मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगी ??? Biggrin
कित्येक जाहिरातींची चुकीच्या भाषांतरामुळे वाट लागलेली आहे. रंगरेजा या शब्दाला रंगराया हा पर्याय कसा होऊ शकतो? रंगेल राया तरी म्हणायला हवं होतं.... Happy

मुग्धा, रिया, ‌ड्रीमगर्ल..
शेजारणीकडे अतिप्रेमाने पाहणारा ‘राया’ रंगेलच असणार ना? आणि ती रंगी...

परवा सकाळी राजेश खन्ना आणि मुमताजचं "सुनो", "कहो" हे गाणं बघत होतो. ते गाणं संपल्यावर देव आनंद आणि मुमताजचं "हे, मैने कसम ली" हे गाणं सुरू झालं. कन्यका लगेच उद्गारली, "बाबा, तिचा नवरा बदलला".

Uhoh

टिव्हीवर झुम बराबर झुम गाणे चालु होते.सफेद दाढितला अमिताभ बच्चन नाचताना बघुन माझ्या लेकाने(वय ३.५)विचारले " पप्पा साईबाबा का डान्स करताय?"

भाचा लहान होता.. नेहमी व्हिडियो गेम वगैरे खेळायचा.. एकदा आईबरोबर विमानात बसला.. विमान सुरू होताच याचं सुरू झालं....
'आता टक्कर, ह्या विमानाची त्या विमानाला टक्कर. मग धडाम, धुडुम.. मग फायरब्रिगेड... ढिशकँऊ..' वगैरे वगैरे.
शेजारी बसलेला पॅसेंजर बहुतेक पहिल्यांदाच विमानात बसला होता. तो ज्याम टरकला. दोन चार वाक्य ऐकल्यावर त्याच्या आईला म्हणतो, 'बहेनजी .. जरा रोकिये आपके बेटेको.. (असं म्हणताना तो रडवेला झाला होता'..)

धमाल किस्से वरचे.

खुपखुप वर्षापुर्वी, ४थी/५वीतल्या चुलत भाच्याला सिनेमाला घेउन गेलो.
'सिंदुर' का काहीतरी जयाप्रदा-श्रीदेवी चा. त्यात जयाचा मुलगा श्री ला देतात मग घोळ, रडारड व शेवटी श्रीकडेच मुलगा रहाणार, जयाला पुन्हा मुल होणार नाही असा रिपोर्ट, पुन्हा रडारड हे सगळे झाले. शेवटी दु:खी जया घरातुन निघताना चक्कर येऊन पडते असे दृष्य येते तेव्हा सहजपणे भाचा मोठ्याने म्हणाला, 'आता अजुन एक बाळ येणार'. (आणि खरच तसेच होते म्हणा). मी मात्र शेवटचा सिनेमा त्याच्याकडेच अंधारात पहात घालवला.

नवरा बदलला>>> Lol

आता टक्कर, ह्या विमानाची त्या विमानाला टक्कर. मग धडाम, धुडुम.. मग फायरब्रिगेड... ढिशकँऊ..' वगैरे वगैरे.
शेजारी बसलेला पॅसेंजर बहुतेक पहिल्यांदाच विमानात बसला होता. तो ज्याम टरकला. दोन चार वाक्य ऐकल्यावर त्याच्या आईला म्हणतो, 'बहेनजी .. जरा रोकिये आपके बेटेको..>>>> Biggrin

.

.

मोठे कुणीतरी तुमच्या मुलीसमोर याआधी अशा प्रकारचं अनेकदा बोलले असावेत आणि तिच्या कानावर पडलं असेल म्हणुन ती बोलली असावी.
पण लिहिताना तुम्हाला शरमिंदं वाटण्यापेक्षा नकळत तिच्या बोलण्याची भलामण आणि काकाची कशी फजिती झाली असा सूर जास्त डोकावतोय, म्हणुन अरेरे, वाईट.

या किश्श्यावर हसू येणं मात्र विचित्र आहे.

ती नेहमी अशी बोलत नाही ना (आगावपणाने) त्यामुळे कधी तरी बोलली ऩकळतपणे म्हणून आम्हाला हसू आलं Happy

माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा परीचा आणखी एक किस्सा -
ती ऑरेंज खात होती . मी तिला म्हणाले ,' एकटी एकटी खातेयेस होय गं? मला?' तर म्हणाले ,' हे घे आणि तुझे बाबा आले की मला परत पैसे दे'
मग माझी आई म्हणाली,' मला पण दे की आणि' त्यावर ती पटकन म्हणाली,' तूला नको! तुझे बाबा वारलेत! मला पैसे कोण देणार आणुन? ' Proud

.

Pages