मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "चारोळ्यांच्या भेंड्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 07:49

Charoli-4.jpg

गणपती बाप्पा मोरया!

चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!

मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!! Happy

१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -

तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..

आणि सो ऑन...

खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिकविलेस तू मीठ घासभर
अभिमानाचा खचला पाया..
कुठचे संकेत, कुठचे दावे,
कुठची नाती, कुठची माया!

(चालवून घ्या)

"सत्य नसे, ही नुसती माया
रमता येथे जासी वाया"
इतुके बोलुन स्वामी गेले
पोळीसह बासुंदी खाया

(चालवून घेताच आहात तर... :P)

सहवासाचे मोल कसे सांगावे
जो अनुभवेल त्यालाच कळावे
माबोवरिल काव्यपुरात बूडून
पवळ्यानेही पांढर्‍यावर काळे करावे Happy

अंधारत तिळातिळाने काळा कालिंदीतीर
गवतात हले काहीसे, राधेचा सुटतो धीर
हसतात दूरचे दीप, हासतो जवळ वनमाळी
वेढावी तितुकी निसटे हातून ओढणी काळी

व्वा ! भरतजी, स्वाती , मस्त चाललीय जुगलबंदी अन साजिर्‍याचे ,इब्लिसचे अँटीक्लायमॅक्सेस. मजा आली. स्वाती, >>वेढावी तितुकी निसटे हातून ओढणी काळी >> अप्रतिम.

चारोळ्या आवडल्याचं आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद. Happy

रोज खटला चालतो उशापाशी
आणि जाते अवसान रोज फाशी
उद्या शेळीगत जगायचे ठरते
पहाटेला पण सर्व ते विसरते!

स्वाती, ट्रॅफिक जॅम Happy
पहाट वारा सागरसाथ
देहावरती मस्त प्रमाथ
नि:श्वासांची शिल्पे कोरत
एकटीच मी इथे धुक्यात

बापरे ४ पान झाली?

कवि होणं तसं सोप आहे
असं असतं तसं नसतं
लिहित जायचं नुसतं
जग हसतं, नाही तर फसतं

Pages