मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "चारोळ्यांच्या भेंड्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 07:49

Charoli-4.jpg

गणपती बाप्पा मोरया!

चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!

मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!! Happy

१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -

तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..

आणि सो ऑन...

खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी कशाला साजिरा? मी, तुमच्यासाठी आणि स्वातीसाठी फुल्टॉस द्यायचं काम करतोय. नाहीतर तुम्ही लोक कधी लिहिता?

मग कळू लागल्या तार्‍यांच्याही कक्षा
मग अमर्याद दर्याचे दिसले काठ
मग डोळ्यांमधली इंद्रधनुष्ये विझली
घेतले जुंपुनी आयुष्यास मुकाट

(आधी मयेकरांच्या ओळीतले 'आहे' घेतले होते. नवीन चारोळी आल्यावर 'मुकाट' घातले. आता हा विनय नसून क्राफ्ट आहे. :फिदी:)

Lol
तरीच दोन मिनिटांच्या आत कॅन्व्हास मुका झाला. Proud
(आणि मी विनय मयेकरांचा म्हणत होते..... :P)

हो हो. मयेकर मूळातच विनयी असल्याने संशय आलाच होता. पण तरी आता सवय झाल्याने संशय आला. म्हणजे नव्याने आला. Proud पुढे चला. मी केवढं स्टफ दिलंय. ब्रश, भांडे (/भांडं), वंचना, नि. नाहीतर कसल्या तुमच्या लास्ट ओळी. ह्याऽऽ.

(घोर) वंचना अशी जाहली,
पॅलेटची पाऽर चवच गेली..
समोर मांडली "फीस्ट" "मेस"ची
लोणच्याची बाटली, रूमवर विसरली..

स्वाती, तुमची रचना वाचून इंदिरा संतांची 'अजंठा' आठवली.
कवितेचा शेवट-
आणि हात मोजू लागतात
तीन कप पाणी
सहा चमचे साखर
असा काहीसा आहे.

हो का? पूर्ण कविता हाताशी असेल तर शेअर करू शकाल का? Happy

>> तोवर इंदिराबाई चहा करतायत, तो घ्या.
Lol

'त्या' बाईंनी चहा सोडा, चरणांचे तीर्थ दिले तरी भरून पावलो म्हणावे वाटते बर्‍यांचदा..
पण ते असो.
चहा पिऊन भर्पूर भुका मारल्यात आजवर.. अगेन ट्यांजंट.
आलोच जेवण करून

>>btw, this response was a total deja vu <<

चित्रे गुरू असल्यावर अस्लंच भंपक कायतरी होणार. अ‍ॅडमिनला सांगून फायदा नाही

'ऑफ व्हाईट ला नावं ठेवताय? चित्रेंना स्मरून 'वेदना-ऑफ-व्हाईट-कलर' वर करून दाखवा चला. Proud

आहा!
साजिर्‍या, पप्पी दे दो म्याण!

वेदना होईलच, जर तीनदा उन्मुक्त झालो
"मुक्तते"साठी तळमळून मित्रांची गादी उस्कटलो..
मित्र, गादी, गादी की मित्र, अनेक राजे गादीवर बसले,
वेदना सहन करीत 'दोस्तीची कस्म' निभावले?

बाप्रे इब्लिस, आज नाईट मारावी लागणार दिस्तंय. बाकी कुठंही (नेहमीच्या अड्ड्यांवर) जात नसाल तर आहे आपली तयारी Proud

निभावलेस कसे सांग एकदा सारे
चुलीस पेटत्यास घातले किती तारे
किती दळून पीठ काढलेस स्वप्नांचे
तरी पिलांस शिकविले उडावया का रे?

Pages