मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "चारोळ्यांच्या भेंड्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 07:49

Charoli-4.jpg

गणपती बाप्पा मोरया!

चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!

मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!! Happy

१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -

तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..

आणि सो ऑन...

खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पत्र सांगते गुज मनीचे'
मस्त पाकृ करुया
हायकू झाले, प्रचिही झाले
आता चला चारोळ्या रचुया
Lol
उगाच काही च्या काही Proud

_________________________
अर्र्र्र्र! हे बाद आहे!
तरीही ठेवते Proud

भावना खेळतात लपाछपी
मनाचा कप्पा ओलावतो
तुला मात्र नेमक्या सापडतात त्या
हा 'धप्पा' मला हेलावतो

_________________
पुन्हा बाद!
मी खेळतच नाही बुवा Sad Proud

तरी करतोच आहे काळजी चिमण्या कळ्यांची
जरी डसण्यास आले स्पर्श शिशिराचे मुळांशी
सुकाया लागल्या शाखा, पिकाया पानजाळी
उरी कवळून आहे स्वप्न हिरवे पावसाळी

पानगळीतुन हिरवे फुटते
नियम निसर्गाचा अतूट
शिशिराच्या मिठीत शिरता
आधी रंगांची लयलूट..

****
खपवून घ्या..

रंगू माजे रंगू कधी येशील घरी?
साठ्ली किती भांडी जरा बगशील तरी?
चायपानी देते, गडे आटप धुणी
तुज्याबिगर हात्! जिनगानी सुनी!

Proud

..

सुनीच्या जिनगानीत आला सुन्या
ष्टोरी का व्हिलन सुनीका बापू बन्या
दिवस महिन्याचा हिशोब सांगी कन्या,
धूमधडाक्यात लगीन लावले, बन्याबापू का पोपट बन्या

(एडीटः व्हिलन ऐवजी बन्याबापू टाकलाय शेवटल्या ओळीत.)

Rofl
__/\__

नवीन पोपट जुनाहि झाला
आता फेमस रिक्षावाला
बाप्पा गेले जरि गावाला
विसरतील ना या त्रासाला

Proud

रंगात रंगूनी रंगीत झाली झाडे
अन पानफुलांची रंग ल्याली कवाडे
तो पाहून त्यांना हसतो स्निग्ध असा की
>>
अभिसारिका मी, वाहवले त्याजकडे

विसराल ना, या त्रासाला?
पोपट रिक्षा फेव्हिकॉलला.
पण पुढल्या वर्षी लौकर यावे,
माफ कराव्या मर्कट लीला !

इब्लीस छान केलीत पूर्ण तुम्ही.. आवडली.. Happy

फक्त इथे तो" मी सर्वेश्वर किंवा देव या अर्थाने घेतलेला इतकासाच फरक.. Happy

Pages