बागकाम - अमेरीका२०१४

Submitted by स्वाती२ on 27 January, 2014 - 08:42

मंडळी , बघता बघता जानेवारीचा शेवट आला. या वर्षीचा हिवाळाही अगदी हाडे गोठवणारा. मात्र बाहेरचे उणे -१० तापमान आणि स्नो काही कायम रहाणार नाहीये. लवकरच स्प्रिंग येइल. तेव्हा २०१४ च्या बागकामासाठी नवा धागा. तुमचे गार्डन प्लॅन्स, रोपं- बियाणे यासाठीचे खात्रीचे सोर्सेस, यावर्षी बागेत काही नवीन प्रयोग करुन बघणार असाल तर त्याबद्दल इथे जरूर लिहा. बागकामाची आवड असलेल्या सर्व नव्या-जुन्या मायबोलीकरांचे धाग्यावर स्वागत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुगोल, धन्यवाद .. पण मरणासन्न नाही म्हणता येणार इतक्यात .. पण पुढे काही होतंच नाहीये .. जैसे थे ..

तिकडून एक शेड लव्हर्स टाईप झुडुपं आणि लीलीज् ऑफ द व्हॅली ही आणले होते .. लीलीज् पैकी एकाला कोंब फुटला पण आमच्यापैकी कोणाच्या केअरलेसपणामुळे किंवा मग उसकी खुदकी मौत मर गया .. Sad शेड लव्हर्स ना छान कोंब फुटले पण सगळे जळून गेल्यासारखे दिसायला लागले आणि एकेक करून भगवान को प्यारे हो गये .. आम्ही काही एक्स्पर्ट गार्डनर्स नाही नी आमच्याकडे ग्रीन थम्बही नसेल पण आता कॉस्टको मधून काही नाही आणणार ह्यापुढे ..

सशल, यात कॉस्टकोचा काही दोष नाही. काही झाडांना जागा बदलल्याचा ट्रॉमा सहन होत नाही. म्हणूनच कॉस्टको, होम डेपो वगैरे वर्षभरात जर झाड मेलं ( कुठल्याही कारणाने का होईना) तर पूर्ण पैसे परत देतात.
अ‍ॅक्चूअली या कारणासाठीच मी या दोन दुकानां मधून झाडं आणते.

ओह् पण परत तरी काय करणार? लीलीज् आणि शेड लव्हर्स दोन्हींचे मातीच्या ढेकळासदृश काहितरी होतं जे आम्ही प्लँट केलं ..

आणि पैशाचं सध्या काही वाटणार नाही (नविन घराचा युफोरीया म्हणाअ हवं तर) पण दु:ख मात्र झालं .. :|

अदिती, रोज नको पाणी घालूस. आठवड्यातून एकदा किंवा खूप उन्हाळा असेल तर दोनदा घाल पाणी. साधारण एक ते दिड इंच. मी साधारण अर्धा गॅलन पाणी एका वेळी एका झाडाला घालते. सकाळी लवकर घालायचे. मल्च घातल्यास जमीनीत ओलावा राहातो. आम्ही कम्युनिटी गार्डनमधे स्ट्रॉ पसरतो.

शुगोल! आम्ही मागल्या वर्शि थुजा ग्रिन लावलेले त्यातले ३ वाळलेत.. पावती आणि झाड दाखवल तर घेतिल का? अर्थात झाड काढुन न्यायलाच खर्च येइलच..

ओह...मेलेलं झाड तर मागेच कधीतरी फेकलं पण पावती तर आणल्या आणल्याच फेकली होती.. उप्स.

आभार शुगोल.

आम्ही तिकडून आणून लावल्या पण पहिल्या कळ्या उमलल्यानंतर आता परिस्थिती चिंताजनक आहे . >> सशल त्या वरच्या फोटोतल्या lily ला asiatic lily म्हणतात. त्यांना दोनदाच फुले येतात एका मोसमामधे बरेचदा. day lily असतील तर वरचेवर येउ शकतात cultivar कुठले आहे त्यावर अवलंबून. asiatic lily मधे काही cultivars आहेत जे थोडे उशिरा फुलतात (बहुतेक ६-८ feet वाढणारे). तुझ्याकडे नक्की कुठले आहेत ? एक मुख्य देठ नि त्याला छोटि पाने वरपासून खालपर्यंत असलेले कि सगळी पाने जमिनीपासून उगवलेली ? एखादा nursery कॅटलॉग बघितलास कि लक्षात येईल बघ सहज.

lily beetles वर लक्ष ठेव. पाने खाल्लेली दिसली कि समजेलच.

प्राजक्ता तुझ्याकडे वरून टाकायला फेन्स करणे फारच सोपे आहे. मधल्या भागात २-३ कुंपणापेक्षा बर्‍यापैकी उंच pvc pipes लाव नि त्यावरून जाळ्यासारखे जे chicken fence असते ते वरून टाक. तुला साईझ बघावी लागेल कि सर्व बाजूंनी कव्हर झाले पाहिजे. माझा शेजारी असेच करतो, त्याने लावले यंदा कि फोटो काढून टाकेन.

>> एक मुख्य देठ नि त्याला छोटि पाने वरपासून खालपर्यंत असलेले

माझ्याकडची बहुदा ही अशीच आहेत पणअत्याचं खोड्/देठ एखा दोन इंच आणि पानंही ३/३.५ इंच एव्हढीच आहेत लांबीला .. बल्ब्ज् च लावले होते त्यानंतर एव्हढी प्रगती झाली पण पहिल्यांदा प्रत्येकी १-२ फुलं लागल्यावर आता पुढे काहीच होत नाही .. बरीच लावली आहेत ज्यापैकी एक आता थोडं पिवळट दिसायला लागलंय आणि एकाच्या पानांचा फुलोरा लेकाने बॉल मारून तोडला तेव्हापासून त्याला नवीन पानं फुटलेली नाहीत ..

बीटल्स् नसावेत अजून तरी .. (आमच्याकडची सगळी डेव्हलपमेन्ट डोंगर पोखरून केलेली आहे .. सध्या प्रचंड प्रमाणात मुंग्या आणि एक सरडा (लिझर्ड) एव्हढेच जीव असावेत वस्तीला ..

हे पहा ..

Lily1.jpgLily2.jpg

हे Asiatic lily सारखे वाटतात ग. एकच वर्‍श झाले ना ? पुढच्या वर्षी परत येतील तेंव्हा bulb food देऊन बघ. ३-४ फूट तरी सहज वाढतात. फुले येऊन गेली असतील तर सध्या काही करू नकोस. बल्ब ना इंधन गोळा करू दे. हा माझा आवडता रिसोर्स आहे

http://homeguides.sfgate.com/ways-care-asiatic-lily-44856.html

सशल, पुढल्यावर्षी येतील फुलं. पान पिवळी पडली तरी काळजी करु नको. पुढल्या स्प्रिंगमधे नविन पानं येतील. लीलीचे बल्ब भराभर मल्टीप्लाय होतात.

अ‍ॅमेझॉनवरून गवती चहाच्या बिया मागवल्या होत्या. थोडे थोडे कोंब उगवलेले दिसत आहेत.

रच्याकने, माती कुठल्या कंपनीची चांगली? मी मिरॅकल ग्रो टॉप सॉइल आणि स्कॉट पॉटिंग सॉइल मिक्स करून लावलीत झाडं यंदा.

आजच्या वादळात झाड झोपणार अस दिसतय.. काकडिच रोप फार छान झाल होत.. टोंमॅटो ला एक दोन बारिक ट्माटेही आलेले..वादळ पावसापासुन वाचवायला काही सेव्हिन्ग टिप आहेत ़का?

मी गवार, पालक, भेंडी, वांगी आणि काही भाज्यांची रोपं लावलीयेत, सगळ्या रोपांना जवळपास ६-७ तास ऊन मिळतं मी पाणीही रोज किंवा एका दिवसाआड घालते पण सगळीच रोपं नीट वाढत नाहीयेत.
काउ मन्युअर खत म्हणून घातलेलं पण अजून काही खत घालायला हवं कां?

गवारीला तर अगदीच ४-५ इंच असतानाच फुले आली आहेत.

आंबट चुक्यालाही लगेच फुलं आली.

चाफ्याचा घोस कसा कुणास ठावूक एकदम तुटून पडलेला दिसला आज Sad Sad Sad हा सगळा सीझन भरपूर फुलं आली. अजून सुद्धा कळ्या होत्याच. खारोट्यांचे उद्योग असावेत का?

मागे (केव्हातरी) म्हटल्याप्रमाणे हा संपुर्ण पिंजरा केलेल्या बागेचा फोटो. हा त्यांच्या बॅकयार्डातला आहे. बेटर लेट दॅन् नेव्हर. होपफुली पुढल्या वेळेस कामाला येईल. Happy

CagedGarden.jpg

मेथि,काकडी,टोमॅटो

मेथिचे वाफे लावले होते, त्याला चिकन फेन्स ही होत तर खालुन बारिक बिळ करुन बारिक काहितरी आत घुसुन काही पान खात होत्,शिवाय चिमण्याही पान खायच्या त्यावर एक सोपा उपाय लागु पडला, डॉलर स्टोअर मधुन काही बलुन पॉप् करुन आजबाजुला बान्धले..आणी ते वर्क झाल, शिवाय जो-अ‍ॅन मधे ५ $ ला एक बुजगावण मिळाल तेही ईफेक्टिव्ह ठरल..

kakadi1.jpgmethi1.jpgbhaji1.jpg

मेथि मधे डोकोवतोय तो वॉटरमेलन चा वेल आहे,त्याला आता आता बारिक फळ धरलियत.

धन्यवाद प्रिति! वॉटरमेलन येतायत पण तगत नाही पुढच आल की आधिच गळुन पडतय, बहुधा वेदर मुळे होतय का? आताशा रात्रि टेम्परेचर डाउन होतय.. एक तगुन जरा क्लेमेन्टाइन एवढ झालय..

Pages