आहे भाजीपेक्षा कोशिम्बीरच जास्त छान लागते.

पडवळाची कोशिम्बीर ... करून बघायला पाहिजे!

बटाटा-प्रेमींसाठी पोटॅटो सॅलडचा आणखी एक (हेवी) प्रकार :
उकडलेल्या बटाट्याच्या फोडी तेलात किंवा लोण्यात क्रिस्पी ब्राऊन रंगावर परतून घ्यायच्या (किंवा बेक करता येतील.)
मेयॉनेज मध्ये मिक्स हर्ब्ज, मिरपूड, फेसलेली मोहरी, कोथिंबीर (किंवा उपलब्धतेनुसार पार्सले), आवश्यक असेल तरच मीठ असे एकत्र मिक्स करायचे. त्यात बेक केलेल्या किंवा परतलेल्या बटाटा फोडी अलगद मिसळायच्या. वरून कोथिंबीर भुरभुरायची.

ह्यात उकडलेले स्वीट कॉर्न / बेबी कॉर्न देखील घालता येतील.

पोटॅटो सॅलड (चिंचेच्या चटणीचे ड्रेसिंग)

उकडलेल्या बटाट्याच्या फोडी सोनेरी तांबूस रंगावर परतून घ्यायच्या. चिंचेची पातळसर चटणी करायची. बटाटा फोडी गार झाल्यावर अलगद चिंचेच्या चटणीत सोडायच्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची.

१. उकडलेला बटाटा + बारीक चिरलेला कांदा + बारीक चिरलेली मिरची + कोथिंबीर + मीठ + दही + साखर हे पण छान लागते.
२.किसलेला पांढरा मुळा + तिखट + मीठ + हिंग + लिंबाचा रस.
३.समुद्रमेथी + बारीक चिरलेला कांदा + बारीक चिरलेली मिरची + मीठ + दाण्याचे कूट + साखर + लिंबाचा रस.

स्ट्रॉबेरीचे दोन तुकडे करावेत. एक बाउलभर घ्यावेत . त्यावर थोडा चाट मसाला टाकणे. मग त्यावर मनसोक्त मध टाकणे. स्ट्रॉबेरी सॅलड तय्यार.

काकडी पडवळ कोचवण म्हणजे काय करणे>>> चोचवण पण म्हणतात.
तुमच्याकडे विळी आहे का तरच समजावून सांगण्यात अर्थ आहे. पण, विळी असेलच आणि वापरात असेल तर हे समजवायची वेळ यायला नको Happy

माझी दोन नविन सॅलडं :

१. फ्लॉवर, गाजर, मटार लहान आकारात कापून घ्यावे. पॅनमध्ये पाणी उकळत ठेऊन ते उकळल्यावर त्यात किंचित मीठ घालून वरील तिन्ही भाज्या एकेक करून अथवा एकत्र पॅनमध्ये घालणे. भाज्या बुडेतो पाणी हवं.

दोनेक मिनिटांत काहीशा शिजतील (जास्ती शिजवू नका. पण कच्च्याही राहिल्या नाही पाहिजेत.) त्या चाळणीत्/गाळणीत काढा. पाणी निघून गेल्यावर गरम असतानात त्यात झेपेलसं अमुल बटर टाका (नाहीतर ऑऑ चालेल. पण बटर इज बेटर.) आणि चिलीफ्लेक्स शिंपडा. मग ते प्रकरण गरम असतानाच खा.

२. एक काकडी, एक टोमॅटो, एक/ दोन उकडलेले बटाटे, अर्धं/ एक सफरचंद यांचे बारीक / आवडतील अशा आकाराचे तुकडे करून घ्या. घरी बनवलेले पनीर (नाहीतर बाहेरचं आहेच) कुस्करून त्यात घ्याला. मोड आलेले मूग / भिजवलेले काबुली चणे थोडं मीठ घालून उकडून घ्या आणि ते घाला. आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर / पुदिना / पार्सली / शेपू चिरून घाला. मग ऑऑ + चिलीफ्लेक्स आणि मीठ आणि लिंबू पिळून असं सगळं एकत्र करून पोटभर खा.

मामी, दुसर्‍या क्रमांकाचं सॅलड मस्त आहे! त्यात द्राक्षे, संत्र्याच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, टिनमधील अननसाचे तुकडे वरून घालता येतील. बर्फाच्या पाण्यात गार केलेली लेट्यूस (लेटस) ची पाने हातानेच थोडी फाडायची आणि ह्या मिश्रणात घालायची. (मला समर स्पेशल सॅलड करण्याचा मोह आवरत नाहीये! Proud )

कॉपी पेस्ट... पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३ वरून

आंबट चुक्याची कोशिंबीरसुद्धा छान होते.

चुका पातळ अन लांब लांब चिरून घ्यायचा. दहिवड्यांकरता करतो तसल्या मधुर दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. मीठ, साखर पहायचं. हवी असेल तर वरून पळीभर तेलाची हळद, जिरं घालून फोडणी द्यायची.
दही मात्र परफेक्ट हवं या रेसीपी करता...

मामीचं सॅलड नं. २ (बटाटा, पनीर, काबूली चणी एकत्र?) म्हणजे घरातल्यांना बाहेर पळायची तयारी करून ठेवायला हवी. नाहितर जो खाईल त्याला. Proud

Pages