अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकीचे नाही का? आपली इज्जत आपण इतक्या सहजपणे दुसर्‍याच्या हातात का द्यावी?
<<
हे वाक्य हास्यास्पद आहे असे वाटत नाही का?
मी कितीही आब राखून, मला ठाऊक असलेले कायदे पाळून वागलो, तरीही समोरचा कुठे ना कुठे मला त्रास देऊ शकतोच. वरतून इग्नरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्स्क्यूज.
अमेरिका दुनियाभराची मोरल पोलिस आहे, व ती जे करील ते बरोबरच, हे गृहितक आडवे येतेय का??

सई केसकर | 26 December, 2013 - 03:50
मला असं बिलकुल म्हणायचं नाही की खोब्रागडे दुष्ट, नोकरांचा छळ करणारी व्यक्ती आहे.

रिचर्ड्स ने तिचा अमेरिकेत वर्क व्हिसा आणि त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी बरोब्बर उपयोग केला आहे. आणि आता नेहमी प्रमाणे यात अमेरिका उपेक्षितांची तारणहार म्हणून उभी राहिली आहे.

>>
सई एकदम बरोबर आहे तु सांगितलेस ते. आपल्या कॉन्सुलेट मधील लोकांना इतक्या केसेस झाल्यावर हे माहित नव्हते, वा तो ४५०० चा आकडा चुकुन लिहिला हे काही बाही समर्थन आहे.

गरिबीचा फायदा घेउन असे स्वस्तात कोणाला आणणे चुकीचेच आहेत. इथे इतकी वर्षे राहिलेल्या (जिच्या नवर्याने आता अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे) स्त्रीला हे माहित नसावे हे हास्यास्पद आहेत.
साध्या ऑफिस असिस्टंट म्हणुन काम करणार्या स्त्रिया नॅनीला पगार देताना किमान वेतन कायद्याचे पालन करतात. देवयानीचा पगार तर १००००० आहे असे इथे सर्वत्र आले आहे (४५०० ही अमाउंट आफ्टर टॅक्स , ४०१K, इन्शुरन्स असणार).
अशा प्रकारे आणलेली स्त्री पळुन जाणार हे न कळण्याइतकी देवयानी दुधखुळी आहे असे मला तरी वाटत नाही.
समजा आपल्याकडे भारतात अजुन गरीब देशातुन दुताने गुलामसद्रुश नोकरास आणले आणि त्या दुताने सांगितले ही व्यक्ति माझ्या देशात माझी नोकर आहे म्हणुन मी तेथिल प्रमाणे फक्त १० रुपये पगार देतो कारण आमच्या देशात असे अनेक नोकर असतात. भारतात ती गुलाम व्यक्ति पळुन गेली. यावर या दुताने त्याच्या देशात तक्रार करुन या व्यक्तिच्या घरातल्यांवर कोर्ट वारंट काढले तर यावर भारत सरकारने काय करावे?
१) अशी व्यक्ति या पगारात आणताना या दुताला ही व्यक्ति परागंदा होइल याची पुसट शंका पण नसणार?
२) अशा प्रकारे व्यक्तिला आणताना पिळवणुक झालेली कोण? हा दुत की ती गुलाम सद्रुश नोकर कारण त्या नोकराला माहित होते की भारतात आल्यावर आपले रहाणीमान सुधारेल?
३) वारंवार ताकिद देउन असे नोकर आणले जात असतील तर हे दुत आपल्या पदाचा गैरफायदा घेत नाही का? अशा नोकराचे सुटका केली तर त्यात त्या देशाचा अपमान होइल का?

अमेरिकेने पण विचार करावा की जर ते दुसर्या देशात गेले जिथे कायदे सौदीसारखे कडक आहेत.
अशी चुक केल्यावर तिथे हातच तोडला जातो म्हणुन अमेरिकन दुताचा हातच तोडला तर.
१) अमेरिकन जनता गप्प बसेल का?
२) दुसरा काही राजनैतिक उपाय जसे संगिताला व्हिसा रद्द करुन हाकलुन देणे जमले नसते का?

मला तरी हा कल्चरल डिफरन्समुळे उपटलेला गैरसमज जणवतो. इथे सामंजस्यची दोन्ही देशांना गरज आहे.
:
:

केवळ ह्या प्रकरणातुन सुटका व्हावी म्हणुन भारत सरकारकडुन देवयानीला चक्क पुन्हा पदोन्नती मिळाली आहे हे कोणाच्या लक्षात आले का? Wink अजुन एक दोन कायदे मोडले की एकदम चीफ अ‍ॅम्बेसेडरच होइल ती. (अमेरिका पण स्वतःच्या दुतांना असेच वाचवते हे मी पण मान्य करते व मला पण ते पण पटत नाही. )
तात्पर्य: एकुण काय जगभर अशी दुराग्रही व्यक्तिच फायदा करुन घेतात अमेरिकन असो वा भारतीय आणि मायबोलीवर येउन आपण सामान्य लोक मात्र एकमेकांचा अपमान करत बसतो Wink

हायला ये क्या लोचा हो गया ?
<<<< Government sources said Khobragade was accredited advisor to the Indian mission to the UN on August 26, 2013 — to help the mission with work related to the General Assembly — and her accreditation was valid until December 31. >>>

तात्पर्य: एकुण काय जगभर अशी दुराग्रही व्यक्तिच फायदा करुन घेतात अमेरिकन असो वा भारतीय आणि मायबोलीवर येउन आपण सामान्य लोक मात्र एकमेकांचा अपमान करत बसतो
अगदी खरे!!

मायबोलीवर येउन आपण सामान्य लोक मात्र एकमेकांचा अपमान करत बसतो >>> अगदी खरय.

आपले राजदुत ह्युमन ट्रॅफिकिंगचे अनधिकृत रस्ते झालेत की काय अशी शंका येतेय. यापुर्वी झालेल्या केसेसवरुनही आपण काहीच शिकणार नाही असं दिसतय.

एक फुस :- सरकारने केवळ अश्याच लोकांना अमेरिकेत पाठवावं, ज्यांना मेडची गरजच भासणार नाही किंवा जे मेड (किमान भारतीय) ठेवणार नाही. ना रहेगा बांस, न बजेगी बासुरी.
अमेरिकेत कित्येक कुटुंब पती-पत्नी नोकरी करुनही मेड ठेवत नाही, ते त्यांना जमते, तर यांना का जमू नये?

देवयानी ह्या युनोच्या कामासाठी भारताचे प्रतिनिधीत्व करत होत्या. आता या नव्या माहितीद्वारे, अटक होण्याचा काळातही त्यान्ना पुर्ण डिप्लोमॅटिक इम्युनिटी मिळते. पडद्यामागे खुप काही देणे-घेणे होत या प्रकरणाचा गोड शेवट होतो आहे असे दिसते.

39-year-old Khobragade, who was posted as Deputy Consul General in New York, was also accredited as an "Advisor to the Permanent Mission of India to the United Nations" by the UN w.e.f. 26th August 2013 and her status as an Advisor was valid until December 31, 2013. The accreditation was for the UN General Assembly 2013, sources said in New Delhi.

http://www.ndtv.com/article/india/devyani-khobragade-accredited-to-the-u...

>>अहो झंपी काहीतरीच काय ?<<

श्री, तुम्हाला नाही माहिती का, भारतातून वाल, काही कडधान्य, लोणची,मसाले वर बंदी असताना लोकं (वरच्याच काही आयडी) आणतात अमेरीकेत व इथे वाटत बसतात. व तीच लोकं हक्काने अमेरीकीतील कायदे कसे पाळावे वर भाषण करतात. Proud

उदय,

>> पडद्यामागे खुप काही देणे-घेणे होत या प्रकरणाचा गोड शेवट होतो आहे असे दिसते.

सहमत. पडद्यामागे बर्‍याच घडामोडी होत असतात. ज्या कधीच बाहेर येत नाहीत. त्यामुळे शेवट 'गोड' होतोय असं वरकरणी तरी दिसतंय.

'गोड' अवतरणांत लिहायचं कारण की संगीताबाई या प्रकरणात पार म्हणजे पारच फसल्या आहेत. त्यांना यापुढे अमेरिकेच्या तालावर नाचावे लागणार म्हणजे लागणारच! त्यांच्या दृष्टीने शेवट गोड नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

सहमत. पडद्यामागे बर्‍याच घडामोडी होत असतात. ज्या कधीच बाहेर येत नाहीत. त्यामुळे शेवट 'गोड' होतोय असं वरकरणी तरी दिसतंय.
-------- त्यान्ना ३१ डिसेम्बर भारतात साजरी ़करायला मिळेल/ लागेल ....

'गोड' अवतरणांत लिहायचं कारण की संगीताबाई या प्रकरणात पार म्हणजे पारच फसल्या आहेत. त्यांना यापुढे अमेरिकेच्या तालावर नाचावे लागणार म्हणजे लागणारच! त्यांच्या दृष्टीने शेवट गोड नाहीये.
-------- विट्नेस प्रोटेक्शन म्हणुन त्यान्ना सरक्शण मिळायला काही हरकत नाही. त्यान्च्या वरिल भारतातील केसेस मागे पडतील.

हायला ये क्या लोचा हो गया ?
<<<< Government sources said Khobragade was accredited advisor to the Indian mission to the UN on August 26, 2013 — to help the mission with work related to the General Assembly — and her accreditation was valid until December 31. >>> Lol

आता आमच्या पायातली काढून हाणा आमच्याच थोतरीत

नॅनी कशाला पाहीजे ? Lol

राष्ट्रपतीला कशाला पाहीजे एव्हढं मोठं घर ? लोक झोपडीत मॅनेज करतात कि

आमचा चहावाला बिंधास फिरायचा, आता कशाला लागतेय त्याला सेइक्युरिटी ??

येडेच सगळे. कुणाला अक्कल अशी नाहीच. ज्यांना होती ते इकडं आले..

- अंकल सॅम हमने आपका व्हिसा लिया है
- अब रस्सा ले ले.
इसे पकड के गरम लोहे मे डाल दिया जायें.

आम्ही इंडीयात रहायचो ना तेव्हां आमच्या घरची भांडीवाली हेलीकॉप्टरने यायची हो आमच्याकडं कामाला. तिचा पगार द्यायला बाबा रोजगार हमी योजनेवर जायचे कामाला.

गंमत आहे.

आख्ख्या आयुष्यात ज्यांनी ड्रायव्हरला ८००० रु च्या वर पगार दिला नाही आणि २४ तास राबवून घेतलं ते..
मोलकरणीला तासाच्या हिशेबाने महिना २००० रु च्या वर कधीही पगार न दिलेले..
लेबर लॉ बदलून ठेकेदारी पद्धतीला परवानगी देताना समर्थन करणारे..
कंपनी बंद करताना नुकसान भरपाई द्यायची गरज नाही या बदलाचं समर्थन करणारे..

आज संगिताबाईच्या बाबतीत इतके हळवे झाले ?

विट्नेस प्रोटेक्शन म्हणुन त्यान्ना सरक्शण मिळायला काही हरकत नाही.
<<
ट्रॅफिक्ड पर्सन म्हणा की!
इतिहास वाचला की रूट्स समजतील कुठे आहेत, अन कोणत्या बाबीवर कशी रिअ‍ॅक्शन येते ते.
असो. आवर्तो. नैतं माबोवरचे स्वयंघोषित इतिहासकार येतील भांडायला. Wink

एकाच्या तोंडून आलं नाही, त्यांनी भारताच्या अधिकृत मिशन वर गेलेल्या अधिका-याला (व्यक्तिगत आयुष्यात तो काय करतो याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही) अशा पद्धतीने अटक केली, मग त्यांनी मोडलेल्या कायद्यासाठी त्यांची वरातच काढा. ब्राझीलच्या नादाला पण लागत नाहीत हे अमेरीकन्स.

मागे भारतीय वकिलाताच्या इमारतींना यांनी प्रॉपर्टी टॅक्सच्या नोटीसा बजावल्या. तेव्हां भारतातल्या त्यांच्या इमारतींना नॉटीसा बजावल्या तर यांना आश्चर्य वाटलं होतं. त्याचं एक्स्प्लेनेशन त्यांनी मागवलं होतं. आता म्हणा कि तुम्ही कशाला देता नोटीसा, अमेरीकेत अमेरिकेचे कायदे पाळायलाच पाहीजेत. त्यांनी नोटीसा दिल्या म्हणून तुम्ही दिल्या याला काय अर्थ आहे ?

अर्थ एकाच गोष्टीला आहे एम्प्लॉयरच्या खर्चाने इंटरनेट ब्राउझ करून उचलले बोट लावले कॉ बोर्डाला !

अजून काय ?
आपल्यालाच लाज वाटायला लागली. बास... चिखलात दगड मारून आपलेच कपडे खराब होतात.

यांना तोडमोड केल्यानंतरही शिल्लक राहीलेले भारताचे मिनिमम वेजेस लॉज माहीत आहेत का ?

किमान वेतन ६५०० ते १०००० ( एरीयानुसार) + विमा + कायद्याने लागू होणा-या सवलती.
तुमच्या कुठल्या भारतातल्या नातेवाईकाने कधी ३०,००० रु पगार दिला होता का ? तो ही भारतातल्या नातेवाईला, उरलेले डॉलर मधे ..

पहिल्या दिवसापासून त्या बाई काय सांगतात याला महत्वच नाही, आणि हे जास्त हुषार ! आता वाचा तिथले लॉ एक्सपर्ट्स काय म्हणतात ते ?
भारताने ठरवलच तर प्रीत भराराला सन्मानाने भारतात आणून येरवड्यात पाहुणचार करता येईल. डॉलर खाली नेते दबलेले नसतील तर... एव्हढा सज्जड पुरावा आहे आता.
कोण कोण येतय भराराबरोबर ?

पडद्यामागे खुप काही देणे-घेणे होत या प्रकरणाचा गोड शेवट होतो आहे असे दिसते. >>>> उदय जरा सविस्तर लिहिणार का ' देणे-घेणे' विषयी ? धन्यवाद.

अमेरीकेने भारताचा अपमान केलाच हो. पण भारताचा अपमान करण्यात आणखी किती जणांना आणि का इंटरेस्ट आहे हे कळल्यावर त्यांचा पण अपमान केला तर वाईट वाटायला नको.

************************************************The END*****************************************

अंबानीच्या मुलानं केलेल्या अ‍ॅक्सीडेंटबद्दल यांच्या जिभा आणि लेखण्या वाळून गेल्या.

प्रत्येकाला एकेक ऑडी मिलालीय. काय धार चढणार ? असलेली पण गंजून गेली असल.
शहाजोगपणाला थोडी तरी मर्यादा असू द्यायची ना खरेपणाची, निदान जेवणात चिमूटभर मिठाइतकी तरी ?

http://www.abpmajha.newsbullet.in/mumbai/103-more/39057-2013-12-26-10-00-50

एव्हढी एकच बातमी आख्ख्या देशातल्या मेडीयात आणि सगळं कसं शांत शांत.
कायद्याच्या अंमलबजावणीचा पुळका म्हणे.
अंबानीचं नाव आलं कि संपला सगळा जोर ?

आणि एकीकडे दात ओठ खात बाई अडकलीच आहे तर होता होईल तितकी बदनामी (कूनाची ???) करायची. नसलेल्या बातम्या ख-या असल्या सारख्या दिल्या.

या लोकांच्या हातात लेखणी आणि देशाबाहेर भारताचं रिप्रेझेंटेशन !!
बा विठ्ठला, सांभाळ रे माझ्या भारतमातेला !

श्री- डिलनुसार( ??) ३१ डिसेम्बरच्या आधी देवयानी भारतात पोहोचतील असा अन्दाज आहे. त्या भारतात सुखरुप पोहोचल्यावरच अधिक माहिती कळू शकेल. स्टेट डिपार्ट्मेन्टच्या मदतीशिवाय ३१ ऑगस्ट तारिख स्विकारणे केवळ अशक्य आहे. ३१ ऑगस्ट तारिख या साठी त्या अनुषन्घाने देवयानीला सम्पुर्ण इम्युनिटी मिळते आणि तिची या प्रकरणातुन सुटका होणे शक्य आहे.

हा सर्व मार्ग स्टेट डिपार्ट्मेन्टने सुचवला असेल... न्यायिक प्रक्रिया स्वत: ओबामाही थाम्बवू शकत नाही... पण खाचा खळगा त्यान्चे त्यानाच माहिती...

रिचर्डसला स्वातत्र्य राहिल, भारतात जाण्याचे - अर्थात सर्व केसेस मागे घेतल्यावरच. किवा अमेरिकेत रहाण्याचे. विटनेस प्रोटेक्शन म्हणुन सन्गिता रिचर्डसची काळजी घेणे अमेरिकेसाठी महत्वाचे.

भरारावर चालू असलेल्या नुकसान भरपाईच्या दोन केसेस मिटल्या का ?
काऊन्स्युलेटमधल्या ४९ रशियन एजंटांना भराराने फक्त माफी वर सोडून दिलं, त्यांचा भ्रष्टाचाराचा गुन्हा इथल्या हुषार लोकांच्या मते गंभीर नसावा.

अंकल सॅम साबासी देगा !!!
बहुत मजा आयेगा !

भरारासाठी येरवडा जेल मधील खोली सज्ज करण्यात येत आहे.
- आमच्या वार्ताहराकडून

भारारासोबत येणा-यांसाठी तिथल्याच दुस-या एका प्रसिद्ध वास्तूत सोय करण्यात येत आहे.
- सोर्स : व्हाईट हाऊस

बास का आता ?

अंबानीच्या मुलानं केलेल्या अ‍ॅक्सीडेंटबद्दल यांच्या जिभा आणि लेखण्या वाळून गेल्या.
>> कायदा मोडला तर त्याचे परिणाम असावेतच , कुणी कितीही पैसेवालं, कितीही उच्च्पदस्थ असलं तरी, असच म्हणायचय ना तुम्हाला ह्यातून? Happy

कायदा मोडला तरच.. त्याआधीच जज्ज होऊन भुई धोपटू नये हे एक
आणि बोंबाबोंब करताना एकच आघाडी उघडू नये हे दुसरं.

कोण काय लिहीतय त्यातून असूया, द्वेष, मत्सर विकार हे सर्व गुण इतक्या ठळपणे समोर आलेत कि त्यावर जास्त भाष्य करायची गरजच नाही. आज वेळ मिळाला म्हणून जरा टपल्या दिल्या.

Pages