जलरंग कार्यशाळा

Submitted by अल्पना on 22 January, 2014 - 10:14

पाटलांच्या http://www.maayboli.com/node/47295 या धाग्यावरील चर्चेमध्ये मायबोलीवर ऑनलाइन जलरंग कार्यशाळा घ्यावी असा विचार पुढे आला.

मायबोलीवर अनेक कलाकार /चित्रकार मंडळी आहेत. काही आमच्यासारखे बर्‍याच वर्षांनी परत रंगवायला सुरु करणारे आहेत तर काहीजण अगदी सुरवातीपासून शिकण्यासाठी उत्सूक आहेत. आमच्यासारख्यांना बर्‍याचदा रंगवण्यासाठी कुणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज असते. बर्‍याचवेळा एखादा क्लास /वर्कशॉप /शिबीर इ. ठिकाणी जाणं जमेलच असंही नसतं. अश्या लोकांना या कार्यशाळेच्या माध्यमातून शिकायची संधी मिळेल.

किमान ८-१० जणांचा ग्रूप तयार झाला तर इथे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेता येवू शकेल, कार्यशाळेचं नक्की स्वरुप कसं असेल हे अजून ठरलं नाही पण कार्यशाळेची अंदाजे रुपरेषा अशी असू शकेल -

"कार्यशाळेचे स्वरुप- मी काही पेंटींग टेक्निक थीअरी वर लिहीन, त्यावर पार्टीसिपन्ट्स प्रश्न विचारु शकतील आणि मी माझ्या परिने उत्तर द्यायचा प्रयत्न करीन , त्यावरुन काही एक्झर्साईज दिले जातील त्यापर्माने पेंट करुन पार्टीसिपन्ट्स इथे पोस्ट करतील ज्याच्यावर क्रिटीक लिहता येइल. तसेच काहि स्टेप बाय स्टेप डेमो, व्हीडीओ करता येतील. अ‍ॅड्मीन ना सांगुन हा क्लोज ग्रूप ठेवता येईल"

ही वरची पोस्ट पाटलांच्या रंगीबेरंगी पानावरून कॉपी केली आहे.

या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणार्‍यांनी इथे किंवा पाटलांच्या रंगीबेरंगी पानावर आपलं नाव नोंदवावं.


कार्यशाळेमध्ये सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी http://www.maayboli.com/node/47426 या ग्रूपमध्ये सामिल व्हावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तयार आहे. मला खूप दिवसांपासून जलरंगासाठी कुणाचंतरी मार्गदर्शन हवं होतं.

अल्पना - धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद . १० जण तयार झालेत म्हणजे आपण हा उपक्रम सुरू करुया. अ‍ॅड्मीन टीम च्या विपूत मी नविन ग्रूप तयार करण्याबाबत आणि या उपक्रमासाठी परवानगी मागीतली आहे. ती मीळाली तर फेब्रुवारीच्या पहील्या आठवड्यात सुरु करुया

नताशा, शैलजा

या कार्यशाळेची संकल्पना पाटलांची आहे. कार्यशाळेमध्ये इंस्ट्रक्टर पण तेच असतिल त्यामूळे सहाभागी लोकांनी किती वेळ देणं आवश्यक आहे हे तेच सांगू शकतिल. तुर्तास मी इच्छूक म्हणून तुमची नावं त्यांच्या धाग्यावर नोंदवून ठेवतेय.

पाटील , माझी पण अगदी abcd पासूनच सुरुवात आहे . अशी विद्यार्थिनी तुम्हाला चालेल का ?

माझ्या डोक्यात असलेले या कार्यशाळेचे स्ट्र्क्चर
१.जलरंगांची ओळख, कागद, ब्रशेस चे प्रकार, पेपर , ब्रशची निवड , पेपरची निवड , आपल्या वर्कशॉपसाठी लागणारे मटेरिअल , या पोस्ट नंतर आठवडाभरात शंका निरसन , लागणार्‍या कमित कमी रंग सामानाची तयारी सहभागी कलाकारानी करावी
२. दुसर्‍या आठवडयात लँद्स्केप कंपोझीशन , पर्स्पेक्टिव्ह , थोडे स्केचिंग यावर लिहीन , डेमो पोस्ट करीन. सहभागी कलाकार साधारण दोन आठवडे याव्र प्रश्न, आपले स्केचेस पोस्ट करतील आणि मी त्यावर शक्य त्या सुधारणा सांगेन, थोडे कलर थिअरीवर लिहिन.
३. इथुन जलरंगाच्या टेक्निक्स ची ओळ्ख सुरु करु - बेसिक टेक्निक्स , साधारण तिन आठवडे , ही बेसिक टेक्निक वापरुन काही पोस्ट्कार्ड्स बनउया. सगळ्यांच्या प्रगती प्रमाणे हा कालावधी अ‍ॅड्जस्ट करुया
४. या वेळी काही अ‍ॅड्व्हान्स टेक्निक्स , टेक्श्चर , शॅडोज, डेप्थ शिकुया, यावरुन चित्र करुया साधारण २ ते ३ आठवडे
५.या नंतर रेफरंस फोटोवरुन प्र्यत्येक आठवड्याला येक असे चित्र स्टेप बाय स्टेप कराय्चे शिकुया, सहभागी कलाकारांच्या प्रगति आणि प्रतिसादाप्रमाणे, वॉटरस्केप, सिटी स्केप, स्नोस्केप्स करुया
यावेळेपर्यंत सर्वांना वॉटरकल्रर्स चा बर्‍यापैकी सराव झाला असेल
त्यानंतर येणार्‍या सुचनांप्रमाणे काही नविन विषय किंवा टेक्निक्स शिकुया किंवा शक्य झाल्यास मुंबईत नॅशनल पार्क सारख्या येखाद्या जागी ऑन दी स्पॉट पेंटींग करुया.
या वर्कशॉप चा पेस बर्‍यापैकी स्लो असल्याने सहभागी होण्यास कुणाला वेळेची अड्चण होऊ नये मात्र प्रगती ही सरावाला दिलेल्या वेळेवर अवलंबून असेल.
का।ओइ सुचना असतिल तर इथे लिहा, शक्य त्या इन्क्लुड करायचा प्रयत्न करीन

मला आवडली रुपरेषा.
सध्या तरी इच्छुकांची संख्या १५-१६ दिसत आहे. अजून काही जण वाढू शकतिल. माझ्या अंदाजाप्रमाणे १५-२० जण तरी असतिल तयार.

वर दिलेल्या स्ट्रकचरप्रमाणे बर्‍यापैकी वेळेची फ्लेक्जिबिलीटी मिळेतेय त्यामूळे बहूतेक सगळ्या इच्छूकांन सहभागी व्हायला जमेल असं वाटतंय. मी तिकडच्या धाग्यावर लोकांची नावं अपडेट करेन.

हा धागा सार्वजनिक आहे ना? मला चित्रकलेत गती नाही, पण लिंक पाठवली तर चालेल का? माझी ताई माबोकरीण नाही, ती हे वाचून तिला जमत असेल तर कदाचित सदस्यत्व घेईल, पण ही लिंक ती सदस्य नसताना तिला वाचता येईल का? तिला चित्रकला आवडते.

अल्पना धाग्यासाठी धन्यवाद Happy
पाटील तुम्ही वेळात वेळ काढून हा उपक्रम राबवताय त्यासाठीम्मनापासून धन्यवाद.
काउंट मी ईन!

मी इथे वाचायला म्हणून नक्की येणार. चित्रकलेतलं काहीह जमत नाही हे ऑलरेडी सिद्ध करून झालंय. त्यामूळे
ज्ञानसंपादन करण्यासाठी माझा सहभाग.

मलापण यायचंय.नाव कुठे नोंदवायचं कळलं नाही.अल्पना,सांगू शकशील का प्लीज्?धन्यवाद..

फारच मस्तं कल्पना आहे. धन्यवाद पाटील. हा धागा काढल्याबद्दल, अल्पना, तुम्हाला देखिल धन्यवाद!

मला या ग्रूपात यायचं आहे.

मी प्रेक्षक म्हणून येणारच येणार... क्लोज्ड ग्रूपमध्ये आमच्यासारख्यांना प्रवेश मिळेल काय?

पाटील सर...
मस्त... कार्यशाळेचे स्वरुप मस्त आहे.. मी पण नाव नोन्दवलय...
ब्रश आहेत ते चालतील कि नवे आणु..? नि रंग कोणते आणु..?
तयारी सुरु करायला हवी.

मी देखिल शिकायला येणार Happy माझे नाव नोन्दवून घ्या प्लिज.

(फक्त मी माझ्या नित्याच्या गडबडीत किती अन कसा "रिझल्ट " देईन याबद्दल सान्गू श्कत नाही. पण परिक्षा घेणार असाल तर पासिन्ग पुरते मार्क्स नक्की पाडेन Proud )

Pages