होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही अजून काही काळ अशी मालिका पाहिली तर नक्कीच फ्रस्टेट व्हाल.... मला तर जानू आणि श्री दुसर्याला ज्ञानामॄत पाजाय्ला लागले कि खूप राग येतोय.

या पिढीला पटकोडगे माहीत नाही हे पाहून हृदय भग्न झाले. आमच्या लहानपणी व नंतर कित्येक वर्षे एक प्लॅस्टिकचा तीन एक फुटी उंचीचा रंगीबेरंगी फुगा मिळायचा. त्याला लाथा घाला, बुक्क्या मारा, काठीने बडवा, तो आडवा होऊन पुन्हा उभा व्हायचा. त्यावरून त्याला पटकोडगे हे नांव पडलेले होते. (हा शब्द नपुंसकलिंगी आहे). 'ते पटकोडगे'! ते लहान मुलांना खेळणे म्हणून आणले जायचे. मोठ्या माणसांचा आलेला राग ती मुले ह्या पटकोडग्यावर वाट्टेल तसे अत्याचार करून व्यक्त करत असत.

मी लहान असताना आमच्या कडे असा फुगा होता.....पण त्याला पट्कोड्गे म्हणतात ते माहित नव्हते>>>> मलाही माहित नव्हते.

त्या बाहुल्याच्या नाकवर hit me. अस लिहिला असयचा म्हनून आम्ही त्याला hit me च म्हनायचो. पट्कोद्ड्गे हे अत्तच कळल. पटकोडगे कै!!!!!

आम्ही 'हिट मी' च म्हणायचो....पटकोडगा हा शब्द पहिल्यांदा वाचला.
तो बाहुला किती ही हिट केल तरी कोडग्या सारखा उभा रहातो. म्हणून चिडून 'पड कोडगा' असे म्हणत असतील. त्याचच झाले असेल पटकोडगा.

मला देखील पटकोडगे शब्द ऐकल्याचं आठवत नाही. बेफी म्हणतात तसले खेळणे आमच्या लहानपणी नव्हते. तरुणपणी पाहिल्याचे आठवते. असो.... बेफींच्या पोस्टमुळे एक नवा शब्द समजला.

अनिल आपटे सुद्धा पटकोडग्यासारखाच...... इतका आपटला तरी ....... Wink

---------------------------------------------------------------------------------------------------------------------
गेल्या काही दिवसांपासून इथल्या लोकांच्या मनातून सिरिअल उतरत चालली आहे असे जाणवू लागले आहे.

किंवा असे तर नव्हे ना की सद्ध्या बरेचसे लोक चेष्टेच्या मूडमधे आहेत ?

अनेक दिवस चांगल्या पद्धतीने चाललेली सिरिअल काहीशी घसरली असली तरी या सिरिअलने पुन्हा स्वतःला सावरावे ही इच्छा आणि अपेक्षा.

आत्ता मध्यंतरी एका भागात श्रीची मावशी आणि छोटी आई कचरा काढताना दाखव्लय. अरे एवढे मोठे घर आणि एवढे मोठे उद्योजक. ह्यांना घरात स्वतः केर काढावा लागतो का? मूर्खपणाची कमाल आहे

konitari jara detail madhe lihil ka Ravivarchya episode baddal? Sadharan andaj aala aahe pan tari ajun details aale tar vachayala aani serial la shivyashaap dyayala ajun maja yeil Happy Dhanyavaad!

आजचा भाग मस्त होता. त्यासाठीच कालच्या भागात इतकी ताणाताणी केली. रविवारच्या भागाची जाहिरात होती म्हणून शनिवारच्या भागात पाणी घातले.
श्री आणि आईआजीच्या वाक्यावाक्यावर बाकीच्या सहा बायकांचे (आता यात जान्हवी आली) चेहरे आणि टिपिकल बॅकग्राउंड म्युझिक नसतं तर चाललं असतं.
एडिटिंगमध्ये लोचा होता की. बँकेत दुसरा दिवस उजाडला तरी गोखल्यांचे रात्रीचे उभ्या उभ्या भांडण चालूच होते? सहस्रबुद्धेंकडेही दुसरा दिवस उजाडला नसावा.
मालिकेत एकट्या रोहिणी हट्टंगडीच "सहस्रबुद्धे" नीट उच्चारतात. त्यांनी भीती असा व्यवस्थित उच्चार केला.
श्रीला आईआजी आपल्याला घरातून बाहेर जायला सांगणार नाही अशी आशा वाटत असावी.

रविवार चा भाग.....

मोठी आईची इंग्रजीची शिकवणी चालू असताना सराफाकडून आई आजीला फोन येतो कि रोहन सहस्त्रबुद्धे चंद्रहार विकायला घेऊन आला आहे. आपण दिलेला चंहा त्यांनी विकायला काढल्यामुळे त्या दोघी चिडतात.

मग पुढे बोरकरांचा जोक....जान्हवी तिथे जाऊन त्यांना लोनबद्दल सगळे कळल्याचे सांगते.

इकडे जानूचे बाबा देवाला पिंट्याला यश येऊदे म्हणून प्रार्थना करतात.

मोठी आई लगेच पळत जाऊन बेबीआत्याला सगळे सांगते. बेबीआत्या चिडून लगेच आई आजीकडे पळते. मग आपणसुद्धा कोणाशीतरी बोला बोलायअला पाहिजे म्हणून मोठी आई श्रीच्या आईकडे जाते.

बेबीआत्या आजीला सांगते कि आता या विकायला काढलेल्या चंद्रहारा बरोबर बाकिच्या दागिन्यांची बिले आपण भरली होती त्याचा पण जाब विचारुया. आजी सांगते तेव्हा बिले भरली त्र्व्हाच बोलायला पाहिजे होते आता बोलून फायदा नाही. तेव्हा आपण आपल्या गरजेसाठी आपल्या ईच्छेने बिले भरली तेव्हा तो विषय तिथेच संपायला हवा.......

संध्याकाळी जानू जेव्हा घरी येते तेव्हा आजी आणि बेबी तिला विचारतात. नर्मदा तेव्हढ्यात सरुला जाउन सगळे सांगते. आजी जानूला सांगते कि आपल्यासाठी बनवलेले दागिने दुसर्‍याकोणालाही बनवून दिले जात नाही. आपण तुझ्यासाठी १ सरुसाठी१ आणि तुझ्या आईसाठी १ असे ३ चंहा घेतले होते. मग जानूला आश्चर्य वाटते..ती विचारते कि आईसाठी चंहा का घेतला होता?
बेबी न मोआला तिला माहित नाही यावर विश्वास बस्त नाही. आता त्या ३ पैकी १ चंहा आपल्या सराफाकडे विकायला आला आहे. तर तुझ्या आईला विचार तिने तो पाठविला आहे का ? --आजी. तेव्हढ्यात छोटी आई जानूची बाजू घेते अन त्यांच्या घरी चोरी होऊन चोर तो हार विकायला आल असेल असे बोलते त्यावर आजी सांगते कि तिचा भाऊउ तो हार घेऊन आला होता.

जानू आईला फोन करुन हाराबद्दल विचारते तेव्हा आईकडे तिचा हार असतो. तेव्हा आजी दोघींना त्यांचे हार आणायला सांगते. तेव्हा सरु श्रीच्या खोलीत जायला निघते अन हार श्रीकडेच ठेवला होता ते सांगते. त्यांच्या खोलीत त्या श्रीला फोन करतात पण तो महत्वाच्या मिटींगमध्ये असल्याने फोन बंद करतो. मग सरु तिला लग्नात काय झाले ते सांगते. मग आता मी काय करू? मी श्रीसाठी खोटे बोलले म्हणून ढ्साढसा रडायला लागते. मग जानूला पुन्हा एकदा महान व्हायची संधी मिळते आणि ती सरुला आपला हार देऊन टाकते....मग ती श्रीला पुन्हा फोन लावते पण तो बिझी!...ठोड्यावेळाते तो घरी जायला निघतो.

जानू आजीला सांगते कि माझा हार मी माझ्या भावाला दिला...तेव्हा सरू खरे सांगायला बघते पण जानू ती मला पाठिशी घालायचा प्रयत्न करते असे सांगते. 'आम्ही दिलेला सन्मान तू बाजारात विकायला काढला?' बेबी बोंबलते. शरू 'त्यांची पैशाची अडचण असेल असे सांगून सावरायला बघते. पण बेबी म्हणते कि, "एव्हढच होते तर आम्ही सगळ्या दागिन्यांचे पैसे दिलेत (जानूला परत धक्का!) तर तू आईला सांगायचे त्यातले दागिने विक म्हणून. आज तू हार दिलास, उद्या तू काहीही उचलून देशील त्यांना."
मग मोठी आई.."पण तू असं केलसंच का? आणि तुला माहित होते कि तू तुझ्या भावाला हार दिलास तर आईला फोन केल्याचे, खोलीत हार आणायला जायचे नाटक का केलेस?" आता हार दाखवायची वेळ आली तर हार दिल्याचे सांगते.

आजी, 'तु चांगले केले नाहीस. घरात आलीस पण स्वभाव बदलला नाही... श्रीसाठी आम्ही गप्प ....परवा दोन पावले जवळ(मुगाच्या डोश्यामुळे)...आज शंभर पावले मागे(हारामुळे).....आता उरलीसुरली आशा तू मारुन टाकलीस...नो अपेक्षा.....खरे सांगितले नाही.....मागच्या वेळेसारखी सिद्ध करायची वेळ येते तेव्हा पलट्ली....सवयच तीची......श्रीची निवड ठात चुकली! ..या घरात तुझा निभाव नाही लागणार' असे बोलून निघून जाते.

नर्मदा बेबीला आजीला समजावायला सांगते तर बेबी अजून बोंबलते. सरू परत खरे बोलायचा प्रयत्न करते पण...महान जानू..
शरु जानूला घेऊन खोलीत जाणार तर बेबी तिला आडवते...परत बेबी बडबड...जानू खोलीकडे...सरू देवाकडे ...बेबी आणि मोठी आई आजीकडे...अन शरू नव्र्याला फोन करायला धावते...नर्मदा रडत बसते.

श्री घरी येतो...आई म्हणते, "तु किती उशीर केलमा...माझ्या हातात काहीच राहिले नाही...संसार टिकत नाही...भांडण झाले...आई जानूवर चिडल्यात...आता यापुढे काही बोलता येत नाही"

मग सगळे हॉलमध्ये...(श्री कटिंग करून येतो लगेच...) ...आजीचे भाषण... मग निर्णय.."या घरात रहायची पात्रता नसलेल्याने या घरातून मानाने निघून जावे" तेव्हा श्री सांगतो कि यात जानूची काही चूक नाही. तिने तिच्या नवर्‍याला वाचवायला प्रयत्न केलाय...मी तुझ्याशी खोटे बोललो आहे. ढॅढॅढॅ!!!!!

बेफी आमच्या लहानपणी असे लाड नै व्हायचे कै.

आम्हाला शेजारचे, लहान भावंड वगैरे कायपण वापरावं लागायचं.... त्यांचं आधी (दूर)पळकोडगा... मग (खाली)पड्कोडगा... मग पट(कन) कोडगा... अन शेवटी नुस्ताच शुद्धं सात्विक कोडगा असं रूपांतर व्हायचं.
मलाही मोठी चुलत-बिलत भावंड होतीच... माझीही तीच स्थित्यंतरं झाली असणार हे मला भेटल्यावर कळतच Happy

त्या भुक्कड मालिकेपेक्षा इथली धमाल जास्तं मस्तय.

सॉरी... आणि ... ते अनुमोदकांचं राहिलच नै...
बेफी + १

माझा अंदाज खरा ठरला - श्री घराबाहेर जात असताना जान्हवी जायला निघते तर आजी म्हणते तू जाऊ नकोसं - प्रोमो मधे दाखवलं काल Happy

सोनाली. छान लिहिलेत अपडेट.
श्रीची सगळी धडपड जान्हवी गोत्यात येऊ नये म्हणून होती. आता जान्हवी परतफेड करतेय. वर आईआजी म्हणतात या सगळ्याची काहीच गरज नव्हती. माझी भीती वाटून श्रीला खोटे बोलावे लागत असेल तर तो माझा पराभव आहे, इ.इ.
बेबी आणि इंदू यांचे चेहरे श्रीच्या खोटारडेपणाच्या आणि जान्हवीच्या तत्त्वनिष्ठेच्या(!) , प्रामाणिकपणाच्या, कथा ऐकताना एकेक मीटरने पडत जातात.

Pages