बागकाम - अमेरीका२०१४

Submitted by स्वाती२ on 27 January, 2014 - 08:42

मंडळी , बघता बघता जानेवारीचा शेवट आला. या वर्षीचा हिवाळाही अगदी हाडे गोठवणारा. मात्र बाहेरचे उणे -१० तापमान आणि स्नो काही कायम रहाणार नाहीये. लवकरच स्प्रिंग येइल. तेव्हा २०१४ च्या बागकामासाठी नवा धागा. तुमचे गार्डन प्लॅन्स, रोपं- बियाणे यासाठीचे खात्रीचे सोर्सेस, यावर्षी बागेत काही नवीन प्रयोग करुन बघणार असाल तर त्याबद्दल इथे जरूर लिहा. बागकामाची आवड असलेल्या सर्व नव्या-जुन्या मायबोलीकरांचे धाग्यावर स्वागत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदीच बीट आणि गाजर लावलंय. जगलेत सुद्धा Happy

पीक काढायचं कधी हे कसं ठरवायचं याबद्दल काही टिपा आहेत का? आताशा बीटाचा भाग जमीनीलगत दिसू लागला आहे. पानं पण वापरू शकतो का?

गवती चहा मी पण लावला आहे....मस्त लागलाय कुंडीत.

गाजर, ...बीट सगळं गेलं एक महीना देशात गेले होते त्यामूळे Sad

मीपू ....टोमॅटो रोपं आहेत का? मला चालतील ... पुढच्या बागकामासाठी शेतकरी तयार आहे.

वेका, बीट, गाजर तयार झालं कि जमीनीवर थोड वर आलेलं दिसायला लागेल.
बीटाच्या कोवळ्या पानांची पालेभाजी चांगली लागते.
सामी, हो आहेत कि, कधी देऊ? घरी कधीही चक्कर मारा.

मी कंपोस्ट बीन मध्ये कंपोस्ट बनवलंय... पण त्यात काही गोगलगाई आणि काळ्या मोठ्या मुंग्या दिसताय्त.
कंपोस्टसाठी गोगलगायी चांगल्या असतात असं ऑनलाईन वाचलंय पण मुंग्या?? आणि कंपोस्ट बीन साधारण किती दिवसांनी रिकामी करावी?

elevated square foot gardening भलतचं आहे प्रकरण. माझ्याकडे ऑलरेडी व्हेजिटेबल बेड्स आहेत. chicken fence म्हणायचय का तुला? ते उपयोगी वाटतय ......

elevated square foot gardening भलतचं आहे प्रकरण. माझ्याकडे ऑलरेडी व्हेजिटेबल बेड्स आहेत. chicken fence म्हणायचय का तुला? ते उपयोगी वाटतय ...... >> तू दोन्ही करू शकतेस. मी काही बेडस ना . chicken fence लावले पण तिथेही नंतर वरचे भाग कव्हर करावे लागले. काही डेकवर आणायच्या होत्या त्या elevated bed करून लावले. तिथे नंतर चिपमन्क्सचा त्रास होउ लागला म्हणून तसेच फेन्सींग करावे लागले.

हरिणांसाठी ते पत्रे लावतात ना? (नाव विसरले.)
त्यांच्या टापा त्यावर पडल्या की जो आवाज होतो त्याने ती घाबरून पळतात - आत येत नाहीत.
एका स्नेह्यांकडे पाहिलं होतं हे प्रकरण.

यंदा आमच्या चाफ्याला घोसानं फुलं आलीत. एकाच झाडाला आलीत मात्र. गेल्या वर्षी मॉस रोझ (चिनी गुलाब) लावला होता. तो जमेल तसा आणि जमेल तिथे उगवून आला आहे. मी उगीच यंदा नवी रोपं आणली. पुदिना पण फुटला पुन्हा. पेटुनिया पण फुटतो का ? तो लावला होता त्या कुंडीत काही रोपं उगवलीत पण ती नक्की पेटुनियाची आहेत की नाही कल्पना नाही.

हायला आमचा का चाफा बोलेना?!
कण्हेरीला कळे आलेत मात्र प्रत्येक दांडोर्‍याला. आता पाखरांनी खाल्ल्या नाहीत म्हणजे मिळवली. गुलाब तीनचार येऊन गेलेसुद्धा. मोगर्‍याला आणि मदनबाणाला पानोपानी कळ्या आल्यात. आजउद्यात फुलतील असं वाटतंय.

पेटुनिया पण फुटतो का ? तो लावला होता त्या कुंडीत काही रोपं उगवलीत पण ती नक्की पेटुनियाची आहेत की नाही कल्पना नाही. >> बिया पडल्या असतील तर फुटतो. माझ्याकडे एका hanging कुंडीमधे आपोआप येतोय ३-४ वर्षे नियमितपणे. मी त्यातली सॉईल फारशी बदलत नाही फक्त काँपोस्ट घालत राहतो.

अदिती,
काकडीला पाणी खूप कमी किंवा जास्त झाले तर असे होते तसेच खूप उन्हाळा असेल तरी काकडी कडू होते.

वेका, मस्त!

chicken fence लावले पण तिथेही नंतर वरचे भाग कव्हर करावे लागले. >> कसे केलेत कव्हर? आम्ही पण य.न्दा बरच काही लावलय! टोमॅटो,मिरचि,काकडी,मेथी,वान्गी,वॉटर-मेलन..हातात काय पडेल ते कळेलच!

chicken fence लावले पण तिथेही नंतर वरचे भाग कव्हर करावे लागले. >> कसे केलेत कव्हर? >> चिकन फेन्सनेच. एका बाजून उघडा असलेला cube बनवला नि उलट करून ठेवला. थोडी adjustment करावी लागली नि झिप टायने एक बाजू बांधून घेतली. त्या ऐवजी ग्रीन टाय पण वापरता येतील म्हणजे सोडायला सोपे पडतात.

आभार्स लोक्स Happy

प्राजक्ता माझ्या चालण्याच्या रस्त्यावर एका कुटुंबाने त्यांच्या बॅकयार्डला त्या प्रकारचं फेन्स्ड रेस्ड बेड केलंय. जर फोटो काढायला जमला तर आणेन. मग तुम्ही तसं ट्राय करून पहा.

फ्रेश शेंगा वेका, मस्त.
आमच्या शेजारच्याने मस्त मोठा व्हेजी पॅच करुन, तारेचे भक्कम कुंपण केलय.
लिलीला खुप कळ्या आल्यात.
हे एक त्यापैकी झाड
image(1).jpeg

स्वाती२, वाटलच पाण्याचे प्रमाण हेच कारण असणार. मी जवळ जवळ रोज पाणी घालते पण किती घालायला पाहीजे?

image_13.jpg
थॅन्क्स वेका, असामी! सध्या चिकन फेन्स च छोटा रेज बेड ़केलाय, अगदी च प्राथमिक / प्रायोगिक आहे.( ७*३ )
साईडला मेथी आणी कोथि.न्बिर आहे, पोरा.नी अति उत्साहाने आलेले अ.न्कुरच उपटायचा पराक्रम ़़केला म्हणुन काठि कु.न्पण टाकलय.
वेका! जमल तर फोटो नक्की टाक!

प्रीती ह्या लिलीज् कॉस्टको तून आणल्या का? आम्ही तिकडून आणून लावल्या पण पहिल्या कळ्या उमलल्यानंतर आता परिस्थिती चिंताजनक आहे .. कॉस्टको चा अनुभव चांगला आला नाही .. झर्बेरा त्यातल्यात्यात बर्‍यापैकी तग धरून आहेत आणि फुलत आहेत ..

वेका, शेंगा मस्त आहेत ..

सशल मी मागच्या वर्षी लोजमधुन आणल्या होत्या. फॉल मधे वरचं सगळं क्लिन करुन मल्च घाउन ठेवल्या. स्प्रिंगपासुन मस्त वाढत आहेत.

Pages