मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा ३. सेव्ह द अर्थ

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:11

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्ट थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.

STY-KaCha-Chaitanya.jpg

लेखकः कवठीचाफा

कथा: सेव्ह द अर्थ

साल : ३०२२

स्थळ : सर्व्हाइवल आयलंड

तात्पुरत्या उभारलेल्या त्या तळावरची सगळी तयारी पूर्ण झालेली होती. काही तासांनीच ती टीम एका अतिमहत्वाकांक्षी मोहिमेवर निघणार होती. योजना होती `सेव्ह द अर्थ'. २०२५ च्या जागतिक महायुध्दानंतर एकवटलेल्या उर्वरीत पृथ्वीवरच्या समस्त मानव जमातीनं घेतलेला एक धाडसी निर्णय. शेवटी त्यांनाही काहीच पर्याय दिसत नव्हता. प्रमाणाबाहेर खनिजांचा उपसा, कारखान्यांनी केलेलं प्रदूषण आणि गेल्या शतकांतली अणुयुध्दे यांच्यामुळे रहाण्यासाठी कशीबशी सापडलेली ही सर्व्हाइवल आयलंड सोडली तर पृथ्वीवर कुठेच जमीन म्हणून शिल्लक राहिलेली नव्हती. या बेटांवरचं संख्याबळही घटत घटत काही हजारांवर येऊन ठेपलेलं होतं. वातावरण विरळ होत चाललेलं, जमिनीतून हिकमतीनं काढलेल्या खाण्यायोग्य पिकांचं प्रमाण कमी होत चाललेलं.

सगळ्या परिस्थितीतून एकच आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे काळजीपूर्वक आखलेली समस्त मानवजातीची ही शेवटची मोहीम. मोहिमेवरच्या लोकांची निवडही तशीच काळजीपूर्वक करण्यात आलेली होती. एसइव्ही असं अर्थहीन नाव धारण करणारे अणुशास्त्रातले महारथी, काली हे प्राणीशास्त्रातले शास्त्रज्ञ, वैशयन रसायन शास्त्रातले, एस्-यू हे पदार्थ विज्ञानातले, वेद हा भूशास्त्रातला, मांडील्य हे खगोलशास्त्रातले, मनू हे उत्क्रांती विज्ञानातले, नील हे स्थापत्यशास्त्रातले आणि डेव्ह हा त्यांचा मार्गदर्शक, संरक्षक अशा भूमिका निभावणारा अंतराळवीर असे निवडक लोक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री यांच्यासह काही तासांनी मोहीम सुरू होणार होती. `सेव्ह द अर्थ'- एक महत्त्वाकांक्षी कालप्रवासाची मोहीम.

तिसर्‍या महायुद्धानंतर कित्येक वर्षांपासून ही कल्पना चर्चेत होती. मानवाला होणार्‍या भविष्यातल्या विनाशाची पूर्वकल्पना देऊन सावध करणं, त्यासाठी उलट्या दिशेने कालप्रवास करून त्याच्या अप्रगत काळात जाऊन त्याला प्रशिक्षित करणं. याकरिता कालावधीची निवडही झालेली होती.

सगळीच यंत्रणा एका भल्यामोठ्या यानावर बसवण्यात आलेली होती आणि अर्थात त्यासह कित्येक कोटी वर्षाचा कालप्रवास करण्यासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा एसइव्ही यांच्या प्रयोगांतून अणूंचे विभक्तीकरण करून मिळवण्यात येणार होती.प्राथमिक गरज भागवण्यासाठी शिल्लक राहीलेल्या अण्वस्त्रांच्या वॉरहेडमधल्या प्लुटोनीयमचा वापर करण्यात येणार होता. कदाचित त्यामुळे ही शिल्लक राहीलेली मानवजात धोक्यात येण्याची शक्यताही होतीच पण यश मिळालं तर .... कल्पनातीत समृध्दी.

डेव्हनं यथायोग्य सेटींगवर शेवटची नजर टाकली आणि उरलेल्यांना इशारा केला. सगळ्यांनीच आपापल्या जागा घेतल्या, कालींनी त्यांनी प्रयोगशाळा पुन्हा तपासून घेतली अणि सिध्द असल्याचा इशारा केला.

प्रचंड थरथराट.. जमिनीवर कित्येक मैल लांब उभे राहून आपापल्या संरक्षित घुमटातून पहाणार्‍या उर्वरित लोकसंख्येलाही थरकाप भरवणारा प्रचंड थरथराट, क्षणोक्षणी वाढत जाणारा. लगेच काही मिनिटांनंतर समोरच्या तळावरून अकस्मात एक ऊर्जेची लाट सरसरत निघून गेली आणि त्यातून सावरेपर्यंत तळ रिकामा झालेला.

'सेव्ह द अर्थ' ची टीम तिच्या कार्यावर निघून गेली होती.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

काय झालं पुढे ? ते त्यांच्या कार्यात यशस्वी झाले का ?

-------------------------------------
नियमावली :
१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल, पण पटेल असा असावा. शेवट १८ सप्टेंबर २०१३ला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ पर्यंत व्हावा.
२) आपले शास्त्रज्ञ समंजस आहेत, त्यांना उगीच भांडायला लावून अपघात घडवू नये, इतर कारणानं घडलाच तर सगळ्यांना एकदम मारून शास्त्रज्ञांचा आणि पर्यायानं कथेचा शेवट करू नये. स्मित
३) शास्त्रज्ञ किमान एकदा तरी परत त्यांच्या वर्तमानकाळात आले पाहिजेत, मग परत भूतकाळात गेले तरी चालतील.
४) कथेत मानवी इतिहासाचा वापर केला तर उत्तम
५) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
६) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
७) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
८) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"ओ पावणं, कोन तुमी? हिथं काय करतायसा?" एक तरुण स्त्री डोक्यावर बास्केटसारखं काहीतरी आणि कमरेत एक पितळी भांडं घेऊन उभी असलेली त्याला दिसली. दिमित्रीला पाहून तिनंच हा प्रश्न विचारला होता. >>> अरे देवा इस्रायेलमधली बेनेमराठी समाज काय ही??? का चक्क आपल्या लाडक्या कु सु श्री उषाताई चव्हाण? अस स्टेपल स्टोरच लाल बटन काय छान वाटतय मराठी कथेत.

दिमित्रीच्या यानाचे माहीत नाही, पण मला थोड्याच वेळात विमान पकडायचे आहे दुसर्‍या स्थळाला पोहोचण्यासाठी, त्यामुळे माझी निवृत्ती Happy

मी लॅण्ड होईपर्यंत पृथ्वी सुरक्षीत असेल अशी आशा आहे ...
कथेचे किती शेवट तेंव्हा वाचायला मिळतील ते पाहुया.
STY ला ATB

अरे वा! सहीच केलय की सर्वांनी...

असाम्या,
भारी रे.. !
[माझी 'ती' कॉमेंट अगदीच मनावर घेतलीस का..? तुला ईथे पुन्हा लिहीते करायचा हाच एक ऊपाय आहे का?] Wink

अरे शेवट झालाच नाही का?
ओ संयोजक, थोडा वेळ वाढवून द्या हो. रात्रीचे वीर येवून पुर्ण करतिल गोष्ट. Happy

ठिक आहे. आज रात्रीपर्यंत पूर्ण करु शकता. वाढता सहभाग बघून हा उपक्रम संपायची मुदत अजून १२ तास वाढवली आहे.

मी वाचतेय फक्त. मी लिहिलंय की रात्रपाळीवाली मंडळी संपवतिल म्हणून. मी तुम्हासगळ्यांसाठी मागितली मुदतवाढ. Wink
तू, असामी, मैत्रेयी, लोला, नानबा..तुम्हीसगळे पूर्ण करा. छान चाललिये गोष्ट.

अस्चिग ने कोण त्या दिमित्रीला इथे आणून सोडले अन स्वतः गायब ? इतर कुणीतरी पाठवा रे त्या दिमित्री ला अस्चिग बरोबर त्या LAMAL की ला ला लॅन्ड मधे Wink

दिमित्रीला आपली ओळख आठवायला काही क्षण लागले. बिग ब्यांगच्या आधी काही नव्हत म्हणतात पण तेव्हाही दिमित्री होता. दिमित्री ३०३५ मध्ये होता आणि ४०४५ मध्ये हि असणार होता. कारण तो नेहमीच असून नसल्यासारखा. क्वचित त्याला 'इथर' नाव मिळाले, कधी 'स्पेस', चोप्रांच्या महाभारतात तो 'समय' होता आणि जेव्हा जेव्हा नाव उपलब्ध नव्हत तेव्हा तो 'सामान्य माणूस' होता. त्याचा साधेपणा अंगभूत नव्हता तर त्याच्यावर परिस्थितीने लादलेला होता. सतत बाकीची मंडली साधी आहेत हे उगाळण्यातून आलेला होता. इतर मंडळी - का ली इ इ गेली ३०२२ कडे पण ह्याला सोडून गेली जुन्या काळात. लोक कितीही पुढे गेले तरी दिमित्रीने आजवर तक्रार केली नव्हती. पण आज ह्या समोरच्या स्त्रीने पहिल्यांदा त्याला ओळख विचारली आणि दिमित्रीला वाटले आता आपणच काहीतरी केले पाहिजे. पिरामिड सुटले पण आता हा जो काही काळ मिळालेला आहे तिथेच काहीतरी खटपट केली पाहिजे.
दिमित्रीने विचारले "ताई तुम्ही कोण? आज किती तारीख?" ती बाई म्हणाली "अरे देवा तुमची मेमरी गेली काय? मी प्रतिभाताई, टीसी सिरीजची एक प्रगत रोबो. सध्या शेतीवर काम बघतीये. आज १ डिसेम्बर २०२३" दिमित्रीने सार्या रोबोचा अभ्यास केला होता "ही कुठली सिरीज?" तिने निर्विकारपणे सांगितले "ठप्पा छाप" दिमित्रीच्या लक्षात आले भविष्य वाचवायचे असेल तर ह्याच क्षणाला हिचे प्रोग्रम्मिंग बदलले पाहिजे.

हा माझ्यातर्फे शेवट. सर्वांनी आपापले शेवट लिहा ..............

=================================================================
दिमित्रीने विचारले "ताई तुम्ही कोण? आज किती तारीख?" ती बाई म्हणाली "अरे देवा तुमची मेमरी गेली काय? मी प्रतिभाताई, टीसी सिरीजची एक प्रगत रोबो. सध्या शेतीवर काम बघतीये. आज १ डिसेम्बर २०२३" दिमित्रीने सार्या रोबोचा अभ्यास केला होता "ही कुठली सिरीज?" तिने निर्विकारपणे सांगितले "ठप्पा छाप" दिमित्रीच्या लक्षात आले भविष्य वाचवायचे असेल तर ह्याच क्षणाला हिचे प्रोग्रम्मिंग बदलले पाहिजे.
>> दिमित्रिने तिच्या डोक्यामागे थोडिफार खटपट केली. ती एकदम स्तब्धच झाली. "काय त्रास आहे राव" म्हणत त्याने त्याच्या पोतडीमधून एक tablet सारखे दिसणारे यंत्र काढले नि तिला जोडले. त्या यंत्रावर काही बटणांची खाटखुट केल्यावर तिचे रुप बदलले. "फिक्स झाले असावे बहुधा" म्हणत त्याने मान तिरकी करत तिला निरखून पाहिले. तिची रसरशीत कांती, टपोरे डोळे, डाळींबासारखे ओठ बघून त्याला स्वतःचाच अभिमान वाटला. ते यंत्र सॅकमधे परत ठेवताना त्याचे लक्ष यंत्रावर लिहिलेल्या लोगोकडे गेले. "बरगडी ? काय पण brand name आहे राव" स्वत:शीच पुटपूटत असताना तिने काहितरी विचारले असे त्याला जाणवले.
"काय म्हणालीस ?"
"अब केअ जेअजे च्ल्क्से"
"काय ?"
"प्व्॑ओएम ओ लेक्र्म लेअप्फोव्॑ओअल"
थोडीशी अशी झटापट केल्यावर त्याच्या लक्षात आले कि ती पूर्णपणे कोरी आहे. तिला काहीच ज्ञान नाही.
"अरे कर्मा" म्हणत त्याने परत त्याच्या पोतडीमधे शोधाशोध केली नि एक चकती बाहेर काढली. त्याच्यावरचा apple चा लोगो चमकत होतो. हि बरोबर चकती नाही हे त्याच्या लक्षात आले पण आत्ता इलाज नव्हता. त्याने ती तिच्या तोंडात बसवली.
"My name is Eve, Are you Adam ?" तिने त्याला विचारले.
Eve, Adam, apple, बरगडी. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. "देवा रे देवा" म्हणत दिमित्री तिच्याकडे वळला.

==========================================================

"आत्ता नक्की काय झाले इथे ?"
"काही समजत नाही, आजूबाजूला नॉर्मल तर दिसतंय सगळं.." मनू म्हणाली.
फदिल आणि हबीबा एकमेकांकडे बघून मिश्किल हसले.

मनू "मग इथले आपले काम पूर्ण झाले का ?"
विशिष्ट कोनांतून बनवलेल्या पिरॅमिड मूळे space time curvature बदलले असावे, वेगवेगळ्या intersection मधून वाहणारा काळमार्ग बदलल्यामूळे प्रुथ्वीचा शेवट बदलला असावा अशी आशा तिच्या मनात चाटून गेली. "आधी" केलेल्या चूका परत होता कामा नयेत हे स्वतःला बजावत तिने फदिलला विचारले
“Would you tell me, please, which way we ought to go from here?"
"That depends a good deal on where you want to get to."
"We don't much care where –"
"Then it doesn't matter which way you go.”
"Alice in Wonderland ? त्याचा इथे काय संबंध ? " मनूने विचारले.
"तू मनू आहेस ना ? तूच ठरव" मेनका/हबिबा हसत म्हणाली.

=============================================================

तिने क्रुतककोपाने त्याच्या हातावर एक चापटी मारली.
ती "तू नेहमी सगळे संपत आले कि अशीच काहितरी हिकमत लढवून काहितरी वेगळेच करतोस. "
तो " त्यातच तर मजा आहे, चल परत डाव मांडूया"
म्हणत त्याने सगळ्या सोंगट्या गोळा केल्या नि सारीपाटावर परत मांडायला सुरूवात केली.
वेद, मनू, एव्हा, अ‍ॅडम, काली ............

THE BEGINNING

अरे त्या शीर्षकाकडेही लक्ष द्या लोक्स! - सेव द अर्थ असा अर्थ घेऊन अर्थाचा अनर्थ करू नका. खरं टायटल ' शेव - द अर्थ'

पृथ्वीला वाचवायला निरूपा रॉयला आणा. ती शेव बनवून, ती विकून पृथ्वी वाचवायला पैशे (पक्षी अर्थ) मिळवेल.

मामी Happy इतकी जंगलतोड चालू आहे कि शेव द अर्थ चालूच आहे. निरुपा रोय का? मला मेगन फोक्स आणायची होती पण सिनेमा नाही सांगितल. मग त्यापेक्षा जास्त दुसर इंटरतेनिंग काय??

शेवटाकरताचा माझा रुमाल.
असामीच्या भागाच्या आधीपर्यंतचीच गोष्ट सगळ्यांनी शेवटाकरता वापरली तर नंतरच्या फाट्यांमुळे काही बिघडणार नाही.

माझा (मी केलेला :P) शेवटः

खरतर का ली वगैरे मंडळी दमित्री उर्फ काळाला मागे सोडून गेली वगैरे सगळं फिगरेटिवली.. लिटरली नव्हे.
कारण काळाला कोण कुठे आणि कसं सोडणार?
काळ असतोच.
तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणारे. आणि काळाच्या दृष्टीनं आज, उद्या, परवा असं काही नसतं. काल-उद्या-परवा हे सगळं ऑब्जर्वर करता. पण ऑब्जर्वर नसला तरी काळ असतोच. पण त्याचं मापन करणारं कुणी नसतं.
मग त्याच न्यायानं काळाच्या दृष्टीनं भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ असं काही नसतच.
---------------------

शास्त्रज्ञांचा चमू काळाच्या फेर्‍यात पुढे मागे करत राहिला, पण त्यांच्या पृथ्वीचा भूतकाळ बदलणं त्यांना शक्य नव्हतं. जर कधीकाळी जमलच असतं तर ती "त्यांचीच पृथ्वी" राहिली असती का - हा ही एक प्रश्न आहे. म्हणजे बाह्यांग तेच, पण आंतरात्मा बदललेला एखादा माणूस भेटला, तर तुम्हाला कसं वाटेल? आणि एकदा भूतकाळ बदलला, तर बाह्यांगही तेच राहिल ह्याची खात्री कोण देणार?

असो, तर पृथ्वीचा भूतकाळ बदलणं त्यांना शक्य झालं नाही.

शेवटी कष्टी होऊन ते परत २०५० मधे आले ते मनात काहीतरी विचार घेऊनच.
सर्व्हायवल आयलंडची लोकसंख्या तोपर्यंत आणखीन रोडावलेली. सजीवाला जगण्यासाठी लागणारी नैसर्गिक सामुग्री आणखीन कमी झालेली. विचारी, ज्ञानी लोक, अभियंते, तंत्रज्ञ यांना हाताशी घेऊन त्यांनी एक शेवटचा प्रोजेक्ट हातात घेतला.

प्रोजेक्ट : सेव द अर्थ.

उत्क्रांती तज्ञ असलेल्या मनूच्या हाताखाली हा प्रोजेक्ट राबवला गेला.
प्रत्येक माणसाच्या योगदानानं आखणी केली गेली. बी- बीयाणं, सजीवांची बीजं ह्यांना गोठवून ठेवलं गेलं. संगणक उभारले. हे संगणक वातावरणाचा वेध घेत रहाणार होते, पृथ्वीची पहाणी करत रहाणार होते. ज्याक्षणी जीवसृष्टी करता योग्य वातावरण तयार होईल त्याक्षणी ते पुन्हा पेरणी करणार होते, सजीवांना पुन्हा एकदा "कल्टिवेट" करणार होते.
हे सगळं करताना पृथ्वीला वाचवायचच हा विचार पक्का होता, त्यामुळे त्यांनी जीवसृष्टीचं मॉडेल तयार करताना जाणीवपूर्वक एक गोष्ट टाळलेली - ती म्हणजे मनुष्य प्राण्याचं बीज साठवणं.

मनुष्य जात शेवटी तरी शहाणी झाली. अंडर द अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड गायडन्स ऑफ मनू - मिशन वॉज सक्सेसफुल! द अर्थ वॉज सेवड!

१९०८:
दिमित्रीला शुद्ध आली तेंव्हा त्याच्या घराच्या ठिकाणी एक मोठे विवर दिसले. आजुबाजुची झाडे उन्मळून पडली होती. शेजारी पडलेला सोन्याचा दगड त्यानी उचलला, हसला, आणि जंगलात नाहीसा झाला.
----------------------
-२६३०:
डेव्हचा पारा आता चढू लागला होता. तो फदिल आणि हबिबाकडे हळूहळू सरकू लागला. त्यांच्या लक्षात येऊनही त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. पुन्हा मिश्किलपणे हसून त्यांनी एकाचवेळी आपापल्या घड्याळांकडे पाहिले आणि गुढपणे म्हणाले: ότι είναι καιρός . तितक्यात त्यांच्या आणि डेव्हच्यामध्ये कोणीतरी अवतरले.
फ-ह: 'ये दिमित्री, तुझीच वाट होती'
वेद: ???
मै-अ-सि: 'आता हा दिमित्री कोण'?
फ-ह: 'दि मित्र. पण आदराने त्याला स्त्रिलिंगी हाक मारायची पद्धत आहे: दि मित्री. काळाचा मालक हाच. त्यामुळेच याला नुसते 'दि' पण म्हणतात.'
मांडिल्य, अचानक आपले कर्तव्य आठवून: 'पण अहो आम्ही पृथ्वी वाचवायला आलो आहोत'
फ-ह: 'घाई काय आहे?'
मांडिल्य: तुम्हाला नसेल, पण आम्हाला आहे.
हबिबा, मंद हसत: तुम्हाला नको म्हणू, नुसते 'तु'ला म्हण.
मांडिल्य: 'आदरार्थी नव्हतो म्हणालो, तुम्हा दोघांना उद्देशून तसे म्हणालो मी.'
फदिल: ती आमच्याबद्दलच बोलत होती. आम्ही इतके एकरूप आहोत, की दोघे मिळून 'मी' आहोत.
डेव्ह: 'हा काय फदिलपणा आहे?'
ह, आपले स्मीत न ढळू देता: 'नावं ठेवायची गरज नाही'
आतापर्यंत शांत असलेला दिमित्री: 'तुम्ही काळात इतके मागे आला आहात की खोडंच म्हणायला हवं तुम्हाला. फॉसिल्स. ट्री.
नील, आतापर्यंत बंद असलेले डोळे उघडत: आय गेट इट! दि मि ट्री. वुई आर द ट्रिनिटी. फ आणि ह हे अॅडम आणि इव्ह, आपण झाड, आणि दिमित्री काळ रुपी शेष.
फ-ह-दि: अगदी जवळ पोचलास, ब्राव्हो!
नील: आता पुर्णच खुलासा करा की.
दि: कालप्रवासात आपले तीन भाग होतात. एक तिथेच राहून भूत-भविष्याबद्दल काही न जाणता पुढे सरकत राहतो, एक सेट केल्याप्रमाणे क्ष कालावधी इतका मागे जातो तो पराभौतिकी, तर तिसरा, भौतिकी, त्याच्या पाचपट. जे काही बदल करायचे ते काळाच्या मदतीनी पराभौतिकी करु शकतात. भौतिकी मात्र quantum entanglement मध्ये आपल्या स्वप्नांबरोबर अडकून बसतात. इथे काहिही होऊ शकतं आणि होत असतं. खुद्द काळ तिथे येईपर्यंत. काळ आला की जाणवतं की आपणच आहोत ट्रिनिटी आणि त्याशिवाय असलेले सर्व काही …
-------------
३०२२:
एल्मा सेव्ह आदी लोकांकडे पळत आली. स्फोटानंतर ते शुद्धीवर येतच होते. तिला पाहताच सुने सुन्नपणे विचारले, 'तु कशी इथे? आमचे यान नाही गेले तर भूतकाळात. वुई आर डुम्ड'.
'मे बी नॉट', आपल्याशेजारी सापडलेल्या टपोऱ्या हिऱ्याकडे हरखून पहात वैशयन म्हणाला, 'हा हिरा नक्कीच स्फोटात निर्माण झाला असणार, आणि आपण अजूनही जिवंत आहोत म्हणजे कालप्रवास नक्कीच सुरु झाला'.
काली: अरे पण आपला भौतिकी भाज -२६३० मध्ये आणि पराभौतिकी १९०८ मध्ये जाणार होता ना? मग आपण एल्मा बरोबर ३०२२ मध्ये कसे?'
यावर प्रसन्नपणे हसून एल्मा म्हणाली: 'कारण तिसरा एक कंपोनंट असतो. भूत, भविष्याची ही चक्र अविरत पणे फिरत असतात. पण न पूर्णपणे डिटरमिनिस्टिकली, न पूर्णपणे रॅंडमली. आपण त्यात विचारपुर्वक बदल घडवू शकतो. तीच नव्हती का आपली मिशन?'
मांडिल्य: 'पण तीन भाग? होली शीट! ते खरे आहे तर.'
एल्मा: 'इंडीड, शीट इज ट्रु. आय मीन, ट्रिनिटी इज ट्रु. बट इट इज नॉट होली'.
मनु: 'तुला हे माहीत होतं तर?'
एल्मा: 'आधी न सांगीतल्याबद्दल क्षमा मागते. पण तुम्हाला आधी सांगीतलं असतं तर अनकॉन्शसली तुमच्या मिशन मध्ये बाधा आली असती.'
वेद: 'ते कसे?'
एल्मा: 'तुम्ही ज्या "दिमित्री" ला पटवायला गेलात तो "ट्रिनिटी" चाच एक सर्वव्यापी प्रकार, पण स्पेशल डायमेन्शन्सचा - म्हणजे सर्व काळ असणारा - दिमित्री, त्रि दिमी, मी थ्रिडी वगैरे'
नील: 'पण मग आता?'
एल्मा: 'आता काही नाही. वुई लिव्ह हॅपिली एव्हर आफ्टर'
डेव्ह: 'हॅ, पण पृथ्वी वाचवायची होती त्याचं काय झालं?'
एल्मा: 'मृत्यु कोणाचा टळला आहे? तो यायचाच. पृथ्वीलापण. पण आपण, म्हणजे तुमचे दोन भाग भूतकाळात जाऊन इतर पृथ्व्यांकरता योग्य ते बदल करताहेत. चला पार्टीची तयारी झाली आहे'.
--------------------------
Earth No End. QED
--------------------------

याच कथेवरून
कचा व माझी बरीच चर्चा झाली होती
तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही Happy
भूतकाळातील साधी शुल्लक गोष्ट सुध्दा भविष्यकाळासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकते,,
असो,,,, यावर प्रचंड चर्चा फार पुर्वी झालेली

नानबा आशिष तुमचे शेवट आवडले. आशिष ला सुद्धा शब्द खेळ करायचा मोह आवरला नाहि शेवटी. " दिमित्री, त्रि दिमी, मी थ्रिडी वगैरे" Happy

क्लासच, मजा आली वाचताना, प्रत्येक शेवट समर्पक Happy ब्ल्यु प्रिंट सकट (थॅंक्स टू मामी ) कालप्रवास घडला.. Happy

Pages