बागकाम - अमेरीका२०१४

Submitted by स्वाती२ on 27 January, 2014 - 08:42

मंडळी , बघता बघता जानेवारीचा शेवट आला. या वर्षीचा हिवाळाही अगदी हाडे गोठवणारा. मात्र बाहेरचे उणे -१० तापमान आणि स्नो काही कायम रहाणार नाहीये. लवकरच स्प्रिंग येइल. तेव्हा २०१४ च्या बागकामासाठी नवा धागा. तुमचे गार्डन प्लॅन्स, रोपं- बियाणे यासाठीचे खात्रीचे सोर्सेस, यावर्षी बागेत काही नवीन प्रयोग करुन बघणार असाल तर त्याबद्दल इथे जरूर लिहा. बागकामाची आवड असलेल्या सर्व नव्या-जुन्या मायबोलीकरांचे धाग्यावर स्वागत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या वर्षी पहिल्यांदाच हिसॉपच्या बीया गोळा करुन स्नो सोइंग केले. गेल्या आठवड्यात तयार झालेल्या रोपांपैकी ६ रोपं नवर्‍याच्या मित्राला दिली द्राक्षांबरोबर लावायला. सध्या लाल मुळा, पालक, कांदे आणि मटार बागेत वाढतायत. टोमॅटो, मिरच्या, वांगी वगैरेची रोपं घरात तयार झालेत. हा आठवडा दिवसभर बाहेर, रात्री घरात असे ठेऊन विकेंडला बागेत लावेन. गेल्या आठवड्यात कम्युनिटी गार्डनमधे टोमॅटो, बेसिल वगैरे लावायला गेले होते, तिथे एकाने मोठ्ठ्या भोपळ्याची बी दिलेय. यावर्षी लाल आणि पांढरा असे दोन राजगिरा पहिल्यांदाच लावलेत.

स्वाती२, लाल पांढरा राजगीर्‍याची रोपं का बिया लावल्यात?

गेले काही विकेंड येत असलेला बागेतला खाऊ. आता हा संपत आला, पण नवीन उन्हाळी रोपं तयार होत आहेत Happy

">

मीपु, सहीच... Happy ते बीट केवढं मोठं झालं आहे? मुद्दाम इतकं मोठं होऊ दिलं का? (का कोबीचा गड्डा लहान आहे?)

@मेधा

लेमन ग्रास म्हणजे आपला गवती चहा ना? इथे उसगावात मला तरी त्याचे रोप कुठे दिसले नाही. मिळत असेल तर कल्पना नाही.
मी केलेला यशस्वी प्रयोग येणेप्रमाणे Happy
चिनी ग्रो. दुकानात याचे ओले कांदे - दांड्यासह मिळतात. ते आणून एका बाटलीत पाणी भरून त्यात उभे केले. अधूनमधून काही दिवसांनी बाटलीतले पाणी बदलले. साधारण महिनाभराने कांद्यांना चांगली मुळे फुटली. त्यानंतर ते कुंडीत लावले.
चहासाठी लहर आली की वापरत असल्यामुळे दीड-दोन फुटापेक्षा जास्त वाढत नाही.
देशात मात्र याचे रान माजलेले पाहिले आहे.

('मेरेपास मां है'च्या चालीवर) माझ्याकडे गवतीचहा आहे. त्याला भरपूर तुरे (कदाचित तुर्‍यांत व्हाएबल बियापण) आल्या आहेत. बियांपासून रोप उगवेल का माहिती नाही. प्रयत्न करून बघायचा असेल तर कळवा.

मी पण चिनी ग्रोसरी मधून आणलेले लेमन ग्रास उगवण्याबद्दल वाचले आहे. यंदा प्रयत्न करायला हवा .

मीपू जबरी भाज्या. कोबी कित्ती सुरेख दिसतो आहे. टेक्सास मध्ये असा कोबी वाढविणे जिकिरीचे आहे निदान माझ्यासारख्या हौशी गार्डनर साठी.
H-mart मधून गवती चहा च्या काड्यांचा बिंडा मिळतो . सहा काड्या असतात. पाण्यात एक आठवडे ठेवल्या. बारीक मुळ फुटल्या सारखी दिसली.जमिनीत लावल्यावर सगळीच्या सगळी मुळ रुजली.
एक माझ्याकडे ठेवलेले ते चार वर्षात इतके प्रचंड वाढले आहे. विंटर मध्ये डॉर्मँट जाते. परत समर मध्ये पुर्ण वाढते.
जवळ जवळ २ फुट पसरला आहे बुंधा चार वर्षात.
देसी दुकानात मिळतात गवती चहाच्या काड्या. लावून पहा. खूपच सोपे आहे.

गवती चहाच्या काड्यांना मुळं फुटतात? मला वाटलं कांदा पाहिजे. काड्यांपासून होणार असेल तर खरच सोपं दिसतंय. करून बघतो.
विंटर मध्ये बाहेर जगात असेल तर एकदम बेस्ट. आमच्या इकडे लईच स्नो पडतो. (४ब) पहिल्यावर्षी कुंडीत लावून रुजला की थोडा बाहेर ट्राय करीन.

पुणेकर,भाज्या मस्त दिसतायत. मी राजगिर्‍याचे बी लावले.

मी पण एशिअयन दुकानातले लेमनग्रास-बाटलीत पाणी वगैरे प्रकार करते. माझा गवतीचहा कुंडीत असतो. २ वर्षांर्नी कुंडी बदलायची वेळ येते इतका दाट वाढतो. बीयांपासूनही वाढवता येतो.

पपईच्या बिया नवर्‍याने काल तशाच रिकाम्या कुंडीत टाकुन दिल्यात Sad पाण्यात वगैरे नाही भिजवल्या. बघु आता काय होते ते. सध्या इथे भरपुर पाउस चालु आहे आणि त्यामुळे गारवा. बघुयात काही येते का ते.शेपु लावायचा असेल तर असे वातावरण चांगले का? शेपु कसा लावायचा? मागच्या वेळेस शेपा नुसत्या टाकल्या तर नीट नाही आला शेपु.

मेधा गवती चहा मिळतो इथे. मी मागच्याच आठवड्यात आणला. एखाद्या (एशियन) लोकल नर्सरीत बघ. माझा दर हिवाळ्यात घरात ठेवूनही वाळून जातो, उन्हाळ्यात अथक प्रयत्न करुनही परत पालवी फुटत नाही आणि दरवेळी नविन आणावा लागतो. मैत्रिणीकडे मात्र एकच झाड गेली ३/४ वर्ष टिकून आहे.

अमित ४ब म्हणजे विंटरमधे घरात आणावा लागेल गवती चहा. सूर्यप्रकाश मिळेल अश्या ठिकाणी ठेवावा लागेल.
सीमा तुझ्याकडे विंटर बरा असतो आमच्यापेक्षा म्हणून तुझा बाहेरही टिकला का?

स्वाती२, अंजली, सीमा, मेधा, चंद्रा, रुनी, पराग धन्यवाद Happy
मेधा Proud
अंजली, कोबी नेहेमीच्या साईझचाच आहे, पण बीटरूटच मोठं आहे. जाएंट बीटरुट आहे या वर्षी. हे नेहेमीच्या बीटरूट पेक्षा कमी गोड असतं, याचे कटलेट वगैरे तिखट प्रकार चांगले होतात Happy
सीमा,
ईथल्या हवेत कोबी अगदी सहजी येतो. चवीला अफाट लागतो :). कॉलीफ्लॉवर मात्र अवघड आहे. तो असा छान पांढरा शुभ्र गड्डा अजून काही हाती लागला नाही.

मस्तच. मी या वर्षी काहीही म्हणजे काहीही लावलं नाही. बॅकयार्डात एक हरीण फॅमिली रहायला आली आहे. २ पोरं आणि आईबाप दिसतात. ससे आणि एक कोल्हाही अधून मधून दर्शन देतात. त्यातून बाग उरलीच तर जॅपनीज बीटल्स साफ करतात. त्यामुळे गार्डनींग ब्लॉगवरचे आणि मीपुच्या बागेचे/भाज्यांचे फोटो पाहून समाधान मानणार.

माझ्याकडे सशांचा आणि जॅपनीज बीटल्सचा उपद्रव आहे. त्यामुळे असे वैराग्याचे झटके मला पण येतात कधीकधी Happy
पण मग Spring येतो ... की ये रे माझ्या मागल्या. बागकामाची हौस काही स्वस्थ बसू देत नाही. सरतेशेवटी बागेत जे काही वाचेल तेच आणि तेवढेच आपले असे समजवले आहे स्वतःला.

शूम्पी! Happy

आमच्या घराला प्रायव्हसी फेन्स आहे. पण ससे फेन्सलगतची जमीन उकरून अलिकडे पलिकडे ये-जा करतात. त्या फटी आणि त्यांची बिळे सतत बुजवणे अशक्य काम आहे. रिपेलंट इत्यादिचा तात्पुरता उपयोग होतो.

Pages