मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा ३. सेव्ह द अर्थ

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:11

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्ट थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.

STY-KaCha-Chaitanya.jpg

लेखकः कवठीचाफा

कथा: सेव्ह द अर्थ

साल : ३०२२

स्थळ : सर्व्हाइवल आयलंड

तात्पुरत्या उभारलेल्या त्या तळावरची सगळी तयारी पूर्ण झालेली होती. काही तासांनीच ती टीम एका अतिमहत्वाकांक्षी मोहिमेवर निघणार होती. योजना होती `सेव्ह द अर्थ'. २०२५ च्या जागतिक महायुध्दानंतर एकवटलेल्या उर्वरीत पृथ्वीवरच्या समस्त मानव जमातीनं घेतलेला एक धाडसी निर्णय. शेवटी त्यांनाही काहीच पर्याय दिसत नव्हता. प्रमाणाबाहेर खनिजांचा उपसा, कारखान्यांनी केलेलं प्रदूषण आणि गेल्या शतकांतली अणुयुध्दे यांच्यामुळे रहाण्यासाठी कशीबशी सापडलेली ही सर्व्हाइवल आयलंड सोडली तर पृथ्वीवर कुठेच जमीन म्हणून शिल्लक राहिलेली नव्हती. या बेटांवरचं संख्याबळही घटत घटत काही हजारांवर येऊन ठेपलेलं होतं. वातावरण विरळ होत चाललेलं, जमिनीतून हिकमतीनं काढलेल्या खाण्यायोग्य पिकांचं प्रमाण कमी होत चाललेलं.

सगळ्या परिस्थितीतून एकच आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे काळजीपूर्वक आखलेली समस्त मानवजातीची ही शेवटची मोहीम. मोहिमेवरच्या लोकांची निवडही तशीच काळजीपूर्वक करण्यात आलेली होती. एसइव्ही असं अर्थहीन नाव धारण करणारे अणुशास्त्रातले महारथी, काली हे प्राणीशास्त्रातले शास्त्रज्ञ, वैशयन रसायन शास्त्रातले, एस्-यू हे पदार्थ विज्ञानातले, वेद हा भूशास्त्रातला, मांडील्य हे खगोलशास्त्रातले, मनू हे उत्क्रांती विज्ञानातले, नील हे स्थापत्यशास्त्रातले आणि डेव्ह हा त्यांचा मार्गदर्शक, संरक्षक अशा भूमिका निभावणारा अंतराळवीर असे निवडक लोक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री यांच्यासह काही तासांनी मोहीम सुरू होणार होती. `सेव्ह द अर्थ'- एक महत्त्वाकांक्षी कालप्रवासाची मोहीम.

तिसर्‍या महायुद्धानंतर कित्येक वर्षांपासून ही कल्पना चर्चेत होती. मानवाला होणार्‍या भविष्यातल्या विनाशाची पूर्वकल्पना देऊन सावध करणं, त्यासाठी उलट्या दिशेने कालप्रवास करून त्याच्या अप्रगत काळात जाऊन त्याला प्रशिक्षित करणं. याकरिता कालावधीची निवडही झालेली होती.

सगळीच यंत्रणा एका भल्यामोठ्या यानावर बसवण्यात आलेली होती आणि अर्थात त्यासह कित्येक कोटी वर्षाचा कालप्रवास करण्यासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा एसइव्ही यांच्या प्रयोगांतून अणूंचे विभक्तीकरण करून मिळवण्यात येणार होती.प्राथमिक गरज भागवण्यासाठी शिल्लक राहीलेल्या अण्वस्त्रांच्या वॉरहेडमधल्या प्लुटोनीयमचा वापर करण्यात येणार होता. कदाचित त्यामुळे ही शिल्लक राहीलेली मानवजात धोक्यात येण्याची शक्यताही होतीच पण यश मिळालं तर .... कल्पनातीत समृध्दी.

डेव्हनं यथायोग्य सेटींगवर शेवटची नजर टाकली आणि उरलेल्यांना इशारा केला. सगळ्यांनीच आपापल्या जागा घेतल्या, कालींनी त्यांनी प्रयोगशाळा पुन्हा तपासून घेतली अणि सिध्द असल्याचा इशारा केला.

प्रचंड थरथराट.. जमिनीवर कित्येक मैल लांब उभे राहून आपापल्या संरक्षित घुमटातून पहाणार्‍या उर्वरित लोकसंख्येलाही थरकाप भरवणारा प्रचंड थरथराट, क्षणोक्षणी वाढत जाणारा. लगेच काही मिनिटांनंतर समोरच्या तळावरून अकस्मात एक ऊर्जेची लाट सरसरत निघून गेली आणि त्यातून सावरेपर्यंत तळ रिकामा झालेला.

'सेव्ह द अर्थ' ची टीम तिच्या कार्यावर निघून गेली होती.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

काय झालं पुढे ? ते त्यांच्या कार्यात यशस्वी झाले का ?

-------------------------------------
नियमावली :
१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल, पण पटेल असा असावा. शेवट १८ सप्टेंबर २०१३ला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ पर्यंत व्हावा.
२) आपले शास्त्रज्ञ समंजस आहेत, त्यांना उगीच भांडायला लावून अपघात घडवू नये, इतर कारणानं घडलाच तर सगळ्यांना एकदम मारून शास्त्रज्ञांचा आणि पर्यायानं कथेचा शेवट करू नये. स्मित
३) शास्त्रज्ञ किमान एकदा तरी परत त्यांच्या वर्तमानकाळात आले पाहिजेत, मग परत भूतकाळात गेले तरी चालतील.
४) कथेत मानवी इतिहासाचा वापर केला तर उत्तम
५) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
६) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
७) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
८) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

कवठी चाफा,

>>त्यासाठी उलट्या दिशेने कालप्रवास करून त्याच्या अप्रगत काळात जाऊन त्याला प्रशिक्षीत करणं. याकरिता कालावधीची निवडही झालेली होती.

या कथेचे STY ? देवा...!!!! हे असामी कंपनी च काम नाय... ईथे आश्चिगच हवा.... Happy
~D
[पेक्षा मूळ कथा तुम्हीच पूर्ण करा... वाचायला आवडेल.]

आता या प्रवाश्यांची थोडक्यात ओळखः ( म्हणाजे स्टिरिओटाइप करायला बरे पडेल Wink )

मांडिल्य, मनू (उर्फ मनकर्णिका) आणी वैश- भारतीय,
डेव्ह आणि सु (उर्फ सुझन - स्त्री) अमेरिकन ,
नील जर्मन, सेव हा फ्रेंच, वेड हा ब्रिटिश..
लास्ट अँड बेस्ट - का ली ही सुबक ठेंगणी चायनीज सुंदरी होती!

तर हे यान जायचे होते २० व्या शतकाच्या सुरुवतीला, अमेरिकेत. पण झाले काय डेव्ह अन सु चे आपापसातच काही खुसुर फुसुर सुरु होते त्या डिस्ट्रॅक्शन मधे सेटिंग भलतेच झाले!!
यान गेले ६००० वर्षापूर्वीच्या काळात... अन उतरले एका मोठ्या नदीकाठी...
अ‍ॅमेझॉन.. ? जरा साउथ ला अलो वाटते ! - मनू उद्गारली.
डॅव्ह - नोप! आजूबाजूला वाळावंटी भाग आहे... धिस इज नाइल मॅन!! वी आर सो लॉस्ट!
ते इजिप्त! लांबवर पिरॅमिड बांधण्यचे काम चाललेले दिसत होते!! स्फिन्क्स!
अवाक होऊन मंडळी तो जगातले आश्चर्य मानला गेलेला लँडमार्क बघायला जवळ गेले....

काम शिस्तीत चालले होते एकदम. बांधकामाच्या जवळ च एक तात्पुरते ऑफिस उभारले होते. त्यात खजुराच्या झाडाच्या खोडाचा वापर करून क्युबिकल्स, ऑफिस फर्निचर होते, फ्रन्ट ऑफिस ला एक सुंदरी कर्ण्यासारख्या यंत्रात कुणाशीतरी बोलत होती.... मागच्या काही ऑफिसेस मधे पण तसलेच कर्णे होते (म्हणाजे तेव्हा फोन होते??!!) , शिवाय अ‍ॅबाकस सारखी दिसणारी बरीच यंत्रे होती, कॉम्प्युटर्स ?? (नक्कीच , कारण ती मुख्यतः भारतीयआणि चायनीज दिसणारे कर्मचारी चालवत होते )
काही गोरे लोक एका दगडाभोवती गोल बसून चर्चा करत होते ( जबरी मीटिंग चालू होती?!)
प्रत्यक्ष साइट वर मोठे मोठे दगड लेझर स्दृश उपकरणाने लोण्यासारखे कट होत होते !! (अ‍ॅ? आणि आपण समजलो कुणी एलियन्स ने हे केले असावे!!)
मेक्सिकन, अफ्रिकन अमेरिकन दिसणारे मजूर बांधकाम , सफई कामगार होते .. ( सो फमिलियर हां ???!) ..
साहजिकच हे सर्व बघून आपले भविष्यातून आलेले पब्लिक चाट पडले ( धिस लुक्स फमिलियर ?!) अरे आपण इतिहासात शिकलो ते सगळे इतके वेगळे ? का ?? मग खरे काय घडले ???
इथे भूतकाळात जाऊन आपण इतरांना शिकवणार आहोत की तेव्हाचे लोकच आपल्याला धडे शिकवून परत पाठवणार आहेत ??? इथे जरा थांबून तर पाहू , सर्व जण कबूल झाले!!
इतक्यात एक मोठी लांबच लांब (लिमो सदृश ? ) उंटगाडी येऊन थांबली ... गाडीतून आधी चार सिक्स पॅक वाले गार्ड्स उतरले, त्यांनी सिक्युरिटी ओके दिल्यावर गाडीची दारे उघडून धरली .... त्यातून सोन्याने मढलेलापण लांडा स्कर्ट घातलेला एक मनुष्य आणि त्याच्या मागून तसेच जास्त दागिने पण कमी कपडे घातलेली एक अप्रतिम सुंदरी उतरली ....
डेव्ह अन सू त्यांची श्रीमंती बघून वॉव मॅन ! म्हणाले. सेव जन्मजात फ्रेन्च रोमॅन्टिक माणूस! तिला बघूनच प्रेमात पडला. का ली तिची पॅडिक्युअर केलेली सुबक पावले, घोडागाडी चे चित्र असलेली कातिल हॅन्डबॅग (आँ ? कोच बॅग ?) अन नेल्स बघून दाद देऊ लागली तर वैश ने तिची कॅटवॉक चाल बघून शिट्टीच मारली, मनूने तिच्या अति दागिने अन भडक मेकप बद्दल तीरकस कमेन्ट केली.... .....अन मांडिल्याने तिच्या कमी कपड्यांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. . !

Happy Proud

अन मांडिल्याने तिच्या कमी कपड्यांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. . ! Lol

मैत्रेयी, किती कल्पक आहेस गं.. भारी करतेयस कथाविस्तार Happy

इतक्यात एक मोठी लांबच लांब (लिमो सदृश ? ) उंटगाडी येऊन थांबली ... गाडीतून आधी चार सिक्स पॅक वाले गार्ड्स उतरले, त्यांनी सिक्युरिटी ओके दिल्यावर गाडीची दारे उघडून धरली .... त्यातून सोन्याने मढलेलापण लांडा स्कर्ट घातलेला एक मनुष्य आणि त्याच्या मागून तसेच जास्त दागिने पण कमी कपडे घातलेली एक अप्रतिम सुंदरी उतरली

>> त्या सुंदरीचे लक्ष ३०२२ मधून आलेल्या प्रुथ्वीवासीयांकडे गेले तसे तिच्या चेहर्‍यावर अस्फुट हसू उमटले. सोन्याने मढलेलापण लांडा स्कर्ट घातलेला एक मनुष्याच्या खांद्याला स्पर्श करत तिने त्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. नजरेने खूण करत तिने त्याला ३०२२ ची मंडळी दाखवली. त्याच्याही चेहर्‍यावर प्रसन्न हसू फुलले. त्या दोघांमधे छोटासा संवाद झाला. त्याने वळून बाजूच्या सिक्स पॅक क्रमांक १ ला खूण केली नि तो वगळता बाकीचा सगळा लवाजमा बांधकामाच्या जवळच्या ऑफिसच्या दिशेने चालता झाला. सिक्स पॅक क्रमांक १ मात्र ३०२२ मधून आलेल्या प्रुथ्वीवासीयांकडे पोहोचला.

तो जवळ येताना पाहून सगळ्यांना 'be careful' असे म्हणत डेव्ह पुढे झाला. 'be careful' म्हणतानाही त्याचे डोळे सू वर लागले होते हे मनू नि का ली च्या चाणाक्ष नजरेनेतून सुटले नाही. आपल्या दिशेने चाहलत येणार्‍या सिक्स पॅक क्रमांक १ ला चालताना पाहून डेव्हला काही तरी खटकत होते पण ते नक्की काय ते सिक्स पॅक क्रमांक १ जवळ आल्यावर त्याच्या लक्षात आले.
"Oh My God, I can see through him. It's hologram"
"Look at the way it's moving, It's hologram of a robot" त्याच्या पाठीमागे उभा असलेले सेव आणी सू एकत्र ओरडले.
सिक्स पॅक क्रमांक १ डेव्हकडे बघत काहितरी म्हणाला. ते काय आहे ते कोणालाच समजले नाही.
"We are here in peace" डेव्हमधला संरक्षक जागा झाला.
सिक्स पॅक क्रमांक १ परत काहितरी अगम्य बोलला.
कोणी इतर काही बोलायच्या अगोदर, मनू पुढे आली. तिच्या हातात Tablet सद्रुष्य यंत्र होते.
"Looks like it's communicating using archaic egyptian language. आपल्या translator ने काही शब्द पकडलेत"
"And they are ? " सेव्ह ने विचारले.
"God Nestar Future Earth"
मांडिल्यने विचारले "तो, umm, ते किंवा जे काही असेल ते नक्की Nestar म्हणते आहे का ?"
"Well, thats what translator is suggesting"
"Nestar नसणार ते, It must be Nile Star"
"And how do you know that, मांडील ?" डेव्ह ने विचारले.
"Nile Star म्हणजे Sirius A. As you already know it's the brightest star in northern hemisphere. Most ancient cultures including egyptians have tons of references for it. In fact entire egyptian calendar was based on Nile star"
"But why is it referring to Nile Star or Sirius A ? Are we not on earth ? and then why is it using archaic egyptian ?"
डेव्ह चे बोलणे पूर्ण होते न होते तो, सिक्स पॅक क्रमांक १ च्या दिशेने खणखणीत आवाज आला.
"Gods of Sirius A welcome residents of future Earth"

Hollywood chalel??? Nidan nidan juna Fireball xl5??? achanak Asami yanchya goshtit sagle Prince William chya barshala jamlyagat english madhe ka boltayt???

सिमंतिनी ३ भारतीय एकमेकांशी कुठल्या भाषेत बोलतील असे तुम्हाला वाटते ? Lol

तेच कशाला तुमचे पोस्ट्सुद्धा Prince William च्या बारशाला जमलेल्या लोकांच्या भाषेच्या लिपीतच लिहिले आहे कि Wink

पात्र परिचय-

sty_1.PNG

इतर-
चार सिक्स पॅक वाले गार्ड्स
सोन्याने मढलेला पण लांडा स्कर्ट घातलेला एक मनुष्य
जास्त दागिने पण कमी कपडे घातलेली एक अप्रतिम सुंदरी

रुमाल.

ह्म्म इतक्या पुढे गेलेल्या काळात फक्त २ जेंडर कशाला? ट्रान्स लोक पण येतील की तोवर सायन्समध्ये. शिवाय सेव देवोईद (humanoid अर्धा माणूस अर्धा मशीन किंवा माणसासारखा मशीन तसा हा Devoid - ardha dev ardha machine) असा विष्णूचा १३वा अवतार आहे अस मला मनापासून वाटतय Super Evolved Vishnu म्हणून त्याला जेंडर माफ. शिवाय फक्त न्यात (नोन) देश का तोवर अजून नवे देश निर्माण होतील किंवा आहेत ते देश तुटतील. लोला, हे सगळ कोस्थक बदलता येईल असा काहीतरी लिही बाई Happy Wink

मै, करेक्ट करत आहे, एक मिन.

बरोबर आहे का पहा, नाहीतर कथेत घोळ व्हायचा. Proud
सिमन्तिनी, थांब जरा. Wink

Pages