अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी,
तुम्ही भारताच्या प्रधानमंत्र्यांचे किंवा परराष्ट्र मंत्रालयाचे बोलणे वाचलेत का?
जर भारताचे पंतप्रधान व परराष्ट्र मंत्रालय जी काही ट्रीटमेंट दिली, त्याचा अधिकृत निषेध करते आहे, तर इट इज नो ब्रेनर की घाण ट्रीटमेंट दिली.
त्यात कीस काढायचं काय आहे?
भारताची राजनैतिक अधिकारी मेल मधे म्हणते आहे की कॅव्हिटी सर्च केला, असे भारतीय वृत्तपत्रे म्हणत असतील, तर माझा तिच्यावर व त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. अमेरिकेच "occicial" अधिकारी खोटे बोलत आहेत असेच मी म्हणेन.

नंदिनी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस अजून, white collar गुन्हा अशी काही वेगळी category आहे का एव्हढाच साधा प्रश्न आहे. तू दिले नाहीस म्हणजे तुला माहित नसावे असे धरतो.<<<< व्हाईट कॉलर गुन्हा अशी कागदोपत्री कॅटेगरी नसते. तो बोलीभाषेतल्या वापराचा शब्द आहे. धन्यवाद. तरी मला माहित नाही असे तुम्ही धरलेत तरी माझे काही बिघडत नाही.

सिव्हिल ऑफेन्स अन क्रिमिनल ऑफेन्स अश्या दोन क्लिअरकट कॅटेगरीज आहेत. तिसरी राजबंदी. या भारतात तरी असतात. सिव्हिलला दिवाणी न्यायालय म्हणतात. या गुन्ह्यात भारतात तरी हातकड्याही घालत नाहीत.
पगार न देणे, कागदपत्रे चुकवणे, पैशात फसवणूक ह्या सिव्हिल ऑफेन्स आहेत.
क्रिमिनल मधे बलात्कार, चोरी, दरवडे, खून इत्यादी येतात.

व्हाईट, ब्लू यलो ग्रीन इ. कॉलरचा संबंध नाही.

व्हाईट कॉलर गुन्हा अशी कागदोपत्री कॅटेगरी नसते. तो बोलीभाषेतल्या वापराचा शब्द आहे. धन्यवाद. तरी मला माहित नाही असे तुम्ही धरलेत तरी माझे काही बिघडत नाही. >> धन्यवाद. मी तुम्हाला न विचारलेली माहिती उगाचच पुरवल्याबद्दल धन्यवाद.

व्हाईट कॉलर गुन्हा >> इब्लिस, उगाचच आक्रस्ताळेपणा न करता उत्तर दिल्याबद्दल खरच धन्यवाद. visa farud हा बहुधा इथे criminal offense मधे धरला जातो. बहुधा terrorism नि drug trafficking शी जोडला जात असल्यामूळे असेल. तसे असेल तर त्यात वापरलेली गेलेली पद्धत ही common आहे. ती इथे अमेरिकेत कोणाला खटकू शकते का नि किंवा बरोबर आहे का इत्यादीबद्दल मी आधीच fourth amedment चे पोस्ट आधी लिहिले आहे त्यात दिलय.

इब्लिस तुम्ही दिलेल्या लिंकमधेही cavity search बद्दल काही नाहिये. deplorale treatment एव्हढेच म्हटलय नि strip search can itself be termed the same.

असामी,
माझे पुढचे वाक्य मिसलेत तुम्ही. बाई स्वतः क्लेम करताहेत.
पण तरीही, जर स्वतः पंतप्रधान एक्स बाबीबद्दल 'डिप्लोरेबल' हा शब्द जाहिररित्या उच्चारत आहेत, तोही अमेरिकेसारख्या देशाबद्दल, तर त्याचा अर्थ काही गंभीर होतो की नाही?
जौद्या. कीस फार होतोय.
झोपतो.

ती मेड अगोदरच गायब झाली होती, तिनं देवयानी खोब्रागड्यांकडे इतरत्र काम करू देण्याच्या बदल्यात तक्रार मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता, भारतात तिच्याविरुद्ध अगोदरच तक्रारी दाखल झाल्या होत्या हे मुद्देही लक्षात घ्यायला हवेत.

नाही चिनूक्स, ते मुद्दे इथे येऊच शकत नाहीत. मुळात देवयानी खोब्रागडे जे काही म्हणते ते खोटंच आहे ना!!!! ती ईमेल करून सांगते की तिचा कॅव्हीटी सर्च झाला, "पण इथे त्यावर अजून एकमत झालेले नाही ना!!!! म्हणजे तिचा मुद्दा खोटा Proud

पण तरीही, जर स्वतः पंतप्रधान एक्स बाबीबद्दल 'डिप्लोरेबल' हा शब्द जाहिररित्या उच्चारत आहेत, तोही अमेरिकेसारख्या देशाबद्दल, तर त्याचा अर्थ काही गंभीर होतो की नाही? >> अर्थातच होतो, फक्त तो निव्वळ strip search ला सुद्धा लागू होत असल्यामूळे त्याचा अर्थ तुम्ही लावला तसाच होतो असे मी घेउ शकत नाही. Dept of State वगळता इतर कोणीही ह्याबद्दल official statement दिलेले नसल्यामूळे सध्या तरी तेच ग्राह्य धरावे लागणार.

भारताचा यात उद्देश जर आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असे अमेरिकेला जाणवू द्यायचे एवढा असेल तर तो साध्य झाला आहे. जॉने केरी यांचा खुर्शीद यांना आलेला फोन कॉल ( व "रिग्रेट"), पंप्रची कॉमेण्ट ई गोष्टी पुरेश्या आहेत.

पण जर उद्देश अमेरिकेला माफी मागायला लावायची व आरोप मागे घ्यायला लावायचे हा असेल (तसा प्रचार भारतात केला जातोय) तर तो साध्य झालेला नाही.

येथे लिहीलेली प्रत्येक कॉमेण्ट दलित-दलितविरोधी किंवा अमेरिकेच्या-भारताच्या बाजूने या दोन बकेट्स मधेच असते असे नाही.

नंदिनी,
कॅव्हिटी सर्च झाला की नाही याबद्दल भारतातल्या न्यूजपेपर्स मधेसुद्धा कन्सिस्टन्सी किंवा "एकमत " नाहिये. इथल्या पेपर्स मधे फक्त स्ट्रीप सर्च झाला एवढेच आहे. सीएनेन वर पण तेच आहे.
देवयानीची ईमेल कुठे पब्लिश झाली होती का? आणि तिचा शब्द खोटाच असे म्हणणे जसे चूक तसेच तिचा प्रत्येक शब्द खराच हे म्हणणे पण चूकच. Happy

'जाणवू द्यायची' कशाला? अमेरिकी दूतावासाबाहेरची बॅरिकेडं काढली, दूतावासातल्या कर्मचार्‍यांची ओळखपत्रं जमा करून घेतली, दूतावासात होणार्‍या आयातीवर निर्बंध घातले, विमानतळावर पूर्वी होत नसलेली तपासणी लागू केली. भारतानं निव्वळ धमक्या या वेळी दिल्या नाहीत.

भारतातल्या अमेरिकी दूतावासातल्या अमेरिकी कर्मचार्‍यांनी यापूर्वी त्यांना असलेल्या इम्यूनिटीचा पूर्ण फायदा घेतला आहे. एका कर्मचार्‍यानं कारनं दिल्लीच्या रस्त्यावर दोन माणसांना उडवलं. त्या कर्मचार्‍याला अटक झाली नाही. अमेरिकेनं नुकसानभरपाई दिली.

वरती चिनूक्सने दिलेल्या लिंक वाचणे. देवयानीचा प्रत्येक शब्द जसा खरा अथवा खोटा नाही, तसाच संगीता रिचर्ड हिचाही प्रत्येक शब्द खरा अथवा खोटा नाही, हे तरी मान्य असावे.

India believes that the US not only acted in bad faith, but thumbed its nose at its "strategic partner" to conspire in Khobragade's arrest and her being treated like a hardened criminal by making her undergo strip search and cavity search. Manmohan Singh, who is said to have a special relationship with the Americans, on Wednesday called the US action "deplorable", while foreign minister Salman Khurshid told Parliament that India suspected a conspiracy against the Indian diplomat by American authorities.

'जाणवू द्यायची' कशाला? अमेरिकी दूतावासाबाहेरची बॅरिकेडं काढली, दूतावासातल्या कर्मचार्‍यांची ओळखपत्रं जमा करून घेतली, दूतावासात होणार्‍या आयातीवर निर्बंध घातले, विमानतळावर पूर्वी होत नसलेली तपासणी लागू केली. भारतानं निव्वळ धमक्या या वेळी दिल्या नाहीत.>>> मान्य. उद्देश ते आणि तेवढेच करणे हा असेल तर तो सफल झाला आहे.

पण राजकीय नेत्यांची वक्तव्ये यापेक्षा बरेच काही करण्याबद्दल होती. त्यांच्या हालचाली त्या दृष्टीने दिसत नाहीत सध्यातरी. म्हणूनच ते केवळ देशांतर्गत विरोधकांना गप्प करण्यासाठी असावे अशी शंका येते.

पण राजकीय नेत्यांची वक्तव्ये यापेक्षा बरेच काही करण्याबद्दल होती. त्यांच्या हालचाली त्या दृष्टीने दिसत नाहीत सध्यातरी. +१

याला posturing for local consumption म्हणतात. अमेरिकेकडून माफी आणी देवयानीजींवरील आरोप मागे घेणे आता फार अवघड आहे याची त्यांना जाणीव आहे.

>>कॅव्हिटी सर्च झाला की नाही याबद्दल भारतातल्या न्यूजपेपर्स मधेसुद्धा कन्सिस्टन्सी किंवा "एकमत " नाहिये. इथल्या पेपर्स मधे फक्त स्ट्रीप सर्च झाला एवढेच आहे. सीएनेन वर पण तेच आहे.>>
मै +१ . एकमताचा अर्थ नंदिनी आणि इब्लिस यांनी आपल्याला हवा तसा लावलेला दिसतोय. भारतात स्ट्रिप सर्च आणि कॅव्हिटी सर्चला जो भडक रंग लावला गेला आहे तसं इथे काहीही वाचण्यात आलेलं नाही. किंबहुना कॅव्हिटी सर्चबद्दल तर नाहीच नाही.

मान्य. उद्देश ते आणि तेवढेच करणे हा असेल तर तो सफल झाला आहे.

पण राजकीय नेत्यांची वक्तव्ये यापेक्षा बरेच काही करण्याबद्दल होती. त्यांच्या हालचाली त्या दृष्टीने दिसत नाहीत सध्यातरी. म्हणूनच ते केवळ देशांतर्गत विरोधकांना गप्प करण्यासाठी असावे अशी शंका येते.
<<
हेच मी विचारले होते तुम्हास,
की बरेच काही म्हणजे काय करायला हवे? विमाने घेऊन अमेरिकेवर बाँब फेकायला हवेत का? बरेच काही म्हणजे नक्की काय करणे अपेक्षित आहे? नेते जाऊंद्यात की उडत. तुमचे स्वतःचे प्वाइंटर द्यावा की?
का प्वाईंटर देणे विशिष्ट पातळीत बसत न्हाई? Wink

**

कॅव्हिटी सर्चला जो भडक रंग लावला गेला आहे <<
कॅव्हिटी सर्चला माइल्ड रंग कसा देतात?
टर्कॉइज अशी पेसल शेड कशी दिसेल?

इब्लिस, जे म्हणायचंय ते साध्या शब्दांत सांगून झालेलं आहे तेव्हा पुन्हा सांगत रहाण्यात वेळ घालवायची गरज वाटत नाही. तुम्हांला त्याला जो अर्थ लावायचा असेल तो लावायला तुम्ही मोकळे आहातच.

त्या चित्रातल्या घटनाक्रमात आधीच्या काही घटनांचा उल्लेख नाही.
१ देवयानीजींनी त्या मेडबरोबर केवळ व्हिसा ऑफिस मध्ये दाखविण्यासाठी ९.७८ डॉलर्स तासाला आणी रोज आठ तास ड्युटी असा करार केला.
२ व्हिसा साठी मुलाखत देताना पगाराचं काय सांगायचं हे मेडला पढवून ठेवले.
३ एकदा व्हिसा आल्यानंतर केवळ तीस हजार पगार असलेला दुसरा करार केला.

वरचा घटनाक्रम नविन नाहिये. तो माहित आहे. पण त्यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की विसा फ्रॉड ची केस बाईंनी बनवलेल्या पेपर्स मुळे आहे. जरी संगीताने ब्लॅकमेल केले म्हणून तिच्यावर केस झाली तरीही त्यामुळे ही दुसरी केस नल होत नाही. बरेचदा विसा फ्रॉडसाठी एम्प्लॉयरवर केस होते तेव्हा कमी पगाराबद्दल नोकराची तक्रार नसली तरी पेपरवर्क पाहून केस फाईल केली जाते.

बाकी इंड्यन फॉरीन सर्विस सिलेक्शन बद्दल बोलायचे तर

http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-22/india/45473493_1_...

ईब्लिस,
हा घटनाक्रम खोटाच आहे किंवा असेल असे नाहीये. ह्या सगळ्यांचे रेकॉर्डस असतील तर चांगलंच आहे, देवयानींविरूद्ध रचलेला कट पुराव्यानिशी सिद्ध करता येईल आणि माफीनामा नुकसानभरपाई वगैरे सगळं आपसूकच येईल. पण दुर्दैवाने हा निवाडा आपण किंवा टाईम्स करत नाहीये त्यामुळे ह्या माहितीची सत्यता केवळ खटला चालू होईल तेव्हाच कळेल.
पण देवयानींच्या नव्या हुद्द्यानुसार त्यांच्यावर खटला चालवता येणार नाही आणि ह्यापैकी काहीही खरे किंवा खोटे हे तुर्तास सिद्ध होणार नाही. त्यामुळे हे प्रकरण आहे तसेच भिजत राहणार आणि दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरींशिवाय काहीही होणार नाही.
देवयानींना दिलेल्या वागणुकीबद्दल न्यायालयात (पण कुठल्या?) दाद मागणे भारत सरकारला शक्य आहे का? असल्यास सरकार ते करत का नाही. तो जो काय सर्च होता तो आता घडून गेला आहे त्याबद्दल केवळ दाद आणि न्याय मागता येऊ शकतो, दोषींना शिक्षा करता येऊ शकते. पण असे काही प्रयत्न चालू आहेत का?
बॅरिकेड्स हटवून आणि खाजगी गोष्टींची आयात कमी करून नेमके काय साध्य झाले? ज्या गोष्टी मुळात नियमाला धरून नव्हत्या किंवा नजरेआड केल्या होत्या त्या बंद करून करून नेमका कोणता फर्म मॅसेज गेला? आम्ही नियम वाकवले होते हेच सिद्ध झाले ना? असे करायचेच होते तर ते आतल्याआत करून वरती दबाव आणायचा होता ना, ही राजनिती एवढ्या मोठ्या नेत्यांना कळू नये हे नवल. पब्लिकली असे ऊट्टे काढल्यासारखे करून ईमॅच्युरिटी किंवा काहीतरी पॉलिटिकली ड्रिवन हेतूच दिसून आला ना.

जर भारतातून आणलेल्या मेड्स नेहमीच अमेरिकेत राहता यावं म्हणून अस्संच करतात तर याआधीच मेड आणणे प्रकार बंद का केला नव्हता? कशासाठी त्यांना ही एक्स्टॉर्शन/ब्लॅकमेलिंग वगैरेची संधी द्यायची?
जून २३ ते जुलै १ मधे देवयानीने मिसिंग पर्सन वगैरे फाइल केलं होतं का? की तो अलेज्ड कॉल आल्यावर एकदम ब्लॅकमेल वगैरेच रिपोर्ट केला? त्यात बरं तिने पैसे मागितले तर त्याला एक्स्टॉर्शन म्हणता येईल, ब्लॅकमेल काय आहे त्यात?

>> बॅरिकेड्स हटवून आणि खाजगी गोष्टींची आयात कमी करून नेमके काय साध्य झाले? ज्या गोष्टी मुळात नियमाला धरून नव्हत्या किंवा नजरेआड केल्या होत्या त्या बंद करून करून नेमका कोणता फर्म मॅसेज गेला? आम्ही नियम वाकवले होते हेच सिद्ध झाले ना?
+१

maayboli_23Dec.jpg
----- इब्लिस- माझ्यासाठी हौस पुर्ण झाली काय आणि नाही झाली काय काही फरक पडत नाही. मी जिथे कुठे आहे तिथे कायद्याचे कटाक्षाने पालन करतो. त्याचवेळी कायद्याचे पालन कराणार्‍या इतरान्चे कौतुक करतो. कुणी जाणते पणी फसवणुक केली असेल तर होता होइल तेव्हढा विरोध करतो.

इब्लिस वरच्या घटनाक्रमानुसार संगिता रिचर्डने अत्यंत धुर्तपणे फासे टाकलेले दिसतात, व्हेरी वेल प्लॅन्ड . आणि हो ते ब्लॅकमेलिंगच आहे.
देवयानीने , संगिताला जे पॅकेज देऊ केलं होतं त्यात तिचा राहण्याखाण्याविषयी काही लिहिलेलं होतं का ? नसल्यास तिला मिळणार टोटल पॅकेज ( राहण्याखाण्याचा व इतर खर्च धरुन) ठरलेल्या पॅकेजपेक्षा जास्त होऊ शकतं.

पण देवयानींच्या नव्या हुद्द्यानुसार त्यांच्यावर खटला चालवता येणार नाही आणि ह्यापैकी काहीही खरे किंवा खोटे हे तुर्तास सिद्ध होणार नाही.
------ नवा हुद्दा आहे आणि या हुद्द्यावर काम करताना diplomatic immunity मिळेल पण केव्हापासुन हे महत्वाचे आहे. त्या मधे आधि केलेल्या कथित गुन्ह्यापासुन सरक्षण अन्तर्भुत नसावे.
चमन कृपया खालील लिन्क पहा.
http://www.indiatvnews.com/news/world/us-rules-out-retrospective-immunit...

बॅरिकेड्स हटवून आणि खाजगी गोष्टींची आयात कमी करून नेमके काय साध्य झाले? ज्या गोष्टी मुळात नियमाला धरून नव्हत्या किंवा नजरेआड केल्या होत्या त्या बंद करून करून नेमका कोणता फर्म मॅसेज गेला? आम्ही नियम वाकवले होते हेच सिद्ध झाले ना?
------ उलट नुकसानच करवले... आणि देवयानीची कायद्याने दुबळी असलेली बाजू अजुनच नाजुक केली.

जर भारतातून आणलेल्या मेड्स नेहमीच अमेरिकेत राहता यावं म्हणून अस्संच करतात तर याआधीच मेड आणणे प्रकार बंद का केला नव्हता? कशासाठी त्यांना ही एक्स्टॉर्शन/ब्लॅकमेलिंग वगैरेची संधी द्यायची?
----- अत्यन्त मोलाचा प्रश्न... पण अशा त्रासदायक प्रश्नाची प्रामाणिक पणे उत्तरे शोधत बसण्यापेक्षा मार्शलकरवी केलेली अटक, आणि सर्च केला गेला म्हणुन ओरडायचे...

>>जर भारतातून आणलेल्या मेड्स नेहमीच अमेरिकेत राहता यावं म्हणून अस्संच करतात तर याआधीच मेड आणणे प्रकार बंद का केला नव्हता? कशासाठी त्यांना ही एक्स्टॉर्शन/ब्लॅकमेलिंग वगैरेची संधी द्यायची?
----- अत्यन्त मोलाचा प्रश्न... पण अशा त्रासदायक प्रश्नाची प्रामाणिक पणे उत्तरे शोधत बसण्यापेक्षा मार्शलकरवी केलेली अटक, आणि सर्च केला गेला म्हणुन ओरडायचे...>> अतिशय सहमत. अपमान तर होतो पण त्यातून शिकायचं नाही. हे जर तिसर्‍यांदा (उघड झालेलं) आहे तर भारतातून मेड वगैरे लोकांना व्हिसा द्यायच्या भानगडीत पडावंच का? इथल्या एजन्सीजना काँट्रॅक्ट देणं हा ही उपाय असू शकतोच की. व्हिसाची भानगड मिटेल आणि ह्या डोमेस्टिक हेल्पना पैसे व्यवस्थित दिले नाहीत हा प्रॉब्लेमही आटोक्यात येऊ शकेल.

Pages