मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "चारोळ्यांच्या भेंड्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 07:49

Charoli-4.jpg

गणपती बाप्पा मोरया!

चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!

मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!! Happy

१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -

तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..

आणि सो ऑन...

खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही भेटले तुक्याला
नाम्याचीही नाही भेट
द्वारवंटी उभी अंजू
देवा आता येई थेट... Happy

भरत, इब्लिस, साजिरा, मेधा, स्वाती सुंदर चारोळ्या!! मजा आली.. एखाद्या आयोजित मैफिलीत आल्यासारखं वाटलं. वा वा!

सॉरी आशूडी...

शापित सार्‍या उनाड वाटा
रेतीवरल्या भ्रामक लाटा
अंतर काही कापत नाही
काळीज चिरते जाता जाता!

अजून गंध तुझा दरवळतोय अंगभर
मेंदीचा सुवास बांगड्यांची खळबळ
नाजूक पारिजाताला जीवाभारी
पहाटवार्याची हलके सळसळ!

सोड नाद हा खुळ्या स्वप्नाचा,
विठोबाच्या पायी
कळे अर्थ जीवनाचा.

माझ्या प्रीतफुला ,
प्रीत जागवू मधुरतेचि ,
ठेवू साक्ष सागराची
भव्य ,दिव्य ,स्वप्नांची I

माझ्या प्रीतफुला ,
प्रीत जागवू मधुरतेचि ,
ठेवू साक्ष सागराची
भव्य ,दिव्य ,स्वप्नांची I

कर जुुळती दिव्यत्वापुढती
प्रकाशालाच सारे पुजती
संपता तेलच दिव्यातले
ज्योती लपती मुक्याच वाती

लपतील कोठे भूमीवरीही,
अपराध्याला भितीच जगती,
आता सुटले, तरीही त्यांना,
देवाघरी नसते मुक्ती.

अन्जु अंकुरीची बाद कारण तिच्या पहिल्या ओळीत ' हिरवाईवर अंथरती' यातलं काही आलेलं नाहीये Happy

मी आधीच्या चारोळ्या अजुन वाचल्या नाहीयेत,..... आत्ता हे लक्षात आलं म्हणून सांगितलं Happy

हो रिया, मीपण परत नियम वाचले त्यात शेवटच्या ओळीत असलेले शब्द असेच लिहिलेय. अन्कुरीची चारोळी बाद असली तरी छान आहे. तूपण छान लिहितेस रिया.

थँक्स अंजू Happy
पण मी इथे नाही लिहिणार जोपर्यंत कोणी अडत नाही तोपर्यंत Happy

तुम्ही खेळा पुढे Happy
नियमानुसार शोभातैचीही चारोळी बाद ठरते पण कोणी पुढे लिहीत नसेल तर त्या चारोळीपासुन पुन्हा सुरुवात करा Happy
मन झाले शांत-निवांत.
किंवा
मुठ उघडूया मदतीची.

यातलं काही तरी घेऊन लिहा

प्राण हवेत विरला तरी,
ती मुळीच हरली नाही.
तिने केलेल्या कार्याने,
देश तिला विसरणार नाही.

विसरणार नाही म्हन्जे काय?
आठवण तरी कुठे येते
जीवामागून जीव जातात
आमची फक्त यादी वाढते..........

Pages