स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धारा,. दहा मिनिटे अजिबात लागत नाहीत. ते दोन्ही ब्लेड कणिक मळल्यावर लगेच पाण्याखाली धुवून घे. आणि नंतर पाचेक मिन्टे भिजवून ठेव. नळाचे पाणी जोरात पडलं की सर्व कणिक व्यव्स्थित निघून येते. दुकानांमधे बेबी बॉटल क्लीनर मिळतो तो आण. त्या क्लीनरने आतपर्यंत धुता येते.

धारा.....राईस कुकर नक्की हवाच किचन मधे ..मी गेले कित्येक वर्षे शिट्टी वाला कुकर लावलेलाच नाही ....अगदी सगळेच मस्त होते .महत्वाचे म्हणजे ..थोडाच भात करायचा असेल तर राईस कुकर च्या भाड्यात खालि पाणी घालायचे आणी लहान भाड्यात तान्दुळ धुवुन त्यात ठेवायचे ...मस्त भात होतो.
त्यात भाज्या वाफवणे , डाळ शिजवणे , बटाटे उ़कडणे ई बेस्ट होते ...+ बासुन्दी पण एकदम झक्कास होते न लक्श ठेवता ...:)
मी तर किचन w/o राईस कुकर विचारच करु शकत नाही

फक्त एक महत्वाची टिप...राईस कुकर घेताना त्याचे झाकण खटका लागुन बन्द होणारे घ्यावे म्हणजेच मी जे काही म्हटले आहे ते नक्कीच होते ....

मी नियमित फूड प्रोसेसर वापरतो. पण तुम्ही म्हणताय त्या पार्टमध्ये पीठ इतके जास्त चिकटून बसण्याचा प्रश्न आता येत नाही. तुम्ही फुप्रोचा बाउल फुप्रोवर फिट करून त्यात kneading blade बसवून मगच पीठ टाकता ना? पीठ टाकायचा आधी ब्लेडवर आणि भांड्यांच्या कडांना चमच्याने थोडे तेल सोडा. तसेच पाणी फीडर ट्यूबमधून थोडे थोडे टाकायचे.
पीठ चिकटलेच तर ते सुकायच्या आधी युनिट्स पाण्यात बुडवून, पाण्याने भरून ठेवली तर पीठ लगेच सुटते.

पीठ चिकटलेच तर ते सुकायच्या आधी युनिट्स पाण्यात बुडवून, पाण्याने भरून ठेवली तर पीठ लगेच सुटते.>> अनुमोदन.

मी पण फु.प्रो. वापरलाच आणी स्वतः धुतला तर पाण्याखाली धरते ती ब्लेड्स ..स्वच्छ निघतात एकदम..
बाई असल्याने ही वेळ तशीही फार च कधीतरि येते..

एक फु. स : वेळ असेल कणीक हातानेच भिजवावी , बोटांचा वेगळा व्यायाम करावा लागत नाही.. Happy

धारा म्हणतेय ते युनिट म्हणजे ब्लेड नाहीये. ब्लेडच्या आत बसवायचं एक लांबुळकं युनीट असतं डिटॅचेबल बजाजच्या फुप्रोमध्ये. त्याच्या आतल्या बाजूला बर्‍याचदा कणिक अडकते. आणि ती आतली बाजू बरीच अरूंद आहे. माझी करंगळीपण नाही जावू शकत. त्या आतल्या दातर्‍यांमध्ये अडकलेली कणिक काढायसाठी युनिट पाण्यात भिजवल्यानंतरही मला टुथपिकनी एकदा स्वच्छ करावंच लागतं.

अल्पना २२:१० +१ अल्पना, टूथपिकची आयडिया चांगली आहे. निदान मी कणिक पुन्हा त्यात मळायला सुरूवात तरी करीन. आता फुपो = मिक्सर झालाय - कारण ती अ‍ॅटॅचमेंट स्वच्छ झालीये, असं वाटतच नाही. Sad
तरी, लोकहो प्रतिसादांबद्दल धन्यवाद. Happy

सुहास्य, छोटा राईस कूकर घेणार आहेच. तुमच्या टिपसाठी स्पेशल धन्यवाद. Happy

फक्त एक महत्वाची टिप...राईस कुकर घेताना त्याचे झाकण खटका लागुन बन्द होणारे घ्यावे म्हणजेच मी जे काही म्हटले आहे ते नक्कीच होते ....>>>>>> सुहास्य तुमचा राईस कुकर कोणत्या कंपनी/ brand चा आहे ते सांगाल का म्हणजे शक्यतो तोच खरेदी करता येईल

<धारा म्हणतेय ते युनिट म्हणजे ब्लेड नाहीये. ब्लेडच्या आत बसवायचं एक लांबुळकं युनीट असतं डिटॅचेबल बजाजच्या फुप्रोमध्ये. त्याच्या आतल्या बाजूला बर्‍याचदा कणिक अडकते. आणि ती आतली बाजू बरीच अरूंद आहे. माझी करंगळीपण नाही जावू शकत> आमच्या गुणी फुप्रोला ते नाही. डायरेक्ट फुप्रोच्या मधल्या फिरणार्‍या खांबावर सगळी ब्लेड्स बसवायची. एक नळी आहे किसणे, इ. कामांच्या वेळी वर्तुळाकार स्टील प्लेटला अडकवायला लागते.

विणकामाची सुई किंवा त्यासदृश काहीही बेस्ट या सफाईसाठी.

विणकाम करत नसल्यने विणकामाच्या सुईबद्दल लक्षात आलं नव्हतं. धन्यवाद. Happy
ती सुई अगदीच परफेक्ट होईल.

आणूनच ठेवाव्यात २-३ विणकामाच्या सुया आता घरात. मला स्वैपाकघरात फक्त केक व्यवस्थित बेक झालाय की नाही बघायला विणकामाच्या सुईचा वापर करतात हे माहित होतं. Happy

संपुर्ण फूड प्रोसेसर घेण्यापेक्षा आपल्या मिक्सर वर चालतिल अशा अटॅचमेंट मिळतात अस ऐकल आहे ..
मॅगीच अस अटॅचमेंट आहे वाटत ..
कोणाला माहिती असल्यास सांगावे..

ईलेक्ट्रिक तंदूरबद्दल कुनीतरी सांगा.>> नंदिनी , मी एका एक्स्पो मधे ईलेक्ट्रिक तंदूर बघितला होता आणि घेणार ही होते, खूप R&D केल्यावर बहुतेकांनी घेऊ नको असे सांगितले. ज्या मॅडम कडे मी मोगलाई वैगरे शिकले त्यांनी पण नको घेऊस म्हणून सांगितले.

धारा माझ्याकडे पण बजाज चा फुप्रो आहे. मी रोज त्यातचं कणीक मळते, कधीतरी मोदकाची आणि चकली भाजणीची उकड पण त्यातच. कदाचित खाली दिलेली पध्दत तुम्हाला माहिती असेल पण तरीही जरा सविस्तर लिहितेय
माझी पध्दत- नीडींग ब्लेड लावुन घ्यायची मग कणीक किंवा पीठ घालायचं झाकण लावून लो स्पीडवर फुप्रो चालु करायचा म्हणजे पीठ ब्लेडजवळ न राहता बाजुला परिघाजवळ जमा होत मग वरुन मोजुन घेतलेलं पाणी बारीक धार धरुन ओतत रहायचं, साधारण पाणी संपेपर्यंत कणीक / पीठाचा गोळा होतो, वरुन थोडं तेल घालून मिक्स झालं की फुप्रो बंद करायचा. कुठेही कणीक चिकटत नाही,
एवढं करुनही कणीक चिकटली, त्या लांबट युनीटला तर वाहत्या नळावर बोट धरून त्या युनीटच्या आतल्या भागावर पाणी स्प्रे करायच.

कुणी स्प्राउटस करायचे यंत्र/ डबा वापरलेय का?
ते कितपत उपयोगाचे ठरते? म्हणजे साध्या भांड्यात रात्रभर कडधान्य भिजत घालणे आणि मग पाणी काढून टाकून दिवसभर ठेवणे (किंवा टांगून ठेवणे) या पेक्षा सोपे पडते का?

कुणी स्प्राउटस करायचे यंत्र/ डबा वापरलेय का?<<< मी वापरते कायम. मलातरे सोयिस्कर प्रकरण वाटतं. त्यामधे टांगून वगैरे ठेवायला लागत नाही.

इथे नारळ खरवडून देण्याच्या उपकरणांची चर्चा वाचल्याचं आठवतंय पण आता सापडत नाहीये.
कुणी लिंक देईल का. जर असं कुठलं उपकरण चांगलं असलं तर मी माझी विळी काढून टाकणार आहे.

वर्षा, इलेक्ट्रिसिटीवरचे आणि हाती हॅण्डल फिरवायचे अशी दोन्ही यंत्रे आहेत बाजारात.
तुला जे बरे वाटते ते घे.
हाती फिरवायचे घेतलेस तर मेटलचे घे म्हणजे त्याला वजन असते त्याने ते लडखडत नाही.
अंजली किंवा तत्सम कंपन्यांची आहेत. मला तरी ते बरे पडते. विळीवर खरवडण्यापेक्षा.
१५०-२०० पर्यंत यायला हरकत नाही.

रात्रभर कडधान्य भिजत घालणे आणि मग पाणी काढून टाकून दिवसभर ठेवणे (किंवा टांगून ठेवणे) या पेक्षा सोपे >> यापेक्षा सोपे अजून काय असू शकेल? Happy

फूड प्रोसेसरलाही अ‍ॅटॅचमेन्ट मिळते खवणीची. पण त्याने चिकार 'राडा' होतो असे माझे मत.
माझ्याकडे अंजलीची फक्त खवणी आहे. त्याला सणसणीत धार आहे, त्यामुळे काम फार झटपट होतं.

माझ्याकडे अंजलीची फक्त खवणी आहे. त्याला सणसणीत धार आहे, त्यामुळे काम फार झटपट होतं.>>> +१/ शिवाय आमच्याकडे ते "मशिनयुक्त काम" असल्याने आऊटसोर्स करायला अडचण येत नाही. Happy

रात्रभर कडधान्य भिजत घालणे आणि मग पाणी काढून टाकून दिवसभर ठेवणे (किंवा टांगून ठेवणे) या पेक्षा सोपे >> यापेक्षा सोपे अजून काय असू शकेल?>>> +१००
मुंबई-पुण्यात तरी या पद्धतीव्यतिरिक्त कडधान्याला मोड आणण्यास विशेष काही करावे लागत नाही.

अंजलीची खवणी >> एका हातात ना.वाटी आणि दुसर्‍या हाताने हँडल गोल फिरवायचं तीच ना? ती चांगली असते का? म्हणजे वापरायला-धुवायला-ठेवायला सोपी आहे का? नारळाचा किस चांगला येतो का?
मी एकदा कधीतरी इमर्जन्सीला शेजारणीची आणली होती, त्याला ओट्यावर किंवा जमिनीवर ठेवण्यासाठी व्हॅक्युम तंत्र वापरायचे होते, जे गंडलेले होते आणि त्यामुळे फारच राडा झाला होता. तेव्हापासून त्या यंत्राविषयी जरा अढीच आहे मनात, तर सगळ्याच खवण्या तश्या असतात का?

एका हातात ना.वाटी आणि दुसर्‍या हाताने हँडल गोल फिरवायचं तीच ना? ती चांगली असते का? म्हणजे वापरायला-धुवायला-ठेवायला सोपी आहे का? <<< तीच. व्हॅक्युम् करायची एक टेक्निक आहे, ती जमली की चार पाच नारळ सलग किसून होतात.

ईलेक्ट्रिक रूब्बी असेल तर त्याला नारळ खोवायचे हे अटॅचमेन्ट आहे ते सग़ळ्यात बेस्ट असत>

यापेक्षा सोपे अजून काय असू शकेल? <<
एरवी ठिके हे. पण मी जिथे राहतेय सध्या तिथे माझ्याकडे किचन नाहीये. टांगून बिंगून ठेवणे करता येण्याची शक्यता नाहीये. पाणी बदलणे किंवा तितपतच गोष्टी करायला वेळ मिळण्याची शक्यता आहे. ते ही क्वचित.

काळा वाटाण्याच्या पोतंभर खोबर्‍याच्या वाटणात, भरपूर तेलात केलेल्या उसळीवर फरसाण घालून त्याला मिसळ म्हणले जाते.. ते रोजचे रोज खाणे आता जिभेच्या, पोटाच्या कपॅसिटीबाहेरचे आणि आत्यंतिक डिप्रेसिंग आहे.

टांगून का बरं ठेवता तुम्ही? मी कडधान्य आदल्या रात्री पाण्यात भिजत घालते. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चाळणीत काढून घेऊन उपसून घ्यायचं आणि मग त्या चाळणीच्या खाली एक ताटली आणि वरती एक ताटली त्यावर काहीतरी वजन असं ठेवून द्यायचं दिवसभर. की चांगले मोड येतात.

नंदिनी, ओके!

बिल्वा+१. टांगून कशाला ठेवायचे? आज रात्री भिजवून उद्या पाणी काढून टाकून त्याच भांड्यात ठेवले की उद्या रात्रीपर्यंत छान मोड येतात. हवं तर रूमाल/ पंचा इत्यादीमधे बांधून ठेव.

काळा वाटाणा Lol

Pages