मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगो, Biggrin

माझ्या हापिसातली एक कलिग तिच्या ६ वर्शे वयाच्या मुलीसोबत आम्हाला मॉलमध्ये भेटली. माझ्या सौ ची ती जुनी मैत्रीणही आहे.
माझी सौ मुलीला: काय आज माय-लेकी दोन्ही पिंक-पिंक! ड्रेस-शुज-सॉक्स सगळे मॅचिंग!
पोरगी: हो! माझ्या मम्माने तर आज चड्डीपण पिंक घातलीये!
तिच्या आईचा चेहरा सहाजिकच दे माय धरणी ठाय!

पोरगी: हो! माझ्या मम्माने तर आज चड्डीपण पिंक घातलीये!
तिच्या आईचा चेहरा सहाजिकच दे माय धरणी ठाय!>>>
'जय हो'चा परिणाम Sad

पोरगी: हो! माझ्या मम्माने तर आज चड्डीपण पिंक घातलीये!
तिच्या आईचा चेहरा सहाजिकच दे माय धरणी ठाय!>>>
देवा रे

बाप रे! हसू का रडू?? Uhoh क मा ल आहे!!!!
जय हो चा संदर्भ काय? इथे लिहिण्यासारखा असेल तरच लिहा, अन्यथा अजिबात नको!

सई, 'जय हो' मध्ये लहानमुलांच्या तोंडी अश्या प्रकारचे संवाद आहेत. Sad

हा असाच संवाद 'जय हो' मध्ये आहे?!!!! आम्ही खरच तो सिनेमा पाहिलेला नाही. त्या पोरीने पाहिलाय का नाही माहीती नाही.
अवांतरः असे पांचट संवाद असून 'जय हो' टॅक्सफ्री!

'जय हो' टॅक्सफ्री!????????????

शेजारच्या काकूंच्या घरी पाहुणे आले होते , जाताना त्यांना सोडायला म्हणून दारापाशी येउन त्यांच्या निरोपाच्या गप्पा सुरु होत्या, इतक्यात खाली खेळणाऱ्या मुलांमधला एक ७-८ वर्षाचा मुलगा जोरात ओरडला ,"काकू ,तुमची चड्डी पडली " Happy
सगळे जन गोंधळलेल्या नजनरेने पाहायला लागले, काकूंना खूपच मेल्याहून मेल्यासारख झाल.
नंतर पाहिलं तर काकूंच्या बाल्कनीतून वाळत घातलेल्या कपड्यांपैकी काही कपडे खाली पडले होते :d )
**अश्लील वाटल्यास पोस्ट उडवू शकता

बायको प्रेग्नंट असल्याचं कळल्यावर चिरंजीव प्रचंड उत्साहात होते. सारखं मला भाऊ मिळणार की बहीण असे प्रश्न सुरू झाले.

सुमारे महिन्याभरानंतर पहिल्या चेकअप् च्या वेळेला डॉक्टरने जुळं असल्याचं सांगून आम्हांला आधीच शॉक दिला होता wink.gif

मुलाला शाळेतून आणल्यावर त्याची आई,

" तन्मय, तुला माहीत आहे, तुला एक नाही , दोन लहान भाऊ किंवा बहीणी होणार आहेत !"

तन्मय अत्यंत विचारमग्नपणे -

" गेल्या महिन्यात एक होतं, या महिन्यात त्याच्या दोन झाल्या.. पुढच्या महिन्यात तीन होणार का ?"

Pages