बागकाम - अमेरीका२०१४

Submitted by स्वाती२ on 27 January, 2014 - 08:42

मंडळी , बघता बघता जानेवारीचा शेवट आला. या वर्षीचा हिवाळाही अगदी हाडे गोठवणारा. मात्र बाहेरचे उणे -१० तापमान आणि स्नो काही कायम रहाणार नाहीये. लवकरच स्प्रिंग येइल. तेव्हा २०१४ च्या बागकामासाठी नवा धागा. तुमचे गार्डन प्लॅन्स, रोपं- बियाणे यासाठीचे खात्रीचे सोर्सेस, यावर्षी बागेत काही नवीन प्रयोग करुन बघणार असाल तर त्याबद्दल इथे जरूर लिहा. बागकामाची आवड असलेल्या सर्व नव्या-जुन्या मायबोलीकरांचे धाग्यावर स्वागत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! धागा आला पण. नव्या बागकाम सीझनची सुरूवात आमच्या स्प्रिंगपर्यंत धीर न धरवलेल्या रातराणीने Happy

RR_0.JPG

अरे वा आला का बागकामाचा धागा...
सर्वांच्या बागांसाठी शुभेच्छा.. भरपूर फोटो टाका.. हा धागा वाचून आणि फोटो पाहून अगदी छान, शांत वाटतं.. Happy

मोड ऑन..
लावा बागा .. करा चैन.. खा काकडीची कोशिंबीर खा.. घोसावळयाची भाजी खा !!!
मोड ऑफ.. Proud

तायांनो, अंगणभर ८-१० इंच बर्फ आहे . मेल बॉक्सात येऊन पडलेले ब्रेक्स अन पार्क सीड्स चे कॅटलॉग आणायला सुद्धा बर्फ तुडवत जायला लागतंय. गार्डनिंग बाफ कसला ***** काढताय आं ? Wink

स्वाती....धन्यवाद!
सध्या लेकीकडे आहे. मुव्हिंगच्या गड्बडीत सुद्धा राहिलेलं मिरचीचं झाड.
त्याला आता नाजुक फुलं आली आहेत. आता मिरच्या येतील.

मेधा.....:स्मितः इथेही तीच अवस्था आहे.
सिंडी....रातराणी मस्त!
मुलींनो मी देशातून तुळ्स मंजिर्‍या आण्ल्या आहेत. कधी लावाव्यात कुंडीत?

रातराणी अगदी सुरेख आहे.
आमच्याकडे यंदा दुष्काळ. त्यामुळे बागकाम कितपत होईल कोण जाणे.

मेधा, इथे देखील तिच परीस्थिती आहे. काल कंटाळून शेवटी टीपी रोल्सचे पॉट्स केले. जरा मूड छान झाला म्हणून धागा उघडला.
मानुषी, मिरचेचे झाड छान दिसतेय. तुम्ही कुठल्या झोनमधे? मी ५बी मधे आहे. साधारण एप्रिल एंडला घरात बी लावते तुळशीचे. बाहेर कुंडीत लावताना मे एंड पर्यंत थांबते.

ह्यावेळेस मी पहिल्यांदाच प्रयत्न करणार आहे, इतके दिवस/वर्षे मुले लहान असल्याने प्रयत्न केला नाही. मला फुलझाडे लावायची आहे, कोणती आणि केव्हा लावावी? मी शिकागोमध्ये आहे.

नीट वाढते. या आधी जे रोप होतं ते तर हिवाळा आहे हे विसरून पार सीलिंगपर्यंत गेलेलं. मी त्याची जरा जास्तच छाटणी केली, बिचार्‍याला सहन झाली नाही. मेलंच ते. सध्या आहे ते बाईंनी दिलेलं. त्यांनी दिल्यापासून घरातच आहे. दिवसातले ३-४ तास प्रकाश असतो अशा ठिकाणी आहे. आमच्या खिडक्यांना बहुतेक युव्ही प्रोटेक्शन नाही त्यामुळे यंदा झाडं हिवाळ्यात पण वाढताएत नीट.

Edited: धागा आहे अलरेडी मी सजेस्ट केलेला.
मी पण सीड्स आणल्याहेत. बघू आज कदाचीत सीडिंग्ज स्टार्ट करेन.

मला दोन्ही रोपं एका सहृदय मायबोलीकरणीनं दिलीत. आधीचं तिने अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. सध्या आहे ते इंडियन ग्रॉसरीत घेतलं बहुतेक तरी.

सांगा हो मायबोलीकरीणबाई.

इश्श! Proud
रातराणी दोन वेळा अ‍ॅमेझॉनवरून मागवली होती. नाइट ब्लूमिंग जॅस्मिन म्हणून मिळते.
गेल्या वर्षी प्रथमच सब्झी मंडीत मोगरा आणि तुळस यांच्याबरोबर समरमधे विकायला आली होती.

>>मला फुलझाडे लावायची आहे, कोणती आणि केव्हा लावावी? मी शिकागोमध्ये आहे.>>

सुप्रिता, कोणती फुलझाडे लावायची हे ठरवण्याआधी पुढील गोष्टी विचारात घ्या.
१. फुलझाडे लावणार आहात तिथली जमीन कशी आहे?
२.सूर्यप्रकाश किती मिळतो?
३. तुम्हाला अ‍ॅन्युअल्स लावायची आहेत की पेरेनिअल्स की दोन्ही?
४. बेड करणार आहात की बॉर्डर?
५. तुमचा हार्डीनेस झोन - पेरेनिअल्ससाठी. - बहूतेक ५ आहे. पण झीपकोड टाकून ५अ की ५ब ते बघा.

तुम्ही दिलेल्या माहितीनुसार फुलझाडे सुचवता येतील. किंवा http://www.bestplants.org/query_simple.htm या दुव्यावर माहिती घालून तुम्ही स्वतःही फुलझाडे शोधू शकाल.

माती,सूर्यप्रकाश आणि पाण्याची गरज साधारणतः सारखी असलेली झाडे एकत्र लावावीत. अर्ली स्प्रिंग ते लेट फॉल कुठल्याना कुठल्या झाडांना फुलं असतील या हिशोबाने फुलझाडे निवडावीत. जिथे फुलझाडे लावणार आहात तिथली बॅकग्राउंड आणि तुमची आवड लक्षात घेऊन फुलांची रंगसंगती ठरवा. तसेच पानांचा आकार, रंग, झाड मोठे झाल्यावर किती उंच होते वगैरे बाबींचाही विचार करा. सुरुवातीला अ‍ॅन्युअल्स आणि विचारपूर्वक निवडलेली थोडी पेरेनिअल्स लावा. मग दरवर्षी थोड्या पेरेनिअल्सची भर घाला. शक्यतो तुमच्या भागात नेटिव असलेली झाडे लावा. तुम्ही नव्याने बाग करणार आहात तेव्हा सुरुवातीला नीट प्लॅनिंग केलेत तर कमी कष्टात हळू हळू छान बाग तयार होईल. मी इथे नवीन होते तेव्हा या गोष्टी विचारात घेतल्या नव्हत्या. त्यामुळे झालेल्या चुका नंतर दुरुस्त कराव्या लागल्या. उगाचच श्रम आणि पैसे वाया गेले. तुमच्या बाबतीत असे होऊ नये म्हणून मुद्दाम लिहिले. तुम्हाला काही प्रश्न असतील तर इथे जरूर विचारा.

मानुषी, मिरचीचे रोप तुम्ही कसे लावलेत? आपल्या स्वयंपाकाच्या मिरच्यांच्या बिया वापरल्या का काही वेगळे? आणि कधी लावलेले चांगले हे रोप? म्हणजे कोणत्या महिन्यात? अजुन एक शेवटचा प्रश्न, हे रोप कुंडीत नीट येईल का?

मानुषींच्या लेकीनं मुव्ह केलं असं त्यांनी लिहिलं आहे. वर जो फोटो दिला आहे तो घराच्या आतल्या बाजूचा दिसतोय. त्यावरून असं म्हणता येइल की कुंडीत लावलेली मिरचीची रोपं नीट येत असणार.

स्वयंपाकात वापरतो त्या मिरच्या आणताना जरा लालसर बघून आणायच्या. फ्रिजबाहेर ठेवल्या तर पिकतात मग वाळतात. अशा वाळवलेल्या मिरच्यांच्या बिया किंवा सुक्या मिरच्या आणून त्यांच्या बिया पेरल्या असता चांगली रोपं उतरतात, त्यांना फळं धरतात असा माझा अनुभव आहे.

मराठी कुडी
सिंड्रेला म्हण्ते तसं़ हे झाड कुंडीतच आहे. पण तिने होम डिपोमधून रोपच आणलं होतं.
एकदा त्याला खूप छान मिरच्या येऊन गेल्या आहेत.
पण सुक्या मिरच्यांच्या बीया रोपल्या तरी छान रोप येतात.

ऑ़क्टोबर मध्ये ट्युलिपचे कंद आणले होते पण लावायचे राहून गेले. आता लावले तर येतील का? नाहीतर काय करावे त्याचे?

ज्ञाती, ट्युलिप्सचे मऊ पडले असतील तर टाकून दे. ट्युलीप्सना विंटर चील हवी. तू लावून बघ. कदाचित फुलतील.

ऑक्टोबरमधे मैत्रीणीने शिकवल्या प्रमाणे रोझमेरीची कटिंग घेऊन ५ रोपं तयार केली होती. त्यातली ४ जगली.

मी या वर्षी पहिल्यांदाच विंटर सोइंगचा प्रयत्न करणार आहे. इथे कुणी करते का?
http://www.agardenforthehouse.com/category/gardening/winter-sowing/ वाचून मी छोटासा प्रयत्न करायचे ठरवले.

रच्याकने माझ्या अबोलीला फुलं आली. Happy

स्वाती छान आहे साइट.
अबोलीचा फोटो टाक ना.
अव्हाकाडो तिकडे बीया नेउन रोपल्या तर येतील का ?
कारण हे तसं ट्रॉपिकल फल आहे ना?
मला ते इतकं आवड्तं......कोकणात गावी अव्हाकडो लागवड करण्याचं विचित्र स्वप्न आहे.....(?!)
बीया साठवतीये.

Avocado grows very well in Kerala and Karnataka. You can find a starter plant in those areas easily.
It is my dream to have rosemary thrive in my home , I have a better chance of winning an oscar I think :(.

I have seen rosemary grown like hedge in San Fran area. I am nearly willing to move there for that one reason - and Mayer Lemons too..

For now the only plans I am making are for the flower show next month...

Pages