Submitted by स्वाती२ on 27 January, 2014 - 08:42
मंडळी , बघता बघता जानेवारीचा शेवट आला. या वर्षीचा हिवाळाही अगदी हाडे गोठवणारा. मात्र बाहेरचे उणे -१० तापमान आणि स्नो काही कायम रहाणार नाहीये. लवकरच स्प्रिंग येइल. तेव्हा २०१४ च्या बागकामासाठी नवा धागा. तुमचे गार्डन प्लॅन्स, रोपं- बियाणे यासाठीचे खात्रीचे सोर्सेस, यावर्षी बागेत काही नवीन प्रयोग करुन बघणार असाल तर त्याबद्दल इथे जरूर लिहा. बागकामाची आवड असलेल्या सर्व नव्या-जुन्या मायबोलीकरांचे धाग्यावर स्वागत!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोझमेरी का येत नाही
रोझमेरी का येत नाही तुमच्याकडे? मी कधी लावली नाही पण घरमालकिणबाईंनी लावली आहे ती एकदम जोरशोर में वाढते.
मी पहिल्यांदा लावलेली रोझमेरी
मी पहिल्यांदा लावलेली रोझमेरी फार काळ टिकली नव्हती. मग नवर्याच्या वेंडरने सांगीतले - रोझमेरीसाठी पॉटिंग मिक्स आणि टॉप सॉइल १ :१ पमाणत घेऊन कुंडी तयार करायची. तेव्हा पासून काही प्रॉब्लेम नाही.
कटिंग घेतल्यावर खालची एक ते दिड इंचावरची पाने काढून टाकायची. रुट स्टार्टरमधे बुडवुन पॉटिंग मिक्स मधे लावायचे. माती कोरडी पडू द्यायची नाही. महिनाभरात नवे रोप छान वाढायला लागते.
मानुषी, उद्या फोटो टाकेन अबोलीचा.
सिंडरेला, मानुषी,
सिंडरेला, मानुषी, उत्तरांबद्दल धन्यवाद. मागच्या वर्षी रोप वाढलेल पण मिरच्या नव्हत्या आल्या.. म्हणून विचारल. या वेळेला तुमच्या सल्ल्यांप्रमाणे करुन बघेन
धन्यवाद स्वाती! ते कंद जाड
धन्यवाद स्वाती! ते कंद जाड पेपर बॅगेतून उघडलेच नाहीत अजून, आता बघते.
तुमची वरची सुप्रिताला लिहीलेली पोस्ट उपयुक्त आहे.
काल मला एका कुंडीत
काल मला एका कुंडीत गोमीसारख्या दिसणार्या दोन पाहुण्या दिसल्या. त्यांचा समाचार घेतला पण त्यांच्या आयाबहिणी कुठे असतील या विचाराने चैन पडेना झालंय. कुठे असतील या बाया?
स्वाती२, खूप छान माहीती दिली
स्वाती२, खूप छान माहीती दिली आहे. सगळे पाँईटस लक्षात ठेवेल. खूप सारे धन्यवाद!!
अजून बाहेर बर्फच १ फूट आहे, वाट पहातीय तो वितळायची.
मी कोबी लावलेला फॉलच्या
मी कोबी लावलेला फॉलच्या सुअरुवातीला, आता स्प्रिंग आला तरी त्याला कोब्या लागायचं लक्षण दिसत नाहीये. मी झोन ९ ब मध्ये आहे. कुणी कोबी लावलाय कां आणि कुणाला संत्रं, सफरचंद असली फळझाडं कुंड्यांमध्ये लावायचा काही अनुभव आहे कां?
ह्या वर्षी herbs लावायचा
ह्या वर्षी herbs लावायचा विचार आहे. basil, chives, rosemary, lavender वगैरे. त्यासाठी बिया कुठल्या कंपनीच्या घ्याव्यात? आणि प्रत्येकाची variety पण असते, उदा. sweet basil, thai basil. ह्यातल्या कुठल्या बिया घ्यायच्या कोणी सांगू शकेल का? मी बाल्कनीत कुंड्यांमधे लावणार आहे.
बेसिल, मार्जोरम ( मरवा) अन
बेसिल, मार्जोरम ( मरवा) अन चाइव्ह्स बियांपासून सहज उगवतात. बर्पी कंपनीच्या बिया माझ्या फेवरिट.
बाकी रोझमेरी, लॅव्हेंडर, ओरेगनो, सेज इत्यादीची छोटी रोपे आणलेली बेस्ट. साधारण मे महिन्यात सगळ्या नर्सरीज मधे मिळतात रोपं.
http://www.burpee.com/
मनी , कोबीला स्ट्रेस असेल तर
मनी , कोबीला स्ट्रेस असेल तर गड्डे नाही तयार होत. पाणी कमी पडले किंवा टोकाचे तापमान यामुळे असे होते.
माझ्या ओळखीच्या बाईंच्या आईकडे कुंडीत संत्र्याचे झाड आहे.
सफरचंद लावायचे असेल तर ड्वार्फ व्हरायटी लागेल. तसेच क्रॉस पॉलीनेशन होते त्यामुळे दोन वेगवेगळी योग्य जातींची झाडे लागतील. प्रुनिंग करावे लागेल. एकंदरीत कुणाला तरी तज्ञ व्यक्तीला विचारावे.
धन्स मेधा..
धन्स मेधा..
मेधाच अगदी बरोबर आहे.
मेधाच अगदी बरोबर आहे. बर्पीच्या बीया चांगल्याच आहेत. होम डिपो मध्ये Ferry Morse कंपनीच्या सीड्स मिळतात. त्याही स्वस्त आणि चांगल्या आहेत.
बेझिल Bam व्हरायटी लावतो आम्ही. अगदी खूप हीट असलेल्याना चांगली आहे व्हरायटी. Sweet Basil क्लासिक व्हरायटी आहे. यु कान्ट गो राँग. मी पर्पल बेझील पण लावते. आमच्या मुलीला कलर आवडतो म्हणुन. घरी कांद्याच्या बीया असतील तर पंच फोरण मधल्या त्या chives साठी वापरता येतील.
रोझमेरी झुडूपासारखी पसरते. पण रोपच आणलेले बरे.
ज्ञाती, आपल्याकडे ट्युलिप्स लावायचा सिझन केव्हाच संपला अगं. ख्रिस्मसला जायला पाहिजेत ते जमिनीत.
पण आता ते तसेच ठेवलेस तर खराब होवून जातील. पेरून टाकलेस तर यावर्षी ट्युलिप मिळणार नाहीत. पण कदाचीत बल्ब्ज वाचतील. ट्राय करून पहायला हरकत नाही. मी लावलेत ख्रिसमसला, बघू काय काय होते.
मनी , अॅपल बहुदा 9b मध्ये येणार नाहीत ना? चिलिंग अवर्स कमी पडतील. मी आमच्या इथे ८अ असुन सुद्धा अॅपल कमी लावताना पाहिलेय.
आम्ही पीच(सेल्फ फर्टाईल) आणि फिग आणलेत गेल्या आठवड्यात कॅलवेज मधून. थंडीमुळ लावले नाहीत अजून.
मला एक विचारायचे आहे , माझी
मला एक विचारायचे आहे , माझी पोस्ट चुकीच्या धाग्यात आहे त्या बद्दल माफी ..
मी मुंबईला जात आहे ३ आठवडे साठी, साधारण दादर भागातून काही सीड्स मिळतील का कडीपत्ता, तुळस, बेसिल आणि पुदिना, मिरची, tomato या साठी(अजून काही असेल तर सुचवा ). लंडन मध्ये पण आत्ता थंडी सुरु आहे आणि स्प्रिंग मध्ये आल्यावर लावायचा विचार आहे. soiling हे तर इथेच करेन, मायबोली वर वाचून.
दादरबद्दल माहिती नाही, पण
दादरबद्दल माहिती नाही, पण भायखळ्याला राणीच्या बागेच्या आसपास नामदेव उमाजी कंपनीचे दुकान आहे. तिथे बिया मिळतील.
बेसिल, मिरची , टॉमेटो, फरसबी, वांगी इत्यादी बिया लंडनमधे सुद्धा मिळतील - क्यू गार्डन्समधे तर नक्कीच ! पुदिना, कडीपत्ता यांची रोपे लावावी लागतील. ग्रोसरीतून आणलेल्या पुदिन्याच्या काड्ञा पाण्यात घालून ठेवा, मुळं फुटली की मातीत रोवा, तुमच्या इथे साधारण यू एस डी ए झोन ८ पर्यंत हार्डीनेस असावा असा माझा अंदाज आहे. पुदिना वर्षभर बाहेर राहू शकेल.
भारतातून आणणार असाल तर लाल माठ्,मायाळू, अंबाडी, दुधी, दोडका, कार्ले अशा बिया ज्या लंडनमधे सहज मिळणार नाहीत, त्या आणा.
सीमा, चाइव्ह्ज् मध्ये यंग
सीमा, चाइव्ह्ज् मध्ये यंग लसूण ना? कांद्याच्या बियांतून चाइव्ह्ज्?
अरेच्च्या! चाईव्ह्ज् म्हणजे
अरेच्च्या! चाईव्ह्ज् म्हणजे कांद्याचीच एक जात की .. माझ्या डोक्यात काही चुकीचंच होतं ..
मेधा धन्यवाद. KEW Gardens
मेधा धन्यवाद. KEW Gardens माझ्या घर पासून फार जवळ आहे पण कधी तिथे गेले नाही आहे.
माझ्या आत्ताच्या घराला फक्त एक छान बाल्कनी आहे मग छोट्या-मोठ्या कुंड्या मध्ये पहिलाच प्रयत्न करून पाहणार आहे. कडीपत्ता चे रोप इथे मिळत नाही आहे, येताना बी घेवून येते, मायबोली वर वाचून मग सुरुवात करेन. पुदिना खरेच इथे साधारण वर्षभर छान राहतो. मागच्या वर्षी पुदिन्याचे छोटे कुंडीत रोपे मिळाले होती.
मिरची, बेसिल नक्कीच शोधून काढते. लाल माठ्,मायाळू, अंबाडी, दुधी, दोडका, कार्ले हे वाचून अजून उत्साह आला आहे.
>>भारतातून आणणार असाल तर लाल
>>भारतातून आणणार असाल तर लाल माठ्,मायाळू, अंबाडी, दुधी, दोडका, कार्ले अशा बिया ज्या लंडनमधे सहज मिळणार नाहीत, त्या आणा.>> हे सगळं डिक्लेअर करून कस्टम्स मधून आणलेलं चालतं?
कोबीच्या माहीतीसाठी धन्यवाद
कोबीच्या माहीतीसाठी धन्यवाद स्वातीताई,
मग मी त्या कोबीच्या रोपांना वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावलं पण कोबीचा कांदा एकालाही लागला नाही, उलट एका रोपाला तर सरळ फुलंच येतायत... आता सगळ्या रोपांची पाने वापरून घेईन म्हणजे अजून नविन भाज्या लावता येतील. माझ्या चांगल्या ६-७ कुंड्या अडकवल्यात सगळ्या कोब्यांनी
मी ड्वार्फ लिंबाचं रोप आणलंय.. आणलं तेव्हा छान निरोगी होतं पण आता त्यावर काहीतरी किड पडलंय त्याने पानं गुंडाळल्यासारखी गोल गोल झालीयेत.
.
.
एक इन्डोअर केळीचं झाड गिफ्ट
एक इन्डोअर केळीचं झाड गिफ्ट मिळालंय. रोज पाणी घालायचं का? आणि काय काळ्जी घ्यावी?
>>>>भारतातून आणणार असाल तर
>>>>भारतातून आणणार असाल तर लाल माठ्,मायाळू, अंबाडी, दुधी, दोडका, कार्ले अशा बिया ज्या लंडनमधे सहज मिळणार नाहीत, त्या आणा.<<<<
जो कोणी हा सल्ला पाळायचा विचार करणार असेल तर नीट माहीती करून घ्या. मेधा ह्यांना सल्ला द्यायला काय जातय? त्यांचा सल्ला एकून कोणीही कायद्याच्या कचाटीत अडकू शकतो.
असे जर कोणी दर वेळेला बीया लपवून आणणे, सुके मासे,बंदी असलेले कडधान्य,बंदी असलेल्या जिन्नस पासूनचे मसाले वगैरे करता करता शेवटी पकडला जावू शकता.
सीडस वगैरे असे आणायला डीक्लेअर करावे लागते(अमेरीकेत तरी). वरती सल्ला देणार्यांनी असे डिक्लेअर केले असेल असे वाटत नाही. डिक्लेअर करून आणले असेल तर तशी माहीती दिली तर बरी, नुसते असे बिनकामाचे व कायद्याने धोकादायक सल्ले काय कामाचं?
अमेरिका बागकाम या वेळी लवकर
अमेरिका बागकाम या वेळी लवकर सुरु झालं का
आमच्या बागेतली काही फुलं
१>डॅफोडिल्स

२>पिंक जास्मीन

३>गुलाब
मीपु मस्त आहेत फुलं ..
मीपु मस्त आहेत फुलं ..
meepu awsomest . Jasmin the
meepu awsomest . Jasmin the best ahe.
रोझेस खूपच सुंदर ..मोगरा पण
रोझेस खूपच सुंदर ..मोगरा पण काय मस्त बहरलाय ..
मिपु, खूप सुंदर बाग आहे
मिपु, खूप सुंदर बाग आहे तुमची. गुलाब किती सुंदर फुललेत. गुलाबी चमेलीचा बहरलेला वेल बघून 'वेड्यासारखं फुलणं' हे एकच विशेषण आठवतं. तो फोटो प्रचंड आवडला.
सुंदर आहेत फुलं. मी यंदा
सुंदर आहेत फुलं. मी यंदा तगरीचं रोप घेणार आहे.
पुणेकर, काय सुरेख बाग फुललेय
पुणेकर, काय सुरेख बाग फुललेय तुमची! अहाहा! मस्त वाटले!
आमच्या बागेत एक पिटुकले ग्लोरी ऑफ स्नो फुललेय. तेवढीच काय ती वसंताची चाहूल.
आमची बाग अजून घरातच आहे.
आमची बाग अजून घरातच आहे. डेझर्ट रोझ आणि जुईला फुलं आलीत, तुळशीला मंजिर्या आल्यात. एका बटाट्याला खूप मोड आले म्हणून सहजच एका रिकाम्या कुंडीत टाकला होता. त्याला चक्क एक बाळ बटाटा आलेला दिसतोय.
Pages