मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "चारोळ्यांच्या भेंड्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 07:49

Charoli-4.jpg

गणपती बाप्पा मोरया!

चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!

मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!! Happy

१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -

तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..

आणि सो ऑन...

खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लीलया पाककृती येती भरभर
नेहमीच्या प्रतिक्रियांची भरती
माबोवर फोटो झळ्कती सुंदर
जेवणात मात्र असेल मनोहर !

:दिवे:

आधीच मर्कट तशात मद्य प्याला
तशात तयाला विंचवाने दंश केला
कसे आवरावे त्याला कुणालाच कळेना
आसाराम नावे पृथ्वीवर ख्यात पावला..

हे कायच्या काय..

आहे मनोहर तरी गमतो उदास
कळेना कसा विसरलो लोणच्यास
जौद्या! ढकलतो मुखी दोन घास
पळतोच अन् मग चहा ढोसण्यास

Proud

चुलीवर उकळतो तो चहा
कळकट लुंगीवालाही तोच हा
चहाच्या पार्टीत दुपारच्या पारी
रोजच त्याला बघतोच हां!

चहा घेऊनी आला
कळकट लूंगीवाला
त्याबरोबर खायला काय-
आज दुपारच्याला?

शुगोल, लाला टांगेवाला आठवला वाटतं. Proud

माझी एक जुनी वात्रटिका आठवली तीच टाकते.

दुपारच्या झोपेच्या वेळी खणखणतो यांचा खलबत्ता
भलत्या वेळी दार ठोकुनी विचारती जन यांचा पत्ता
चहात त्यांच्या साखर अमुची, विडीस त्यांच्या अमुची काडी
उसनवारिची हद्द, तयांच्या लेंग्यामध्ये अमुची नाडी!!

नाडीवाले वैद्य , वैद्य गल्लेवाले
वैद्य माणसांचे, वैद्य औजारांचे
वैद्य व्यायामाचे, वैद्य आहाराचे
इथे भरले सगळे वैद्य सल्लेवाले Happy

इथे प्रत्येक फ्लॅट्चं दार बंद
अन प्रत्येकजण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र
आयहोलमधून पाह्ण्याचा छंद आहे!

स्वप्ने केवळ दिसती रात्री?
कंबख्त मग ती कसली संत्री!
दिवसा जी दाखवील तारे
तिचीच वाटे मजला खात्री!

Proud

कविता कधी लिहीणं सोडा, वाचलीही नाही. पण एका प्रतिभावान कवीचा चारोळ्यांच्या धाग्यावर होतो म्हणून दोन पैसे लावतोय Proud

आता उघडू वाटे बाफ
आता दवडू थोडी वाफ
शब्द असे कि जळते बाण
काळीज धसते लागे धाप

या संत्र्याची महती न्यारी
पहिल्या धारेची नागपुरी
रात्री घ्यावी किंवा दुपारी
उडतो पायलट अधांतरी

खटोबा, आपण भेंड्या खेळणे अपेक्षित आहे. थोडी वर नियमावलीकडे नजर टाका Wink
विस्मया यांची चारोळी बाद असावी असा माझा अंदाज आहे.
पण असो. तुमच्या पासून पुढे सुरू ठेवू.

मा़झी का बरं एण्ट्री बाद ?

काळीज धसते लागे धाप

या ओळीतला लागे हा शब्द घेतला होता. त्या दरम्यान दुसरी चारोळी आली असेल.

ओह. मग ठीकेय.
**

सुटकेचा आटापिटा
गाठ पडे ठका ठका
जेठमलानी आला धावून
बापूला ये जोर फुका..

बापूंच्या खांद्यांवर
सनातन ओझे
विसर्जन मिरवणुकीत
बुद्धाचे रोजे..

( हलके घ्या लोक्स. बुद्ध म्हणजे क्षणस्थ कुणीपण Wink )

Pages