जलरंग कार्यशाळा

Submitted by अल्पना on 22 January, 2014 - 10:14

पाटलांच्या http://www.maayboli.com/node/47295 या धाग्यावरील चर्चेमध्ये मायबोलीवर ऑनलाइन जलरंग कार्यशाळा घ्यावी असा विचार पुढे आला.

मायबोलीवर अनेक कलाकार /चित्रकार मंडळी आहेत. काही आमच्यासारखे बर्‍याच वर्षांनी परत रंगवायला सुरु करणारे आहेत तर काहीजण अगदी सुरवातीपासून शिकण्यासाठी उत्सूक आहेत. आमच्यासारख्यांना बर्‍याचदा रंगवण्यासाठी कुणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज असते. बर्‍याचवेळा एखादा क्लास /वर्कशॉप /शिबीर इ. ठिकाणी जाणं जमेलच असंही नसतं. अश्या लोकांना या कार्यशाळेच्या माध्यमातून शिकायची संधी मिळेल.

किमान ८-१० जणांचा ग्रूप तयार झाला तर इथे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेता येवू शकेल, कार्यशाळेचं नक्की स्वरुप कसं असेल हे अजून ठरलं नाही पण कार्यशाळेची अंदाजे रुपरेषा अशी असू शकेल -

"कार्यशाळेचे स्वरुप- मी काही पेंटींग टेक्निक थीअरी वर लिहीन, त्यावर पार्टीसिपन्ट्स प्रश्न विचारु शकतील आणि मी माझ्या परिने उत्तर द्यायचा प्रयत्न करीन , त्यावरुन काही एक्झर्साईज दिले जातील त्यापर्माने पेंट करुन पार्टीसिपन्ट्स इथे पोस्ट करतील ज्याच्यावर क्रिटीक लिहता येइल. तसेच काहि स्टेप बाय स्टेप डेमो, व्हीडीओ करता येतील. अ‍ॅड्मीन ना सांगुन हा क्लोज ग्रूप ठेवता येईल"

ही वरची पोस्ट पाटलांच्या रंगीबेरंगी पानावरून कॉपी केली आहे.

या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणार्‍यांनी इथे किंवा पाटलांच्या रंगीबेरंगी पानावर आपलं नाव नोंदवावं.


कार्यशाळेमध्ये सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी http://www.maayboli.com/node/47426 या ग्रूपमध्ये सामिल व्हावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटील.. कार्यशाळेचे स्वरुप एकदम मस्त वाटते आहे.. मुख्य म्हणजे टाईमस्पेस्ड आहे.. एखाद दुसरा वीकेंड प्रत्येक पुढच्या स्टेपला असल्यामुळे बहुतेक सगळ्यांना जमू शकेल..

कंसराज | 23 January, 2014 - 02:22

जलरंग ग्रूपमधे सहभागी होवून काही शिकता आले तर मलाही आवडेल. प्लीज मला ह्या ग्रूपमधे सहभागी करा.
>>>>>>>>

एव्हढे हुषार विद्यार्थी येणार असतील तर आम्ही पाठच्या बेंचवर बसू! Happy

म्हणजे पाठच्या बेंचवर बसणारे पुढच्या बेंचवरच्यांच्या शर्टवर जलरंगाने रंगवणार Proud पुढच्यांच्या शर्टवर फाउंटनपेनातली शाई शिंपडली आहे की नाही कधी शाळेत असताना? मी मधल्या बेंचवर बसत असे त्यामुळे माझ्या ब्लाउजवर पाठून शाई उडवलेली असे. मी पण एकदा उडवलेली धीर करुन पुढचीच्या पाठीवर Proud

प्रतिसाद चांगलाच आहे, आत्ता मलाही तयारीला लागावे लागेल. आपली प्रगती चांगली असेल तर या वर्कशॉप च्या शेवटी माझ्या काही चित्रकार मित्रांना स्टेप बाय स्टेप डेमो द्यायला सांगेन , त्यामुळे वेगवेगळ्या पद्ध्तीची कामं बघुन शिकता येतील.

भारीच! Happy

सद्ध्या भाग घेणं शक्य नाही, पण इथल्या एन्ट्र्या बघायला आणि एकूण माहिती मिळवायला आवडेलच.

पाटील सर .. तयारी काय करायला लागेल ते कधी सांगणार आहात? आणि सुरुवात कधीपासून करायची आहे?

आणि ढ विद्यार्थाने मागच्या बेंचवर बसायचेय Sad

की पुढच्या Happy हे पण सांगाच!!

ए प्लि़ज माझं ही नाव घ्या , इयत्ता १० नंतर मी चित्रकला केलेली नाही [कंटाळवाण्या मिटिंग्ज मध्ये मात्र अजुनही माझ्या चित्रकलेला डायरीच्या मागच्या पानावर बहर येतो.] पण मला खरंच पेंटिंग शिकायचं आहे.

पाटील, मला सहभागी व्ह्यायचे आहे.तुमच्यासारख्या गुणी कलावंताकडुन मार्गदर्शन घ्यायला निश्र्चितच आवडेल.माझे नांव समावीष्ट करावे.

.तुमच्यासारख्या गुणी कलावंताकडुन मार्गदर्शन घ्यायला निश्र्चितच आवडेल. >> +१

मलाही सहभागी व्हायला आवडेल.

पाटील , माझी पण अगदी abcd पासूनच सुरुवात आहे . अशी विद्यार्थिनी तुम्हाला चालेल का ?
अन्वीता सारखि माझी पन अवस्था आहे.प्लीज मला ह्या ग्रूपमधे सहभागी करा.

Pages