अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री, कुणाची कार्यकक्षा काय हे आपल्याला काही "वाटण्या - पटण्याने" बदलणार नाही. लिहिलंय की तिथे स्पष्ट, की तिची ती पोस्ट त्या इम्युनिटीमधे कव्हर होत न्व्हती. म्हणून तर आता बदली करून पोस्ट पण रिवाइज केली, जेणेकरून तिची सुटका झाली सुद्धा. अजून कसले डाउट येतायत तुला!!
चला कामाला लागा आता Happy

लिहिलंय की तिथे स्पष्ट, की तिची ती पोस्ट त्या इम्युनिटीमधे कव्हर होत न्व्हती. म्हणून तर आता बदली करून पोस्ट पण रिवाइज केली, जेणेकरून तिची सुटका झाली सुद्धा. अजून कसले डाउट येतायत तुला!!
चला कामाला लागा आता
----- कामाचे स्वरुप बदलले... पण मग आता पुन्हा स्टेट डिपार्ट्मेन्टची परवानगी लागणार नाही का? अगोदरचा विसा हा काही एका कामासाठी होता, आता कामाचे स्वरुप बदलले, पुन्हा विसा साठी अर्ज करावा लागणार असेल तर प्रकरण अजुन समाप्त झाले आहे असे वाटत नाही.
आता या नव्या विसा अर्जाच्या वेळी त्यान्चा मागचा फसवेगिरी चा आरोप असलेला इतिहास बघता स्टेट डिपार्टमेन्ट काय भुमिका घेते हे महत्वाचे.

बदली करुन तात्पुरती मलम पट्टी करतो आहोत असे वाटते, असे प्रश्न निर्माणच का होतात ? IFS अधिकार्‍याना घरात काम करायची सवय नसते का?

उदय,

>> डॉ. देवयानी यान्चे वर्तन आदर्ष होते आणि आहे असे लिहा.

मला डॉ. देवयानींच्या वर्तनात खोट दिसत नाही. संगीता यांचं पारपत्र राजनैतिक आहे तर त्यांना A3 व्हिसाचा अर्ज का भरावा लागतो? १९६३ च्या व्हिएन्ना दूतावास (consular relations) करारान्वये राजनैतिक पारपत्र घेऊन येणार्‍या व्यक्तीस (डॉ. देवयानी आणि संगीता यांना) अमेरिकेचे नियम लागू पडायला नकोत.

आ.न.,
-गा.पै.

आप ल्या देशातल्या अनेक शहाण्यासुरत्या लोकांना कायद्याचा भंग केल्याबद्दल देवयानीबाईंचा नि षेध करावासा वाटू नये, हे आप ल्या देशाचं दुर्दैव!
देशाला रिप्रेझेंट करणार्‍या माणसाला इतकं भान असू नये! देशाला रिप्रेझेंट करत नसाल तरी कायदे पाळायचं कळू नये का? आणि हे असं वागण सपोर्ट करत आपण कायद्या विरुद्ध लढावं? तत्व म्हणून नव्हे, खोटी अस्मिता म्हणून?
खरच वाईट वाटलं वाचून!

जर ती मेड हेर असली, तरीही चुकीचं वागून कोलीत कुणी दिलय?

नो वंड र आपल्या इथे अशी परिस्थिती आ हे! लाँग वे टू गो!

काही महिन्यांपूर्वी कुणितरी मायबोलीवरच्या नोकरीच्या शोधात ग्रूपमधे एका मराठी इंग्रजी दुभाषाच्या कामाबद्दल माहिती दिली होती. हे काम करणारी व्यक्ती अमेरिकेत राहणारी, अमेरिकेची नागरीक आणि सिक्युरीटी क्लीअरन्स मिळवायला पात्र असावी अशी अट होती. मला तेंव्हापासून उगीचच एक प्रश्न पडला आहे. अमेरीकेत राहून मराठी दुभाषाचे काम करण्यासाठी सिक्युरीटी क्लीअरन्सची काय गरज असावी? का ही व्यक्ती फोन संभाषणे ऐकून दुभाषाचे काम करणार होती?
न्यूयॉर्कच्या भारतीय दुतावासात आता काही महत्वाच्या राजनैतिक व्यक्ती ह्या मराठी भाषिक आहेत. हे डॉ. देवयानी प्रकरण झाल्यापासून त्या कामाचा आणि या प्रकरणाचा किंवा हेरगीरीचा काही संबंध असेल का अशी शंका दाटून राहिली आहे.

नानबा,

>> आप ल्या देशातल्या अनेक शहाण्यासुरत्या लोकांना कायद्याचा भंग केल्याबद्दल देवयानीबाईंचा नि षेध
>> करावासा वाटू नये, हे आप ल्या देशाचं दुर्दैव!

ज्या कायद्याचा भंग झाला आहे तो कायदा कोणीच पाळत नाही. कारण तो पाळणं जवळजवळ अशक्य आहे. तसेच तो कायदा डॉ. देवयानींच्या बाबतीत लागू होतो की नाही यावर आजूनही संभ्रम आहे.

आ.न.,
-गा.पै.

अजय, अजून काही गोष्टी अशा समजल्या आहेत, त्यावरून हे प्रकरण हेरगिरीशी संबंधित आहे असंच वाटायला लागलेले आहे.

अजय, गवरमेंटसाठी, डिफेन्स कॉन्टॅक्टर साठी काम करायला सिक्युरीटी क्लिअरन्स लागणारच ना. दुसरे असे की कॉन्सुलेट, एम्बसी म्ह्टले की हेरगीरी गृहित धरायचे. ते अमेरीकन डिप्लोमॅटच्या बायकोचे (Valerie Plame) कव्हर उडवले म्हणून केवढा दंगा झाला होता मध्यंतरी.

अमेरीकेत राहून मराठी दुभाषाचे काम करण्यासाठी सिक्युरीटी क्लीअरन्सची काय गरज असावी? का ही व्यक्ती फोन संभाषणे ऐकून दुभाषाचे काम करणार होती? >> मागे मी काही मराठी देशातून कुरियरने पुस्तके मागवली होती जी बरेच दिवस जर्सीमधे कस्ट्म clearance साठी अडकून होती. जवळ जवळ २-३ महिने पाठपुरावा केल्यावर असे कळले कि त्यांचा दुभाषा सुट्टीवर असल्यामूळे डिले झाला होता. तेंव्हा हे government/federal department असल्यामूळे security clearance लगत असणे सहज शक्य आहे.

कठीण आहे. तिकडे साधी पुस्तके पण दुभाषा येईपर्यंत अडकून बसतात आणि आपल्याकडे मुंबईत बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीर लोकांना 'आधार' कार्ड मिळते. जय हो!

ज्या कायद्याचा भंग झाला आहे तो कायदा कोणीच पाळत नाही. कारण तो पाळणं जवळजवळ अशक्य आहे
>>>
पैलवान , तुमच्या विचारांचा मी विरोधक असलो तरी तुमच्या अभ्यासाबद्दल आदर आहे.पाळणे अशक्य असल्याने कोणीच कायदा पाळत नाही म्हणजे तो मोडण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळतो हे लॉजिक भयानक आहे. मुळात कायदे वैय्यक्तिक , राष्ट्रीय हितासाठी , समाजस्वास्थ्यासाठी आणि सुरक्षेसाठी बनवतात . ते पाळायला अशक्य कसे काय असू शकतात?
आमच्या भारतात श्रद्धेच्या प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोर्टाना नाही असा एक युक्तीवाद (सत्तेवर येईपर्यन्त) करण्याची पद्धत आहे.या मतलबी लॉजिक्च्या जवळपास तुमचे विचार कसे काय आश्चर्यकाररीत्य जुळतात बुवा Uhoh
पुण्यात सिग्नल्चे नियम पाळणे जवळजवळ अशक्य असल्याने ते कोणीच पाळत नाही म्हणून पुणे वाहतूक पोलीस सिग्नलचे तोडायला परवानगी द्यायच्या विचारात आहेत असे नुकतेच समजले. कित्ती छान नै का?

अ‍ॅडव्हान्टेज इब्बू Proud

>> पाळणे अशक्य असल्याने कोणीच कायदा पाळत नाही म्हणजे तो मोडण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळतो हे लॉजिक भयानक आहे.
+१
त्याबद्दल भारताने किंवा इतर कुठल्या देशाने याआधी तक्रार केली असल्यास तसं या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आलेल्या माहितीत कुठे वाचनात आलं नाही.

sorry struggling to type in marathi being new. Point is, has US always respected the law of other nation? Headley involved in killing people on 26/11 and i hope you agree he broke the law then why isn't he prosecuted in India? why US tried to assassinate head of other country like Cuba many times? US can drone in other countries without permission. it can go to Iraq , Vietnam for personal interest . is that not violation to international
law? I don't mean to take side but certainly US should first try to respect rest of the world politically before taking action unilaterally. If I understand the matter correctly, this is not personal matter as this has been code of conduct for indian diplomats in US. US diplomats does have special privileges all across world. Our govt also allowed US citizen to fly after Bhopal gas leak.

finally, politicians and diplomats should shut up giving bites in public on both sides and deal with this case privately and diplomatically. it's in the best interest for both US and India to remain close ally.

>> Headley involved in killing people on 26/11 and i hope you agree he broke the law then why isn't he prosecuted in India?>> अहो पण ह्यात नेभळट कोण आहे? भारत सरकार की अमेरिकन सरकार? भारताला स्वतःच्या देशाच्या नागरिकांची काही पडलेली नाही त्यात आणि अमेरिकन सिटीझन्सची भर का घालताय?

रॉबिनहूड,

>> कोणीच कायदा पाळत नाही म्हणजे तो मोडण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळतो हे लॉजिक भयानक आहे.

तीन युक्तिवाद आहेत.

१. तो कायदा राजनैतिक पारपत्र घेऊन अमेरिकेत आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात न यावा. हे व्हिएन्ना दूतावास नियम (consular relations) करारात नोंदवले आहे.

तरीपण अमेरिकेने तो हट्टाने लागू केलाच तर :
२. तो कायदा पाळायचा झाला तरी तो पाळता येणार नाही. कारण डॉ. देवयानींचे वेतनच मुळी किमान वेतनापेक्षा कमी आहे. त्या नोकराला कुठून पैसे देणार.

त्यामुळे :
३. घरकामास नोकर बरोबर न नेणे हा एकमेव मार्ग डॉ. देवयानींसमोर उपलब्ध आहे. असं झालं तर घरकामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांच्या अधिकृत कामावर परिणाम होईल. हे भारताला परवडेल का?

तुम्हीच सांगा कसा यातून मार्ग काढायचा ते.

आ.न.,
-गा.पै.

गामाजी,
असं झालं तर घरकामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांच्या अधिकृत कामावर परिणाम होईल. हे भारताला परवडेल का?>> भन्नाट केवळ अप्रतिम.

असं झालं तर घरकामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांच्या अधिकृत कामावर परिणाम होईल. हे भारताला परवडेल का? >>>> Rofl Rofl Rofl

बास गापै,
प्लीज, प्लीज ह्यापुढे काही लिहून ह्या कमेंट मध्ये तुम्ही मिळवलेलं क्रेडीट घालवू नका.

२. तो कायदा पाळायचा झाला तरी तो पाळता येणार नाही. कारण डॉ. देवयानींचे वेतनच मुळी किमान वेतनापेक्षा कमी आहे. त्या नोकराला कुठून पैसे देणार.
------ खुप सरमिसळ होते आहे... देवयानींचे वेतन किमान वेतनापेक्षा कमी नाही आहे (अर्थात देवयानी यान्च्या वेतनाचा सम्बध आहे असे मला अजिबात वाटत नाही). देवयानी ६ तास काम करणार, मेड १७-१८ तास काम करणार.

३. घरकामास नोकर बरोबर न नेणे हा एकमेव मार्ग डॉ. देवयानींसमोर उपलब्ध आहे. असं झालं तर घरकामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांच्या अधिकृत कामावर परिणाम होईल. हे भारताला परवडेल का?
------- येथे ९९.५ % लोक घरकाम स्वतःच करतात... घर साफ करणे, बाथरुम, सण्डास तसेच चुल साम्भाळुन व्यावसायात अत्यन्त उच्च पदावर काम करणारे आहेत....
मग देवयानी अपवाद कशाला?

thats exactly my point US diplomat doesn't respect the law of other country.Also country is made up of people and its नेभळट because of its people like you and me Happy

>>US diplomat doesn't respect the law of other country.>> आधी भारतातल्या लोकांना स्वतःच्या देशातल्या न्यायाचा आदर करू द्या, मग दुसर्‍यांकडून अपेक्षा करा.

असं झालं तर घरकामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांच्या अधिकृत कामावर परिणाम होईल. हे भारताला परवडेल का?

पुरणा-वरणाचा स्वैपाक, कुळधर्म-कुळाचार, रोजचं वाटणा-घाटणाचं कुकिंग, शिवाय उन्हाळ्यातली वाळवणं, आंघोळीचा बंब घासणे वगैरे करावं लागत असेल का?

अमेरिकेत घरकामाला लिव्ह इन नॅनी लागत नाही. अगदी नवरा बायको दोघेही खाजगी नोकरी करतात आणी दोन लहान मुले आहेत असे असले तरीही. अतिरिक्त ताण कसला आलाय डोंबलाचा !. आणी हा 'अतिरिक्त ताण' भारताला परवडत नसेल तर सरकारने स्वखर्चाने नॅनी पाठवावी.

sorry I thought by mistake that you are Indian. US prisons are full with people who broke local law. Discussion is about diplomat breaking law on foreign land. US can get away with anything across the world and no one else can't.

बरं मी काय म्हणते, देवयानीबाईंच्या नॅनीचा महिन्याचा पगार ऐकल्यापासून मला तो फारच महाग वाटतोय. त्यांनी मला संपर्क केल्यास मी त्यांना ह्यापेक्षा बर्‍याच कमी पैशांत काम करणारी नॅनी सुचवू शकेन. ज्यायोगे त्यांना ती परवडेलही आणि त्या आपल्या कामावरही लक्ष केंद्रित करू शकतील Wink

विकू , कुणीतरी लिहिलय कि डिप्लोमॅट लोकांना अति काम असत आणि रुटीन वेगळ असत म्हणुन. १५/१६ तास काम करणार्या IT / management workers ना ते नाही कळणार. Proud

Pages