बागकाम - अमेरीका२०१४

Submitted by स्वाती२ on 27 January, 2014 - 08:42

मंडळी , बघता बघता जानेवारीचा शेवट आला. या वर्षीचा हिवाळाही अगदी हाडे गोठवणारा. मात्र बाहेरचे उणे -१० तापमान आणि स्नो काही कायम रहाणार नाहीये. लवकरच स्प्रिंग येइल. तेव्हा २०१४ च्या बागकामासाठी नवा धागा. तुमचे गार्डन प्लॅन्स, रोपं- बियाणे यासाठीचे खात्रीचे सोर्सेस, यावर्षी बागेत काही नवीन प्रयोग करुन बघणार असाल तर त्याबद्दल इथे जरूर लिहा. बागकामाची आवड असलेल्या सर्व नव्या-जुन्या मायबोलीकरांचे धाग्यावर स्वागत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेथी किती सुंदर आली आहे!
माझ्या काकड्या नेहमी कडु निघतात, मी नाद सोडलाय. माझ्याकडे टोमॅटो/ मिरची आली आहेत भरपुर.

धन्यवाद सायो,अदिति! आमच्या ही फार मोठ्या झाल्या की कडु निघतायत, जरा मध्यम झाल्या की काढल्यावर छान लागल्या चविला, टोमॅटो ला खत घातल्यावर २ आठवड्याने घोसाने लागायला लागले.
मेथि चा हा दुसरा लॉट आहे.

काकडी फार डॉमिनेटीन्ग आणी पसरणार प्ल्न्ट आहे, न.न्तर नन्तर त्याने टोमॅटो वर आक्रम्णच केल ..त्याने २ एक झाड वाढलीच नाही, काक्डी ला एकटच लावायला पाहिजे.

(तरी हे सगळ म्हणजे चार आण्याची कोबडी आणी बारा आण्याचा मसाला अस झाल. हौस अन दुसर काय!)

मी नेट्फ्लिक्सवर एक डॉक्युमेंटरी बघत होते त्यात सांगत होते की आपण हे फुलझाडं, भाज्या आणि फळांची झाडे लावतो त्याने पॉलिनेशन करणार्‍या किटकांना जीवनदानच मिळते, नाहीतर सगळी किटकं हळूहळू संपून जातील.

मलाही आधी हे सगळं चार आण्याची कोबडी आणी बारा आण्याचा मसाला असंच वाटायचं पण आता मस्त वाटतं, पुढील वर्षी जास्त झाडं लावेन.

Pages