फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकांनी स्वतःचे पैसे जाळणे म्हणजे फटाके उडवणे .........

काही लोक सिगरेट रुपी पैसे जाळतात काही लोक फटाके उडवुन जाळतात

>>काही लोक सिगरेट रुपी पैसे जाळतात काही लोक फटाके उडवुन जाळतात<<
हे खरच आहे पण सिगरेट रुपी पैसे जाळले तर त्या व्यक्तिपुरते नुकसान होते.(व्यावहारिकदृष्ट्या) तर फटाक्याच्या प्रदूषणामुळे समाजाचे,पर्यावरणाचे नुकसान होते.

हे खरच आहे पण सिगरेट रुपी पैसे जाळले तर त्या व्यक्तिपुरते नुकसान होते. >>>> सिगरेट मुळे त्याचे तर होतेच त्याच बरोबर त्याभोवती असणार्या लोकांचे सुध्दा होते

खरं आहे. फटाके जाळणे म्हणजे पैशाचा धूर करणेच आहे. त्यापासून मिळणार्‍या आनंदापेक्षा (ज्यांना मिळत असेल त्यांना) त्रासच जास्त आहे. अशी पैशांची राख, धूर आणि प्रदुषण करण्यापेक्षा तेच पैसे जर गरजू व्यक्तीला(उदा. पेपरात येणार्‍या "ऑपरेशनसाठी पैशाची आवश्यकता" अशा गरजेसाठी वापरवा.) किंवा अनाथाश्रम, वृद्धाश्रम, गरीब लोक यांना दिल्यास त्याच्या अनेक मुलभूत गरजा ते भागवू शकतील.

विचार करा! अमलात आणा! Happy

परवा वाचकांच्या पत्रव्यवहारात एक पत्र वाचले होते. त्यात पत्रलेखकाने गेल्या ४-५दिवाळ्यांचे निरिक्षण केले होते. त्याच्या मतानुसार मोठी माणसे व तरुण मुलेच जास्त फटाके उडवतात ते बंद केले तरी प्रदूषण कमी होईल.

आधी केवळ दिवाळीच्या आसपासच फटाके मिळायचे. आता तो वर्षभराचा धंदा झाला आहे. कुर्ला पश्चिमेला फटाक्यांची वर्षभर चालणारी दुकाने आहेत.

आता क्रिकेटची मॅच, वरात, ईद, वाढदिवस अशा अनेक निमित्ताने फटाके फोडले जातात.

फटाके फोडू नका अशी विनंति केल्यास काही जण या उद्योगातून मिळणारा रोजगार बंद होईल असा दावा करतील पण या उद्योगात काम करणारे कितपत सुरक्षित आहेत, अशी शंकाच आहे. त्यांनी तरी आपला जीव धोक्यात का घालावा ?

मी वास्तव्य केलेल्या अनेक देशांत फटाक्यांवर बंदी होती. हिंदु बहुसंख्य असलेल्या केनयातही केवळ एकच दिवस आणि तेसुद्धा ठरवून दिलेल्या मोकळ्या मैदानातच फटाके फोडायला परवानगी असते. दोन वर्षांपुर्वी तर सुरक्षेच्या कारणास्तव तिही नव्हती. या वर्षी तर गरब्यावरही बंदी होती. ( पुर्वी रात्रभर गरबा चालत असे. )

आजकाल शाळांमध्ये मुलांना फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन करतात आणि माझ्या पाहण्यातली बरीच शाळकरी मुलं मुली त्यानुसार वागतात. हे गेली कित्येक वर्षे चालू आहे. ही मुलं पुण्यातल्या नदीकाठच्या शोभेच्या आतषबाजीला पाहण्यासाठी आईबाबाबरोबर जातात. कोणाच्या घरी फटाके जर आणलेच तर ही मुलं आवाज व धूर न करणारे शोभेचे फटाके आणण्याचा आग्रह करतात.

परंतु...

माझ्या घराजवळ आजूबाजूला व्यापारी पेठ आहे. ह्या समस्त भागात वसुबारसेपासून जे (रात्री-बेरात्री, पहाटे, कोणत्याही वेळेला) फटाके वाजवण्याचे सत्र सुरु होते त्याचा लक्ष्मीपूजनाला अगदी कळस होतो. फटाके उडवणारे लोक हे दुकान / शो-रूमचे मालक, त्यांचे नातेवाईक व नोकर असतात. हे लोक त्यांना कितीही सांगितले तरी ऐकत नाहीत. रात्री साडेबारा-एक पर्यंत हजारो फटाक्यांच्या माळा लावणे व परिसर दणाणून सोडणे जोरात चालू असते. लहान मुले - तान्ही बाळे, वृद्ध आणि पाळीव प्राण्यांची स्थिती या काळात दयनीय असते. फटाके उडवायचेच असतील तर शोभेचे, आवाज न करणारे फटाके उडवता येतात. परंतु इथे जास्तीत जास्त आवाज करणारे फटाके फोडण्याची स्पर्धा असते.

ध्वनी वायु प्रदूषण झाले तरी चालेल पण आम्ही फटाके उडवणारच असा वर्ग हा समाजात असणारच आहे. प्रदुषणाचा परिणाम तर सर्वांवर होणार आहे. जे त्यांचे होईल ते आमचे होईल.कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा| भावी पिढ्यांची चिंता आम्ही कशाला करु जे होईल ते त्या त्या वेळी बघतील.आमची पिढी तर आरामात जगते आहे ना! अंधश्रद्धांनिर्मुलनात जसे अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात हे समजावुन घ्यावे लागते. तसेच इथे आहे. गुटख्याच्या वेळी असेच झाले. पण त्याचे परिणाम हे त्या त्या व्यक्तिपुरते असतात. मरु दे ना गुटखा खाउन! समाजाची कीड तेवढीच कमी होईल. कशाला त्यांना समजावयला जाताय? त्यांच त्यांना समजेल त्यावेळी उशीर झाला असेल. असे म्हणणारे लोकही असायचे.
समाज शेवटी व्यक्तींचाच बनला आहे. तोच जर आत्मघातकी असेल तर समाजाचेच त्यात अंतिम नुकसान असते. समाज बदल हा केवळ प्रबोधनाने होणार नाही व केवळ कायद्यानेही होणार नाही. दोन्ही गोष्टींचा वापर होईल तेव्हा कुठे त्याचे बदल दिसू लागतील. सतीची प्रथा हे त्याचे एक उदाहरण आहे.
डॉ दाभोलकरांना जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर यंदापासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करेन एवढे जरी केले तरी खूप झाले.

कोणतेही धोके नसलेली केमिकल्स वापरून फटाके बनवता येणार नाहीत का? काहीतरी पर्याय नक्कीच असेल. अमेरिकेत बॅकयार्ड मधे उडवतात म्हणजे त्या कंपन्यांनी तेवढा विचार नक्कीच केलेला असेल - लोकांच्या काळजीने नसेल तरी किमान लायेबिलिटीच्या भीतीमुळे.

फटाक्यांमधले धोके, तसेच बनवतानाचे ही धोके, बालमजुरी ई. बंद करण्याचे पर्याय शोधून तसे फटाके विकायला कोणी आणले तर बरे होईल. दिवाळीत फटाकेच नाहीत यात काही मजा नाही.

ध्वनी वायु प्रदूषण झाले तरी चालेल पण आम्ही फटाके उडवणारच असा वर्ग हा समाजात असणारच आहे. प्रदुषणाचा परिणाम तर सर्वांवर होणार आहे. जे त्यांचे होईल ते आमचे होईल.कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा| भावी पिढ्यांची चिंता आम्ही कशाला करु जे होईल ते त्या त्या वेळी बघतील.आमची पिढी तर आरामात जगते आहे ना! ................. अनुमोदन

चांगला विषय मांडला आहे . पण परत आपण स्वतः फक्त फटाके न उडवून काही फरक पडणार नाहीये Sad
लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे . पण आजकाल कोण जास्ती फटाके उडवतो याचीही इर्ष्या असते.
कायदा केल्याशिवाय आपल्या इथे कुणी काही ऐकत नाही . खरे तर कायदे करूनही ऐकत नाही . डॉल्बी वर बंदी असतानाही डॉल्बी चालू आहेतच ना ?

लक्ष्य२०१४ | 26 October, 2013 - 19:14

(१) प्राणी रक्तपातमुक्त ईद
(२) वाहतुक कोंडीमुक्त नमाज
याकडे सुद्धा लक्ष द्या की

<<

अगदी अगदी.
हिंदू धर्मिय आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल बोलत असताना, तुम्ही तुमच्या धर्मातील वाईट बाबींबद्दल इथे आवाज उठवत आहात, याबद्दल तुमचे अभिनंदन @ लक्ष्य जे काय असेल ते Happy

आपण नमाजसाठी केलेल्या कोंडीबद्दल व देशातील सर्व रस्त्यांत होणार्‍या कोंडीबद्दलचा विदा, तसेच दोन्ही इद दरम्यान होणार्‍या प्लस प्रत्येक दिवशी खाण्यासाठी होणार्‍या प्राणीहत्येबद्दलचा टनावारी विदा देणार काय?

आपण नक्कीच तुमच्या मागास धर्मातील वाईट रुढी मोडून काढण्याबद्दल प्रयत्न करू. आधी तुम्ही पुढे चला. आम्ही मदत नक्कीच करू.

चला पुढे! लवकर!! चलो, आगे चलो.

>>फटाकेमुक्त दिवाळी कधीही होणार नाही, वाट बघा मियाँ<<
मान्य कि ही आदर्श अवस्था आहे. पण यानिमित्त पर्यावरणाविषयी जागृती तर निर्माण होईल. फटाक्यामुळे होणारे ध्वनि व वायुप्रदुषण हे समाजातल्या काही लोकांसाठी त्रासाचे आहे तर तीच गोष्ट समाजातल्या काही घटकांसाठी ही गोश्ट आनंदाची आहे. याचा समतोल राखण्यासाठी संशोधक पुढे येउन कदाचित पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती होउ शकेल.कायद्याने दिलेली बंधने पाळुन हा समतोल राखण्याचा प्रयत्न होइल. अशा काही गोष्टी झाल्या तरी ती एक प्रगतीच असेल.

याचा समतोल राखण्यासाठी संशोधक पुढे येउन कदाचित पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती होउ शकेल.कायद्याने दिलेली बंधने पाळुन हा समतोल राखण्याचा प्रयत्न होइल. अशा काही गोष्टी झाल्या तरी ती एक प्रगतीच असेल.>>> याच्याशी सहमत. फटाके पर्यावरण पूरक कधी होतील असे वाटत नाही, त्यामुळे अगदी तेवढे नाही तरी निदान प्रदूषण कमी झाले (एमिशन स्टॅण्डर्ड्स असतात कार्सना तसे) तरी खूप फरक पडेल.

कार्ससाठी एमिशन स्टँडर्ड्स असतात तशीच फटाक्यांच्या आवाजावरील मर्यादा स्पष्ट करणारे नियमही आहेत. फटाक्यांच्या कारखान्यांपासूनच या नियमांची अंमलबजावणी करण्यात नोकरशाही अर्थातच नेहमीसारखी तोकडी पडते.
रात्री दहा वाजल्यानंतर आवाज करणार्‍या फटाक्यांना सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. पण काही शूर देशभक्त मंडळी रात्री दहानंतरच फटाके फोडायला बाहेर पडतात.
फटाक्यांचा , विशेषतः आवाज करणार्‍या फटाक्यांचा दिवाळीशी संबंध कधी जुळला हे कळले नाही.
फटाक्याने होणार्‍या वायूप्रदूषणाचा त्रास फटाके फोडणार्‍यांना होतच नाही असे त्यांना वाटते का? अनार, भुईचक्र,फुलबाज्या यांचा धूर पसरलेल्या वातावरणाकडे आपल्या मुलांना सोपवणार्‍या पालकांचे केवळ कौतुकच वाटते.

(१) प्राणी रक्तपातमुक्त ईद
(२) वाहतुक कोंडीमुक्त नमाज

आणखी एक विसरलोच
(३) ध्वनीप्रदूषणमुक्त बांग - हे सुद्धा बंद व्हायला हवे.....काय?!!!

आणि हो, अनेक वाहने किती प्रदूषण करतात. धूर सोडतात. चला सगळे बैलगाडी वापरू.
म्हणजे सोयीचे असेल तिथे हव्या तितक्या गाड्या उडवायच्या, आणि आम्ही मात्र फटाके बंद. करत नाही ज्जा!!!

मोठ्या समजूतदार माणसांनी कितीही ठरवले, तरी जेव्हा शेजारच्या घरातला मित्र रस्त्यावर येऊन फटाके ऊडवू लागतो, तेव्हा वय वर्षे ५ आणी ९ ला नुसते बघत बसणे अशक्य अवघड होऊन बसते हो! आणि ह्या वयात त्याच्यांकडून समजूतदारपणाची अपेक्षा करणे पण जाचकच वाटते मला.

८-९वी असताना कधीतरी मी फटाके ऊडवणं बंद केलं. धाकट्या भावाला मात्र तेंव्हा फटाके हवेच असायचे म्हणून त्याच्यासाठी घरी थोडे फटाके यायचेच. पण मी फटाके उडवण्याच्या वेळी बाहेर येणं पण बंद केलं होतं. त्यानंतर २-४ वर्षांनी फटाके आमच्या घरून नेहेमीसाठी हद्दपार झाले.

सासरी मात्र मोठ्ठं (२०-२५ जणांचं) एकत्र कुटूंब आहे. आम्हा २-३ जावांचा फटाके न उडवण्याचा निर्णय तिथे अल्पमतात जातो. तरी दरवर्षी आम्ही निषेध करत असतो. हल्ली आमची मुलं पण गावी जायच्या आधी फटाके नको म्हणत असतात. पण तिथे पोचलं की त्यांचे काका त्यांना मोहात पाडतातच. पण हळूहळू प्रमाण कमी होतंय. पूर्वीची तासभराची फटाकेबाजी बंद होवून हल्ली २-३ आकाशातल्या आतिषबाजीचे फटाके १०-१५ मिनीटात उडवून संपवले जातात.
यावेळी माझा पोरगा सगळ्यांना सांगतोय आपण फटाके फोडायच्या ऐवजी गुब्बारे फोडूया म्हणून. बघू कोणी ऐकतंय का त्याचं.

Pages