मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "चारोळ्यांच्या भेंड्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 07:49

Charoli-4.jpg

गणपती बाप्पा मोरया!

चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!

मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!! Happy

१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -

तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..

आणि सो ऑन...

खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ने भिजर्‍या डोळ्यांआड
तरंगतात पण वहात नाहीत
सख्या अताशा माझे ऋतू
तुझी वाट पहात नाहीत!!!

डोळे वाटेकडे वळतात,
मन भूतकाळात हरवत,
आठवणींचे चित्रपट पहात,
मन माझं हरवून जातं .

हरवून जावं वाटतं खरं
पुन्हा जुन्या आठवणींत
बाहूल्यान् रिबिनीन् गोट्यान् खडे
बोचकं जपलंय वळचणींत...!

सॉरी... अंजलीचा प्रतिसाद पहायच्या आधीच माझा पडला. माझा प्रतिसाद डिलिट करू का आता?

मन म्हणजे ओला भिरभिर
झाडांमधला खटयाळ वारा
मन म्हणजे पागोळ्यांच्या
शिरशिर रेशीम पाऊसधारा..

जे तुला हवे , ते मलाही ठावे
तरीही आपण गप्पच का रे
कारण अजून तसेच तर आहे
मनातलं ओठावर यायला वेळ लागतो

ओठ विलगले तुझे जरासे
अन शब्दवेली उमलून गेल्या
न समजूनही मजला काही
डोळ्यांच्या कडा मात्र ओलावून गेल्या

डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा,
सांगतात काही बघ तुला,
क्षणभर तरी थांब माझ्यासाठी,
माझ्या प्रीतफुला.

Pages