निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोगलगाय ला मारले तर गो हत्येचे पाप नाही ना लागणार? कारण कशीही असली तरीही ती "गाय" आहे ना? Happy

हे कसले झाड आहे. पाने चिंचेसारखी बारीक. पाठी काटेरी. आणि ही फुले येतात. आमच्या ऑफिसच्या समोर आहे. >>>>>>
जागू, ते बाभळी सारखे दिसणारे झाड - या खालील पैकी कुठलेतरी आहे -

Acacia leucophloea - हिंवर

Acacia torta - चिल्लरी

Acacia pennata - शेंबी, शेंबरटी

इतका की फुलं चुकवून चालताच येत नाही. आणि त्या स्वर्गीय सुगंधाबद्दल काय बोलावं?? आहाहा...ह्या अगदी गगनचुंबी वृक्षाची फुलं मात्र एकदम डाऊन टू अर्थ असतात नाही? उमलतात पण धरतीकडे बघत आणि नंतर झेपावतात पण तिच्याच कडे. फक्त इतर फुलांसारखं कोमेजून नाही तर अगदी टवटवीत असतानाच!>>>>>>>>+१ झाडाच्या जवळपास जाताच सुगंध दरवळतो. सध्या दररोज मला ह्याचा लाभ होतोय. पहाटे ह्याची झाडावरची फुले पाहिलीत कोणी? संपूर्ण झाड पाढर्‍या झुंबरांनी भरलेले दिसते. कधी कधी चांदण्याच झाडावर झोके घेतायत असं वाटतं. Happy

<<संपूर्ण झाड पाढर्‍या झुंबरांनी भरलेले दिसते. कधी कधी चांदण्याच झाडावर झोके घेतायत असं वाटतं.<<
व्वा. शोभे! अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. Happy

जागू,
अश्या प्रकारची कमळाची वेणी मी महालक्ष्मीला पाहिली होती. बहुतेक लांब देठाच्या (बुच, मधुमालती इ.) फुलांची अशी वेणी करता येईल.

कोणाला शेवंतीची वेणी करता येते का? आणि मोगर्‍याचे गजरे?
जमल्यास स्टेप बाय स्टेप कृती देऊ शकेल का?

मला शिकायचे आहे वेणी आणि गजरे करायला. पण अजिबातच येत नसल्याने सुई धाग्याने ओवूनच गजरा करावा लागतो. Sad

हे गमभन मला येते शेवंतीची पण वेणी. बाजारातल्या इतका सराईत हात बसलेला नाही पण विणता येते.

गजरा, कदंबाही येतो. हे सगळे माझे आधीचे छंद म्हणा की आवड म्हणा आहे. दाखवेन मी सगळे स्टेप बाय स्टेप. Happy

जागू,
या सर्व कृती सचित्र दाखव, म्हणजे नीट कळेल. पूर्वी आम्ही जिथे राहयचो तिथे खुप तगर, जास्वंद, कोरांटी अशी खुप फुले सहज मिळायची. फावल्या वेळात मग आम्ही त्यांचे हार करुन देवांना घालायचो.

आता गेले ते दिवस! पण अजुनही सणासुदीला दादरच्या फुलबाजारातून सुटी फुले आणून घरीच हार, तोरणे करतो. स्वःत बनवलेला हार देवाला वाहताना मनात जे भाव येतात ना त्याचे वर्णन करु शकत नाही.

जागू,
वेण्या विणायचे कौशल्य गोव्यातल्या बायकांचे बघावे.
शंकासूर, तगर, गुलबक्षी, मुचकुंदाची बाह्यदले, सोनचाफा.. अशा सगळ्याच फुलांना त्या छानच गुंफतात.

गमभन मलाही गतकाळात गेल्यासारखे झाले.
आईने जुईचे झाड लावले होते त्याला टोपभरुन कळ्या यायच्या तेवढ्या कळ्या आई आणि मी काढायचो आणि आम्ही त्याचा भला मोठा कदंबा बनवून सगळ्यांना रोज वाटायचो. अजुनहि ती वेल आहे पण बहर कमी झालाय आता.

तगरीच्या फुलांचे मी ओउन भरगच्च हार करायचे. कधी कधी त्याचे देठ काढूनपण झुबकेदार हार बनवायचे.

पावसाळ्यात प्राजक्ताचे ओउन, देठ काढून हार बनवायचे. तेरडा, लिलि, बुचाची फुले, इतर उपलब्ध असलेल्या सगळ्याच फुलांचे मला हार करायला आवडायचे. तेंव्हा हार-गजर्‍यामध्ये बुचाच्या झाडाच्या पानांना गुंफण्याची फॅशन होती. ती पाने, झिपरी घालून हार, कदंबे करणे मला खुप आवडायचे.

नवरात्रात झेंडू, जंगली घोसाळ्याची फुले, रानभेंडीची फुले ह्यांच्या माळा घटावर सोडायचो.

बुचाच्या वेण्या तर त्या सिझनमध्ये ठरलेल्याच असायच्या.

आमच्या दारासमोर कोळशिंदाचे रान माजलेले होते. काटेरी झाडे सगळी. त्याच्या कळ्या संध्याकाळी काढून आणून त्याचे गुंफुन गजरे करायचे. ते निळे गजरे दिसायला सुंदर दिसायचे.

आमच्या दारासमोर आईने पांढर्‍या कोरंटीची झाडे लावली होती. ती कोरंटी फुलली की त्याचे कदंबे. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर पिवळी कोरंटी असायची. ती फुले गोळा करुन आणायची आणि पांढरी आणि पिवळी असे दुरंगी गजरेही मी विणायचे.

आमच्याकडे बटण शेवंती फुलायची. त्याचा तेंव्हा मला ओउनच गजरा करता ययचा.

डबलच्या मोगर्‍याचाही मी ओवुन गजरा करायचे.

साधा मोगरा, सायली ह्यांचे कदंबेच करायचो. मी गुंफुन जास्त गजरे केले नाहीत कारण मला आणि आईला दोघींनाही त्या जड गजर्‍यांपेक्षा हलके कदंबेच आवडतात.

आमच्याइथे कसली फुले नसली आणि लग्नसराई असली की आम्ही बाजारातून कागड्याची पुडी आणायचो. मग त्याचा प्लेन कधी रंगीत अष्टर घालून मोठे मोठे कदंबे करायचे.

होळीला म्हणजे छोट्या हवलू बायला जी मेन होळीच्या आधी ८ दिवस असते त्या होळीसाठी कधी रिंगणाच्या पाकळ्यांचे तर कधी काटेसावरीच्या लाल पाकळ्यांचे हार करायचे.

मोठी झाल्यावर शेवंतीची वेणी भवानीमातेसाठी शिकले.

खेळण्यात बर्‍याच रानफुलांचे हार करायचे. त्यात सागाच्या चिमटीत राहणार्‍या फुलांचेही हार केले होते.

आताही लग्न वगैरे असेल नात्यात तर मांडवाला बांधायचे टोपलीभर झेंडू, आंब्याच्या पानांचे तोरण मी रात्री बसुन अर्धा एक तासात करुन देते.

ही फुले, हार, गजरे माझ्या जिव्हाळ्याचा विषय लिहाव तितक कमी. पण थांबवते आता Happy

ह्या रम्या आठवणी काढल्याबद्दल ही वेणी. (बाजारातली आहे.)

जागुले किती गोड लिहिलंस हार गजर्‍यांवर !
स्वःत बनवलेला हार देवाला वाहताना मनात जे भाव येतात ना त्याचे वर्णन करु शकत नाही.
+१०० गमभन!
सध्या बागेत दोन प्रकारचे गुलाब, जास्वंदी, कर्दळ, तगर, जाई अशी फुलं आहेत त्याचा मिक्स हार करते देवीला. मस्त वाटतं!...बाकी अमांडा, एक्झोरा इ.इ. नुस्तीच शोभेचीही आहेतच.

मानुषी अग एक्झोरा आणि गुलबक्षी विसरले.

गुलबक्षी तर खुप मनमोहक. त्याच्याही वेण्या संध्याकाळी करायचे. फुले उमलल्यावर. मस्त मंद सुगंध.

एक्सोराची गुच्छातली फुले सुटी करुन त्याची वेणी,कदंबा पण करण्याचा छंद होता.

वा! जागू, किती सुंदर वर्णन केलंस! आणि तो मधुमालतीच्या फुलांचा गजरा काय सह्ही दिसतोय!

शोभे तू अगदी अ‍ॅप्ट वर्णन केलंस हं... झुंबरं किंवा चांदण्याच वाटतात ही फुलं.

येस्स मानुषी, हा वास नवरात्राशी निगडीत आहे.

>इतका की फुलं चुकवून चालताच येत नाही. आणि त्या स्वर्गीय सुगंधाबद्दल काय बोलावं?? आहाहा...ह्या अगदी गगनचुंबी वृक्षाची फुलं मात्र एकदम डाऊन टू अर्थ असतात नाही? उमलतात पण धरतीकडे बघत आणि नंतर झेपावतात पण तिच्याच कडे. फक्त इतर फुलांसारखं कोमेजून नाही तर अगदी टवटवीत असतानाच!>>+१
हे अप्रतिम वर्णन वाचुन माझ्या शाळेतलं ते ऊंच झाड आणि त्याच्या फुलांचा सडा डोळ्यासमोर आला..

जागु,
वाह ! मोगरा,आकाशमोगरा यांच्या फुलोर्‍याबद्दलच्या (आणि गजराबद्दल) या एक से एक गप्पा वाचुन त्यां सगळ्यांचा सुगंध या पानावर दरवळतोय अस वाटतयं Happy

हो शशांकजी बाभळीचाच प्रकार आहे तो. धन्स.
अशाच बाभळीच्या दुसर्‍या एका प्रकारात पिवळी फुलेही दिसली.
DSCN0379_0.JPG
या त्याच्या शेंगा..
DSCN0373_0.JPG
या भवर्‍यांची गर्दी फुलांवर दिसली..
DSCN0377_0.JPG
ही विलायती चिंच आणि या बाभळीमध्ये काही दुरचं नातं आहे का ?
DSCN0345_0.JPG

नमसकार नि ग कर्स.
येथे फारसे यायला जमात नाही आणि मग सगळे वाचता वाचता धाप लागते. वाटते किती काही सुटुन जाते हातातु़न.
जागू, येथे लिहिले नाहि तरी जमेल तसे वाचायचा प्रयत्न करते मी.
खुप आठवण येते बालपणाची.
नोव्हेंबरात भारतात येत आहे आणि जानेवारीत परतणार.
ह्यावेळी, जमले तर नक्की भेटायचे आहे.

कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????
कदंबा म्हणजे काय??????????

जागु, मस्त आठवणी सांगितल्यास. माझ्या बालपणीच्या आठवणीत मी हरवून गेले. आम्ही पण लहानपणी, गुलबक्षीच्या देठ गुंफुन, कोर्‍हांटीच्या कळ्यांच्या वेण्या, आणि घरी शेत केलेल्या झेंडूच्या वेण्या आई करायची आणि बाजाराला निघालेल्या बायकांना वाटायची. आमचीही डोकी भरलेली असायची. (फक्त वेण्या-फुलांनी. :फिदी:)

हो सुमंगल भेटू नक्की.

अनिल ही बाभुळपण आमच्या ऑफिसच्या रोडवर आहे. ही फुलली की छान मंद सुगंध येत असतो.

शोभे तुला ना धिरच नसतो. नुसती ओरडत सुटतेस जिथे तिथे.
हा बघ कदंबा. म्हणजे घट्ट न गुंफता दोन फुले एक मेकांसमोर धरून त्याला गाठ मारत

जागु, धन्यवाद! हा आम्ही पण करायचो. Happy
शोभे तुला ना धिरच नसतो. नुसती ओरडत सुटतेस जिथे तिथे.>>>>>>>>>>>>>काय करणार ओरडल्याशिवाय तु दखलच घेत नाहीस ना? Sad Uhoh Light 1

कदंबा किती सुंदर नाव जागू, आम्ही याला साधा गजरा म्हणतो ( आता लाज वाटली स्वतःची कि इतके सुंदर नाव माहिती नाही आपल्याला ).

जागू, आफ्रिकेतली मधुमालती आणायला पाहिजे तुझ्यासाठी. इथे अंगोलात असते ती फारच सुगंधी असते आणि फुले मोठी व रंगाने अगदी मरुन कलरची असतात.
नायजेरियात असतात त्यांचे देठ खुप भक्कम असतात. त्यामूळे तो गुच्छ वरच्या दिशेने गोलाकार आणि भरगच्च दिसतो. सिंगापूरात मी डबल मधुमालती पण बघितली आहे. मुंबईला बाबूलनाथाच्या देवळात आहे तशी.

Pages