Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफिकीर आणि
बेफिकीर आणि अश्विनीमामी....धन्यवाद.
मी स्वत:ही कित्येकवेळी मालिकातील काही प्रसंग पाहून वैतागलो होतो. सुरुवात दणदाकटपणे केलेल्या ह्या मालिकेला दिग्दर्शकाने असे का घसरू दिले असावे याचाही विचार केला. पण प्रमुख कलाकारांचा अभिनयातील ताजेपणा, प्रसन्न वातावरण आणि इस्टेटीसंदर्भातील खलनायकी चाळ्यांचा अभाव यामुळे मालिकेने मनी घर केले आणि त्यामुळेच ती पाहिली जात आहे.
"....टेक इट ऑर माइंड युअर ओन बिझनेस....." नक्की बोलू शकला असती एखादा युवक. पण श्री हा याच स्त्रियांच्या समोर लहानाचा मोठा झाला असल्याने त्याला फक्त त्याची आई नव्हे तर अन्य स्त्रियाही आईच्याच जागी आहेत....आणि दैवाने या सार्या स्त्रियांना कमनशिबाचे तडाखे दिले आहेत, हे तो जाणतो. खुद्द त्याचे वडील त्याला व आईला सोडून परदेशात गेले आहेत...मोठ्या आईचा नवरा व मुलगा अपघातात ठार झाले.....धाकट्या आईच्या नवर्याला कठोरपणे आईआजीनी घराबाहेर काढले आहे, तर बेबीआत्याचा संसार फुलायच्या आतच तुटला आहे....सरूमावशी आईबापाविना कशी राहील एकटी म्हणून गोखल्यानी तिला आपल्या घरी सहारा दिला आहे.....असा सारा मोडकातिडका कारभार पाहिल्यानंतर श्री सारखा उच्चशिक्षित तरुण माईंड युवर ओन बिझिनेस नाही म्हणू शकणार....त्याला या स्त्रियांविषयी इतके प्रेम वाटायचे कारण म्हणजे याही सार्या त्याला मुलासारखेच प्रेम देत आहेत....इव्हन बेबीआत्या टू.
सुरुवात दणदाकटपणे केलेल्या
सुरुवात दणदाकटपणे केलेल्या ह्या मालिकेला दिग्दर्शकाने असे का घसरू दिले असावे >+१.
* मला गुळचट संवाद अजिबात आवडत
* मला गुळचट संवाद अजिबात आवडत नाहीत (खास करून त्या जान्हवीचे) आणि सर्वांचेच व्हेन ईट कम्स टू मुगाची धिरडी अॅन्ड ब्रेकफास्ट ऑन सन्डे.
* आयुष्यात बरिच इतर महत्वाची आणि चॅलेंजिंग कामं पार पाडायची असतात, तिथे यांना फक्त खाणे पिणे, कुणाच्या तरी मनात घर करणे किंवा विष कालवणे इतक्याचेच पडलेले असते.
* नको तितकं कौटुंबिक ऐक्य जे फक्त आणि फक्त कथा कादंबर्यात दिसते ते सिरियल मध्ये दाखवण्याचा अट्टहास आणि मग नक्कल फसणे.
* एक व्यक्ती अगदी पांढरी स्वच्छ (सालस, सहनशिल, हळूवार, सुगरण इ. जान्हवी) दुसरी एकदम काळी म्हणजे गुणांनी (लोभी, लोचट, चतुर इ. सावत्र आई) सगळ्याची टोकं दाखवायची. जगात असं कुणिच अगदी स्वच्छ पांढरं किंवा काळं नसतं. ग्रे शेड्स विसरतात हे लेखक्स.
ह्यांच्या गृहोद्योगाच्या
ह्यांच्या गृहोद्योगाच्या जाहीराती मारे बसस्टॉपपासून सगळीकडे लागलेल्या असतात. त्यावर मस्त मस्त पेढे बर्फी दिसतात. (भूक लागते ऑन द स्टॉप्...सॉरी सॉरी ऑन द स्पॉट) आणि ह्यांचे हातावरचे पोट असल्यासारखे हे उत्तप्पा, शिरा आणि हाईट म्हणजे मुगाचे डोसे ह्यावर भागवाभागवी करतात. चितळेंच्या तोडीचा हा गृहोद्योग असेल तर पन्नास हजार पण उचलायची टाप नाही का त्या श्रीबाळाची?
हे उत्तप्पा, शिरा आणि हाईट
हे उत्तप्पा, शिरा आणि हाईट म्हणजे मुगाचे डोसे ह्यावर भागवाभागवी करतात. >> अग मग सकाळी सकाळी पेढे- बर्फी, बासुंदी, कलाकंद असे कसे खाणार..
दक्षिणा, तुमच्या चारही
दक्षिणा, तुमच्या चारही मुद्द्यांचे अनुमोदन....
पण कोणी दुसर्याच्या नव्या
पण कोणी दुसर्याच्या नव्या उभ्या राहू पाहणार्या संसाराला नजर कसे लावू शकते. <<< एकदम बरोबर अश्वीनीमामी. त्यातही ह्यांच्या घरी म्हणे संसार टिकत नाहीत. शाप आहे म्हणे. कसाला शाप ह्यांच्या अश्या वागण्यामुळे होत असेल तसं
दक्षिणा+११
शुक्रवार दि. २० डिसेंबर २०१३
शुक्रवार दि. २० डिसेंबर २०१३ : अपडेट
~ कालच्या रस्त्यावरील बोलण्यानंतर श्री व जान्हवी एका कॉफी शॉपमध्ये प्रवेश करतात. तिथे श्री तिच्या चेहर्यावरील चिंतेचा भाव दूर करण्यासाठी हलकेफुलके बोलण्याचा प्रयत्न करतो; पण या बहिणाबाई आपल्या भावाच्या सिगारेट प्रकरणावरून अजूनही संतापातच आहेत. शेवटी श्री मुद्दाम अनिल आपटेचा विषय काढतो. जान्हवीला हसू फुटते....श्री देखील चेष्टेने, "म्हणजे अनिल आपटे तुझा मित्र आहे, खरा..." त्यावर जान्हवीचा उरलासुरला संताप निघून जातो व ती श्री शी नित्याचे संवाद करते. कॉफी शॉपविषयी सांगताना "इथे मी आणि आजीदेखील कधीकधी कॉफी प्यायला येत असतो, इतकी चांगली कॉफी मिळते, मात्र मालक काहीसा खाष्ट आहे..." असे बोलत असतानाच तो मालक एका वेटरला रागाने ग्लास फोडला म्हणून शिव्या घालीत आहे हे दिसते. तो वेटर 'मला माफ करा...' वगैरे म्हणतो....मालक "ग्लासचे पैसे तुझा बाप भरून देणार का ?" असे चिडून म्हणतानाच, "जा त्या सात नंबरची ऑर्डर घे...." असे फर्मान सोडतो. इकडे ७ नंबरवरील श्री जान्हवी त्या वेटरबाबत सहानुभूतीने बोलतात....तोच तो वेटर त्यांची ऑर्डर घेण्यासाठी त्या टेबलवर येतो आणि पाणी ठेवणार तोच जान्हवीचे लक्ष त्याच्याकडे आणि त्याचे जान्हवीकडे जाते. तो वेटर असतो खुद्द पिंट्या.
बहिणीला पाहून त्याला धक्का बसतो आणि त्या नादात त्याच्या हातातील पाण्याचा ट्रे खाली पडतो, ग्लास फुटतात...मालक गल्ल्यावरून त्याला शिव्या हाणीत तिथे येतो...."परत फोडलास ग्लास ? याचे नुकसान कोण भरून देणार ? तुझा बाप ?" यावर जान्हवी आणि श्री दोघेही मालकाला थोपवितात. श्री नुकसान भरपाई देतो....तर जान्हवी, "तुम्ही सांभाळून बोला...हा माझा भाऊ आहे...". पैसे दिल्यावर दोघेही त्याला घेऊन बाहेर पडतात. एका कॉर्नरला मग भावाबहिणीचे रडणे सुरू होते....श्री बाजूला शांत उभा आहे. आज बहिणीला समजते की भाऊ कुठल्याही वाईट वा कायद्याच्या विरोधात जाऊन काम करीत नव्हता तर हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता...ती त्याला समजावून सांगते की अशा कामात काहीही गैर नसते. हे तू बाबांना सांग. पिंट्या 'ते माझे ऐकणार नाहीत. त्याना वाटेल मी वाईट काम करतोय...मला काही किंमत नाही....१२ वी नापासाला कोण चांगली नोकरी देणार, ताई ?" अशा संवादानंतर जान्हवी म्हणते, "मीच सांगते बाबांना सारे समजावून...चल तू आमच्यासोबत...." असे म्हणून हे तिघेही सहस्त्रबुद्धे यांच्या घरी येतात. तिथे नेहमीप्रमाने प्रथम कलाबाई आपला पोरगा वाया गेलेला नाही या खात्रीने शांत होतात. ती सिगारेट पिंट्याने खिशात ठेवलेली असते, फ्रस्ट्रेशनपायी, पण त्याने ती ओढलेली नसते. जान्हवी त्याला खूण करते आणि बाबाजवळ पाठविते. पिंट्या त्यांच्यासमोर उभा राहतो आणि "बाबा, मी चुकलो" असे म्हणतो, ते ऐकून सदाशिवराव स्वत:च उठतात आणि "बाळा, तूच मला माफ कर...मी चुकलो तुला ओळखायला" म्हणत त्याच्यासमोर चक्क हात जोडतात. सार्यांनाच ते दृष्य पाहून वाईट वाटते. रडणार्या पिंट्याला बाबा आपल्याजवळ घेतात.
इकडे गोकुळमध्ये बेबीआत्या दिवाणखान्यात अस्वस्थपणे येरझार्या घालत आहे. सरूमावशी "ते दोघे आल्यानंतर उशीर का झाला म्हणून चिडू नका" असे बजावते पण बेबीआत्या "ही काय वेळ झाली ? याना फोन करता येत नाही ? ही जान्हवी माहेरी गेली की अशीच वागते..." असली चिडकी वाक्ये फेकत उभी आहे. तोच श्री आणि जान्हवी आत प्रवेश करतात. त्यानी आत येऊन दम घ्यायच्या आतच बेबीचा पट्टा सुरू होतो. श्री सुरुवातीला आय अॅम सॉरी म्हणतो....जान्हवीही म्हणते, पण 'मला तुझ्या सॉरीची गरज नाही....' असे म्हटल्यावर जान्हवी मान खाली घालते. तिची तसली अवस्था पाहताक्षणीच श्री संतापतो आणि "बेबीआत्या, नाही जमलं एखाद्या दिवशी फोन करायला म्हणजे आमच्या डोक्यात दुसरा कुठला तरी विषय असेल ज्यामुळे आम्ही डिस्टर्ब झालेलो असू शकतो....नियम आहे हे मान्य, पण प्रत्येक वेळी तो जसाच्या तसा पाळलाच पाहिजे असे काही नसते..." श्री च्या आवाजातील धारदारपणा ऐकून बेबीआत्या चूप राहते. श्री तिच्याकडे न पाहता ताडताड जिना चढून आपल्या खोलीत येतो....पाठोपाठ जान्हवी येते आणि ती 'बेबीआत्यांचे म्हणणे बरोबर होते....तू असा त्यांच्यावर चिडायला नको होते...." श्री आपली बाजू मांडतो, पण त्याचे सर्व म्हणणे जान्हवी खोडून काढते व बेबीआत्याना सॉरी म्हणून ये असे म्हणते....श्री स्मित करतो आणि बेबीआत्याच्या खोलीकडे निघतो.
चला थोडासा तरी happening
चला थोडासा तरी happening episode झाला म्हणायचा आजचा! बाबांना पिंट्याविषयी प्रेम वाटले आणि ते त्यांनी बोलून दाखवले हे फार बरे झाले!
मामा, माझा अंदाज खरा ठरला कि
मामा, माझा अंदाज खरा ठरला कि नाही? मी लिहिले होतेना की पिंट्या काही वाईट वागणार नाही, हाराबद्दल असाच काहीतरी सस्पेन्स असेल.
होय.....जिज्ञासा आणि
होय.....जिज्ञासा आणि अन्जू..... काहीतरी होकारार्थी घडल्याचे दाखविले हे बरे. बाकी आज मला वाटले होते की भावनेच्या भरात पिंट्या आपल्याकडे असलेल्या चंद्रहाराबद्दल बहिणीला सांगेल....पण ते झाले नाही....म्हणजे ते प्रकरण अजून रहस्याच्या पिशवीत आहे....फक्त त्याने तो विकू नये त्रयस्थाला म्हणजे झाले.
आजच्या एपिसोड वरुन तो विकेल
आजच्या एपिसोड वरुन तो विकेल असे वाटत नाही. पिंट्याचे काहीतरी चांगले लवकर व्हावे ..
पिंट्याला बहुतेक माहिती नसेल
पिंट्याला बहुतेक माहिती नसेल की त्याच्या मामाने जान्हवीचा हार चोरलाय.
हाराबद्दल काहीतरी महाएपिसोड
हाराबद्दल काहीतरी महाएपिसोड मधे दाखवतील. खरेपणाची कसोटी की कायतरी आहे. सगळ्या सिरीअलीतले एक्दम खरं खरं बोलणार आहेत.
रोहन गुजर्/पिंट्याचे काम मस्तच आहे पण.
होय अंजली..... रविवारच्या
होय अंजली..... रविवारच्या एपिसोडचा विषय "चंद्रहार" हाच आहे. सर्व आयांच्यासमोर श्री ने गुडघे टेकून आजीला हात जोडून चंद्रहाराबद्दल मी खोटे बोललो मला माफ कर.....अशी स्पष्टोक्ती दिली आहे....त्याच्या बाजूला जान्हवीदेखील अपराधी चेहर्याने उभी आहे.
"रोहन गुजर्/पिंट्याचे काम मस्तच आहे... ~ अनुमोदन.
अन्जू ~ "..पिंट्याला बहुतेक माहिती नसेल की त्याच्या मामाने जान्हवीचा हार चोरलाय...." : माहीत असणार, कारण मामाची ट्रंक त्याच्याच माळ्यावर होती आणि तो हार सापडण्यापूर्वी एकदा आईला म्हणाला होता, "ती मामाची ट्रंक आता माझ्या इथे का ठेवली आहेस ? दे ना त्याच्याकडे पाठवून." यावर सदाशिवराव बाहेरून म्हणतात, "काही नको तिकडे लक्ष देवूस. तो ज्यावेळी येईल त्यावेळी जाईल घेऊन....". नंतर तीच ट्रंक पिंट्याच्या हातून सुटते आणि कुलूप उघडले जाऊन चंद्रहार त्यातून पडतो.....हा सुन्न. म्हणजे त्याला लग्नघरात हार कुणी चोरला हे लक्षात आले असणारच.
मला कालच्या भागात जान्हवीचे
मला कालच्या भागात जान्हवीचे बेबीआत्याची बाजू घेणे अज्जिबात पटले नाही.

अति चांगुलपणाने वागणारी माणसं डोक्यात जातात माझ्या..
"स्वतःवर मुकाटपणे अन्याय करून घेणे आणि वर त्याचे समर्थन करणे म्हणजे चांगुलपणा" असं समिकरण असावं बहुतेक मालिकांचं !!!
पियुपरी+१
पियुपरी+१
काल बेबी आत्या फारच विनोदी
काल बेबी आत्या फारच विनोदी बोलत होती.
एकदा म्हणाली की कीती उशीर. मग म्हणाली की काळजी वाटते. जेव्हा सरू म्हणाली की फोन कर मग तर ही म्हणते इतका उशीर झाला तर करीन फोन.
म्हणजे नक्की काय उशीर झाला की नाही
एकदा म्हणाली की कीती उशीर. मग
एकदा म्हणाली की कीती उशीर. मग म्हणाली की काळजी वाटते. जेव्हा सरू म्हणाली की फोन कर मग तर ही म्हणते इतका उशीर झाला तर करीन फोन.
म्हणजे नक्की काय उशीर झाला की नाही>>>> नताशा तिला त्यांच्या उशीर होण्याबद्दलची काळजी कमी आणि जान्हवीच्या माहेरुन येताना झालेला उशीराचा राग जास्त आहे....
पियुपरी+१>>> मी पण +१
पिंट्याबद्दलच्या सगळ्या पोस्टींना अनुमोदन.... बाबांनी पिंट्याला जवळ केल हे पाहुन खूप्च बर वाटल
मला कालच्या भागात जान्हवीचे
मला कालच्या भागात जान्हवीचे बेबीआत्याची बाजू घेणे अज्जिबात पटले नाही +१
अशावेळी तिचा स्वाभिमान कुठे
अशावेळी तिचा स्वाभिमान कुठे जातो काय माहीत..कळवायले हवे वगैरे ठिक, पण किती ताणायचं, नियम नियम..अरे काय हॉस्टेल आहे का??
पियू+११११
पियू+११११
दक्षिणा आणी पियू ++११ (कितीही
दक्षिणा आणी पियू ++११ (कितीही वेळा )

अतिरेकी चांगुलपणाच्या नादात आपण स्वतावर अन्याय करतो अस वाटत नाही का त्यांना....:अओ:
अरे काय हॉस्टेल आहे का??<><<<
अरे काय हॉस्टेल आहे का??<><<<
मुलगा हॉटेलमधे काम करतो ही गोष्ट घरच्यांपासून एवढी लपवून कशाला ठेवतो? अगदी घरातले वाया गेलेला वगैरे समजत असताना सुमडीमधे मला जे काम मिळालंय ते मी करणार असं सरळ सांगू शकत नाही??
एका सिगरेटपायी आईवडलांनी केलेल नाटक पाहता लेखक दिग्दर्शक अद्याप ऐंशीच्या दशकातच आहेत की काय असं वाटलं. सिगरेट सापडली तर बावा ओढतोस का? असं विचारू शकत नाही आईबाप?
ह्या मालिकेचा एक अत्यंत बंडल
ह्या मालिकेचा एक अत्यंत बंडल एपिसोड ह्या क्षणी सुरू आहे.
इंदू आणि शरी ह्यांच्या इंग्रजी शिकवणीसंदर्भातील खास भुक्कड शैलीतील संवादांची उधळण झाली. त्यापूर्वी फ्रस्ट्रेटेड बेबी आणि श्री ह्यांनी एकमेकांसमोर लोटांगणे घालून माफ्याबिफ्या मागण्यात काही मिनिटे बरबाद केली. 'छोटी आई' वगैरे हाका लाडीकतेची परमावधी गाठून मारणार्या जान्हवीला पाळणाघरात तरी ठेवावे नाहीतर मुस्काटावे असे मनात येत आहे.
आता पिंट्या चंद्रहार मोडायला सोनाराच्या दुकानात आलेला असून रोहिणी हट्टंगडीला दुकानातून तसा फोनही आलेला आहे.
बेफी
बेफी
'छोटी आई' वगैरे हाका
'छोटी आई' वगैरे हाका लाडीकतेची परमावधी गाठून मारणार्या जान्हवीला पाळणाघरात तरी ठेवावे नाहीतर मुस्काटावे असे मनात येत आहे.
>> बेफी कंट्रोल..
बेफी अवघडेय ..
बेफी
अवघडेय ..
दोनदा पोस्ट! अजुनही हसतेय ..
दोनदा पोस्ट! अजुनही हसतेय ..
बेफी .. इतकं मनावर घेवु नका .. टिव्ही फोडाल रागाच्या भरात
शनिवार दि. २१ डिसेंबर २०१३ :
शनिवार दि. २१ डिसेंबर २०१३ : अपडेट
~ वर श्री.बेफिकीर यानी अपडेट स्वरुपातच आजच्या भागाचे वर्णन केले आहेच. आजचा भाग बालिशतेचे आत्यंतिक टोक गाठणारा होता....निव्वळ इंग्लिश शिकण्यात तू पुढे की मी पुढे यात आजी, मोठी आई, शरयू आणि जान्हवी यानी भरपूर फूटेज खाल्ले....त्या अगोदर श्री ने बेबीआत्याच्या खोलीत जाऊन तिची माफी मागितली....त्यात निम्मा वेळ.
हे झाल्यावर तो पिंट्या नामक जान्हवीचा भाऊ चंद्रहार घेऊन कसा काय नेमक्या त्याच सराफाकडे जातो जिथून गोखल्यांनी लग्नासाठी चंद्रहार करून घेतलेले असतात. मुंबईत जणू काय एकच सराफाचे दुकान आहे की काय असेच वाटावे. तो चंद्रहार पाहून सराफ भागीरथीबाईना फोन करतात आणि त्याना कळविण्यात येते की तुमच्याकडील चंद्रहार विकण्यासाठी रोहन सहस्त्रबुद्धे नामक मुलगा आला आहे. आजी त्याना सांगतात, "रोहन म्हणजे माझ्या नातसुनेचा भाऊ..."
आता आजी आणि बेबीआत्या या दोघींनी जान्हवीला कैचीत पकडले आहे....जान्हवी 'मी भावाला तो चंद्रहार दिला होता..." असे उत्तर देत आहे....तर आजी, "कालपर्यंत मी समजत होते की तुझ्या वर्तनाने तू दोन पावले पुढे आली आहेस, पण आज तू शंभर पावले मागे गेली आहेस..." असे संतापाने म्हणत आहेत, जान्हवीला.
[उद्या एक तासाचा विशेष कार्यक्रम आहे....पण मी उद्या हुबळीला भाचीकडे चाललो असल्याने हा भाग मला पाहता येणार नाही....तुमच्यापैकी कुणीतरी दोन दिवस अपडेट लिहावेत ही विनंती.]
Pages