तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलभुत प्रश्न विचारला आहे शाहिरांनी. माझ्या मते या प्रश्नाच उत्तर अस असावं "आले चिमाच्या मना तेथे कोणाचे चालेना"

माधवी, अनघा राजे काय समजुत काढणार मंजिरीची.... मंजिरीला तिच्यावरच संशय आहे आणि आता प्रिया प्रकरण समोर आल्यावर जर अनघा राजे हिला समजवायला गेली तर मंजिरीची खात्रीच पटेल की या दोघांच पण अफेअर आहे म्हणुन...... मंजिरी पण बावळट्ट आहे अगदी जिच्यावर संशय घ्यायला फुल्ल स्कोप होता तिच्यावर आंधळा विश्वास टाकला आणि जी चिमाला फक्त मैत्रीच्या नात्याने बघते तिच्यावर संशय घेतेय........ कधी हिला कळणार आपल कोण आणि परक कोण काय माहित?

मुग्धा.. नको गं डोक्याला इतका त्रास करून घेऊ.. एकदा ती बावळट आहे म्हणून अ‍ॅक्सेप्ट केलेय ना.. आता जाऊदे.. आपण फक्त ती बावळटपणाच्या किती लेव्हल्स पार करते ते बघुयात.

हो ना ग पियु.... पण सांगु का मला मृणाल दुसानीस आवडते, गोड आहे चेहरा त्यामुळे तिला अस काहितरी करताना बघुन अगदी नको नको होत यार. पण तिचा एकुण अ‍ॅपिअरन्सच साधी, सरळ असा आहे, आवाजही फार गोड आहे त्यामुळे तिच्या वाट्याला अलका कुबल स्टाईल रोलच येत रहाणार अस दिसतय

त्या शमिका-अभिच्या सिरियलमध्ये पण ती बावळट च दाखवली होती. आता तूतिमी मध्ये सगळं झाल्यावर मारे कणखरपणाचा आव आणतेय. तिच्या काकाचा रोल करणारा नट बदललाय. होळकर मंजिरीच्या वडिलांना 'बॉस' का म्हणत होता?

कारण आधि होळकर मंजिरीच्या वडिलांकडे काम करत असतो.(काय काम ते माहित नाही)

आता तूतिमी मध्ये सगळं झाल्यावर मारे कणखरपणाचा आव आणतेय.>>अगदी अगदी. ती तिच्या बाबांना म्हणते मला वाटते मी ते घर सोडायला नको होते....काहीही झाले तरी ते शुभ्रासाठी उत्तम बाबा आहेत....(बघा आता! पा घ पाणी!!! )

आता परत किती आठवड्यांचं (की महिन्यांचं की वर्षांचं ) पाणी ह्या सीरियलच्या पानचट रश्श्यात पडलं कुणास ठाऊक....:अओ: Sad :रागः

चुरुचुरु चुरुचुरु ...चुरुचुरु चुरुचुरु Lol

म्हणजे काय अबोली.....आता मंजिरीला एव्हढं वर्षभर छळलन....सत्यजीतला वर्षभर छळलं नाही तर हा मंजिरीवर अन्याव हे.

sonalist: खरंय, श्री. मुधोळकरांचं प्रायश्चित्त आवश्यक आहे. पण ती यडी मंजिरी आधीच विरघळेल.... काही म्हटलं तरी गंगाज वॉटर आहे ती....तरीही मालिकामात्र लांsssssssबेल....

मुधोळकरांचं प्रायश्चित्त आवश्यक आहे. >>हो....त्यात भर म्हणजे प्रियाला तिच्या पापांची सजा, दादाची वाट लागायची आहे त्यामुळे मालिका लांबवायची असेल तर बराच वाव आहे

माझी दोन वर्षाची छोटी 'मंजिरी आली मंजिरी आली ' करत असते ती दिसली की! तोच काय आनंद ही सिरीयल पाहण्यात!

अर्थात मी नेहमीच ही अन अशा सिरीयल्स बघत नाही पण कानाडोळा करून बघावी लागते. Happy

आज सकाळी माझ्या साबांनी अचानक मला विचारल "मुग्धा त्या मंजिरीच्या लक्षात कस नाही आल की ती सीडी प्रियानेच ठेवली असेल सगळ्यांनी बघावी म्हणुन?" मी त्यांना म्हणाले "अहो जिच्यावर संशय घ्यायला फुल स्कोप होता तिच्यावर १००% विश्वास दाखवत होती आणि त्या अनघा राजेबद्दल कारण नसताना संशय घेतीय, एव्हढी बावळट आहे ती..." आमच्या या संभाषणाकडे माझा नवरा Uhoh असे भाव चेहर्‍यावर घेउन बघत होता. संभाषण संपल्यावर त्याच्या लक्षात आल की आम्ही मालिकेतल्या मंजिरीबद्दल बोलत आहोत.... आणि मग नवरा कपाळावर हात मारुन घेत होता आणि मी आणि साबा Proud
खर म्हणजे मलाही सुरुवातीला लिंक लागायला वेळ लागला पण तो काही सेकंदच

>>या सीरीयलचा नाव "तू तिथे मी...." का आहे ??

हे कुत्र्याचं शेपूट कुत्र्याला म्हणतं अशी कल्पना आहे. कुत्र्याचं शेपूट कसं वाकडं ते वाकडंच तशी मालिकेतली सगळी पात्रं आहेत. Angry

आता सत्याची आजी वज्रचुडेमंडित सकलसौभाग्यवती मंजिरीसाहेब सत्यजित मुधोळकरांची समजूत काढायला चालली आहे. एव्हढी समजूत त्या अडवानींची पण काढली नसेल बीजेपीवाल्यांनी.

Lol

म्हणे 'तिला घट पुजाया यावंच लागंल'! काय पण!!
आणि तिच्या पहिल्या वर्षीच्या सणांच्या वेळी कुठे गेला होता हा विश्वास अन् पुळका?
आणि सत्याची आई तर.... हरे राम! कोणि प्रेग आहे म्हटल्यावर लगेच गोग्ग्ग्गोड बोलायला लागते. अरे आवरा!!

मंजिरीला स्प्लिट पर्सनॅलिटी असावी. आधी मेणाहुनी मऊ होती आणि आता कठिण वज्रास भेदू ऐसे अशी तिची गत आहे. काल देवीची आरती पण अश्या चेहेर्‍याने करत होती की जशी देवीवर उपकार करतेय.

स्वप्ना, हो अगदी....हुप्प करून उभी होती मंजिरी काल....मला वाटलं आरती झाल्यावर मुधोळकर गाणंच म्हणतील,"नॉकॉवरच्या रॉगॉला औचद क्कॉय, गॉलावरच्या फुग्यांच म्हॉण्ण तरी क्कॉय"

भगिनींनो.............
मालिकेचे जेमतेम २ भाग बघितले असतील मी पण इथली चर्चा मात्र चुकवणे शक्यच झाले नाही ...... Lol Proud
<<आमच्या या संभाषणाकडे माझा नवरा अ ओ, आता काय करायचं असे भाव चेहर्‍यावर घेउन बघत होता. >>
Biggrin

स्वप्ना............. ___/\___ Lol
अबोली ...... Biggrin

Pages