अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निदान ह्यापुढे तरी लोक धडा घेतील व अशी प्रकरणे होणार नाहीत. (मी लगेच हिशोब करुन पाहिला, आमच्या क्लिनरला योग्य पैसे देते ना? ) ..
बाईंचा पगार नक्की किती? १००,००० की ५०,००० वर्षाला? कितीही असला तरी मेडला पुर्ण पगार मिळुन ५००-६०० डॉलर्स दिले गेले असतील तर कमीच. (पुर्ण पगार मिळुन म्हणजे वरच कोणीतरी मेडला भारताकडुन पण मिळत होते वगैरे लिहिलय. आता बातम्यांवर, कोणत्याही बाजुच्या असोत, दोघे आपापली छबी सांभाळुनच लिहिणार).

पण बाईंनी मेड का ठेवली वगैरे कशाला? इतरांना नोकरी करुन जमते म्हणुन त्यांना जमावे असे आहे का? मेड ठेवायचा त्यांचा निर्णय होता तो पण कागदपत्रे व प्रत्यक्ष वागणे ह्यात घोटाळा केला.

चर्चा चकवा लागल्यासारखी पुन:पुन्हा त्याच वळणांवर जातेय. कोणाचा पगार किती, नोकर ठेवणं आवश्यक/परवडत होतं की नाही, व्हिसासाठी कागदपत्रं दिली ती खरी की खोटी, अमेरिका आणि भारत सरकारनं वेळच्यावेळी योग्य गोष्टी केल्या की नाही - खोब्रागडेंना अटक झाली त्या क्षणी या मुद्द्यांची वासलात लागलीय. केवळ 'लेटर ऑफ द लॉ'नुसार पाहिलं तर त्यांची बाजू लंगडीच आहे. त्यामुळे दोन्ही देशांतले संबंध का ताणले गेलेत - दोघांचं इंटरप्रिटेशन का वेगळं आहे - आणि दोन्ही देशांकडून नव्यानं काय पावलं उचलली जाताहेत, याकडे पाहिलं तरच पडद्याआड नक्की काय झालं असण्याची शक्यता आहे याचा आपल्याला थोडातरी learned guess बांधता येऊ शकेल.

भारतीय परराष्ट्रमंत्री खुर्शीद यांनी सुरुवातीपासून 'कॉन्स्पिरसी'चा उल्लेख केला आणि जॉन केरींनी खोब्रागडेंना मिळालेल्या वागणुकीबद्दल 'खेद'व्यक्त केला. जर खोब्रागडेंना समजुतीत यूएन मिशनमधे काम करु दिलं असतं, तर असा तर्क काढता आला असता की somebody in the US State department dropped the ball earlier; पण आता त्यांनी प्रकरणावर पडदा टाकायचं ठरवलं आहे. एका नोकरावरुन अमेरिकेला आशियातला महत्वाचा भिडू गमवावासा वाटेल का? (रेफ.: अफगाणिस्तान, चीन, आणि एशिया-पॅसिफीक रीजन मधे अमेरिकेनी गेल्या ४ वर्षात घेतलेली दिशा) पण खटला काढून टाका ही भारताची मागणी होती - ती मान्य केली असती तर भारतातून 'इव्हॅक्युएट' करुन आणलेल्या रिचर्ड कुटुंबाला इथे ठेवायला काहीच आधार राहिला नसता. अमेरिकेनी ती मागणी स्पष्ट फेटाळून लावली आहे. आता खरंच सगळा मामला पडद्याआडचा आहे, एका प्याद्यासाठी वजीर पणाला लावल्यासारखं दिसतं आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे केवळ एक क्रिमीनल केस नाही तर मोठी डिप्लोमॅटिक डेव्हलपमेंट. डिप्लोमसी हा बुध्दिबळाचा डाव - चाल एक असली तरी प्रत्यक्ष मोहर्‍यावर काय/कोण आहे हे आख्खा पट दिसल्याशिवाय कळणं कठीण आहे.

Black and White do not matter - what's important is the grey matter Happy

अमेरिकेनी ती मागणी स्पष्ट फेटाळून लावली आहे. आता खरंच सगळा मामला पडद्याआडचा आहे, एका प्याद्यासाठी वजीर पणाला लावल्यासारखं दिसतं आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे केवळ एक क्रिमीनल केस नाही तर मोठी डिप्लोमॅटिक डेव्हलपमेंट. डिप्लोमसी हा बुध्दिबळाचा डाव - चाल एक असली तरी प्रत्यक्ष मोहर्‍यावर काय/कोण आहे हे आख्खा पट दिसल्याशिवाय कळणं कठीण आहे. >>> +१ .
यशवंत सिन्हांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच डिप्लोंमॅट्सनी भारतात इन्कमटॅक्स रिटर्न फाईल केलेलं नाहीये. अमेरिकन सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहणार आणि भारत सरकार कदाचीत अमेरिकन डिप्लोमॅट्सना कात्रीत धरणार. पेच वाढण्याची शक्यता जास्त झालीये.

हा दुवा विषयाला धरून नसला तरी अमेरिकेचे गोडवे गाणार्‍यांनी हेही लक्षात घ्यावे...इथे भ्रष्टाचार खालच्या स्तरावर चालत नसेलही पण वरच्या स्तरावर आणि तोही फार मोठ्या प्रमाणात चालतो ह्याचे हे एक ढळढळीत उदाहरण...
.
http://www.news-republic.com/Web/ArticleWeb.aspx?regionid=1&articleid=16...

प्रमोद देव, मुद्द्याला धरून तर नाहीच पण तुम्हांला इथे जे अमेरिकेच्या बाजूने लिहीत आहेत त्यांचा मुद्दाही कळलाय असं वाटत नाहीये.
अमेरिकेत भ्रष्टाचार नाही असा दावा कुणी केलेला नाही आणि कुणी करणारही नाही. तेव्हा उगीच व्यवस्थित चाललेली चर्चा भरकटवू नका कृपया.

सायो, चर्चा व्यवस्थित चाललेय असं तुम्हाला वाटतंय...पण ती केव्हाच भरकवटवलेय...तुमच्यासारख्यांनी...मूळ मुद्दा नीट समजून न घेता केवळ देवयानीचीच टिंगल टवाळी करण्यात इथले बरेचजण धन्यता मानत आहेत आणि तिला अट्टल गुन्हेगारही ठरवून टाकलंय ...विशेषकरून तुमच्यासारख्या इथल्या अमेरिकास्थित बहुसंख्य बायकाच त्यात आघाडीवर आहेत...एखाद्याला सहानुभूती दाखवता येत नसेल तर किमान त्याची टिंगल तरी करू नये इतकंही भान इथे कुणाला नाहीये असे खेदाने म्हणावं लागतंय.
अमेरिकेच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आणि न्यायप्रियतेबद्दल इथे लोक उगाचंच भरभरून बोलताहेत...असंख्य उदाहरणं अशी आहेत की जिथे अमेरिकेने माती खाल्लेय पण त्याबद्दल इथल्या लोकांना सोयर ना सुतक...म्हणूनच ही एक ताजी घटना आहे त्याचे उदाहरण मी मुद्दामच दिलंय.

प्रमोद देव, अमेरिकास्थित बायकांनी चर्चा भरकटवली आहे की आणखी कुणी हे माहित करून घेण्याकरता पहिल्यापासून सगळं वाचा प्लीज. त्यात स्वतःचे प्रतिसादही वाचायला विसरू नका.
जी काही सत्य परिस्थिती असेल ती काही काळाने बाहेर येईल आणि सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा करूया.

एनीवेज, जे काही झालंय त्याचा फायदा त्या मेडला झाला असे वरवर तरी दिसतेय. ती आणि तिची फॅमिली अमेरिकेत आहेत, अमेरिकन संरक्षणात. Happy आता तिला हेच हवे होते की काय देव जाणे.

Who appointed a maid whose in-laws are closely related to us embassy in India? Surprising!

चला रामदास काकानी ओबामाला इमेल पाठवली आहे (आजचा लोकसत्ता). लवकरच उत्तर अपेक्शित आहे.

देवयानी आदर्श प्रकरनात दोशि....सरकार कारवाइ करनार नाहि.

जय कायदा - जय भारत

इथे खरंच लोकांना डिप्लोमॅटचे काम ऑफिसात बसून अर्धावेळ ऑफिसच्या पैशाने मायबोली बघण्याइतके सोपे वाटतेय असे दिसते.
Wink

नॅनीची गरज काय वैगेरे अतिच मजेशीर प्रश्न आहेत.

बाईंनी मेड का ठेवली वगैरे कशाला? इतरांना नोकरी करुन जमते म्हणुन त्यांना जमावे असे आहे का? मेड ठेवायचा त्यांचा निर्णय होता तो पण कागदपत्रे व प्रत्यक्ष वागणे ह्यात घोटाळा केला.

आणि

इथे खरंच लोकांना डिप्लोमॅटचे काम ऑफिसात बसून अर्धावेळ ऑफिसच्या पैशाने मायबोली बघण्याइतके सोपे वाटतेय असे दिसते. नॅनीची गरज काय वैगेरे अतिच मजेशीर प्रश्न आहेत.

याला +१.

बेफिकीर,

>> येथे बोलण्यात अर्थ नाही आहे हे तुमच्या आता लक्षात आलेलेच असेल

अनुमोदन. परदेशी राजदूत टाचेखाली राहावा म्हणून प्रत्येक देशाकडे कुठलातरी तांत्रिक कायदा जय्यत तयार असतोच. बागुलबुवा दाखवायला बरा पडतो. पण हे ऐकणार कोण. कित्येक लोकांना देवयानी प्रकरण म्हणजे कायद्याच्या उल्लंघनापुरतं मर्यादित वाटतं. मुख्य भाग त्यापलीकडे आहे. तिकडे लक्ष देणे जमत नसावे बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

>>कित्येक लोकांना देवयानी प्रकरण म्हणजे कायद्याच्या उल्लंघनापुरतं मर्यादित वाटतं. मुख्य भाग त्यापलीकडे आहे. तिकडे लक्ष देणे जमत नसावे बहुतेक.
गापै, अनुमोदन !!!

प्रमोद देव,
>>इथल्या अमेरिकास्थित बहुसंख्य बायकाच>>
या सेक्सिस्ट विधानाबद्दल निषेध नोंदवत आहे.

अमेरीकेत भ्रष्टाचार नाही असे मी तरी इथ कुठेही म्हटले नाहीये. अमेरीकेचा इंटीग्रीटी इंडेक्स काय आहे ते मला माहित आहे. अ‍ॅक्टीव सिटीझन म्हणून आमच्या स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिनीधींना जाब विचारायचा अधिकार सामान्य नागरीकाला आहे आणि आम्ही तो बजावतोही. अखंड जागरुक राहून सशक्त लोकशाहीची जपणूक करावीच लागते. मात्र त्याचा इथल्या चर्चेशी काय संबंध ते कळले नाही.

देवयानीबाईंना सहानुभूती दाखवण्याच्या मुद्द्यावर बोलायचे तर कोरड्या सहानुभूतीने काय होणार आहे? भले एक माणूस म्हणून दुसर्‍या माणसाबदल वाटावी तितपत सहानुभूती मला या बाईंबद्दल वाटली तरी क्रिम लेयर समजल्या जाणार्‍या फॉरीन सर्विसमधील मंडळी आणि भारत सरकार जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर असे लिंबूटिंबू सारखे वर्तन करते तेव्हा हसावे की रडावे कळत नाही. हा असा स्टॅन्ड ऑफ व्हायला नको म्हणून तर सप्टेंबर मधे अ‍ॅलर्ट दिलेला ना! याआधी दोन वेळा याच कारणासाठी दंड वगैरे प्रकार झाले तेव्हा का नाही भारत सरकारला जाब विचारला देशाची अब्रू घालवली म्हणून? देवयानीबाईंच्या बाबतीत अशीच पुन्हा एकदा दंड भरायची मानहानी पत्करावी लागली असती तर देशभक्त काय करणार होते?
स्वतःचा नाकर्तेपणा झाकायला सरकारला इंस्टंट देशभक्तीचा उमाळा येतो, देशाची अस्मिता आठवते आणि जनताही भुलते. चालू द्या!

इथे खरंच लोकांना डिप्लोमॅटचे काम ऑफिसात बसून अर्धावेळ ऑफिसच्या पैशाने मायबोली बघण्याइतके सोपे वाटतेय असे दिसते >>.

या वैय्यक्तिक टिप्पणीचा निषेध.

>> कित्येक लोकांना देवयानी प्रकरण म्हणजे कायद्याच्या उल्लंघनापुरतं मर्यादित वाटतं. मुख्य भाग त्यापलीकडे आहे. तिकडे लक्ष देणे जमत नसावे बहुतेक.

अय्या, हो? मग तुम्ही का व्हिएन्ना करार आणि व्हीसा कॅटेगरीज आणि कोणाला पगार कोण देतं त्याच्या पंचायती करत होतात?

>>
केवळ देवयानीचीच टिंगल टवाळी करण्यात इथले बरेचजण धन्यता मानत आहेत आणि तिला अट्टल गुन्हेगारही ठरवून टाकलंय ...विशेषकरून तुमच्यासारख्या इथल्या अमेरिकास्थित बहुसंख्य बायकाच त्यात आघाडीवर आहेत...एखाद्याला सहानुभूती दाखवता येत नसेल तर किमान त्याची टिंगल तरी करू नये
<<

स्वाती२, प्रमोद देव ज्या प्रकारे (भारतीयच आणि स्त्रीच असलेल्या) मेडबद्दल बोललेत ते वाचल्यावर या विधानाला उत्तर द्यायची आवश्यकता उरलेली नाही. सामाजिक उच्चनीचतेच्या तर्‍हेतर्‍हेच्या कल्पना दामटण्यातच पुरुषार्थ वाटत असेल एखाद्याला तर त्याची फारतर कीव करावी, निषेध काय करणार!

देवयानी खोब्रागडे भारतीय स्त्री आहेत आणि ती मेड 'मेड' आहे हे साधं सरळ समीकरण अमेरिकास्थित बायकांना कुठलं आलंय कळायला.

संगीताबद्दल बोलायला लागलं की लोक लगेच 'हे फार खोलातलं प्रकरण आहे, मेड वाटते तेवढी साधी नसणार' हा युक्तीवाद करतात. मग भारत सरकार आणि देवयानी खोब्रागडे साधे आहेत म्हणून त्यांची बाजू घेतली जातेय का? तिथे पाणी खोल का नाहीये?

जौद्या झालं.

>इथे खरंच लोकांना डिप्लोमॅटचे काम ऑफिसात बसून अर्धावेळ ऑफिसच्या पैशाने मायबोली बघण्याइतके सोपे वाटतेय असे दिसते.
>नॅनीची गरज काय वैगेरे अतिच मजेशीर प्रश्न आहेत

माफ करा पण हे पटले नाही. अमेरिकेत सर्व सिस्टिम्स नीट काम करत असतात. त्यामुळे किराणा, वीज बील भरणे, पाणी आलं नाही, कामवालीने बुट्टी मरली , असे प्रश्न सहसा येत नाहीत. अगदी नवरा बायको दोघेही उच्चशिक्षित ( मुक्तपीठच्या भाषेत) आणी नोकरी करणारे आणी मायबोलीवर न येणारे असले तरीही नॅनीची गरज पडत नाही. फार फार तर मूल अगदीच लहान असेल तर.

त्यातूनही आपल्या डिप्लोमॅट्स ना कार्यबाहुल्यामुळे नॅनीची आवश्यकता आहे असे भारत सरकारला वाटत असेल तर भारतात रीतसर भरती करून पाठवू नये? किंवा अमेरिकेत जाहिरात देऊन जे काय किमान वेतन देऊन नेमू नयेत? एकदा हे रामायण झलेले असतानाही ? परवडते म्हणून भारतातून स्वस्त नॅनी आणायची आणी कागदोपत्री एक पगार दाखवून प्रत्यक्ष कमीच द्यायचा हा कंजूशपणा का?

कमला चित्रपटात त्या कमला ला एक पत्रकार विकत घेतो आणी पत्रकार परिशदेत 'पेश' करतो तो प्रसंग आठवला. तो पत्रकार एखादी शिकार केल्याचा आवेशार फुशारकी मारत असतो, इतर लोक पटापट फोटो काढायचा घाईत असतात. कमला मात्र एका कोपर्‍यात अवघडून उभी असते. तिच्याकडे कोणाचेच लक्ष नसते.

स्वाती_आंबोळे,

>> अय्या, हो? मग तुम्ही का व्हिएन्ना करार आणि व्हीसा कॅटेगरीज आणि कोणाला पगार कोण देतं त्याच्या
>> पंचायती करत होतात?

तथ्ये शोधून काढणे (establishing the facts) करायलाच हवे ना? त्या पंचायती केल्या म्हणूनच तर त्यापलीकडील मथितार्थ ध्यानात येतो ना? कोण दोषी आहे ते ठरवायची घाई कशाला?

आ.न.,
-गा.पै.

vijaykulkarni,

>> त्यातूनही आपल्या डिप्लोमॅट्स ना कार्यबाहुल्यामुळे नॅनीची आवश्यकता आहे असे भारत सरकारला वाटत
>> असेल तर भारतात रीतसर भरती करून पाठवू नये?

अगदी योग्य प्रश्न आहे. व्हिएन्ना करार, व्हीसा कॅटेगरीज बघितल्या आणि कोणाला पगार कोण देतं याचा तपास केला की नेमका हाच प्रश्न उभा राहतो.

आ.न.,
-गा.पै.

ज्यांनी फिलापाईन्स, व्हीएतनाम, इराक इराण अफगाणिस्तान क्युबा रशिया जपान ईत्यादी असंख्य देश स्वार्थापायी उद्ध्वस्थ केले ,ते लोक कायदा पाळतात यावर माझा तरी विश्वास नाही.

आजोबा, ते बाहेर बेकायदा वागतात आणि स्वतःच्या देशात कायद्याने.
किंवा कुठेही कसेही वागतात आणि मग म्हणतात आम्ही कायद्याने वागतो.

>>काही महिन्यांपूर्वी कुणितरी मायबोलीवरच्या नोकरीच्या शोधात ग्रूपमधे एका मराठी इंग्रजी दुभाषाच्या कामाबद्दल माहिती दिली होती. हे काम करणारी व्यक्ती अमेरिकेत राहणारी, अमेरिकेची नागरीक आणि सिक्युरीटी क्लीअरन्स मिळवायला पात्र असावी अशी अट होती. मला तेंव्हापासून उगीचच एक प्रश्न पडला आहे. अमेरीकेत राहून मराठी दुभाषाचे काम करण्यासाठी सिक्युरीटी क्लीअरन्सची काय गरज असावी? का ही व्यक्ती फोन संभाषणे ऐकून दुभाषाचे काम करणार होती?
न्यूयॉर्कच्या भारतीय दुतावासात आता काही महत्वाच्या राजनैतिक व्यक्ती ह्या मराठी भाषिक आहेत. हे डॉ. देवयानी प्रकरण झाल्यापासून त्या कामाचा आणि या प्रकरणाचा किंवा हेरगीरीचा काही संबंध असेल का अशी शंका दाटून राहिली आहे.

त्या कामाची माहिती मी दिली होती (इथे आहे: http://www.maayboli.com/node/6087?page=2)
त्यांना भाषांतरकार हवे होते, सीटीझन असणे आणि सिक्युरिटी क्लियरन्स असणे/मिळवू शकण्यास पात्र असणे अशा नॉन निगोशियेबल अटी होत्या. मीही तेव्हा विचारात पडले होते की असं कोणतं एव्हढं सिक्रेट काम असू शकेल..नंतर वाटलं की हेडलीरिलेटेड काम निघालं असेल.....

few points here..sry for typing in english..

1. devyani and her husband both r earning in NYC..USA.. as per record in papers Devyani's salary is $4500 per month..

2. Why did she hired Nanny from India and responsible for A3 Visa transfer when there r so many local options available.. there so many indians or asian nanny services available in NYC NJ area... people come to ur place on hourly basis... do cooking, cleaning, babysitting and get paid accordingly..

3. CNN says devyani paid less than $600 to Maid per month.. again not sure if this is true..
(i understand she arranged for her accomodation , food and local transport etc..)
But in area like Jersey City.(which is 10 mins away from NYC) . Gujarati nanny charges $500 per week.. for 9 hours a day.. in which babysitting..cleaning and cooking is done..

4. One of my friend who is working in IT and earn $4200 per month..kept Nanny with $500 per week.. (her husband is earning too) nobody need to hire anyone from India..was Devyani just tried to use A3 Visa service to get cheap services and rates from Indian worker? What was her motive to hire nanny when options are very easily available and especially in NYC, NJ type area...

5. If Devyani really paid less than $600 per month sorry but then its abuse and way less than what local Indian nanny's gets money...then it is obvious that Sangeeta Richard tried to get job outside..

6. About nature of arrest and further checking process.. she was searched by femal police officer in private police area and not publically.. every country have their own strict laws...so how come it was insult..

7. Why india let go of Richardson who was involved in Bhopal case or recently Hedley.. why we never took very strict actions against criminals.. latest is italian marines.. why did India allowed them to let go or reduce their sentence..last visit to India.. security guard sleeping at airport.. Immigration officer not paying attention to papers.. within few secs.. foreigners are allowed IN..why don't we have finger printing and more stringent checks..to these Outsiders.. to make sure about Our Security...

8. what about Maid.. was it not insulting to make her work in low wages..who will speak against such abuse..

9. Devyani's name is involved as illegal beneficiary in Aadarsh scam also...what is background check about her financial activities..

10. Why india never reacted when APJ Abdul Kalam was questioned long hours at Newark Airport.. he is our Ex President and Diplomat..

Sorry to say for Indian Consulate experience in NYC midtown is very horrible..
First of all...anyone can enter in our Indian Consulate without Security check.. WHY?
If USA can do strict checking in Delhi or Mumbai Consulate office.. why don't we apply these rules..don't you think our goverment should be Cautious about such BASIC rules..
Staff is late.. and very very rude.. Information are misleading.. frankly.. its as bad as any Indian goverment office,, instead of improving these issues...

when Devyani Types A3 VIsa details from her own Computer, how come she typed to pay that much amount to pay in Contract...???

instead of being emotional about LADY Diplomat's Arrest...lets try to understand facts behind it..

Pages