स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजसी, मी ultralite चा wet grinder वापरला आहे. एकदम हलक्या इडल्या तसेच वडे करायला wet grinder best! त्यात मी इडली आणि वड्याच्या व्यतिरिक्त मुगाची डाळ(बिनसालीची) वाटली आहे. जरा मोठ्या साईझचं भांडं घेतलं की एका वेळी जास्त क्वांटीटी वाटता येते. एकदा सुरु केलं आणि झाकण लावलेलं असलं की आपल्याला इतर काम करता येतात. पीठ एकदम फाईन वाटलं जातं. फर्मेंट झालं की भांड्यासकट फ्रीज करता येतं (जर फ्रीज मोठा असेल आणि काचेवर भांड ठेवत नसाल तर). butterfly चाही चांगला आहे असं ऐकलं आहे.
जास्त वापराने स्टार्ट करावं लागणारं बटन कधी कधी काम करेनासं होतं अश्या वेळी चालु करून भांड manually फिरवा असले प्रकार करावे लागतात सुरु होईतोवर. अश्यासाठी विकत घेतांनाच वॉरंटी कार्ड, लागणारी वीज ( मी भारतातून अमेरिकेला स्टेप डाऊन करून नेला होता), तसेच सर्विसिंग इन्फो. जर प्रॉब्लेम आलातर ई. गोष्टी खातरजमा करून घेणे.

http://salestores.com/cuisinartgr1.html ह्या लिंक मधे आहेत तशा ग्रिल प्लेट्स आहेत का अल्पना? मी ह्यावर चिकन, भाज्या ग्रिल करते. चांगला वापर होतो इनडोर ग्रिलिंग साठी.

हो हो, प्रॅडी अश्याच ग्रील प्लेट्स आहेत. थँक्स.

मावेच्या ग्रील मोडमध्ये ग्रील करायला खूपच वेळ लागतो. दोघांपुरतंच करायचं असेल तर ठिक, पण एखादी व्यक्ती जास्त असेल तर खेळत बसण्यापेक्षा ग्रील न केलेलं बरं असं वाटतं. यात करून बघते आता. किमान एकावेळी यात आणि मावेत असं दोन्ही ठिकाणी करून वेळ तरी वाचवता येईल. Happy

५०० डॉलर म्हणजे फार वाटतात. मला लेकाने दिलाय पानीनी मेकर. $१० चे कुपन वापरुन $१९ ला पडला. चांगला आहे.

घरामधे इडली, डोसा, अडै, गुंडपंगला वगैरे खाण्याचे प्रमाण आठवड्यातून एक दोनदा वगैरे असलं तरी वेट ग्राईन्डर घेणे उत्तम.>>
नंदिनी, धन्यवाद ही महत्त्वाची उपयुक्त माहिती.

आम्ही साधारण दहा दिवसांत एकदा दोसे / उत्तपम खातो. वाटणाचा वापर माझ्या स्वयंपाकात अजिबात नाही ते क्वचित असतो. किचन ओटा छोटा असणार आहे. त्यात मावे, ओटीजी, केटल, टोस्टर/ सँड्विच मेकर, कॉफी मशिन, हँड्ब्लेंडर इ. गोष्टी हाताशी ठेवाव्या लागतात (रोज वापर असल्याने, ओटीजी- आठवड्यात एकदा). वेट ग्राईन्डरला जागा असेल का? आणि मला किती वापर होईल ह्यावरच बहुधा खरेदीचा निर्ण्य होईल.

मृण, असा आहे:
http://www.amazon.com/Ultra-Dura-Grinder-Kneader-110-volt/dp/B00AFR0ILE/...
त्यात आटानीडर आहे हे नव्याने कळलं. ह्या लिंकमध्ये असलेलं भांड सहज detach करता येतं आणि फ्रीजमध्ये ठेवता येतं. पण खूप जड असतं. घेतल्यास फोटोतली साईझ घ्यावी आणि झाकणवालंच घ्यावं. बिना झाकणीने घरभर डाळ होते. जमल्यास समोर trial करून मगच घ्यावं. (निदान भारताततरी करून दाखवतात)

मी कॉस्टको मधून वर्षापुर्वी घेतलेला तोच पणिनि मेकर. ६०/६५ डॉला.
इथे अ‍ॅमेझॉनवर आहे. http://www.amazon.com/Cuisinart-Gourmet-Griddle-Griddler-GRID-8NPC/dp/B0...

भरपुर वापरते. केसडिया, सॅडविचेस ,चपातीचा रोल मस्त होतात. भाज्या छोट्या प्रमाणावर मस्त ग्रील होतात. झुकीनी वगैरे तर मस्तच होते ग्रील.

राजसी, वेट ग्राईंडर जागा बर्‍यापैकी घेतो. तुम्ही आठवड्यातून ४/५ वेळा इडली डोसे करत असाल तर घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्हाला अगदीच स्पेसिफिक माहिती हवी असेल तर इथल्या सर्व साउथ इंडिअन मैत्रिणींकडे आहे. विचारून सांगते.

थँक्स चिन्नू. दोन्ही वेट ग्राइंडर्स साधारण सारखेच वाटतात. घ्यावासा वाटतोय.

>>केसडिया, सॅडविचेस ,चपातीचा रोल मस्त होतात. भाज्या छोट्या प्रमाणावर मस्त ग्रील होतात. झुकीनी वगैरे तर मस्तच होते ग्रील.

अगदी. पनिनी मेकर खूप उपयोगी आहे. एकाच वेळी भाज्या, सॉसेजेस, पॅट्या ग्रिल केल्या की बर्गर्स, हॉट डॉग्ज, होगी सँडविचेस करता येतात. सॉटे केलेल्या भाज्या, चीज कोल्ड्कट वापरून नानमधे भरून पनिनीमेकरात घातले की पोटभरीचा पदार्थ होतो. मुरवलेले मासे, चिकनचे तुकडे छान ग्रिल होतात. पैसा वसूल उपकरण आहे!

ओ ताई तो उदाहरण म्हणून दिलाय. माझ्याकडे पण कॉस्टको मधे मागच्या वर्षी डील वर घेतलेला ६०-७० $ वाला जॉर्ज फोरमन आहे.

अरेच्चा. मी पानिनी मेकरचा पैसा वसूल वापर करत नाही असं लक्षात आलं इथल्या सीमा आणि मृण्मयीच्या पोस्टी वाचून. माझ्या कडचा पण $३० च्या आतलाच आहे. चिकन ग्रिल करायला किती वेळ लागतो?
त्याची प्लेट काढता येते की नाही माहित नाही मात्र. काढता येत नसेल तर साफ करणं जरासं जिकिरीचं आहे काय चिकन/फिश ग्रिल केलं तर?

माझ्याकडे कुझिनआर्टचं काँपॅक्ट साइझ्चं काँटॅक्ट/ओपन पनिनीमेकर- ग्रिल आहे. त्याच्या दोन्ही प्लेट्स काढून धुता येतात. तसंच, प्रेस करायचं नसेल तर दोन्ही प्लेट्स फ्लॅट करून ग्रिलिंग सरफेस वाढवता येतो.

ग्रिल केल्यावर प्लेट्स साबूच्या पाण्यात बुडवून ठेवायच्या. विकत घेताना एक प्लास्टिकचा दाते असलेला तुकडा मिळतो. तो स्वच्छ करायला वापरायचा. फार कष्ट न पडता सगळं जळकट, तेलकट नीट निघून येतं.

धन्यवाद मृ. घरी जाउन बघते प्लेट्स काढता येतात का ते. माझ्याकडे कोणता ब्रँड आहे ते पण लक्षात नाही माझ्या

मृण, असा आहे:
http://www.amazon.com/Ultra-Dura-Grinder-Kneader-110-volt/dp/B00AFR0ILE/... >>
माझ्याकडे पण असलाच आहे . आठवड्यातून दोन तरी वाटणं असतात - इडली प्रकारचे एक अन डोसा प्रकारचे एक.
. मुलं डब्यात, ब्रेफाला, डिनरला इडली डोसा अप्पे पेसरट्टू असे प्रकार आवडीने खातात त्यामुळे पूर्ण पैसे वसूल.

मी ओट्यावर ठेवत नाही. जेंव्हा वाटण असेल तेंव्हाच फक्त ओट्यावर. इतरवेळेस ओट्याखालच्या कॅबिनेटमधे ठेवते.

1700

कनीक (पीथ) भिजवायला hand mixer सारखे काही आहे का ? kitchen aid बरेच महाग वाटते..काही स्वस्त आणि मस्त आहे का ?

इथे वाचून मीही पानिनी ग्रिल घेतलेय पण अजून म्हणावा तितका वापर झाला नाहीये.
सीमा त्यात तु चपाती रोल म्हणजे कसा करते नक्की ?

मेधा वरचा ग्राइंडर साफ कसा करायचा असतो?

मला पण पानिनी ग्रिल घ्यायचा फार मोह होत असतो अधून मधून. पण एकंदरीतच सॅडविचेस कॅटेगरीतले पदार्थ फारसे आवडन नाहीत कोणाला त्यामूळे ते बारगळतंय.

वेट ग्राइंडरचे भांडे नीट निघून येते . ते सिंकमधे धुवायचे हाताने नेहमीसारखे. उडीद डाळ, मूग डाळ वाटलेली असेल तर थोडा वेळ पाणी भरुन ठेवायचं. बाकी ग्राइंडरवर काही पडलं सांडलं तर ते ओल्या फडक्याने पुसून काढायचे ..

कनीक (पीथ) भिजवायला hand mixer सारखे काही आहे का ? kitchen aid बरेच महाग वाटते..काही स्वस्त आणि मस्त आहे का ? ==> कुणाला काही कल्पना असल्यास द्यावी..

पानिनी मेकर वापरणार्‍यांनो जरा त्यात करता येणार्‍या पाकॄ. चा वेगळा धागा काढा. म्हणजे घेतल्यावर किती उपयोग होईल ते कळेल.

ash, kanik maLayla food processor pan chalto.. to swastat yeil jara..

मलाही पानिनी मेकर घ्यावा असं कधीपासून वाटतंय. पण खूप वस्तू होतात, जागा अडून बसते ह्या कारणास्तव घेत नाहीये.

Pages